Thursday, December 31, 2020

द रुथलॅन्ड | #१

 द रुथलॅन्ड | #१ 


"केयूर...र र र !!" मागून हाक आली त्यामुळे तो थांबला. धीरज धापा टाकत त्याच्या जवळ आला, "मित्रा तिकडे कुठे चाललास?"

केयूर त्याला काही कळलं नाही असं बघतो... "अरे आत चल ना! किती मोठी लाँच पार्टी आहे!!"

"कशाची?" केयूर त्यात काही रुची न दाखवत निघायला लागतो, मग वळून म्हणतो, "हे न्यू इयर पार्टी अँड ऑल मला नाही आवडत!"

"तुला माहित नाही?" धीरज अष्टकर्याने बघतो तर केयूर मान हलवून नाही सांगतो. धीरज त्याला ओढतच स्वतः सोबत नेतो, तो दार ढकलतो, समोर अवाढव्य मोठ्या मैदानात मोठे मोठे बॅनर लावलेले, केयूर ते बॅनर वाचायचा प्रयत्न करतो, "द रूथलँड, म्हणजे?"

"अरे गेम च नाव आहे!!" धीरज तुला काही की  माहित नाही असं बघतो!

"गेम?"

"आज रात्री आपल्या शहरातलं, अरे शहरातलं काय भारतातील सर्वात मोठा गेम लाँच इव्हेंट आहे!! सर्वात मोठं, नवीन आणि भव्य..."

"कळलं.. तू काय त्यांचा मार्केटिंग एक्सिक्युटीव्ह आहेस का?"

"केयूर असं काय करतोस यार, आपण जाऊयात ना त्या पार्टी ला..."

"अरे बोर असतात रे अश्या पार्ट्या वगैरे!"

"अरे फ्री डिनर, डान्स, दारू, मुली आणि बरच काही आहे, आपलं न्यू इयर सेलिब्रेशन हि होऊन जाईल ते हि फुकटात!!" केयूर त्याच्याकडे ब्लॅक बघतो, "तुला माहिती ना ह्या अश्या पार्टीझ  मला नाही आवडत आणि त्यात मुली वगैरे, मला नाही जमत त्यांच्याशी बोलायला."

"बरं बाबा नको बोलूस, पण माझ्या सोबत तर चल, तुझ्या शिवाय मला कोणी मित्र आहे का? मला तर एन्जॉय करू दे!!" केयूर ते ऐकून हसतो आणि त्याला बघून म्हणतो, "मला तर खूप मित्र आहेत ना तुला सोडून!!" त्यावर धीरज हि हसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याला आपल्या सोबत कॅन्टीन ला घेऊन जातो... सर्व कॉलेज मध्ये गेम चे पोस्टर्स, स्लोगन्स लागले होते, सर्व बघत केयूर धीरज ला म्हणतो, "तयारी तर सॉलिड केली आहे ह्या लोकांनी, बघायला हरकत नाही काय आहे ते!"

धीरज हि दात काढत आनंदानी त्याला सहमती देतो. "संध्याकाळी ६ ला सुरु होणार आहे पार्टी, उशीर करू नकोस हा..." केयूर बरं ठीक आहे असं म्हणून मागवलेल्या बर्गर वर लक्ष देतो. 

"ए... आणि काही तरी मस्त घालून येशील हा!" केयूर धीरज च्या वाढणाऱ्या अपेक्षांना दुर्लक्ष करत सर्व ला ठीक आहे करत आपल्या बर्गर वर लक्ष केंद्रित करतो.


कॉलेज संपवून दोघे आपल्या घरी जातात, संध्याकाळच्या पार्टी साठी तयारी करायची होती, केयूर तर धीरज साठी चालला होता, धीरज आणि केयूर जीवाला जीव लावणारे मित्र, दोघे मुंबई च्या प्रसिद्ध 'हॅरोल्ड' कॉलेज चे विद्यार्थी होते, सेकण्ड इयर ला शिकत, धीरज चा अभ्यासापेक्षा एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मधेच जास्ती लक्ष असायचं, त्याला आवडायचं म्हणून केयूर हि त्यात खेचला जायचा, 

आज वर्षाचा शेवटचा दिवस, सर्व प्लॅन करत होते पार्टी साठी, डिस्क ला जायला, पण आता तर कॉलेज नीच त्यांची पार्टी ची सोय केली होती!! द रुथलॅन्ड च्या लाँच पार्टी मार्फत. 


