Sunday, October 6, 2019

तू भेट ना... पर्व २... एक झलक ...



किंजल च्या हातून फोन पडला... तीला काय ऐकले हे काही कळेना... काल सकाळी तर सर्व ठीक होते... हे काय घडले..?? काही समजेना... अनुज बाजूलाच होता त्याने फोन उचलून काय झाले म्हणून समोर विचारले... तिकडून मृणाल बोलत होती. अनुज हि धक्क्यात होता पण त्याला खचून चालणार नव्हते...
धावपळ करून अनुज ने मुंबई ची तिकीट काढून आणले... सर्व तयारी त्यानेच केली, पैश्याची जमवा जमव केली आणि घाई गडबडीत तो तिला घेऊन मुंबई ला पोचला...

किंजल तर बोलायच्या मानस्थतीतच नव्हती... अजून हातावरच्या मेहेंदीचा रंग हि उतरला नव्हता, आनंदाचे क्षण नीट साजरे हि केले नव्हते, हे काय घडले. सारखे सारखे तिला तिनी घालवलेले ते क्षण आठवत होते, घरातले आनंदाचे वातावरण... स्वॅप पूर्ण झाल्याचा भास होता तो... हो भासच होता...

हॉस्पिटल ला पोहोचल्यावर अनुज ने मृणाल ला फोन लावला... ती सांगते तिथे ती दोघे लगबगीने पोचतात...
रात्र झाली होती बरीच. किंजल मृणाल जवळ जाते, मृणाल ला काय बोलावे कळत नव्हते... ती किंजल ला उराशी घेते आणि म्हणते.. "सर्व ठीक होईल... घाबरू नकोस..."
किंजल ला काय बोलावे सुचत नाहीं... ती फक्त म्हणते "कसं काय?"
"मला हि काहीच माहित नाहीं... काल दुपारी फोन आला पोलीस चा, त्याच्या गाडी च्या रजिस्ट्रेशन च्या वेळेस माझा पत्ता आणि नंबर दिला होता म्हणून त्यांना पोचता तरी आले माझ्या पर्यंत... "
"मी बोललेले नको जाऊस गाडी नि... लांबचा प्रवास आहे... माझं कोण ऐकणार... " किंजल मुसमुसत म्हणाली...
"जा बघून ये त्याला... " मृणाल तिला धीर देत म्हणाली...
किंजल मान हलवत नाहीं असे म्हणाली... "मला शक्य नाहीं त्याला असे बघणे... "
मृणाल तिला धीर देत म्हणते... "ठीक आहे तू बस इथे, मी काही लागते का बघून येते... "
"रूम कुठे आहे?"
"अजून रूम मध्ये नाहीं शिफ्ट केले, ICU मध्ये आहे अंडर ऑबसेर्व्हशन... अजून शुद्ध आली नाहीं आहे ना... ४८ तास होतं आले त्यामुळे अजून हि काही सांगता येत नाहीं... रक्त हि खूप गेलेले ... "
मृणाल चे बोलणे एकूण किंजल ला भुरळ येऊ लागली... "किंजल... " अनुज तिला खाली बाकावर बसवतो आणि मृणाल ला बघून म्हणतो... "तिचा ऍक्सीडेन्ट झालेला तेव्हा पासून तिला रक्त बघितले, विचार वगैरे हि केला  कि खूप त्रास होतो... भीती बसली आहे तिच्या मनात.... तुम्ही हे सर्व जीजू बद्दल बोलताय त्यामुळे बहुदा जास्तीच हळवी झाली... " अनुज मृणाल ला सांगतो आणि मी तुमच्या सोबत येतो बघायला असे म्हणतो... तो किंजल कडे बघतो... "तू इथे थांबतेस? मी जाऊन येतो दीदी सोबत... "
किंजल नजरेनेच हो म्हणते... ते गेल्यावर ती आपल्या हातातला कागद उघडते...

'माझं सारं विषव आता तूच आहेस ओंकार!! तुझ्या भावतीच माझे स्वप्न आणि मी आहे... गोल लिस्ट काय बनवू... २ वर्षाची काय... साऱ्या आयुष्याची हीच गोल लिस्ट आहे... तुझा हट्ट म्हणून लिहीत आहे ...
१. तुला नेहमी आनंदी ठेवणे...
२. तूच माझं सर्वस्व ... तुझी सारी स्वप्न माझी, तुझं दुःख माझं, तुझं हसणं माझं तू माझा मी तुझी...
३. तू म्हणशील ते करील... तशी राहील... तशी वागली...
४. तू तूच माझं सर्वस्व ...'
वाचता वाचता डोळे पाणावले तिचे... परत ती फोल्ड करून वाचन बंद करते. स्वतःशीच विचार करत तिथे बसून असते. त्याच्या साठी प्रार्थना करत.

