Sunday, August 9, 2026

TBN...Navyane Promo2

काही माणसं जन्मताच गर्दीत उठून दिसतात. ओंकार त्यातलाच एक — देखणा, हुशार, आत्मविश्वासाने भरलेला, आणि कॉलेजमध्ये ज्याच्या शब्दाबाहेर कुणी जात नाही असा एक 'हिरो'. पण याच दबदब्याच्या मागे एक असा अहंकार लपलाय, जो कधीतरी त्याच्याच पायाखालची जमीन सरकवणार आहे. डिझाईन स्टुडिओतली त्याची सत्ता, कँटीनमधली त्याची 'कटिंग' आणि इतरांकडे बघण्याचा तो तुच्छतेचा दृष्टिकोन — हे सगळं त्याच्या आयुष्यात लवकरच एका मोठ्या आरशासमोर उभं राहणार आहे. आणि याच गर्दीत, त्याच्या नजरेच्या टप्प्याबाहेर, एक अशी मुलगी आहे जिच्याकडे तो ढुंकूनही बघत नाही — पण जिच्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. अहंकाराचा हा महाल किती काळ टिकेल? आणि तो जेव्हा कोसळेल, तेव्हा त्याखाली नेमकं कोण दबेल? ओंकारचा हा दबदबा आणि त्यामागचं खरं वादळ अनुभवण्यासाठी "तू भेट ना... नव्याने" वाचा. ~.~.~.~ मैत्री म्हणजे जुन्या इमारतीचा तो भक्कम पाया असते, ज्यावर कितीही मोठी वादळे आली तरी, विश्वासाची भिंत कधीच कोसळत नाही... ती फक्त उभी राहते, प्रत्येक ऋतूत, प्रत्येक सावलीत... ओंकार आपल्या नेहमीच्या कोपऱ्यातल्या टेबलाजवळ उभा होता. त्याची काळ्या रंगाची ड्राफ्टिंग ट्यूब त्याच्या पाठीवर होती. तो अत्यंत शांतपणे आपल्या आजूबाजूचा गोंधळ बघत होता. तेवढ्यात समोरून पीटर धावत आला. त्याचे केस विस्कटलेले होते, शर्टाची बटणे वेडीवाकडी लागली होती आणि हातात एक अर्धी-अधुरी डिझाईन शीट होती. "वाचव भावा... आज माझा मर्डर फिक्स आहे. कदम सर आज मला कच्चं खातील!" पीटर धापा टाकत ओंकारच्या अंगावरच कोसळला. "भावा, माझं डिझाईन बघ ना. टॉयलेटचा ब्लॉक चुकून किचनच्या वर आलाय माझ्या प्लॅनमध्ये... सर बघतील तर मला त्याच टॉयलेटमध्ये फ्लश करतील!" पीटरने अक्षरशः रडवा चेहरा केला. ~.~.~.~ "प्रतीलिपीवर सारख्याच धाटणीच्या CEO Romance, Surrogate Mother किंवा कौटुंबिक कटकारस्थानांच्या कथा वाचून काहीतरी वेगळं वाचायची इच्छा होतेय?" मग तयार व्हा... 💛 Fresh College Romance ❤️ Emotion 🕵️ Suspense 🤝 Friendship 💔 Unpredictable Twists अशी कथा, जिथे प्रत्येक भाग संपताना तुमच्या मनात एकच प्रश्न असेल... "आता पुढे काय होणार?" 👀 आणि आता येते सर्वात भन्नाट बातमी... 🥳 🎉 या कथेचे भाग आधीच लिहून पूर्ण झाले आहेत! हो... बरोबर वाचलंत! म्हणजे एकदा या कथेच्या प्रेमात पडलात की... "पुढचा भाग कधी येणार?" अशी वाट बघायची गरजच नाही! 😉 --- 📖 प्रतिलिपीवर नवीन आहात? मग हे नक्की वाचा... माझ्या कथा वाचण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. 🌟 पर्याय १: Superfan बना (Recommended) फक्त ₹२५/महिना मध्ये Superfan Membership घ्या आणि... ✨ सगळे Parts... सगळे १० Seasons एकाच वेळी Unlock करा! 📚 मनसोक्त Binge Read करा. 🚫 No Waiting. No Rok-Tok. ❤️ मी पण तुम्हाला मध्येच थांबवणार नाही! यासोबतच माझ्या इतर सर्व कथा आणि कथामालिकाही सलग वाचता येतील. --- 📚 पर्याय २: Free मध्ये वाचा माझ्या Pratilipi Profile ला Follow करा. Nishigandha Omanwar ❤️ 📖 १५वा भाग पूर्ण झाल्यावर, दररोज एक नवीन भाग मोफत Unlock होईल. 🔔 Profile Follow केल्यावर पुढचा Free Part उपलब्ध होताच Notification मिळेल. --- 👇 कथेची लिंक खाली कमेंटमध्ये दिली आहे. आजच Story Library मध्ये Add करा आणि एका वेगळ्याच कॉलेज रोमांसच्या, मैत्रीच्या आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रवासाला सुरुवात करा! 💛 वाचल्यानंतर Comment करून नक्की सांगा... पहिल्याच भागाने तुम्हाला किती गुंतवलं? 💬 Because... ❤️ Keep Reading. Keep Loving. Keep Bingeing. (All kinds of love are accepted in the form of ❤️ Likes • 💬 Comments • 🔄 Shares • ⭐ Ratings • 🎁 Stickers • 🌟 Superfan.) तुमची, Natkhat Nishi❤️ https://marathi.pratilipi.com/series/tu-bhet-naa-navyane-by-online-pl8jeatqnedm

