Sunday, August 9, 2026
TBN...Navyane Promo2
काही माणसं जन्मताच गर्दीत उठून दिसतात. ओंकार त्यातलाच एक — देखणा, हुशार,
आत्मविश्वासाने भरलेला, आणि कॉलेजमध्ये ज्याच्या शब्दाबाहेर कुणी जात नाही असा
एक 'हिरो'.
पण याच दबदब्याच्या मागे एक असा अहंकार लपलाय, जो कधीतरी त्याच्याच पायाखालची
जमीन सरकवणार आहे. डिझाईन स्टुडिओतली त्याची सत्ता, कँटीनमधली त्याची
'कटिंग' आणि इतरांकडे बघण्याचा तो तुच्छतेचा दृष्टिकोन — हे सगळं त्याच्या
आयुष्यात लवकरच एका मोठ्या आरशासमोर उभं राहणार आहे.
आणि याच गर्दीत, त्याच्या नजरेच्या टप्प्याबाहेर, एक अशी मुलगी आहे जिच्याकडे
तो ढुंकूनही बघत नाही — पण जिच्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे.
अहंकाराचा हा महाल किती काळ टिकेल? आणि तो जेव्हा कोसळेल, तेव्हा त्याखाली
नेमकं कोण दबेल?
ओंकारचा हा दबदबा आणि त्यामागचं खरं वादळ अनुभवण्यासाठी "तू भेट ना...
नव्याने" वाचा.
~.~.~.~
मैत्री म्हणजे जुन्या इमारतीचा तो भक्कम पाया असते,
ज्यावर कितीही मोठी वादळे आली तरी,
विश्वासाची भिंत कधीच कोसळत नाही...
ती फक्त उभी राहते, प्रत्येक ऋतूत, प्रत्येक सावलीत...
ओंकार आपल्या नेहमीच्या कोपऱ्यातल्या टेबलाजवळ उभा होता. त्याची काळ्या रंगाची ड्राफ्टिंग ट्यूब त्याच्या पाठीवर होती. तो अत्यंत शांतपणे आपल्या आजूबाजूचा गोंधळ बघत होता. तेवढ्यात समोरून पीटर धावत आला. त्याचे केस विस्कटलेले होते, शर्टाची बटणे वेडीवाकडी लागली होती आणि हातात एक अर्धी-अधुरी डिझाईन शीट होती.
"वाचव भावा... आज माझा मर्डर फिक्स आहे. कदम सर आज मला कच्चं खातील!" पीटर धापा टाकत ओंकारच्या अंगावरच कोसळला.
"भावा, माझं डिझाईन बघ ना. टॉयलेटचा ब्लॉक चुकून किचनच्या वर आलाय माझ्या प्लॅनमध्ये... सर बघतील तर मला त्याच टॉयलेटमध्ये फ्लश करतील!" पीटरने अक्षरशः रडवा चेहरा केला.
~.~.~.~
"प्रतीलिपीवर सारख्याच धाटणीच्या CEO Romance, Surrogate Mother किंवा कौटुंबिक कटकारस्थानांच्या कथा वाचून काहीतरी वेगळं वाचायची इच्छा होतेय?"
मग तयार व्हा...
💛 Fresh College Romance
❤️ Emotion
🕵️ Suspense
🤝 Friendship
💔 Unpredictable Twists
अशी कथा, जिथे प्रत्येक भाग संपताना तुमच्या मनात एकच प्रश्न असेल...
"आता पुढे काय होणार?" 👀
आणि आता येते सर्वात भन्नाट बातमी... 🥳
🎉 या कथेचे भाग आधीच लिहून पूर्ण झाले आहेत!
हो... बरोबर वाचलंत!
म्हणजे एकदा या कथेच्या प्रेमात पडलात की...
"पुढचा भाग कधी येणार?" अशी वाट बघायची गरजच नाही! 😉
---
📖 प्रतिलिपीवर नवीन आहात? मग हे नक्की वाचा...
माझ्या कथा वाचण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.
🌟 पर्याय १: Superfan बना (Recommended)
फक्त ₹२५/महिना मध्ये Superfan Membership घ्या आणि...
✨ सगळे Parts... सगळे १० Seasons एकाच वेळी Unlock करा!
📚 मनसोक्त Binge Read करा.
🚫 No Waiting. No Rok-Tok.
❤️ मी पण तुम्हाला मध्येच थांबवणार नाही!
यासोबतच माझ्या इतर सर्व कथा आणि कथामालिकाही सलग वाचता येतील.
---
📚 पर्याय २: Free मध्ये वाचा
माझ्या Pratilipi Profile ला Follow करा. Nishigandha Omanwar ❤️
📖 १५वा भाग पूर्ण झाल्यावर, दररोज एक नवीन भाग मोफत Unlock होईल.
🔔 Profile Follow केल्यावर पुढचा Free Part उपलब्ध होताच Notification मिळेल.
---
👇 कथेची लिंक खाली कमेंटमध्ये दिली आहे.
आजच Story Library मध्ये Add करा आणि एका वेगळ्याच कॉलेज रोमांसच्या, मैत्रीच्या आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रवासाला सुरुवात करा! 💛
वाचल्यानंतर Comment करून नक्की सांगा...
पहिल्याच भागाने तुम्हाला किती गुंतवलं? 💬
Because...
❤️ Keep Reading. Keep Loving. Keep Bingeing.
(All kinds of love are accepted in the form of ❤️ Likes • 💬 Comments • 🔄 Shares • ⭐ Ratings • 🎁 Stickers • 🌟 Superfan.)
तुमची,
Natkhat Nishi❤️
https://marathi.pratilipi.com/series/tu-bhet-naa-navyane-by-online-pl8jeatqnedm
Subscribe to:
Post Comments (Atom)
Secret Pulse Promo 1
पुण्याच्या एका सुधारगृहाच्या त्या दमट, कुबट कॉरिडॉरमध्ये पहाट कधीच सुंदर नसते. बाहेरच्या जगात याच वेळी कदाचित पहाटेचं कोवळं धुकं पसरलेलं असत...
-
सिक्रेट सायको – १ २४ जानेवारी २०२२ जगातील महत्वाचे आणि मोठे साय्कोलोजी कॉन्फेरेंस भारतात, पुणे इथे भरले होते! रिपोर्टर रिपोर्ट देत होत...
-
द रुथलॅन्ड | #१ "केयूर...र र र !!" मागून हाक आली त्यामुळे तो थांबला. धीरज धापा टाकत त्याच्या जवळ आला, "मित्रा तिकडे कुठे चा...
-
नात तुझं माझं नेहमीच माझी साथ देत आलीस, माझ्या तक्रारी ऐकत आलीस मला हसवत राहिलीस, मला सहन करत राहिलीस माझ्या आठवणी गोंजारत राहिलीस आज वळून ...

No comments:
Post a Comment