घरी पोचला तसा केयूर शांत झोपला. त्याच्या वयाची मुलांची एव्हाना ३-३ ब्रेकअप झाले होते पण केयूर ला ब्रेकअप चा ब्र हि माहित नव्हता, तसं त्याला प्रेमाचा प्र तरी कुठे माहित होता, मुलींशी बोलायचं म्हंटल कि ह्याचा श्वास अडकायचा, जो पर्यंत बोलणार नाही तो पर्यंत प्रपोज होणार नाही, गाडी त्यामुळे पुढे कशी जाणार? आपण सिंगल बरे असं मत ठामपणे दर्शवणारा केयूर.


केयूर ला जाग आली तेव्हा ६ वाजून गेले होते आणि धीरज त्याला फोन करून करून थकला होता, त्याच्या फोन च्या आवाजानेच केयूर ला जाग आली होती, फोन अजून हि वाजत होता त्या जाणिवेने तो फोन उचलतो, "मी वाट बघतोय केयूर, कुठे आहेस? येत आहेस ना, डिच नको करुस!!"

धीरज च बोलणं ऐकून केयूर ची झोपच उडाली, हा इथे मस्त झोपला होता, तो त्याला आलो आलो करत फोन ठेवतो आणि पटकन तयारी ला लागतो, "काय घालू?" तो डोकं खाजवत कपाटासमोर उभा होता. त्यानी पटकन आपली ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टी-शर्ट काढलं, लगेच शॉवर घेऊन आला आणि केस सेट न करताच भरभर कपडे घालून तो निघाला, निघतांना त्याच्या लक्षात आलं, रात्री उशीर होईल तर आपलं लेदर जॅकेट खांद्यावर अडकवत तो धावपळ करतच बाईक जवळ पोचला, 'टर्मिनेटर!!' तो स्वतःशी हसून बाईक कडे बघतो आणि तिची किस घेत तिला सांगतो, "टर्मिनेटर, धीरज वाट बघतोय कॉलेज मध्ये हा माझी.. आता तुला मला वेळेत पोहोचवायचं आहे!!"


रस्त्यावर गाडी धूम पळवत केयूर कॉलेज मध्ये पोहोचतो, ऑडिटोरियम ला धावत जातो, कचाकच गर्दी झाली होती सर्वत्र, धीरज ला कुठे शोधणार हा विचार मनात आलाच होता कि धीरज ची थाप त्याच्या खांद्यावर पडली, "मला माहित होतं तू नाही शोधू शकणार म्हणून मग मी दारात पहारेकरी बनून थांबलो तुझी वाट बघत..." धीरज त्याला किती ओळखतो म्हणून तो स्माईल करतो, दोघे समोर बघतात, डोळे दिपावुन टाकणारे फ्लॅश लाईट्स नि सर्वत्र उजेड केला होता आणि मागे कानठाळ्या बसतील अश्या आवाजात आमिर च गाणं वाजत होतं... 


केयूर आणि धीरज अजून ते वातावरण आत्मसाद करत होते, तेव्हा माईक वर अनाउन्समेंट झाली, 

"कोई कहे केहता रहे... हम लोगों की ठोकर में है यह ज़माना!! राईट गाईज?"

प्रेक्षकांतून होकार गुंजला... "सो गाईज रेडी टू वेकम २१२१?" परत होकार वाऱ्यात गुंजला!!

"अँड हाऊ अबाऊट द फर्स्ट ग्लिम्स ऑफ द रुथलॅन्ड?" तिकडून को होस्ट चा आवाज आला...

"ये... येस...!!" करत सर्वत्र जल्लोष सुरु होता आज हॅरोल्ड ची वास्तू दणाणून टाकली होती सर्वांनी!