Saturday, August 8, 2026

TBN Navyane.. promo1

पहाटेचे साडेपाच वाजलेत. दादरच्या एका जुन्या मध्यमवर्गीय वस्तीत, एका खोलीत टेबल लॅम्पचा पिवळसर प्रकाश अजूनही तेवतोय. रात्रभर जागून, आठ तास ड्राफ्टिंग बोर्डवर वाकून काम करणारा ओंकार — त्याचे डोळे लालबुंद आहेत, बोटांवर ग्रॅफाईटचे डाग आहेत, पण चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आहे. इमारती फक्त विटा आणि सिमेंटने उभ्या राहत नाहीत, तर त्या उभ्या राहतात माणसांच्या श्वासांवर, त्यांच्या आठवणींवर — हा ओंकारचा विश्वास आहे. आणि हाच विश्वास त्याला त्याच्या बाबांनी, श्रीकांतरावांनी दिलाय — ज्यांच्या डोळ्यांतल्या अभिमानासाठी ओंकार रोज स्वतःला घडवतो आहे. पण नियतीच्या आराखड्यात असं काही लिहिलेलं आहे, जे ओंकारच्या या सुंदर, रेखीव जगाला लवकरच हादरे देणार आहे. एक असं वळण, ज्याची त्याला आत्ता पुसटशीही कल्पना नाही. बाप-लेकाचं हे नातं, हे स्वप्न, आणि त्यामागे लपलेलं ते न दिसणारं वादळ — हा प्रवास सुरुवातीपासूनच तुमचं काळीज घट्ट पकडून ठेवेल. ओंकारच्या आयुष्यातला हा 'निळाशार आराखडा' त्याला कुठे घेऊन जातो, हे जाणून घेण्यासाठी "तू भेट ना... नव्याने" जरूर वाचा. ~.~.~.~ स्वप्नांच्या निळ्याशार कागदावर... रेखाटतोय मी आयुष्याचा नवा आराखडा, जिथे प्रत्येक रेषेला आहे एक अर्थ, आणि प्रत्येक वळणावर आहे एक नवा धडा... पहाटेचे साडेपाच वाजले होते. दादरच्या त्या जुन्या, मध्यमवर्गीय वस्तीत अजूनही रात्रीचा एक मवाळ आळस रेंगाळत होता. खिडकीबाहेरच्या प्राजक्ताच्या झाडावरून टपटप पडणाऱ्या फुलांचा मंद सुगंध आणि कुठूनतरी दूरवरून येणारा लोकल ट्रेनचा धूसर, लयबद्ध आवाज... हे सगळं मुंबईच्या पहाटेचं एक नेहमीचं पण तितकंच हवहवंसं वाटणारं संगीत होतं. पण या शांततेतही ओंकारच्या खोलीत मात्र एक वेगळीच लगबग रात्रीपासूनच थांबलेली नव्हती. टेबल लॅम्पचा तो पिवळसर प्रकाश ओंकारच्या चेहऱ्यावर पडला होता. रात्रीचे जागरण आणि सलग आठ तास ड्राफ्टिंग बोर्डवर वाकून काम केल्यामुळे त्याचे डोळे लालबुंद झाले होते. बोटांवर ग्रॅफाईटचे काळे डाग पडले होते आणि पाठीचा कणा अक्षरशः दुखून निघाला होता. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक विलक्षण समाधान होतं. त्याने हातातली 'रोटरिंग पेन' बाजूला ठेवली आणि एक दीर्घ श्वास घेत आपल्या समोरच्या त्या मोठ्या A0 साईझच्या ड्रॉईंग शीटवर नजर फिरवली. कदम सरांची ती शेवटची आणि सर्वात कठीण 'डिझाईन सबमिशन' त्याने अखेर पूर्ण केली होती. एका जुन्या, पडक्या वाड्याचे त्याने केलेले ते 'री-डिझाईन' त्याच्या मेहनतीची साक्ष देत होते. इमारती फक्त विटा आणि सिमेंटने उभ्या राहत नाहीत, तर त्या उभ्या राहतात त्या माणसांच्या श्वासावर, त्यांच्या आठवणींवर... हा त्याचा विचार त्या डिझाईनच्या प्रत्येक रेषेतून स्पष्ट दिसत होता. "चला, फायनली डन!" तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने ती शीट अत्यंत काळजीपूर्वक गुंडाळली आणि आपल्या काळ्या रंगाच्या 'ड्राफ्टिंग ट्यूब'मध्ये ठेवून दिली. खिडकीतून आत येणाऱ्या पहाटेच्या गार वाऱ्याने त्याला अचानक झोपेची जाणीव करून दिली. तो थेट बेडवर कोसळला आणि त्याने गोधडी तोंडावर ओढून घेतली. ~.~.~.~ "प्रतीलिपीवर सारख्याच धाटणीच्या CEO Romance, Surrogate Mother किंवा कौटुंबिक कटकारस्थानांच्या कथा वाचून काहीतरी वेगळं वाचायची इच्छा होतेय?" मग तयार व्हा... 💛 Fresh College Romance ❤️ Emotion 🕵️ Suspense 🤝 Friendship 💔 Unpredictable Twists अशी कथा, जिथे प्रत्येक भाग संपताना तुमच्या मनात एकच प्रश्न असेल... "आता पुढे काय होणार?" 👀 आणि आता येते सर्वात भन्नाट बातमी... 🥳 🎉 या कथेचे भाग आधीच लिहून पूर्ण झाले आहेत! हो... बरोबर वाचलंत! म्हणजे एकदा या कथेच्या प्रेमात पडलात की... "पुढचा भाग कधी येणार?" अशी वाट बघायची गरजच नाही! 😉 --- 📖 प्रतिलिपीवर नवीन आहात? मग हे नक्की वाचा... माझ्या कथा वाचण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. 🌟 पर्याय १: Superfan बना (Recommended) फक्त ₹२५/महिना मध्ये Superfan Membership घ्या आणि... ✨ सगळे Parts... सगळे १० Seasons एकाच वेळी Unlock करा! 📚 मनसोक्त Binge Read करा. 🚫 No Waiting. No Rok-Tok. ❤️ मी पण तुम्हाला मध्येच थांबवणार नाही! यासोबतच माझ्या इतर सर्व कथा आणि कथामालिकाही सलग वाचता येतील. --- 📚 पर्याय २: Free मध्ये वाचा माझ्या Pratilipi Profile ला Follow करा. Nishigandha Omanwar ❤️ 📖 १५वा भाग पूर्ण झाल्यावर, दररोज एक नवीन भाग मोफत Unlock होईल. 🔔 Profile Follow केल्यावर पुढचा Free Part उपलब्ध होताच Notification मिळेल. --- 👇 कथेची लिंक खाली कमेंटमध्ये दिली आहे. आजच Story Library मध्ये Add करा आणि एका वेगळ्याच कॉलेज रोमांसच्या, मैत्रीच्या आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रवासाला सुरुवात करा! 💛 वाचल्यानंतर Comment करून नक्की सांगा... पहिल्याच भागाने तुम्हाला किती गुंतवलं? 💬 Because... ❤️ Keep Reading. Keep Loving. Keep Bingeing. (All kinds of love are accepted in the form of ❤️ Likes • 💬 Comments • 🔄 Shares • ⭐ Ratings • 🎁 Stickers • 🌟 Superfan.) तुमची, Natkhat Nishi❤️
https://marathi.pratilipi.com/series/tu-bhet-naa-navyane-by-online-pl8jeatqnedm

