Wednesday, February 16, 2022

 सिक्रेट सायको – १

 

२४ जानेवारी २०२२

 

जगातील महत्वाचे आणि मोठे साय्कोलोजी कॉन्फेरेंस भारतात, पुणे इथे भरले होते!

रिपोर्टर रिपोर्ट देत होते आप आपल्या चॅनेल साठी... अशीच एक न्यूज चॅनेल वर झळकत होती.

“२०२२ IIER ११७५ इंटरनॅशनल कॉन्फेरेंस हि जगातील प्रमुख कॉन्फेरेंस आहे ज्यात रिसर्चर्स सायकॉलजी च्या क्षेत्रात आपले नवीन संशोधन मांडतील...”

घरी आरामात सोफ्यावर बसून घरचे न्यूज द्वारा उपडेट घेत होते!

“बाबा मला शिन चान बघायचं...”

“थांब रे... ”

“हे काय बोर बघत बसलात तुम्ही? प्लीज न बाबा... बदला न चानेल...”

हट्ट वाढला तसा रिमोट मुलाच्या हातात देवून तो झोपायला गेला.

 

तिकडे कॉन्फेरेंस मध्ये लोकांची गर्दी वाढू लागली होती! आज कॉन्फेरेंस एकाद्या फिल्म फेयर अवार्ड च्या फंक्शन पेक्षा कमी सजलेली नव्हती, त्याला शोभतील  असेच कॉन्फेरेंस अटेंड करणारे होते, रेड कार्पेट चालून येणारे.

 आज ची कॉन्फेरेंस जरा हटके होती आणि त्याला कारण होते ते म्हणजे पहिल्यांदा दिल्या जाणारे अवार्ड... सायकोलॉजी च्या क्षेत्रात पहिल्यांदा हा अवार्ड मिळणार होता कोणाला. त्यामुळे कोणाला हा अवॉर्ड मिळणार ह्याची चुरस लागली होती! त्यात नुकतेच धुमाकूळ घातलेल्या करोना मुळे प्रत्येकाकडे एक आपली आगळी वेगळी कथा आणि अनुभव होताच! ह्या काळात क्वचित कोणी भेटेल ज्यांनी आपल्या जवळच्यांना निराश, हताश बघितले नसेल, डिप्रेशन ला जवळून बघितले नसेल? इतक्या सर्व लोकांमध्ये इतक्या सर्व कथांमध्ये, कोणाला मिळणार होता तो अवार्ड? सर्वांचे डोळे त्या अवार्ड वर लागले होते!

हॉल मध्ये कुजबुज सरू होती! २४ -२५ जानेवारी म्हणजे मोठा दिवस होता!

तितक्यात रेड कार्पेट वर एक गाडी येवून थांबली, तुम्ही विचार कराल त्यातून एक स्लिम ट्रिम अभिनेत्री बाहेर पडेल आणि मग ती हात हलवून तिथे जमा असलेल्या पब्लिक ला अभिवादन करेल, पण त्यातून निघाले एक ऐन्शितले गृहस्त,  त्यांना बघून तिथे उपस्थित जमावाची मात्र प्रतिक्रिया तीच होती! त्यांना बघून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आले, “योगी दादा!!” बस एकच नाव सर्वांच्या ओठी होते!

सर्वांना बघून त्यांनी फक्त विनम्र हात जोडून नमस्कार केला. चालायला त्रास होत होता त्यांना म्हणून त्यांना आधार द्यायला सोबत एक महिला होती! योगी दादा म्हणजे भारतातले मदर टेरीसा चे मेल वरजन! दिन दुबळ्यांची फक्त सहायता करायचे असे नाही तर मनानी खचून गेलेल्यांना मार्ग दाखवण्याचे हि काम ते करायचे! भारतात मेंटल हेल्थ हा विषय धरून उचलणारे, शारीरक स्वस्थ जितके महत्वाचे आहे तितकेच मेंटल स्वस्थ हि गरजेचे आहे ह्यावर भरभरून व्याख्यान आणि पुस्तकं फक्त लिहिणारे योगी दादा नव्हते तर ते अमलात आणून पीडितांना मदत हि करत होते! अनेक हजारो कहाण्या त्यांच्या जवळ होत्या काही उरात पुरलेल्या तर काही केस स्टडी झालेल्या.

आज इतक्या दिवसांच्या त्यांच्या मेहनातीचे फळ म्हणून त्यांना ह्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून अमंत्रित केले होते! आपला तोल सांभाळत ते त्या कार्पेट वरून हॉल चा मार्ग चालत निघाले.

बाहेर रिपोर्टर लोकांनी गर्दी केली होती योगी दादा एक वाक्य तरी त्यांच्यासाठी बोलावे हा प्रयत्न होता प्रत्येकाचा.

योगी दादा सोबत सर्व मान्यवर हॉल मध्ये पोहचतात, योगी दादांना बघून त्याचं स्वागत टाळ्यांनी होतं. टाळ्यांच्या आवाजात हॉल गजबजला.

ह्या वर्षी ची थीम होती “एक्क्सपेरिमेंटल सायकॉलॉजि इन क्रॉस कल्चर सेटिंग"

वेगवेगळ्या प्रांतातून आपले अनुभव आणि रिसर्च वर बोलायला लोक आले होते.