सकाळी...
डॉक्टर ओंकार ला तपासायला येतात. मृणाल आणि अनुज तिथेच असतात, ते डॉक्टर ला सर्व विचारपूस करतात... डॉक्टर शी बोलून अनुज बाहेर येतो.

हॉस्पिटल मध्ये मंद आवाजात रेडिओ वर गाणं लागलं होतं ...

'कभी कभी अदिती जिंदगी में युहू कोई आपणा लागत है... कभी वो बिछड जाये तो सपना लगता है ऐसे में कोई कैसे अपने आसू को रोके और कैसे कोई सोचे एव्हरीथिंग गोंना बी ओके... ऐसे में कैसे कोई मुसरकराये और हसदे खुश होके... '

किंजल चा बाकावर बसल्या बसल्या डोळा लागला होता. अनुज तिच्या साठी नास्ता घेऊन येतो...
किंजल त्याच्या हातातली प्लेट बघून मान हलवून मला नको असे म्हणते... "डॉक्टर येऊन गेलेत का?" अनुज मान हलवून हो असे सांगतो...
"काय म्हणाले ते? कधी येईल ओंकार ला शुद्ध? कसा आहे ओंकार आता?" अनुज काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. "अनुज प्लिज असा शांत नको राहूस काय म्हणाले डॉक्टर?" किंजल अधीर झाली होती.
अनुज आपले अश्रू आवारात तिला जवळ घेतो आणि मान हलवत म्हणतो... "किंजल... जीजू चा खूपच भयानक ... खूप लागले आहे त्यांना... डॉक्टर म्हणतायेत त्यांना डोक्याला खूप मार लागला आहे म्हणून शुद्ध येत नाहीं आहे आणि हृदयाच्या वाल्व रुपचर झालेत... त्यांचे फक्त २०% हृदय काम करत आहे सध्या त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे आणि अश्या परिस्थितीत ... " अनुज पुढे बोलायला घाबरू लागला...
"चल... " किंजल त्याचा हात झटकत म्हणाली... "हि गंमतीची वेळ नाहीं अनुज... असं काही बोलून तू माझं हृदय फेल करशील हा... " किंजल डोळे पुसत म्हणाली... अनुज गंभीर होऊन तिच्या कडे बघत होता... किंजल ला त्याच्या डोळ्यात बघायची हिंम्मत हि होतं नव्हती आता... त्याच्या डोळ्यातली भीती तिला जाणवू लागली होती... "सत्य परिथिती शी जितक्या लवकर अवगत करशील स्वतःला तितकं चांगलं..." तो तेवढे बोलून प्लेट तिथेच ठेवून आपले डोळे पुसत तिथून निघून जातो. किंजल ला तिच्या विचारात तिथेच सोडून...

बराच वेळ किंजल स्वतःशी विचार करत बसते... आता काय ऐकले आपण... ओंकार चे हृदय फक्त २० टक्के काम करत आहे... ?? कुठे कमी पडली माझ्या प्रेमाची? ओंकार ला मी एकटं का सोडलं? हे काय घडलं...?? ओंकार बोल ना रे माझ्याशी... ?? ती आपल्याच विचारात ओंकार ला बघायला निघते... पाय नेतील तिकडे... काही क्षणांनी ती स्तब्ध उभी राहते... समोर काचेचं पार्टीशन होते आणि त्या पलीकडे ओंकार... किंजल चा जणू श्वासच थांबला, ओंकार ला असे पट्ट्यांत बघून, एकीकडे रक्त चढवलेले, नळ्या लावलेले, प्राणवायू लावलेला... हातातल्या गोल लिस्ट च्या चिट्ठी चा चुरगळा झाला होता. 

'आओगे जब तुम... साजणा... अंगण... फुल खिलेंगे... बारसेंग सावन...
नैना तेरे कजरले है.. नैनो पे हम दिल हारे है... अंजने में हि तेरे नैनो ने वादे किये कई सारे है हा सासो कि लय माध्यम चाले है... तोसे कहे है... दो दिल ऐसे मिलेंगे '