TBN Promo FB - bhet1

हा भाग लिहिताना एकच प्रश्न होता — एखादी व्यक्ती आयुष्यात न भेटताच किती खोलवर रुजू शकते? ज्यांना अशा कथा आवडतात, त्यांच्यासाठी “Tu Bhet Na…” Link comment मध्ये 👇 आज किंजल इतकी आनंदी होती, आकृती भेटायला तयार झाली म्हणून!! इतकी खुश होती कि तिनी आज काही हि मागितले असते, कसली हि अट ठेवली असती तरी ती तयार झाली असती... तरी औपचारिकता म्हणून ती तिला विचारते 'सांग... काय अट आहे तुझी?' 'परत एकदा विचार करून घे तुला भेटायचे ना...' 'ए... हो ग... लवकर सांग... छळू नकोस असे...' 'हम्म.. मी येईल भेटायला तुला... हवं तर दिवस भर वाट बघायला हि तयार आहे मी तुझी ... पण... ' 'पण काय??' 'कोणत्या हि कारणाने जर आपण भेटलो नाही तर... ' 'तर?' 'तर... आपण आयुष्यात परत कधीच भेटायचे नाही... बोल मंजूर?' 'मी ना तू सांगशील त्या दिवशी तितके वास्ता भेटायला तयार आहे... तू म्हणशील तर आदल्या दिवशीच तिथे येऊन बसेल... पण तुला भेटायचा एक चान्स नाही मिस करणार... ' 'इतकं काय तुला मला भेटायचे आहे... ' 'नाही कळणार तुला.. मी भेटल्यावर सांगीन तुला... ' 'बरं ठीक आहे.. ' 'ए... पण मी ओळखणार कसं तुला?' 'ते तुझं तू बघ!!' 'मी तिथेच तुझी वाट बघत राहील... तेच सांगितले ना आता मी तुला... जर कोणत्या हि कारणाने आपण भेटू नाही शकलो तर त्यात हे हि येते कि तू मला ओळखू नाही शकली तर... आयुष्यात परत कधी नाही भेटायचे...' 'अगं पण असं कसं? मी तुला पहिले नाही... मला तुझा आवाज हि माहित नाही कसं शोधणार मी तुला... तुझा नंबर नाही ...' 'म्हणून तर पूर्ण दिवस दिला ना तुला... बघू शोधून काढतेस का ते...!!! मी तिथेच असणार ... मनाच्या डोळ्यांनी बघशील तर लगेच दिसेल तुला...' 'आणि तू आलीच नाहीस तर..??' 'माझ्यावर विश्वास नाही का?' 'तसं नाही... तुला तर मला तसे हि भेटायचे नाही... तू येणारच नाहीस आणि म्हणशील मी शोधू नाही शकले... मग?' 'हम्म... असं.. होय... मग तू सांग काय करायचे..??' किंजल बराच वेळ विचार करून तिला म्हणते, 'ठीक आहे... तू ये आणि तिथे पिवळे ऑर्चीड (आपल्या मैत्रीचे प्रतीक ) चे फुलं आणून ठेवायचे... तरच मी समजेल कि तू तिथे आली आहेस!!' 'ठीक आहे... चालेल मला ... मला काही प्रॉब्लेम नाही... अरे पण १ मिनिट आता ओर्चीड ची फुलं कुठे भेटतात, सीजन नाही ना...' 'ते मला काही माहित नाही कुठून हि जमव...' 'अरे ह्याला काय अर्थ? सीजन नाही तर कुठून मिळणार मला? आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून हवे ना... मग पिवळी लिली ची फुले, पिवळे गुलाब किंवा अजून झेंडू... पिवळे ते आणते चालेल ..??' 'तू काय सोपं आव्हान दिलेस मला??... तुला हि मला भेटायचे तर काही कष्ट घ्यावे लागतील...' 'ठीक आहे!!! आता काय... ' 'मग कुठे भेटायचे?' 'तू सांगशील तिथे भेटू...' 'मला जरा विचार करू देत...!! मला इथले जास्ती माहित नाही... ' 'काय ग बाई... अजून फिरली नाहीस पुण्यात?' 'तुझ्या कॉलेज लाच भेटू नाही तर...' 'नाही... कॉलेज मध्ये नको.. मी सांगते ना... मला वेळ तर दे... मला आता काही सुचत नाही आहे.. तुला भेटण्याचा आनंद इतका आहे कि डोकं काही काम करत नाही आहे... ' 'उद्या पर्यंत सांग... मला त्या प्रमाणे बाकीचे काम बघावे लागेल... ठीक ना...' 'हम्म चालेल... उद्या सांगते...' 'चल बाय ' 'बाय!! मी आज खूप खुश आहे.. .थँक यु !!' 'चल.. बावळट ... थँक यु काय ?? मी पण खूप खुश आहे... बाय ...!!' किंजल ला आकृती ला भेटायचा इतका आनंद असतो, काय करावे सुचत नाही... माझ्या साठी पूर्ण दिवस ठेवणार आहे... कसा घालवायचा तिच्या सोबतचा दिवस ह्या विचारात तिला झोपच लागत नाही. दुसऱ्या दिवशी... 'आपण ना... सिटी प्राईड ला मूवी बघू ... ' 'ठीक आहे पण सिटी प्राईड ला मी फुलं कुठे ठेवायचे??' 'तिथे बाजूला मस्तानी हाऊस आहे आपण तिथे भेटू... तर तू तिथे थांब...तिथल्या कोणत्या हि टेबलं वर फुलं ठेवशील म्हणजे तू आलीस ह्याची मला शाश्वती!! मग मी तुला शोधलं कि आपण मुवि बघू ठीक ??' 'आणि नाही शोधलस तर? माझं माझं तिकीट मला पाठवून ठेव... म्हणजे माझी मुवि तरी वाया नाही जाणार..' 'हा चालेल... ' किंजल मनात विचार करते मी बुक केलेल्या जागेवर जाऊन मुवि बघणार... ?? किती सोपं होईल मला तुला शोधणं... 'काय चालेल...!! मी तुला इतकी बावळट वाट्ते का ग..??' 'कळले तुला...?? ' 'हो... ठीक आहे सकाळी ९ ला भेटू मग मस्तानी हाऊस ला?' 'हम्म.. तू पुण्याला कशी काय आलीस ते तर सांगितलेच नाहीस...' 'भेटल्यावर हि काही बोलू ना... नाही का..??' 