स्टेज वर प्रेसेंटेटशन द्यायला सर्व सेटअप तयार केले होते! मान्यवरांच्या खुर्च्या खाली पहिल्या रांगेत होत्या!

हॉल भरला होता, अंधार करण्यात आला आणि एक एक करत कार्यक्रमाला सुरवात झाली! इतका मोठा विखुरलेला विषय होता हा आणि तितकेच भव्य दिव्य प्रत्येकाचे अनुभव! कोरोनाच्या काळात कोणी अनुभवलं नव्हतं, विचार हि केला नव्हता इतका एक्सपेरिमेंट झाला सर्वांच्या साय्कोलोजी चा! जग तयार नव्हते ह्या महामारी साठी! आपल्या जवळच्या लोकांपासून लांब होणे काय असते हे तर आपण अनुभवतोच पण त्यांचे अंतिम दर्शन हि न करता यावे असं कधी होईल असा विचार हि कोणी केला नव्हता. सर्व एकत्र असून एकटे पडले होते. दिवस-रात्र बस उद्याचा दिवस कसा येयील ह्याची चिंता! सर्वात जास्ती त्रास सहन केला तो खालच्या वर्गानी, करून का होत नव्हताआ, आजारी तर काही पडत नव्हते पण उपाशी राहून मारायचे दिवस आले होते!

 

सकाळची संध्याकाळ झाली....

वेळ होती अवार्ड देण्याची, स्टेजवर ट्रॉफी आणण्यात आली, मेडल्स आणण्यात आले! आपल्या आपल्या क्षेत्रातून उत्तम कामगिरी करणार्यांना आज सम्मानित करणार होते, ती ट्रॉफी कोणाला मिळणार ह्याची उत्सुकता सर्वांना होती. एक एक करत सर्वांचे नाव पुकारण्यात आले. मेडल अन सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.

“आणि आता मी स्टेज वर आमंत्रित करू इच्छितो आपल्या चीफ गेस्ट योगी दादांना प्लीज स्टेज वर येवून तुमच्या हसते आमच्या स्टार ला हा अवार्ड द्यावा हि विनंती!”

 

तसे योगी दादा उठू लागतात, त्यांना मदत करत त्यांना सोबत स्टेज वर बसवून त्यांच्या सोबतची महील वळते, तसे योगी दादा तिचा हात धरून तिला थांब म्हणतात, त्यांना काही त्रास होतोय का वाटून ती तिथेच थांबते. तसं त्या चिठ्ठीत नाव वाचून पुकारण्यात आले...

“आणि आपण सर्व ज्या क्षणाची खूप आतुरतेने वात बघत होतो तो क्षण आला आले... आज च्या संध्याकाळचा सर्वात प्रेस्टीजियस अवार्ड जात आहे... आश्लेषा देश्मुक ह्यांना....”

आश्लेषा चा हात तसा योगी दादा सोडतात ती अविश्वासात त्यांना बघत होती, “अगं खाली जावून परत वरती कशाला यायचं, मला म्हाताऱ्याला नको वाटलं तसं .. म्हणून थांबवून घेतलं तुला...” ते डोळे मिचकावत म्हणले तिला...

आश्लेषा च्या डोळ्यात आनंदाश्रू आले! ती त्यांच्या समोर येवून उभी होते आणि ते तिच्या हातात ती झाकाक्णारी, चकाकणारी ट्रॉफी  देतात...

आश्लेषा त्या ट्रॉफी ला बघतच राहते...

हीलिंग टच!!’ ती त्या वरचे शब्द स्वत:शी कितीदा वाचत होती! तिला विश्वासच बसत नव्हता, हि ट्रॉफी तिला मिळाली होती! परतीच्या रस्त्यावर ती सारखी त्या ट्रॉफी ला बघत होती!

“दादा, मला कशी काय मिळाली?”

“तू कामच असे केले आहेत बेटा!! अशीच चालत रहा, लोकांच दु:ख कमी केलं कि आपल्या पदरात आपो आप सु:ख पडतं!”

आश्लेषा हसत होती! “यु हीलड सो मेनी पिपल...”

ते वाक्य ऐकून आश्लेषा स्वत:शी हसली आणि स्वत:शीच म्हणली, “आय हिल्ड मायसेल्फ!!”

 

आज आश्लेषा ला झोप काही येत नव्हती! डोळे बांध केले कि सारखे ते शब्द कानात ऐकू यायचे!!

“तू न... तू तर सायको आहेस...” ते शब्द ऐकून तिला येत असलेली झोप निघून जायची!

“खरंच यु आर सायको...”

सामन्य माणसाला असं बोलल्यावर राग येयील, पण आश्लेषा त्यावर मंद हसायची! हवेहवेसे वाटायचं त शब्द... कधी ऐकलं नाही की मिस करायची.

पण आज ते शब्द कोण जाणे का तिच्या डोळ्यात पाणी आणत होते! नक्की ते आनंदाश्रू होते अवार्ड चे कि वेदनेने निर्माण केलेले? आज मिस करत होती कदाचित ती स्वतःची पदवी? सायको ?? हीलिंग टच पेक्षा ते नाव जस हवेसे वाट होते?....

 

क्रमश:

1 comment:

  1. 👌🏻👌🏻 Nice start of Story...
    Waiting for next part....

    ReplyDelete

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...