Wednesday, June 6, 2012

मला तो खूप आवडतो...


तो आला कि नकळतच माझ्या चेहऱ्यावर हसू उमलतं, 
त्याचा स्पर्श माझ्या मनाला हळुवार कुरवाळून जातो... 
आमचं नातं हे असंच आहे आज पासून नाही... 
मला काही कळायचे नाही तेव्हापासून, 
तो आला की मी मला छान वाटायचा, 
त्याच्या मुळे मला कधी कधी मग शाळे ला सुट्टी सुद्धा मिळायची,
तो आला की आईच मला म्हणायची आज नको जावूस शाळेला... 
मग कसं नाही आवडणार तो मला... 
त्याच्या मुले मला शाळा सोडून खेळायला मिळायचा, 
मज्जा करायला मिळायची 

मी दर वर्षी आतुरतेने त्याची वाट बघायची कधी येतो ते 
उन्हाळ्याच्या सुट्टी पेक्षा मला त्याला भेटण्याची आतुरता जास्त असायची 
असायची काय... आहे.. अजून ही मला तो आला की छान वाटतं
पण आज काल मी त्याच्या सोबत मनसोक्त बागडू शकत नाही 
पाहिजे ते करू शकत नाही 
आज काल माहित नाही काय झालं तो आला तरी मी त्याच्या कडे लक्ष देत नाही... 
कामात busy आहे असं दाखवते, 
मनाला खूप वाटतं कि त्याच्या सोबत २ शब्द बोलावेत 
काय मी खरच इतकी व्यस्त झाली आहे ?
माझ्या लहानपणीच्या मित्राला भेटायला माझ्या जवळ वेळ नाही?
काय मी इतकी मोठी झाली कि त्याचं सोबत खेळू शकत नाही.. 
तो दर वर्षी न चुकता येतो मला भेटायला ... माझी वाट बघतो.. 
मला ही खूप जावसं वाटतं त्याला भेटायला.. 
पण लोक काय म्हणतील? ह्या प्रश्न नि शांत बसते... 
खिडकीतून त्याच्या कडे बघत राहते... 
तो हाक मारतो मला, त्याचा तो मंजुळ स्वर आज हि घुमतो माझ्या कानात 
पण मी माझं मन मारून तिथेच बसून राहते खिडकीच्या पलीकडे... 
ह्या विचाराने कि उद्या जाईल मी आणि मनसोक्त वेळ घालवेल त्याच्या सोबत... 

असं म्हणत म्हणत पावसाळा कधी स्माप्तो हे काळात हि नाही... 
आणि माझी मनातली इच्छा तशीच मनात हरवून जाते ... 
माझ्या मित्राशी माही भेट होत नाही ...
मला काही काळात नवते तेव्हाच चांगला होता... तो आला की मी धावत जायचे त्याच्या पाशी... 
आज मला सारा काही कळतं, पण काही उपयोग नाही त्यला भेट ही येत नाही... 
पण मला एकदा भेटून त्यला दाखवायचे आहे मी आज ही तीच निशी आहे... 
त्याला परत सांगायचा आहे... 
"मला तू खूप आवडतोस.. आजही मला तसंतास तुझ्या कडे बघत राहायला आवडते... तुझ्हा रीम्झ्हीम आवाज आवडतो..."
हो मला पाऊस खूप आवडतो... !!

Tuesday, June 5, 2012

आला आला पावसाळा...ती पहिली पावसाची सर 
मनातील इच्छा जागवणारी 
आपल्याला परत लहान बनवणारी 
काही हि पूर्व तयारी नसताना येणारी 
आणि आपल्याला चिंब भिजवणारी 
मातीचा सुगंध सगळीकडे पसरवणारी 
आपल्या मनाला नाचवणारी 

अशीच एक सर आज आली 
माझ्या मनाला ताझं तावण करून गेली 
मला परत माझ्या विश्वात रमवून गेली 
जुन्या आठवणी ताज्या करून गेली 
दु:खाचा विसर पडून गेली 
मला ओळ चिंब भिजवून गेली 
अजून एक हवी हवी शी बावन जागवून गेली.... 