'बरं.. जस तू म्हणशील... तू भेटायला तयार झालीस हेच खूप आहे माझ्या साठी ..' किंजल ला तिला खूप काही स्पेशल गिफ्ट घ्याचे असते.. परत ती तिला कधी भेटणार नव्हती... त्यामुळे ती तिच्या साठी गिफ्ट बघण्यात मागणं होते... !! तिच्या साठी एक कविता लिहिते... आणि त्या गिफ्ट सोबत ती कविता ठेवते... नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!! काही अगदी जवळची, तर काही अशीच वरवरची... नाती काही क्षणातच जुळणारी, तर काही अनेक वर्षातही न जाणवणारी... काही नात्यांना देता येत नाही नाव, तरीही ती असतात खूपच खास ! काही नाती हृदयात घर करून रहणारी, दूर राहूनही कधीच न तुटणारी... तो दिवस उगवतो, किंजल च्या आनंदाचा पारा नसतो, ठरलेल्या वेळेत पोहचायचे म्हणून ती लवकर तयार होते. आज स्वतःला आरशात बघून भारी खुश होत होती, काय घालायचे हेच कितीतरी वेळ ठरत नाही, शेवटी ती तिचा बांधणीचा पीच कलर चा कुर्ता काढते. अर्धे केस बांधते आणि कपाळावर छोटीशी काळी टिकली लावते. आपल्या बॅग मध्ये ती तीच गिफ्ट आणि कविता ठेवते. मैत्रिणीची स्कुटी घेऊन ती निघते. कॉलेज पासून सिटी प्राईड लांब नसते पण तिला ट्रॅफिक लागते, त्यामुळे प्रत्येक सरकणारा क्षण मनात हुरहूर निर्माण करत होता. सारखी तिची धडपड सुरु असते, कधी एकदा मस्तानी हाऊस ला पोचते ह्याची. मस्तानी हाउस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने चौकातच होते, थोड्या वेळात ती त्याच्या समोर येऊन पोचते आणि सारखं त्या बाजूनी बघायचा प्रयत्न करत असते पण ट्रॅफिक एवढी होती कि तिला काही दिसेना... बस आता एक यू टर्न घ्याचा होता आणि तिची मंझिल तिच्या समोर होती... किंजल च्या मनात किती तरी प्रश्नांनी गोंधळ घातलेला .. कशी असेल आकृती, मी शोधू शकेल ना तिला? त्यांची हि पहिली भेट त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील ना... ?? काही प्रश्नांचे उत्तर मिळते काही नाही, प्रत्येक सरकणाऱ्या गाडी सोबत तिला त्यांचा भेटण्याचा क्षण जवळ येतांना दिसत होता. किंजल नि यू टर्न घेतला आणि दुसऱ्या बाजूचे ट्रॅफिक सुटायला एकच वेळ झाली, त्यामुळे एक भरधाव वेगानी दुसऱ्या बाजूनी गाडी सुटते आणि दोघांना काही कळण्याच्या आत गाड्यांची धडक झाली असते, किंजल पार वर उडाली आणि लांब फेकल्या गेली होती. आपल्या सोबत आता काय झाले ह्याचे हि तिला भान नसते तिची नजर फक्त मस्तानी हाऊस कडे लागून असते, ती तिथल्या प्रत्येक टेबलं कडे बघत असते आणि एका कोपऱ्यात तिची नजर पिवळ्या ओर्चीड च्या फुलांचा गुलदस्त्या वर पडते, न कळत तिच्या चेहऱ्यावर इतक्या वेदनेत हि एक आनंद उमलतो आणि ती तृप्त होऊन डोळे बंद करते. ~.~.~.~ "प्रतीलिपीवर सारख्याच धाटणीच्या CEO Romance, Surrogate Mother किंवा कौटुंबिक कटकारस्थानांच्या कथा वाचून काहीतरी वेगळं वाचायची इच्छा होतेय?" मग तयार व्हा... 💛 Fresh College Romance ❤️ Emotion 🕵️ Suspense 🤝 Friendship 💔 Unpredictable Twists अशी कथा, जिथे प्रत्येक भाग संपताना तुमच्या मनात एकच प्रश्न असेल... "आता पुढे काय होणार?" 👀 आणि आता येते सर्वात भन्नाट बातमी... 🥳 🎉 या कथेचे तब्बल १० Binge-Worthy Seasons आधीच लिहून पूर्ण झाले आहेत! हो... बरोबर वाचलंत! म्हणजे एकदा या कथेच्या प्रेमात पडलात की... "पुढचा भाग कधी येणार?" अशी वाट बघायची गरजच नाही! 😉 --- 📖 प्रतिलिपीवर नवीन आहात? मग हे नक्की वाचा... माझ्या कथा वाचण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. 🌟 पर्याय १: Superfan बना (Recommended) फक्त ₹२५/महिना मध्ये Superfan Membership घ्या आणि... ✨ सगळे Parts... सगळे १० Seasons एकाच वेळी Unlock करा! 📚 मनसोक्त Binge Read करा. 🚫 No Waiting. No Rok-Tok. ❤️ मी पण तुम्हाला मध्येच थांबवणार नाही! यासोबतच माझ्या इतर सर्व कथा आणि कथामालिकाही सलग वाचता येतील. --- 📚 पर्याय २: Free मध्ये वाचा माझ्या Pratilipi Profile ला Follow करा. Nishigandha Omanwar ❤️ 📖 १५वा भाग पूर्ण झाल्यावर, दररोज एक नवीन भाग मोफत Unlock होईल. 🔔 Profile Follow केल्यावर पुढचा Free Part उपलब्ध होताच Notification मिळेल. --- 👇 कथेची लिंक खाली कमेंटमध्ये दिली आहे. आजच Story Library मध्ये Add करा आणि एका वेगळ्याच कॉलेज रोमांसच्या, मैत्रीच्या आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रवासाला सुरुवात करा! 💛 वाचल्यानंतर Comment करून नक्की सांगा... पहिल्याच भागाने तुम्हाला किती गुंतवलं? 💬 Because... ❤️ Keep Reading. Keep Loving. Keep Bingeing. (All kinds of love are accepted in the form of ❤️ Likes • 💬 Comments • 🔄 Shares • ⭐ Ratings • 🎁 Stickers • 🌟 Superfan.) तुमची, Natkhat Nishi. https://marathi.pratilipi.com/series/ti-laajate-jevha-parv-3-tu-bhet-na-by-online-svbjbcyutakh

