Thursday, May 31, 2012

ती लाजते जेव्हा... १.१


तिच्या हि आयुष्यात तो दिवस आला जेव्हा तिच्या नकळत कोणी तिच्या आयुष्यात शिरलं, ज्याच्या डोळ्यात ती ह्या जगाला आणि तिच्या त्रासाला विसरून जाईल... पण तो असा येयील तिच्या आयुष्यात असा नवता वाटला तिला... नेहमी प्रमाणे ती १ स्टोप आधीच उतरली बस मधून , विचार, जे त्या दिवसात तिचे घनिष्ट मित्र होते तिच्या सोबतच होते, विचार करत - करत ती चालली होती, खूप दमली होती ती, निराशे ची तिला सवय झाली होती, पुढे काय होईल काही काळात नवते, आज उन जास्तीच वाटत होता, तहान हि लागली होती, चालना कठीण होत चालला होता प्रत्येक पावलावर, शेवटी ती एका कट्ट्यावर जावून बसली, मंदिर दिसत होता तिला बाजूला, घंटी चा नाद ऐकायला येत होता, बहुतेक दुपारची आरती चालली असावी, तिने विचार केला, आत जाण्याची खूप इच्चा होती पण शरीर काही साथ देईना, शेवटी खाली मान घालून ती तिथूनच आरतीत सामिलीत झाली, खूप विश्वास होता तिचा देवा वर, असतोच न आपला, लहान पण पासून परी आणि राजकुमार च्या कहाण्यात रमलेले आपण कॉलेज संपला कि खरी दुनिया कळते, तशीच ती हि आपले धडे घेत होती. तिच्या ह्या विश्वास मुलेच तिला जगण्याची प्रेरणा मिळत होती, तिला विश्वास होता देव नक्की सगळा ठीक करेल, तिची परीक्षा घेत आहे तो आणि थोड्या दिवसात ती ह्या परीक्षेत पास होवून चं जीवन सुरु करणार आहे.

आपल्या विचारात मग्न, आरतीच्या तालावर मान हलवत ती तिथेच बसून राहिली, थोड्या वेळाने बरे वाटू लागले पण तरी तहान लागली होती, तिची भिरभिरती नजर पाणी शोधू लागली, तितक्यात तिथे तो आला आपल्या विक्टर वर, "तुम्ही खूप काळजीत दिसतंय? रस्ता चुकलात का? मी सोडू का तुम्हाला कुठे? "           
तिने त्याच्या कडे बघितला हि नाही, तिला ठील्लार्बाजी अजिबात आवडत नवती आणि ती अस्य मुलांच्या नदी लागण्या च्या इच्छेत हि नवती... ती भरभर पावूल टाकू लागली ते परत त्याने हक मारली," अहो तुम्ही खूप थकलेल्या वाट्य मी सोडतो न तुम्हाला, काही काळजी करू नको मी चांगल्या घरचा मुलगा आहे, फक्त तुम्हाला मदत करू इच्छितो" 
तिचे पाय थांबले, विचार हि थांबले, जणू सुन्न झाला सगळा शरीर, तरी ती पाय पुढे टाकण्याचा प्रयत्न करू लागली, नवतं तिच्या शरीरात तेवढा बळ, ती चक्कर येवून तिथेच पडली. "अरे बापरे मी असा काय बोललो कि ह्या चक्कर येवून पडल्या... मी चांगल्या घरचा नाही का? " स्वताशी पुटपुटत त्याने गाडी stand वर लावली आणि पटकन तिला बघायला गेला... 