Friday, June 1, 2012

ती लाजते जेव्हा .... १.२

दुसर्या दिवशी शिवानी नी साहील ला फोने केला, ती खूप आनंदात होती, त्याच्या फोने च्या घंटी सोबत तिचा आनंद ही वाढत जात होता, शेवटी त्याने फोने उचलला 
"हेल्लो...  "  त्या बाजूने त्याचा आवाज आला. 
"हेल्लो मी शिवानी बोलतीय आपण काल तिथे गणपती मंदिरा पाशी भेटलो होतो न... "
"अः... हम्म हो हो.. बोला न " तो आठवत म्हणाला " कशी काय आठवण काडलीत ह्या गरीबाची?"
"हुः? नाही ते तुम्ही म्हणाला होतात न की नौकरी साठी बोलू शकता... " ती अडखळत बोलू लागली 
"हो हो , म्हणालो होतो मी, मग बोलू का तुमच्यासाठी? तयार आहात का तुम्ही? "
"हो चालेल मला.. "
"ठीक आहे मी बोलतो माझ्या वारीष्टांशी... " त्याने फोन ठेवला. 
शिवानी ह्या एका आशेच्या किरण नी आनंदात होती, ती interview साठी तयारी करू लागली.. तिला ही संधी अजिबात गमवायची नव्हती... दिवस रात्र एक केले तीने, 
शेवटी तो दिवस आला, तिला call आला interview साठी.. .
ती लवकर उठून छान तयार झाली, पांढरा चिकन ची कारागिरी असलेला सलवार कुर्ता आणि त्यावर लाल रंगाची बांधणी ची ओढणी, डोळ्यात थोड काजळ, अर्धे केस क्लीप मध्ये बाधलेले... आणि ती निघाली interview
साठी... मनात नवीन आशे चे किरण बाळगत 

दिवस भर बसून राहिली तरी तीचा काही नंबर आला नाही, BPO साठी ही इतके लोक येत असतील असा तीला स्वप्नात ही वाटला नव्हता, पण आता तिला आपला धृष्टीकोन बदलावा लागणार होता,
कारण हीच BPO industry होती जी आता तीला ती एक संधी देणार होती, दिवस भर काही न खाल्ल्याने आधीच चेहरा पडला होता त्यात काळजी, जीवाची हुरहूर, कधी एकदाचा नंबर येतो असा वाटू लागलेला तिला, 
आणि ३ round होते तिचा १ ही झाला नव्हता, ७ वाजले होते, तिला आता भीती वाटू लागली परत तर नाही पाठवणार? तिच्या मनातल्या प्रश्नांना ती दुर्लक्ष करत होती आणि चांगले विचार अन्याचा प्रयत्न करत होती.
तिचे नाव पुकारण्यात आले, त्या थकलेल्या अवस्तेत ही ती चेहऱ्यावर छान हसू ठेवू इच्छित होती. तिचा biodata जास्ती qualified श्रेणी मध्ये होता तर तिचा interview झाल्यावर तिला घ्याचा का? असा प्रश्न विचारण्यात आला, तिला कधी ही चांगली नौकरी मिळाली तर ती सोडून जाईल अशी त्यांना शंका होती.. त्यांचा प्रश्न ऐकून तर ती भांबावून गेली "ह्यांना माझ्या मनातले कसे कळले?" कसे बसे तिने त्यांना विश्वास दिला कि ती चांगला काम करेल आणि तिला तो जोब करायला मध्ये खूप आवडेल... 
तिला थांबायला सांगण्यात आले... नंतर तिला कळवण्यात आले की त्यांना ह्या गोष्टी साठी काही पुरावा हवा होता की ती त्यांच्या सोबत १ वर्ष तरी काम करेल, म्हणून जर ती बोंड sign करणार असेल तर ते तिला घेतील. 