TBN FB Promo

काही भेटी... फक्त काही मिनिटांच्या असतात. पण त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात... 💛 कधी प्रत्यक्ष न पाहिलेल्या व्यक्तीला भेटण्याची इतकी ओढ असू शकते का? एक वचन... एक आव्हान... पिवळ्या ऑर्किड्सचा एक गुच्छ... आणि त्या एका दिवसासाठी जपलेली असंख्य स्वप्नं... पण नियतीने त्यांच्यासाठी नेमकं काय लिहून ठेवलं होतं? ही भेट पूर्ण झाली का... की फक्त आठवण बनून राहिली? ~.~.~.~ "प्रतीलिपीवर सारख्याच धाटणीच्या CEO Romance, Surrogate Mother किंवा कौटुंबिक कटकारस्थानांच्या कथा वाचून काहीतरी वेगळं वाचायची इच्छा होतेय?" मग तयार व्हा... 💛 Fresh Bedroom Romance ❤️ Emotion 🕵️ Suspense 🤝 Friendship 💔 Unpredictable Twists अशी कथा, जिथे प्रत्येक भाग संपताना तुमच्या मनात एकच प्रश्न असेल... "आता पुढे काय होणार?" 👀 आणि आता येते सर्वात भन्नाट बातमी... 🥳 🎉 या कथेचे तब्बल १० Binge-Worthy Seasons आधीच लिहून पूर्ण झाले आहेत! हो... बरोबर वाचलंत! म्हणजे एकदा या कथेच्या प्रेमात पडलात की... "पुढचा भाग कधी येणार?" अशी वाट बघायची गरजच नाही! 😉 --- 📖 प्रतिलिपीवर नवीन आहात? मग हे नक्की वाचा... माझ्या कथा वाचण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. 🌟 पर्याय १: Superfan बना (Recommended) फक्त ₹२५/महिना मध्ये Superfan Membership घ्या आणि... ✨ सगळे Parts... सगळे १० Seasons एकाच वेळी Unlock करा! 📚 मनसोक्त Binge Read करा. 🚫 No Waiting. No Rok-Tok. ❤️ मी पण तुम्हाला मध्येच थांबवणार नाही! यासोबतच माझ्या इतर सर्व कथा आणि कथामालिकाही सलग वाचता येतील. --- 📚 पर्याय २: Free मध्ये वाचा माझ्या Pratilipi Profile ला Follow करा. Nishigandha Omanwar ❤️ 📖 १५वा भाग पूर्ण झाल्यावर, दररोज एक नवीन भाग मोफत Unlock होईल. 🔔 Profile Follow केल्यावर पुढचा Free Part उपलब्ध होताच Notification मिळेल. --- 👇 कथेची लिंक खाली कमेंटमध्ये दिली आहे. आजच Story Library मध्ये Add करा आणि एका वेगळ्याच कॉलेज रोमांसच्या, मैत्रीच्या आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रवासाला सुरुवात करा! 💛 वाचल्यानंतर Comment करून नक्की सांगा... पहिल्याच भागाने तुम्हाला किती गुंतवलं? 💬 Because... ❤️ Keep Reading. Keep Loving. Keep Bingeing. (All kinds of love are accepted in the form of ❤️ Likes • 💬 Comments • 🔄 Shares • ⭐ Ratings • 🎁 Stickers • 🌟 Superfan.) तुमची, Natkhat Nishi https://marathi.pratilipi.com/series/ti-laajate-jevha-parv-3-tu-bhet-na-by-online-svbjbcyutakh

Friday, March 25, 2022

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट...


भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे कुतूहल वाटले नाही, त्याला कारण म्हणजे आयुष्याच्या उतार वयात देव देव तर करायचे आहे असा समज असणारी मी ! 


पण आयुष्यात तू आलीस, तुझं ते अध्यात्मिक ज्ञान मला अचंबित करायचं, माझ्याच एवढी तू, पण किती समजदार, सहनशील? कसं जमतं, माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला गीतेत मिळणार म्हणालीस, एकदा माझ्या खातर गीता वाच म्हणालीस, मी पण चक्क घेतली वाचायला, अगदी न विसरता रोज एक अध्याय वाचून काढला, माझा हा प्रवास सुरु झाला! 

माझा असा समज झाला की तुला माझ्या आयुष्यात देवानी अध्यात्माकडे वळवण्यासाठी आणले, तुझं माझ्या आयुष्यात येण्याचं हेच कारण आहे! माझी अध्यात्माकडे ओढ वाढू लागली, नवीन नवीन गोष्टी समजत होत्या, किंवा एक नवा दृष्टिकोन मिळत होता.


अश्यातच मी जोडले गेले गीता परिवाराशी! 

गीता शिका, शिकवा, आचरणात आणा!!💐

माझ्या यासोबत अर्थात तू ही क्लास जॉईन केले, रोज सकाळी त्या क्लास साठी उठण्याची ओढ!! खूप सुंदर सुरवात व्हायची दिवसाची! किती किती चुकलं आपलं हे लक्षत आलं, गीता उतार वयात शिकायची नाही तर आयुष्यभर आचरणात आणायची गोष्ट आहे!


गीता शिकत असतांना आपण ही एक दुसऱ्याला समजू लागलो, एक दुसऱ्याच्या विचारांची देवान घेवान होऊ लागली, 


तू मला मी तुला ओळखू लागलो!

तू मला मी तुला गुंगूनू लागलो!


दिवस सरत होते लेवल 1 ची परीक्षा संपली, खरं तर तुझ्या मूळ3च मी ही परीक्षा दिली!! काही स्वप्न रंगवणे सुरू झाले! गीता च्या सर्व परीक्षा पास करायच्या आहेत, एक दुसऱ्याला ध्येय देऊ लागलो!!


तुझ्यामुळे माझा हा आध्यात्मिक प्रवास इतका सुंदर सुरू झाला आणि अजून ही सुरू आहे! 


पण मला खूप मोठे सुखद बक्षीस मिळाले, अगदी मन लावून गीता शिकण्याचे, एकाग्र राहण्याने! 


त्याच भगवंतांनी माझी भेट घडवून दिली तुझ्या सोबत - गीता मैत्री मिलन कार्यक्रमामुळे! माझं एक स्वप्न पूर्णत्वाला गेले!

तुझी भेट झाली!! बस अजून काय हवे होते!