पाण्या साठी त्याची नजर भिरभिरू लागली, पाणी काही दिसेना, मग तिला कट्ट्यावर बसवून भिंतीचा आधार दिला आणि बाजू च्या फुल वाल्या काकू कडे गेला... "काकू त्या तिकडे बेशुद्ध पडल्यात, मी पाणी घेवून येतो तुम्ही थोडा लक्ष ठेवा त्यांच्या कडे "  असा म्हणत तो मंदिरात गेला, पाणी मंदिरात तर मिळेलच पाय धुण्य करिता असाच न, "वाह साहिल हुशार आहेस तू किती" नळ बग्तच त्याने स्वतः ची तारीफ सुरु केली, "अरेच्या पण पाणी नेणार कसा? ओंजळीत घेतला तर तिथे पोचू पर्यंत संपले सुद्धा पाणी" इकडे तिकडे शोधू लागला ते त्याला नारळ फोडलेले  तुकडे दिसले, त्याने चांगला मोठा, खोलगट तुकडा घेतला आणि त्यात पाणी घेवून निघाला, तिच्या जवळ येवून थोडा तिच्या चेहऱ्यावर पाणी मारला, चित्रपटात दाखवतात तशी ती शुद्धी वर आली आणि "मी कुठे आहे म्हणू लागली"  आपल्या हेरो ला आला tension, बाई ची याद्शात वगेरे तर नाही न गेली? त्याच्या मनात भलते सलते प्रश्न येवू लागले, "तुम्ही इथे गणपती मंदिरा पाशी आहात" त्याने थोडा पाणी तिला पिण्यासाठी दिला,तिने आपल्या चेहऱ्यावर हास्य आणायचा प्रयत्न केला आणि पाणी पियू लागली, वर्ष भाराची तहान भागल्या सारखा वाटू लागला, त्यला धन्यवाद देण्या करिता ती त्याच्या कडे वळली, तो आपला रुमाल काढून हाथ पुसण्यात मग्न होता, त्यच्या चेहऱ्यावर अंधार पडत होता, पण त्याचे केस वार्यावर सळसळ करत होते, चेहर्यावरची खळी बराच काही सांगून जात होती, आपल्या रुमालाची घडी करत तो म्हणाला "मी म्हणालो होता न तुम्हाला मी सोडतो? बघा चक्कर येवून पडलात, कधी ऐकायचा असतं कोणाचा" आणि तो आपल्या विक्टर कडे वळला, गाडी चालू केली आणि म्हणाला "आता तरी येणार आहात कि नाही? मी सोडतो तुम्हला". त्याच्या वाक्यांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आणले, आणि मान हलवत ती त्याच्या जवळ आली. 