"ओके, चला तर मग... " म्हणत दोघांनी ऐक मोठ्या स्क्रिन वरचा परदा काढला, "रुथलॅन्ड ची सैर करू!! आज हा कार्यक्रम अख्या भारत देशात सुरु आहे!! रुथलॅन्ड ला आज सर्व भारतात लाँच करत आहोत, तुमच्या सारखेच प्रत्येक शहरात यंग जनरेशन क्रेझी होतं आहे, तुमचा जास्ती वेळ न घेता मी सांगतो रुथलॅन्ड नक्की आहे काय?"


"सुहास, काय म्हणतोस सांगायचं का मग रुथलॅन्ड बद्दल...??"

"नक्कीच शालिनी, पण त्या आधी मी सॅम्पल किट वाटल्या होत्या त्या सर्वांना मिळाल्या का!!" सुहास ऑडियन्स कडे माईक धरतो आणि सर्व एका सुरत हो म्हणून ओरडतात. 


"काय आहे ह्यात?" केयूर त्याच्या किट कडे बघत म्हणतो.

"श... शांत बस आणि ऐक रे..." धीरज केयूर ला शांत बसवतो.


"आज आपण एक अश्या दिवशी जमलो आहोत जेव्हा २१२० ला बाय करून २१२१ चे स्वागत करणार आहोत!! त्याच सोबत आपण स्वागत करणार आहोत मॅजिक ब्रदर ह्यांनी बनवलेल्या गेम चा म्हणजेच द रुथलॅन्ड चा... तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल काय आहे हे रुथलॅन्ड?"

"नक्कीच सुहास, मी तर खूप उत्सुक आहे जाणून घ्यायला..."

"शालिनी रुथलॅन्ड हा आर्टिफिशिअल इंटीलीजेंस वर आधारित एक गेम आहे!! 

"गेम आहे मग ह्यात एवढे खास काय?" शालिनी सर्वांच्या वतीने प्रश्न मांडते.

"मला हा प्रश्न अपेक्षितच होता! हा गेम तुम्ही फक्त खळणारच नाही तर अनुभवू शकणार आहात, हा साधा सुद्धा विडिओ गेम नाही, हा गेम घेऊन जाईल तुम्हाला रुथलॅन्ड वर जे आपल्या नावाप्रमाणेच रूथलेस आहे, गेम मध्ये एन्ट्री केल्यावर वापस बघणे नाही आहे, रुथलॅन्ड वर तुम्हाला मिळणार आहे आयुष्याचे अनुभव, ब्रेथटेकिंग ऍडव्हेंचर आहेत इथे!! असे मोमेंट्स जे तुमच्या अंगावर शहारे आणतील!"

"वाह!! मला तर राहवत नाही आहे, आत्ता खेळावासा वाटतोय हा गेम!!" शालिनी अति उत्साहात म्हणाली.

"नक्कीच!!" सुहास तिच्या डोळ्यात बघतो आणि मग इतरांना म्हणतो, "पण शालिनी हे इतकं सोप्प नाही!" शालिनी अर्थातच असं त्याला बघते, सुहास थांब मी सांगतोय असं बघत म्हणतो, "हा गेम चालणार आहे १ महिना!!"

"१ महिना!!" सर्व ऑडियन्स मध्ये खुस फूस सुरु झाली...

"हो... १ महिना तुम्ही ह्या जगात नसणार आहात... तुम्ही ट्रासनपोर्ट केले जाणार आहात रुथलॅन्ड वर, तुम्ही तिथे  असणार आहात, नवीन नवीन अनुभव घेत!!" ते ऐकून सर्वत्र शांतता पसरली, सर्वांच्या मनातले प्रश्न ओळखून सुहास पुढे म्हणतो, "गाईज आम्हाला तुमचं शैक्षणिक नुकसान नाही करायचं... रुथलॅन्ड ची ट्रिप हि तुमच्या सुट्ट्या सुरु होतील तेव्हा सुरु होणार आहे!!" सर्व अजून हि खुसफुसत होते, सर्वांना शांत करत सुहास पुढे म्हणतो, "तर मग गाईज तुम्हाला आवडेल का खेळायला? आवडेल का जायला रुथलॅन्ड वर? कुठे आहे हे रुथलॅन्ड? खूप प्रश्न पडले आहेत ना?"

सर्व नक्कीच, हो ना असे म्हणतात तेव्हा सुहास पुढे म्हणतो, "आम्ही तुम्हा सर्वांसाठी एक गोल्डन चान्स घेऊन आलो आहोत, आज रात्री १२ वास्ता संपूर्ण भारतात जिथे जिथे हि लाँच पार्टी सुरु आहे, सर्वांची एक लॉटरी निघणार आहे... " सर्व श्वास रोकुन सुहास काय बोलत आहे ऐकत होते, "लॉटरी मध्ये भाग कसा घ्यायचा हाच प्रश्न आहे ना?" तो स्वतःशी हसून म्हणतो, "मी तुमच्या पर्यंत आता ज्या सॅम्पल किट वाटल्या आहेत त्यात बघा तुमचं हे लॉटरी च तिकीट पण आहे! जस्ट फील इट अँड पुट इट इन द लॉटरी बॉक्स!!" सुहास स्टेज वर ठेवलेला बॉक्स दाखवतो!!

"हे काम तुम्हाला १२ च्या आधी करायचं आहे!! १२ ला भारतभरातील सर्व मिळालेली तिकीट आमचे सर्वर शफल करून २ लकी विनर काढतील!! त्यांना रुथलॅन्ड फ्री खेळायला मिळेल... हा ब्रेथटेकिंग अनुभव फ्री घेता येणार आहे!!" सर्व तोंड वासून बघत होते, कान देऊन ऐकत होते, "मग तुम्हाला व्हयचं ना तो लकी विनर!! कशासाठी थांबलात तर... उघडा आपली किट आणि घ्या ते तिकीट!! पण हा सावध रहा तिकीट जमा करायच्या आधी १० वेळा विचार करा, १ महिना रुथलॅन्ड वर रहावे लागेल! जमेल ना? जमणार असेल तरच नाव द्या... हा गेम कमजोर दिल वाल्यांसाठी नाही आहे! एकदा तुमचं नाव सिलेक्ट झालं तर मग तुम्हाला माघार घेता येणार नाही... कारण तुम्हीच बघा इतके लोक आहेत आतुर, त्यात जर तुमची निवड झाली आणि तुम्ही माघार घेतली तर तुम्ही किती लोकांच्या स्वप्नांवर पाणी घालणार, आणि आम्ही हि लॉटरी परत नाही काढू शकणार!! तेव्हा लॉटरी तिकीट सबमिट करतांना मनाशी दृढ निश्चय करून मगच टाका... हि आमची नम्र विनंती आहे!!"


धीरज मंत्रमुग्ध होऊन सुहास ला ऐकत होता, केयूर नि आपल्या हातातलं किट बघितलं, तो त्यावरचे इंस्ट्रक्शन वाचत होता, धीरज नि घाईत आपल्या किट मधून तिकीट काढून त्यात मागितलेली माहिती भरून पण टाकली, केयूर तिकीट वाचत होता, "एवढी पर्सनल माहिती का हवी आहे ह्यांना... माझा ई-मेल ऍड्रेस पाहिजे ठीक आहे, घरचा ऍड्रेस घेऊन काय करायचं ह्यांना..." केयूर चा अति शहाणपणा बघून धीरज ची चिडचिड वाढत होती, "केयूर... भर ना रे पटकन... ते बघ स्टेज वर किती लाईन लागली आहे!!"

"अरे १२ पर्यंत वेळ आहे!!"

"म्हणून काय आपण १२ ची वाट बघायची आहे का..."

"बरं चिडू नकोस... मी भरतो!!" केयूर जीवावर येऊन आपली माहिती भरत होता, तोपर्यंत धीरज नि आपल्या किट मध्ये अजून काय काय आहे बघायला सुरवात केली, त्यात रुथलॅन्ड च एक टी-शर्ट होतं आणि निऑन च वॉच, धीरच लगेच ते आपल्या मनगटावर चढवतो, रात्रीच्या अंधारात ते चमकत होते, "अरे पण हे कसलं घड्याळ आहे? ह्याला काटे नाहीत, आकडे नाहीत, वेळ कसा कळणार?" धीरज उत्सुकतेने घड्याळी ला बघत होता, केयूर नि आपली सर्व माहिती भरली, तिकीट ला बघतच तो धीरज ला चल म्हणतो. धीरज त्याच्या मागे मागे निघतो, "केयूर... हि घड्याळ बघ ना, किती वाजलेत संग ना..."

केयूर त्याच्या हात धरून मनगटावर बघतो आणि सांगतो, "९:४० झालेत!!"

धीरज डोळे फाडून त्याला बघतो, "कसं कळलं तुला? ह्या घड्याळी ला ना काटे आहेत ना आकडे..."

"पण माझ्या घड्याळी ला आहेत..." केयूर त्याला आपलं घड्याळ दाखवतो आणि मोठ्याने हसतो!! "अरे डंबो, ते काय तुला साधं सुध घड्याळ देणार होते का? काही असेल त्यात हि रुथलॅन्ड शी रिलेटेड गूढ लपलेलं..." धीरज त्याला पॉईंट आहे असं बघतो!! दोघे जाऊन स्टेज पुढे उभे होते, स्टेज वर ठेवलेले पुतळे बघत केयूर च्या मनात प्रश्न सुरु होते... सुहास आणि शालिनी लोकांना काही अडचण आहे का ते बघत होते, सुहास त्यांच्या जवळ येऊन त्यांना विचारतो, "काही अडचण नाही ना..." धीरज मान हलवून नाही सांगतो..

केयूर त्याला म्हणतो, "अडचण नाही एक प्रश्न आहे विचारू का?" सुहास हो असं बघतो, "ते पुतळे कोणाचे आहेत?"  

"ओह्ह... ते तर सांगायचं राहिलंच!!" सुहास काही आठवलं असं बघून सॉरी म्हणत स्टेज वर चढतो आणि परत माईक वर बोलतो, "गाईज तुम्ही गेम मध्ये असाल ना तेव्हा तुम्ही ह्या अवतारात असणार!! तुम्हाला ह्यांना भेटायचं का? आवडेल का?"

शालिनी हि त्याला जॉईन झाली... "हि आहे टिनसले आणि हा आहे एरियन!! तर गेम मधले तुमचे अवतार बघून कसं वाटतंय? कोणाला बनायला मिळेल टिनसले? तिचे डोळे बघा कसे चमकतायेत!!" शालिनी सर्वांना हसून बघते. "बघुयात इथून कोणाची निवड होते का गेम साठी!!" सुहास शालिनी ला बघतो. 


"... एवढेच नाही गाईज!! तुम्हाला सर्वांना आज इथे रुथलॅन्ड चा फील घेता येणार आहे!! मुलींना टिनसले  होऊन बघता येणार आहे तर मुलांना एरियन बनून!!" सर्व कसं असं बघतात, आम्ही इथे सर्वत्र AI स्लॉट इन्स्टॉल केले आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल वर एक टेम्पररी अँप इन्स्टॉल करायचं आहे, आणि बस... अँप वर पासवर्ड काय टाकायचा हे तुमच्या किट मध्ये दिलेला आहे, प्रत्येकाचा पासवर्ड वेगळा आहे तर आपला आपला पासवर्ड वापरा!! एन्जॉय गाईज!!"


धीरज आणि केयूर आपले तिकीट बॉक्स मध्ये टाकतात. 


धीरज लगेच आपल्या मोबाईल वर अँप इन्स्टॉल करून पासवर्ड टाकून तयार होता, केयूर त्याचं अनुसरण करत आपल्या किट मधला पासवर्ड टाकतो... "अरे हे काय ह्यांनी मला एरियन नाही बनवलं... मी टिनसले झालो आहे!!" केयूर निराश झाला, "चालतं रे चल ना आपण खेळू..."