त्या गाण्याच्या हि आवाजात ठळक असे ऐकू येत होते ते ECG मशीन चा बीप बीप चा आवाज जे किंजल ला सांगत होते अजून त्याचे हृदय धडधडत आहे!! किंजल तिथेच बराच वेळ स्तब्ध उभी होती, ओंकार ला असे निशब्ध बघून काय करावे कळत नव्हते, कधी तो डोळे उघडेल आणि त्याचे ते निळे डोळे तिच्या शी काही न बोलता परत खूप काही बोलतील असे झाले होते तिला...
"ओंकार... तुला वेळ घ्याचा घे... माझ्याशी नाहीं बोलायचे नको बोलूस... पण... हे सर्व थांबव हा... " किंजल लांबूनच त्याला बघत म्हणाली...
किंजल आत जाऊन त्याच्या जवळ बसली...
तिच्या डोळ्या समोर त्या सकाळचे किंजल ओंकार खेळू लागले... सर्वांची नजर चुकवून दोघे घराच्या टेरेस वर भेटलेले...
"लिहिलेस?" ओंकार नि अधीर होऊन विचारले तर किंजल मान हलवून हम्म म्हणाली... "दे ना मग... "
"आधी तू दाखव... "
"मी मागितले आहे ना मग आधी मला दाखव... "
किंजल त्याच्या हातात रिकामी चिट्ठी देत म्हणाली.. "प्रयत्न केला पण काही सुचले नाहीं... " ती ओंकार चा त्या रिकाम्या चिट्ठी कडे बघून उतरलेला चेहरा बघून सॉरी असे बघत होती ... "तुझी दे ना..."
"नाहीं... मी तुला लिहायला सांगायचे काही कारण होते... मला माहीत आहे माझी बघून घेशील आणि झाले... तुझी गोल लिस्ट सर्व माझ्या गोल लिस्ट अवती भवती फिरेल..."
"अरे असं कसं... माझी गोल लिस्ट माझी असणार ना... " किंजल भांडू लागली... "बरं... एक... एक गोल सांग... मग मी देईल ना माझी लिस्ट तेव्हा बाकीचे सांग... "
ओंकार आपली लिस्ट बघून थोडा विचार करतो... मग पुढे भाव खात तिला म्हणतो ... "ठीक आहे एक सांगेन... पण फक्त एक... "
किंजल आनंदाने मान हलवत हो म्हणाली... ओंकार पुढे म्हणू लागला... "मला माझी प्रेमकथा लिहायची आहे... ह्या जगाला ऐकवायची आहे!!"
"काय!! वेडा आहेस का..? जगाला ऐकवायची म्हणे... शांत बस... " किंजल त्याला चिडवत म्हणाली...
"का? तुला नाहीं वाटत आपली कहाणी ह्या जगाला कळावी... किती वेगळी सुरु झाली आपली कहाणी... कधी वाटले होते तुला इथे येऊन पोचेल?"
"ते सर्व मान्य आहे... पण मला नाहीं सांगायचे कोणाला... "
"का??"
"तू माझ्या वर इतकं प्रेम करतोस बघून लोकांची नजर लागेल ना... " किंजल त्याच्या हृदयावर डोकं ठेवून त्याची धडधड ऐकत म्हणाली...
"ह्म्म्म..." ओंकार तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला...
"ठीक आहे... कॅन्सल ..."
"ए... असं नाहीं यार.. माझ्या,मुळे तुझी गोल लिस्ट नाहीं  बदलायची... "
"मग आता काय करू? दुसरी कोणी धरावी लागेल जी माझ्यावर तुझ्या पेक्षा जास्ती प्रेम करेल... आणि मला कथा लिहायला प्रोत्साहित पण करेल... हो ना... " ओंकार डोळा मारत तिथून पळ काढत म्हणाला...

"काय बोललास... " असे म्हणत किंजल त्याला पकडायला त्याच्या मागे धावू लागली... त्यांना असे भांडताना प्रेम करताना बघून किंजल हि अचानक हसली आणि वर्तमानात आली... समोर ओंकार ला असे निश्चल बघून परत मनात असंख्य वेदना झाल्या...

ये आईंना है या तू है जो रोज मुझको सवरे ...
इतना सोचने लगे क्यू मे आजकाल तेरे बरे
तू झील खामोशि की लॅब्जो कि में  एक लेहेर हू
एहसास कि तू है दुनिया छोटा सा में एक शहर हू...

"ओंकार... मी हि माझी गोल लिस्ट नाहीं बदलणार आहे... तू आणि तूच आहेस माझं सर्वस्व.. माझा गोल तूच ... तूच आणि तूच, मी नाहीं बदलणार ती,  तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणणे, तुला आंनदी ठेवणे हेच आहे माझं गोल... कळलं.. आज च उद्याच... २ वर्षाचं नाहीं तर अख्या आयुष्याचे... हो... तू काही हि बोल... ह्यातच माझा आनंद लपला आहे रे... आणि भांडायचे का तुला माझ्याशी... नाहीं हि अशी नसते गोल लिस्ट... भांड ना मग... ये ना... उठ ना... बोल ना... भांड ना.. चीड माझ्यावर... पण प्लिज... बोल... " किंजल बोलता बोलता रडू लागली... 

खुद्द से है अगर तू बेखबर... रख लू में तेरा खयला क्या...
में दौड के पास आऊ... तू निंद में जो पुकारे... में रेत हू तू है दारिया... बैठी हू तेरे किनारा...
ये आईंना है या तू हॆ... जो रोज मुझको सवरे...