"येते तर महाले पण कस बसू?" ती ह्या आधी कधी एका मुलाच्या मागे गाडी वर बसली नवती, देवाचा नाव घेत ती बसली,"अरे देवा गाडी ला पकडायला काही नाही" ती गाडी चाचपळत बडबडली, "तुम्ही मला धरू शकता,
मला राग नाही येणार " तो हसत म्हणाला, तिला तो थोडा विचित्रच वाटला, पण तिने दुर्लक्ष केले, रस्ते तर माहीतच आहेत पुण्यातले आपल्याला, वरून त्याने गाडी नाही विमान चालवत असल्या सारखी गाडी पळवली, आपला जीव मुठीत घेवून ती गाडीलाच घट्ट धरून बसली होती, तिच वसतीघृह जवळ आल्यवर तिने त्याला गाडी थांबवायला लावली, ती उतरली आणि धन्यवाद देवून जावू लागली, ते त्याने तिला परत हाक मारली, 
"उम्म मला माहित आहे तुम्हला आवडणार नाही, पण मी खरच काळजी पोटी विचारात आहे, तुम्हाला नाही सांगावासे वाटले तर नका सांगू, पण मी एक विचारू?"   
"हो बोला न " ती दीर्घ स्वस सोडत म्हणाली
"तुम्ही मला खूप काळजीत वाटता, मी काही मदत करू साहत असेल तर, आणि तुम्हाला जर ठीक वाटल तर, काय problem आहे?"
" नाही तस काही नाही, हो विचित्र आहे, आपण पहिल्यांदाच भेटलो असे आणि तुम्ही मला, I mean मी माझ्हे प्रोब्लेम्स सांगतीय तुम्हाला, मी गेल्या बर्याच दिवसां पासून नौकरी शोधात आहे, पण काही काम होत नाही आहे , त्याच्याच काळजीत आहे थोडी " तिचे डोळे पाणावले, पण तिने स्वताला सांभाळून घेतला.
"बस येवडेच, माझ्या कडे आहे एक offer जर तुम्हाला ठीक वाटतात असेल तर " तिचा आनंद जणू द्विगणित झाला, "काय खरं!!" 
"हो पण BPO ची offer आहे चालेल का तुम्हाला, म्हणजे त्यात रात्रपाळी वगेरे असते आणि मुलीना हि करावी लागते जर तुम्ही तयार असाल तर मी बोलतो माझ्या वारीष्टांशी "
रात्रपाळी बद्दल ऐकून शिवानी थोडी घाबरली, तिने त्याला थोडा विचार करायला वेळ मागितला, त्याचा नंबर घेतला जेव्हा तो नंबर save करू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले आपण तर नाव विचारलेच नाही थोड विचित्र चाललं होता सगळ शेवटी तिने त्याला विचारला "sorry मी तुच नाव विचारायचा विसरले!" 
"अरे हो, मी पण नाही विचारले, मी साहिल आणि तुम्ही?"
"माझं नाव शिवानी थांक्यौ मी करते कॅअल तुम्हाला "
"ठीक आहे, आणि हो काळजी करू नका, तुम्ही हसताना  छान दिसत, काळजीत नाही " आणि तो तिथून निघाला.. 
शिवानी आपल्या रूम मध्ये आली, बर्याच दिवसांनी तिला एक आशेची किरण दिसली, "पण आई बाबा, तयार होतील का ते? " लगेच प्रशा उत्भवायला लागले. मी दुसरा जोब शोधत राहील, तो पर्यंत हा करायला काय हरकत आहे, तिने स्वताशी निश्चय केला. संद्याकाळी आई बाबा न फोन करून विचारीन, थोडं बारा वाटू लागला तिला. थकल्या मुले कधी झोप लागली कळलाच नाही तिला, ती संध्याकाळी उठली तेव्हा तिने पाहिलं काम फोन चा केलं. 
फोन नेमका बाबा नि उचलला काही बोलू नाही शकली ती, इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, मन  सारखा  आई शी कधी बोलते ह्या कडे डोळे लावून होता शेवटी आली आई शी बोलण्याची वेळ आली, " आई तू कशी आहेस, मला तुला काही विचारायचा  आहे"  ती थोडी आड्खलत बोलू लागली 
"आग बोल कि मग बेटा, काय झाला सगळ ठीक आहे न?"
"मला एक जोब ऑफर आहे "
"काय खरं?? मिळाला तुला... ऐकलं गं बाई देवानी माझे,  गणराया धन्य आहेस तू " तिची आई तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच सुरु झाली. 
"ऐक न गं आई आधी, तु आपल निट ऐकून तर घे, जोब BPO मधला आहे "  ती थोडं घाबरत घाबरत बोलू लागली 
"अगं मग काय झालं? तू खुश आहेस न, आम्हाला काही हरकत नाही तू खुश तर आम्ही खुश, त्यात काय येवढा बेटा" तिच्या आई ने तिला आश्वासन दिला.. 
"अगं आई BPO म्हणजे कळल का तुला, मला रात्रपाळी हि करावी लागेल, चालेल न तुम्हाला?" तिला वाटले आई ला कळलाच नाही ती काय बोलतीय.. 
"मला माहित आहे, तुझ आई म्हणजे तुला अडाणीच वाटते, माहित आहे मला त्यात रात्रपाळी करावी लागते, तू जपून रहा, सावध रहा, बाकी काही नाही तू ज्याच्या खुश त्यात आम्ही हि खुश" तिच्या आई नि परत अशा दाखवली "पण बाबा? तू एकदा त्यना विचारून मला संग, मी नाही बोलणार त्यांच्या शी तूच बोलून संग मला "
"अरे वा असे कसे, इतकी चांगली बातमी आणि ती तू नाही द्याची त्यांना.. तूच बोल त्यना हे घे  " अस  म्हणत तिच्या आई ने फोन तिच्या बाबांकडे दिला 
"काय गं चिवू काय झालं? कसली बातमी? काय म्हणतीय तुझही आई?" तिचे बाबा लाडात येत म्हणाले ज्याने करून तिला जास्ती भीती नको वाटायला..
"बाबा ते मला ऐक जोब ऑफर आली आहे पण ती न... BPO मध्ये आहे आणि त्यामुळे मी विचार करत होती करावा कि नाही, कारण त्यात रात्रपाळी हि करावी लागते" तिने एका श्वासात सगळा काही सांगून टाकला 
"तुला विश्वास आहे न तू करू शकतेस?"
"उ हम्म वाट्य मला मी करू शकेल... "
"ठीक आहे न मग... कर काही हरकत नाही आणि त्या सोबत तुझी दुसर्या जोब ची शोध मोहीम हि चालू ठेव, म्हणजे दुसरी कडे लागला कि काळजी मिटली काय? काही नसण्य पेक्षा हातात काही असलेले बरे, तुझा वेळ तर जाईल... आणि हो बेटा सावध राहायचा बारा काय चिवू ताई आपण TV वर एकतो कि नाही किती तरी बातम्या, तर आपल्या बाजू ने थोडं सावध राहा आणि स्वताला जप, मला बाकी काही प्रोब्लेम नाही तू जॉईन कर "
"थंक यौ बाबा, मी काळजी घेईल माझी आणि सावध हि राहीन, अजून interview व्हायचा आहे माझा, झालं कि कळवते तुम्हाला." तिने सुटकेचा स्वाश सोडला. आज तिच्या आनंदाला सीमा नवती, इतक्या दिवसां पासूनची तडप, बेचैनी, आज सगळे तिचे कष्ट कारणी लागणार होते, तिने साहिल ला फोन करण्याचा विचार केला पण रात्र झाली होती आणि तो काय विचार करेल, म्हणून मग तिने दुसर्या दिवशी फोन करण्याचा विचार केला... 
बर्याच दिवसांनी तिला आज चं शांत झोप लागली.... 