दोघांनी आपले AI गोगल चढवले आणि दोघे गेम खेळण्यात मग्न झाले, "अरे काय मस्त गेम आहे!!" धीरज खेळतांना मोठ्यांनी ओरडत होता!! सुहास त्याच्या जवळ येऊन म्हणतो, "तुम्हाला गेम आवडला ऐकून खूपच छान वाटले पण खरोखरच गेम खूप वेगळा आहे !! हे तर तुम्ही AI मुळे मोबाईल वर खेळू शकत आहात, कंटाळा आला कि मोबाईल बंद करता येईल....  पण खऱ्या गेम मध्ये कोणतीच पळवाट नाही आहे... " केयूर आपले गॉगल काढून सुहास ला बघतो, तो मी खरं सांगत आहे असं त्याला बघतो आणि केयूर स्मित करायचा प्रयत्न करतो. 


बराच वेळ गेम खेळून होतो, लाईफलाईन संपते तसा गेम संपतो, दोघे अगदी त्यांनी कसली धमाल केली हे एकमेकांना सांगायला आतुर होते ती चर्चा करतच ते तिथून निघतात, वातावरण अजून हि तापलेलं होतं, मागे गाणी सुरु होती! धीरज ची डान्स करायची इच्छा होती केयूर ला माहित होते, त्यामुळे ते सुद्धा सुरु असलेल्या मुलांच्या गोंधळात शामिल होतात, बराच वेळ दोघे डान्स करतात आणि मग भूक लागली आहे हे जाणवायला लागते!! दोघे मग जेवणाकडे वळतात, "किती वाजले रे?" केयूर धीरज ला विचारतो, तो मुद्दाम विचारत आहे हे धीरज ला माहित होते, "अरे घड्याळ बघ ना तुझं!!" केयूर त्याच्या मनगटाकडे बघून परत चिडवत म्हणतो, मग स्वतःच आपलं घड्याळ बघून म्हणतो, "११ वाजले... धीरज... ह्या वर्षाचा शेवटचा तास!!" धीरज ते ऐकून अरे हो रे असं त्याला बघतो! दोघे आपल्या प्लेट्स घेऊन एका निवांत ठिकाणी जाऊन जमिनीवर बसतात. एक मोठा श्वास सोडत केयूर म्हणतो, "काही वेळात हे वर्ष संपणार, २१२१ आपल्या सोबत काय घेऊन येईल?"

"नक्कीच चांगलंच असणार आहे २१२१ आपल्या साठी!!" केयूर कसं काय असं बघतो...

"अरे मग सुरवातच झोंबलास्टीक होणार ना भावा... मग वर्ष पण तसंच जाणार ना..." केयूर त्याला टाळी देत हो ना असं बघून हसतो आणि दोघे आपले ड्रिंक्स आणि जेवण एन्जॉय करत आपले त्या वर्षातले शेवटचे क्षण घालवतात. त्याचवेळी नवीन वर्षाच्या नवीन उमेद मनात जन्म घेत होत्या!


जसा जसा वेळ पुढे सरकत होता १२ कडे सर्वांचे लक्ष होते आज, फक्त नवीन वर्ष सुरु होणार म्हणून नव्हते तर रुथलॅन्ड वर ते लकी २ कोण व्यक्ती जाणार ते हि जाहीर होणार होते, त्यामुळे सर्वांच्या हृदयाची धडधड वाढलेली होती, भारतातला प्रत्येक तरुण हीच आशा लावून होता कि त्याचं नाव निवडून यावं, हा लकी चान्स त्याला मिळावा! नक्की कोणाच्या नशिबात रुथलॅन्ड होते हे कोणाला माहित नव्हते, समोर असेलेले क्षण एन्जॉय करण्यात सर्व मग्न होते!


क्रमश:





तुम्हाला एक वेगळ्या दुनियेच्या सफर वर घेऊन जायला आले आहे, मग तय्यार? २१२१ मधली, हो बरोबर वाचले २१२१ मधलीच आज पासून १०० वर्षानंतर ची हि निराळी दुनिया अनुभवायला? तुमच्यासाठी हि नवीन रोमांच  आणि ऍडव्हेंचर ची आगळी वेगळी कथा घेऊन आले आहे, आशा आहे तुम्हाला आवडेल! खाटा जास्ती मोठी नसणार आहे फक्त १०-१२ भाग असतील आणि मी रोज पोस्ट करणार आहे!!

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...