मी हे सर्व समजत होते त्यांनी मला त्याच्या भेटीसाठी अग्रेसर करण्यासाठी केले होते, पण ह्या सर्व चक्रमागे करण होते तुझी माझी भेट घडवणे!!


आता असं वाटतं, गीता ला तू आयुष्यात नाही आणलं तर गीता नि तुला माझ्या आयुष्यात आणलं, माझी रुची गीतेत वाढणे, ते एकत्र गीता शिकणे, त्या सोबतच भेटीची ओढ निर्माण होणे... आणि चक्क गीता परिवाराने हा मिलन कार्यक्रम पुण्याला ठेवावा? 

त्यात तुला येत यावे? 

हे स्वप्न पूर्ण करायला त्यानी किती प्लांनिंग केली असेल ना? किती सूत्र हलवले असतील त्यानी? तुला मला एक छताखाली आणण्यासाठी? 


खूप कविता वाचल्या आज पर्यंत, खूप कथा वाचल्या 

एक अपूर्ण स्वप्न वाल्या, पण मी त्याची खूप आभारी आहे, माझं स्वप्न पूर्ण झाले, तुला भेटता आले!


आता ही जी तज्झ्या सोबतीची वाट त्यांनी दाखवली आहे ना मला त्यावर चालत राहायचं!! 



 Thank You Geeta Pariwar for these memories!!💐


 


मी कशी ग विसरेल तुला ?



Monday, February 28, 2022

 

सिक्रेट सायको – २

 

आश्लेषा रूम मध्ये पडल्या पडल्या त्या ट्रॉफी ला निहाळत बसली होती, त्या वरच ठळक अक्षरातले ते शब्द ‘हिलिंग टच’ मनाला खूप स्पर्शून गेले होते, ती ट्रॉफी म्हणजे जादुई दरवाजा होता, आश्लेषा ला आपल्या सोबत ती तिच्या भूतकाळात घेवून गेली... जिथून तिच्या ह्या प्रवासाला सुरवात झाली.

ते कॉलेज चे सोनेरी दिवस, स्वप्न रंगवण्याचे दिवस आणि स्वप्नात रमायचे दिवस! मित्र मैत्रिणी आणि खूप मज्जा मस्ती!

 

तेरी बातो में दिल खो स गाया, प्यार केहते जिसको वो हो स गया...

खुश हु मेईन इतना क्यू? तेरे प्यार मेईन चमकू जैसे जुगनू...

 

तिला मिळालेली ती पहिली शाबासकी... गुरुजींनी गर्वाने थोपात्लेली पाठ!

तीच ते शेवटच्या वर्षी आपल्या थिसीस वर दिलेले भाषण अजून हि किती स्पष्ट ऐकायला येत होत तिला?

स्य्कॉलोजी मधली फ्रेड ची थेरी, जी सांगते कि कोणत्या हि व्यक्तिमत्वाचे तीन भाग असतात, इड, इहो आणि सुपर इगो.

हे तिन्ही इड, इगो आणि सुपर इगो आपलयाला वागण्याला कारणीभूत असतात.

इड आपल्याला आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करायला मदत करत असतो जसं कि

सुपर इगो त्यात आपल्याला २ गोष्टीतली काय बरोबर आणि काय चूक हे सांगत असते, चांगल्या रस्त्यावर चालण्याला सांगत असते. जेव्हा कि ह्या दोघंमध्ये समतोल राखण्याचे काम करत असते इगो.

औदितोरीम शांत गंभीर झाले होते, आश्लेषा ला त्यामुळे समजले होते जरा डोक्यावरून चाललंय प्रकार... त्यामुळे ती सर्वांना वेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करते. अचानक बोर्ड वर काढलेले सर्व मिटवून ती बोर्ड वर लिहिते... दिल चाहता है!! ऐकल आहे हे नाव??

नवीनच चर्चेत असलेली मूवी म्हणजे दिल चाहता है, प्रत्येकाच्या ओठी गाणी असलेली मूवी, प्रत्येकाला ती मूवी डायरेक्ट connect झाली, कॉलेज मध्ये सर्व मुल वो लाडकी है कहा गात होते तर मुली, जाणे क्यू लोग प्यार करते है गात होते!

कोणी स्वत:ला आकाश मध्ये शोधत होत तर कोणाला आपण समीर वाटत होतो! काही न काही कुठे तरी प्रत्येकाच्या आयुष्यावर त्या मूवी नि छाप सोडली होती! पण आश्लेषा नि त्या मूवी ला एका वेगळ्या लेवेल ला नेले !!

इतक्या गंभीर विषयावर बोलतांना आश्लेषा नि असं मूवीचे नाव का लिहिले? प्रत्येकाच्या मनात ते प्रश्न सुरू असतांनाच आश्लेषा नि बोलायला सुरू केले..

आपल्या थेसिस ला ह्या मूवी चा आधार घेवून खूप छान पद्धतीने समजावून सांगू लागली!!

“ह्या मूवी मध्ये इड, इगो आणि सुपर हेरो सर्व आहेत म्हंटल मी तर काय तुम्हाला विश्वास बसेल?” तिनी उलट प्रश्न केला सर्वांना. मूवी मध्ये इड आणि इगो? सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्न स्पष्ट दिसत होते. आश्लेषा च्या चेहऱ्यावर मात्र एक गूढ स्मित आले होते.

ती पुढे नाव लिहिते तीन बोर्ड वर... आकाश, समीर आणि सिड. तिची थेसिस होती आईसबर्ग ची ३ मैंद च्या states वर होती म्हणजे इड, इगो आणि सुपर इगो आणि दिल चाहता है चे हे हिरो आता आपल्याला काय शिकवणार?

आश्लेषा सर्वांना बघत सांगते असे बघत पुढे लिहू लागली!!

आकाश (अमीर खान) – म्हणजे आपल्या मनाचे इड स्टेट दर्शवते – तो बेसिक प्लेझर नियमांवर चालतो, तो आपले आयुष्य आपल्या गरजा भागाव्ण्यास्तही जगतो.

सिड (अक्षय खन्ना) – म्हणजे सुपर इगो ला दर्शवतो. सुपर इगो आणि इड ह्यात नेहमी द्वंद्व सुरू असते, जे बरोबर आहे ते करायचे कि आपल्या गरजा निभ्वाय्च्या?

समीर (सैफ आली खान) – म्हणजेच इगो. त्याला सारख एक सुवर्ण बिंदू गाठवा लागतो इड आणि सुपर इगो च्या मध्ये.

तर दिल चाहता है मधले हे तीन पत्र नसून एकाच्या मनाच्या ३ स्थिती आहेत!

इतकी कॉम्पलीकेतेड थेरी आश्लेषा नि विश्लेषण =करून इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितली होती! तिचं बोलण संपते न स्माप्ते हाल मध्ये टाळ्यांचा कडकडत झाला!

“ए.. आशु... मानले हा तुला...” जुही नि आश्लेषा ची तारीफ करत स्वताचीच कल्लर ताईत केली.

“का ग?

“मग काय मूवी बघतांना पण तुझ्या डोक्यात हा अभ्यासच फिरत असतो न?” जुई नि डोळा मारत चिडवले.

आश्लेषा नि हलके स्मित केले.

AD, आज तर तू जादूच केलीस!!” समोरून आशिष आला आणि आश्लेषा च्या हृदयाची धडकन थांबली जणू, सर्व black out... हृदयात बस, गिटार ची धून सुरू झाली आणि ते अपोआप गावू लागले...

आते जाते...

आते जाते, हँसते गाते

सोचा था मैं ने मन में कई बार

वो पहली नज़र, हलका सा असर

करता है क्यों दिल को बेक़रार

रुक के चलना, चल के रुकना

ना जाने तुम्हें है किस का इंतज़ार

 

तेरा वो यकीं, कहीं मैं तो नहीं

लगता है यही क्यों मुझको बार बार

यही सच है, शायद मैं ने प्यार किया

 

आशिष तिला विश करून गेला सुद्धा तरी आश्लेषा त्यातच हरवलेली, तिकडून जुई सोबत बाकीची गांग येवून आश्लेषा ला चिडवायला लागल्या.

“आमच्या स्कॉलर ला कोणी तरी मात दिली तर...” जुई तिला खांद्याला खांद्यानी मारत म्हणली आणि सर्व खिदळायला लागल्या!

“सय्या ने देखा ऐसे... में पाणी पाणी हो गायी...” इशा लाल झालेल्या आश्लेषा चा चेहरा हातात घेवून म्हणाली तशी आश्लेषा तिला धरून मारते.

त्यांची ती सर्व मस्ती आठवून आज हि आश्लेषा च्या चेहऱ्यावर smile आली होती आणि डोळ्यात पाणी भरून आले.

क्रमश: 

Wednesday, February 16, 2022

 सिक्रेट सायको – १

 

२४ जानेवारी २०२२

 

जगातील महत्वाचे आणि मोठे साय्कोलोजी कॉन्फेरेंस भारतात, पुणे इथे भरले होते!

रिपोर्टर रिपोर्ट देत होते आप आपल्या चॅनेल साठी... अशीच एक न्यूज चॅनेल वर झळकत होती.

“२०२२ IIER ११७५ इंटरनॅशनल कॉन्फेरेंस हि जगातील प्रमुख कॉन्फेरेंस आहे ज्यात रिसर्चर्स सायकॉलजी च्या क्षेत्रात आपले नवीन संशोधन मांडतील...”

घरी आरामात सोफ्यावर बसून घरचे न्यूज द्वारा उपडेट घेत होते!

“बाबा मला शिन चान बघायचं...”

“थांब रे... ”

“हे काय बोर बघत बसलात तुम्ही? प्लीज न बाबा... बदला न चानेल...”

हट्ट वाढला तसा रिमोट मुलाच्या हातात देवून तो झोपायला गेला.

 

तिकडे कॉन्फेरेंस मध्ये लोकांची गर्दी वाढू लागली होती! आज कॉन्फेरेंस एकाद्या फिल्म फेयर अवार्ड च्या फंक्शन पेक्षा कमी सजलेली नव्हती, त्याला शोभतील  असेच कॉन्फेरेंस अटेंड करणारे होते, रेड कार्पेट चालून येणारे.

 आज ची कॉन्फेरेंस जरा हटके होती आणि त्याला कारण होते ते म्हणजे पहिल्यांदा दिल्या जाणारे अवार्ड... सायकोलॉजी च्या क्षेत्रात पहिल्यांदा हा अवार्ड मिळणार होता कोणाला. त्यामुळे कोणाला हा अवॉर्ड मिळणार ह्याची चुरस लागली होती! त्यात नुकतेच धुमाकूळ घातलेल्या करोना मुळे प्रत्येकाकडे एक आपली आगळी वेगळी कथा आणि अनुभव होताच! ह्या काळात क्वचित कोणी भेटेल ज्यांनी आपल्या जवळच्यांना निराश, हताश बघितले नसेल, डिप्रेशन ला जवळून बघितले नसेल? इतक्या सर्व लोकांमध्ये इतक्या सर्व कथांमध्ये, कोणाला मिळणार होता तो अवार्ड? सर्वांचे डोळे त्या अवार्ड वर लागले होते!

हॉल मध्ये कुजबुज सरू होती! २४ -२५ जानेवारी म्हणजे मोठा दिवस होता!

तितक्यात रेड कार्पेट वर एक गाडी येवून थांबली, तुम्ही विचार कराल त्यातून एक स्लिम ट्रिम अभिनेत्री बाहेर पडेल आणि मग ती हात हलवून तिथे जमा असलेल्या पब्लिक ला अभिवादन करेल, पण त्यातून निघाले एक ऐन्शितले गृहस्त,  त्यांना बघून तिथे उपस्थित जमावाची मात्र प्रतिक्रिया तीच होती! त्यांना बघून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आले, “योगी दादा!!” बस एकच नाव सर्वांच्या ओठी होते!

सर्वांना बघून त्यांनी फक्त विनम्र हात जोडून नमस्कार केला. चालायला त्रास होत होता त्यांना म्हणून त्यांना आधार द्यायला सोबत एक महिला होती! योगी दादा म्हणजे भारतातले मदर टेरीसा चे मेल वरजन! दिन दुबळ्यांची फक्त सहायता करायचे असे नाही तर मनानी खचून गेलेल्यांना मार्ग दाखवण्याचे हि काम ते करायचे! भारतात मेंटल हेल्थ हा विषय धरून उचलणारे, शारीरक स्वस्थ जितके महत्वाचे आहे तितकेच मेंटल स्वस्थ हि गरजेचे आहे ह्यावर भरभरून व्याख्यान आणि पुस्तकं फक्त लिहिणारे योगी दादा नव्हते तर ते अमलात आणून पीडितांना मदत हि करत होते! अनेक हजारो कहाण्या त्यांच्या जवळ होत्या काही उरात पुरलेल्या तर काही केस स्टडी झालेल्या.

आज इतक्या दिवसांच्या त्यांच्या मेहनातीचे फळ म्हणून त्यांना ह्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून अमंत्रित केले होते! आपला तोल सांभाळत ते त्या कार्पेट वरून हॉल चा मार्ग चालत निघाले.

बाहेर रिपोर्टर लोकांनी गर्दी केली होती योगी दादा एक वाक्य तरी त्यांच्यासाठी बोलावे हा प्रयत्न होता प्रत्येकाचा.

योगी दादा सोबत सर्व मान्यवर हॉल मध्ये पोहचतात, योगी दादांना बघून त्याचं स्वागत टाळ्यांनी होतं. टाळ्यांच्या आवाजात हॉल गजबजला.

ह्या वर्षी ची थीम होती “एक्क्सपेरिमेंटल सायकॉलॉजि इन क्रॉस कल्चर सेटिंग"

वेगवेगळ्या प्रांतातून आपले अनुभव आणि रिसर्च वर बोलायला लोक आले होते.

स्टेज वर प्रेसेंटेटशन द्यायला सर्व सेटअप तयार केले होते! मान्यवरांच्या खुर्च्या खाली पहिल्या रांगेत होत्या!

हॉल भरला होता, अंधार करण्यात आला आणि एक एक करत कार्यक्रमाला सुरवात झाली! इतका मोठा विखुरलेला विषय होता हा आणि तितकेच भव्य दिव्य प्रत्येकाचे अनुभव! कोरोनाच्या काळात कोणी अनुभवलं नव्हतं, विचार हि केला नव्हता इतका एक्सपेरिमेंट झाला सर्वांच्या साय्कोलोजी चा! जग तयार नव्हते ह्या महामारी साठी! आपल्या जवळच्या लोकांपासून लांब होणे काय असते हे तर आपण अनुभवतोच पण त्यांचे अंतिम दर्शन हि न करता यावे असं कधी होईल असा विचार हि कोणी केला नव्हता. सर्व एकत्र असून एकटे पडले होते. दिवस-रात्र बस उद्याचा दिवस कसा येयील ह्याची चिंता! सर्वात जास्ती त्रास सहन केला तो खालच्या वर्गानी, करून का होत नव्हताआ, आजारी तर काही पडत नव्हते पण उपाशी राहून मारायचे दिवस आले होते!

 

सकाळची संध्याकाळ झाली....

वेळ होती अवार्ड देण्याची, स्टेजवर ट्रॉफी आणण्यात आली, मेडल्स आणण्यात आले! आपल्या आपल्या क्षेत्रातून उत्तम कामगिरी करणार्यांना आज सम्मानित करणार होते, ती ट्रॉफी कोणाला मिळणार ह्याची उत्सुकता सर्वांना होती. एक एक करत सर्वांचे नाव पुकारण्यात आले. मेडल अन सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.

“आणि आता मी स्टेज वर आमंत्रित करू इच्छितो आपल्या चीफ गेस्ट योगी दादांना प्लीज स्टेज वर येवून तुमच्या हसते आमच्या स्टार ला हा अवार्ड द्यावा हि विनंती!”

 

तसे योगी दादा उठू लागतात, त्यांना मदत करत त्यांना सोबत स्टेज वर बसवून त्यांच्या सोबतची महील वळते, तसे योगी दादा तिचा हात धरून तिला थांब म्हणतात, त्यांना काही त्रास होतोय का वाटून ती तिथेच थांबते. तसं त्या चिठ्ठीत नाव वाचून पुकारण्यात आले...

“आणि आपण सर्व ज्या क्षणाची खूप आतुरतेने वात बघत होतो तो क्षण आला आले... आज च्या संध्याकाळचा सर्वात प्रेस्टीजियस अवार्ड जात आहे... आश्लेषा देश्मुक ह्यांना....”

आश्लेषा चा हात तसा योगी दादा सोडतात ती अविश्वासात त्यांना बघत होती, “अगं खाली जावून परत वरती कशाला यायचं, मला म्हाताऱ्याला नको वाटलं तसं .. म्हणून थांबवून घेतलं तुला...” ते डोळे मिचकावत म्हणले तिला...

आश्लेषा च्या डोळ्यात आनंदाश्रू आले! ती त्यांच्या समोर येवून उभी होते आणि ते तिच्या हातात ती झाकाक्णारी, चकाकणारी ट्रॉफी  देतात...

आश्लेषा त्या ट्रॉफी ला बघतच राहते...

हीलिंग टच!!’ ती त्या वरचे शब्द स्वत:शी कितीदा वाचत होती! तिला विश्वासच बसत नव्हता, हि ट्रॉफी तिला मिळाली होती! परतीच्या रस्त्यावर ती सारखी त्या ट्रॉफी ला बघत होती!

“दादा, मला कशी काय मिळाली?”

“तू कामच असे केले आहेत बेटा!! अशीच चालत रहा, लोकांच दु:ख कमी केलं कि आपल्या पदरात आपो आप सु:ख पडतं!”

आश्लेषा हसत होती! “यु हीलड सो मेनी पिपल...”

ते वाक्य ऐकून आश्लेषा स्वत:शी हसली आणि स्वत:शीच म्हणली, “आय हिल्ड मायसेल्फ!!”

 

आज आश्लेषा ला झोप काही येत नव्हती! डोळे बांध केले कि सारखे ते शब्द कानात ऐकू यायचे!!

“तू न... तू तर सायको आहेस...” ते शब्द ऐकून तिला येत असलेली झोप निघून जायची!

“खरंच यु आर सायको...”

सामन्य माणसाला असं बोलल्यावर राग येयील, पण आश्लेषा त्यावर मंद हसायची! हवेहवेसे वाटायचं त शब्द... कधी ऐकलं नाही की मिस करायची.

पण आज ते शब्द कोण जाणे का तिच्या डोळ्यात पाणी आणत होते! नक्की ते आनंदाश्रू होते अवार्ड चे कि वेदनेने निर्माण केलेले? आज मिस करत होती कदाचित ती स्वतःची पदवी? सायको ?? हीलिंग टच पेक्षा ते नाव जस हवेसे वाट होते?....

 

क्रमश:

Secret Pulse Promo 1

पुण्याच्या एका सुधारगृहाच्या त्या दमट, कुबट कॉरिडॉरमध्ये पहाट कधीच सुंदर नसते. बाहेरच्या जगात याच वेळी कदाचित पहाटेचं कोवळं धुकं पसरलेलं असत...