किंजल बोलता बोलता हळवी झाली... "तू मला नेहमी त्रास देतोस यार... तुला माहित आहे ना... तुझ्या डोळ्यात माझा जीव अडकलाय... बघू देत ना परत त्यांच्यात हरवू देत ना... उघड ना रे डोळे... हाक मार ना रे मला किंजल म्हणून... "

तान्हाई का में जवाब हू... होगा मेरा भी असर तू अगर पढ ले में तेरी किताब हू
सिने पे मुझको सजाके जो रात सारी गुजारे... तो में सवेरे से केह दु.. मेरे शहर तू ना आये...
ये आईंना है या तू है...

..... लवकरच येत आहोत तुम्हाला परत भेटायला
किंजल आणि ओंकार आपल्या परिवारासह...

फ्रेंड्स,
सॉरी... खरंच पण हे लिहिल्या शिवाय चैन पडेना...
किंजल ओंकार सारखे डोकावून बघायचे.. कि कधी आम्हाला विचारणार... कधी काही काम देणार... असे...
आता जरा रिलॅक्स वाटतंय...
हो माहित आहे... मी रिलॅक्स झाले आणि तुमच्या डोक्यात चक्र सुरु झाले...
पण जास्ती दिवस नाही... सर्व काही कळेल... काय झाले कसं झालं , पुढे काय होणार वगैरे वगैरे... ओंकार वाचेल कि नाही... हिरो आहे तर वाचलाच पाहजे का?.. काय किंजल चे ओंकार शिवाय अस्तित्व नाहीं?
काय प्रत्येक लव्ह स्टोरी सुखातच संपते? आयुष्यात असे नेहमी सुखाचं राहील नेहमी असे नाहीं ना... दुःख हि आयुष्याचे अविभाज्य अंग आहे ..

आज काही प्रश्न नाहीं सोडत आहे... कारण मला माहित आहे आज तुमच्याच मनात खूप प्रश्न आहेत... आणि तुम्ही आता म्हणताय काय हे निशी... अशी काय तू....
काय करू मी अशीच आहे... छळल्याशिवाय चैन मिळत नाहीं... आणि मी तर छळतच राहणार... बघा झेपते का तुम्हाला ते... म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीं...या से काही आहे.. माझे मराठी इतकं विशेष नाहीं...

सर्व काही कळेल... आणि जास्ती लांब नाही लवकरच कळेल... TLJ३ संपणार आहे लवकर...
त्रास होत असले तर सॉरी... पण मी कॉन्सन्ट्रेटे नव्हते करू शकत हे लिहिल्या शिवाय...!!
तर लवकरच घेऊन येईल किंजल ओंकार ची पुढची कहाणी...

मला कोणी विचारले तुझी फेव्हरेट कथा कोणती... ??
आई ग... किती सोपा तो प्रश्न? मी विचार करू लागले पण खरंच प्रत्येक कथा हि वेगळी आहे आणि ती लिहितांना वेगळे अनुभव, पण मी जेव्हा विचार केला एखादी कथा आवडीची म्हणजे काय? ती तुमच्या हृदयात एक वेगळे स्थान स्थापित करते ती... तर खरं तर मी TLJ२ लिहितांना ज्या इमोशनल फेज मधून गेले मला वाटले नव्हते कि त्याच्या पेक्षा अजून चांगली कथा मी लिहू शकेल... पण स्वतःची अपेक्षा मी खोटी ठरवली ... मी 'तू भेट ना' लिहिली... आणि काय झाले सांगू?
हि कथा माझ्या खूपच जवळची आहे... ह्या कथे मुळे मला माझी आकृती भेटली आहे...
खरं... म्हणजे जी फक्त एक कल्पना होती माझी ती सत्यात उतरली आहे... आणि हो... मी हि बऱ्याच लोकांची आकृती होऊन त्यांना मदत केली... म्हणून हि कथा खूप जवळची झाली आहे... कल्पना अस्तित्वात साकार होणे... म्हणजे स्वप्नच पूर्ण होणे नाहीं का...??
तुम्ही सर्वांनी ह्या कथेला इतके प्रेम दिले मला खूपच भारी वाटतंय!!
जसे मी आधी पण बोलले आहे हो कथा जिथे पोचली आहे तिथवर पोचण्याचे श्रय पूर्ण पणे तुम्हा सगळ्यांना जाते. मी विचार हि नव्हता केला, तुम्ही विचार करायला भाग पडले...!!! मनापासून आभारी आहे... माझ्यातल्या लेखकाला काही नवीन लिहायला प्रेरणा देत राहण्यासाठी!!

निशी ...

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...