...क्रमश:

4 comments:

 1. hey hi nishi ,remember pallavi here ,mala tuze blog far far avadtat ,ani ha pan far chan ahe ,tula sagate tuzya blog chi aturte ne wat pahat

  aste me, just saturday sunday ala na ki boar hote karan tuze blog ch nastat na ,ani kadhi pan tuza blog read kelananter ase watat ki lagech

  comment karave pan acess nahi na :( mhanun just dusre che comment pahate . pan nishi kharach i like ur blog ,ani tu mhanali hoti ki tu

  book publish karnar ahe kay kothe parayant ale ahe ?...

  ReplyDelete
 2. Hey Pallavi,

  offcourse I remember.. :)
  thanks for ur comment..
  mala khup annad zala tuzhi comment baghun..
  ani tyache connents baghun azun jasti...

  thank u so much for showering ur love liek this...

  book... yaar mala vel nahi milat aahe.. I tried with 1 publisher but didn't turn up... ani kam khup wadhla aahe..
  may be delay hoil thoda...
  to paryant online blog wach mazhe.. :)

  tula koni mahit asel publisher tar sang... :)

  ReplyDelete
 3. publisher mahit nahi pan mala book read karayla awadte.;)

  ReplyDelete
 4. kay baba konachi tari mumbai la maza chalu ahe ;) enjoy dear take care

  ReplyDelete