हा काय आता नवीन प्रश्न.. शिवानी ची चीड चीड होवू लागली पण ती ते चेहऱ्यावर अनु ही नव्हती शकत.  तिने त्यांना थोडा विचार करण्या साठी वेळ मागितला, त्यांनी तिला ७ दिवसाची मुदत दीली, ती तिथून offer letter घेवून निघाली, रस्त्यात ते हातातले पत्र बघून तिला खूप आनंद व्हायचा, पण ती अट आठवून काय करावे काही कळत नवते, ती थोड्या अंतरावर गेली आणि रिक्षा शोधू लागली तोच तिला साहील भेटला, तो बहुदा आपलं   काम संपवून घरी जात असावा, तिला पाहून तो थांबला आणि कसा झाला interview अशी चौकशी करू लागला... 
"मी सोडू का तुम्हाला? मी ही तिकडेच जाणार आहे, तुमच्या वसतीघृह रात्यातच आहे " 
शिवानी खूप थकली होती आणि सकाळ पासून काही खाल्लं नसल्या मुळे ती तयार झाली, रस्त्यात तिने सगळी कहाणी सांगितली त्याला, आणि त्यांची अट ही सांगितली, तो थोडा विचार करून म्हणाला, 
"जर तुला हा जोब करायचा नसेल तर नको करूस, उगाच १ वर्ष जाईल, दुसरा जोब मिळाला तरी नाही करू शकशील, अडकून पडशील"   
"हो न मला ही तेच वाटतंय.. " शिवानी नी आपली भीती प्रकट केली.
"पण मला काय वाटतंय तू कर जॉईन "
"अरे पण ... "
"तू त्यांना सांग तू १ वर्ष चा बोंड नाही करू शकत, लग्नाचं वगेरे कारण दे त्यांना संग तुलाच माहित नाही तू इथे राहणार आहेस का १ वर्ष ६ महिन्याचा देवू शकते म्हण... "
"ते तयार होतील?" शिवानी ला नवते वाट्त ते ऐकतील 
"बघ काय म्हणतात ते..  विचारायला काय हरकत आहे? " आणि त्याने कचं कून ब्रेअक मारले तिचं वसतीघृह आलं होता. 
ती त्याचे आभार मनात तिथून निघाली, मनात विचार करत..  आई बाबा वाट पाहत असतील ती स्वताशीच बोलत होती..  रात्री झोपण्या अगोदर तिने त्यांना फोन केला... 
"बाबा मला मिळाली नौकरी... "  तिच्या आवाजात आनंद नवता.. 
"अगं ताई मग ही तर आनंदाची बातमी आहे... हस की, काळजी मिटली न मग आता तुझी" बाबा धीर देत म्हणाले... 
"नाही न हो.. त्यांनी मला १ वर्षाचा बोंड मागितला आहे... "
"बोंड म्हणजे? का आणि?"
"मी जास्त शिकलेली आहे त्या जोब साठी, त्यांना भीती आहे की मला दुसरा चांगला जोब मिळाल तर मी लगेच सोडेन हा जोब म्हणून त्यांना बोंड हवा "
"काही हरकत नाही ताई .. १ वर्ष असा निघून जाईल.. कळणार सुद्धा नाही तुला.. "
"पण बाबा १ वर्ष खूप होतो.. माझा bio data खराब होईल हो "
"मग काय करायचा ठरवल आहेस? " बाबांच्या आवाजात थोडा चिंतेचा स्वर चढला... 
"बघते त्यांना ६ महिने जमेल का विचारते... ७ दिवसांची मुदत दीली आहे त्यांनी त्या मध्ये दुसरा मिळाला तर बरच होईल  "
"ठीक आहे... बघ काय म्हणतात ते आणि हो काळजी करू नकोस..  "
थोडा वेळ ती आपल्या आई शी बोलली... 
३- ४ दिवस असेच निघून गेले, काय करू ह्या विचारात, दुसर्या जोब चा काही पत्ता नवता... शेवटी तिने ठरवले जे हातात आहे ते नाही गमवायचे... ६ महिने च्या अटी साठी ते लोक तयार झाले तर चांगलाच आहे... नवीन जोब मिळे पर्यंत ६ महिने कसे जातील कळणार ही नाही... पण ते लोक जर नाहीच झाले तयार तर १ वर्ष ही ठीक आहे... देवा ची जशी इच्छा असेल तसा... माझ्या नशिबात हाच जोब असेल... मी उद्या कॅल करते त्यांना.. .स्वतःच  मत ठाम ठरवत ती झोपी गेली. 

दुसर्या दीवशी तिने ऑफिस मध्ये कॅल केला आणि त्यांना विनंती केली की १ वर्ष च्या एवजी ६ महिन्याचा बोंड घ्यावा... 
तिची बुद्धिमत्ता बघता त्यांनी तिला ही सुठ दीली असती असं ते म्हणाले, पण एका ला सुठ दीली की बाकी लोक नाराज होतात त्या मुळे त्यांच्या हातात नाही असा ते म्हणाले....     
तिने शेवटी नाईलाज होवून १ वर्ष चा बोंड सही करून दिला त्यांना आणि २ दिवसांनी तिला आपल्या नवीन जोब वर रुजू व्हयाचे होते... 

आज ती आनंदी होती खूप... बाकी सगळ्या शंका कुशंका दूर ठेवून तिला त्या क्षणा चा आनंद लुटायचा होता... 
तिला नौकरी मिळाली होती, आता ती ही कमवणार, स्वतः च्या पाया वर उभी राहणार, कोणा पुढे पैस्यान साठी हाथ नाही पसरावे लागणार... 
आपल्या आई बाबा साठी पाहिलेले सगळे स्वप्ना आता ती पूर्ण करू शकणार होती.... 
दर महिन्याच्या १ तारखे कडे तिचे ही डोळे लागले राहतील.... 
ती स्व कष्टा ची कमाई... 
आनंद ही आनंद गडे... जिकडे तिकडे चोही कडे... 
आपल्या मनाच्या उंच भरारी ला ती ही आता रोखू नवती शकत... 
एक नको नको सा पण हवा हवा सा स्वाभिमान तिच्या डोळ्यात झळकू लागला होता... 

....क्रमश: