Sunday, October 4, 2020

दिलं दोस्ती रीलोडेड (DDR)  #२

मीनल फोन वर बोलण्यात मग्न होती, कोणाशी तरी भांडत होती फोन वर, तिचं गरम डोकं लगेच चढलं होतं, ती कोणाशी काही न बोलता खोलीत निघून जाते आणि तयार होऊन कोणाला काहीच न बोलता निघून जाते...
"अशी काय हि काही न सांगता कुठे गेली ह्या वेळी?" रेश्मा काळजी ने म्हणली.
"येईल ग इथेच गेली असेल..." सुजय सांजवतो तिला.
"अरे पण सांगून नको का जायला?" रेश्मा हातवारे करत काळजीने म्हणते, "जेवायचं कसं करायचं?"
"कोणाशी बिनसलं काय माहित हिचं" एना पण काळजीत विचार करत म्हणली.
"अरे एवढं काय तुम्ही लोक..." कैवल्य हि तयार झाला होता, "आली असेल ऑडिशन गेली असेल..."
"ऑडिशन ह्या वेळेला?" रेशीम त्याला लाटणं दाखवत म्हणते, ते बाजूला करतं कैवल्य पाण्याची बाटली फ्रीज मधून काढून तिला पाणी पीत सांगतो, "मी बाहेर जात आहे हा, आणि मी सांगून जात आहे मला ओरडायचं नाही..." तो डोळे मोठे करून तिला बरं का असं बघतो. 
"तू कुठे निघालास?"
"अरे आता टार्गेट मीट नको का करायला, मी तर लागलो कामाला, एका प्रोड्युसर चा फोन होता, त्यांना भेटून येतो!" कैवल्य समजवतो परत, रेश्मा हा, चांगलं आहे असं बघते.

सर्व आपल्या कामात होते... बऱ्याच वेळानी दारावरची घंटी वाजते, रेश्मा किचन मध्ये बिझी असते, सुजय आपल्या लॅपटॉप वर काही करत असतो, आशु आडवा पडला होता मोबाईल वर खेळत, एना तिच्या खोलीत असते. दार उघडायला कोणी स्वतःहून तयार होतं नव्हतं.

बाहेर... 
"माजघर? म्हणजे?" मीनल तो प्रश्न ऐकून त्याच्या कडे रागाने बघत म्हणते, "ह्या घरातली सर्व माणसं माजात असतात म्हणून त्याच तसं नाव आहे..."
"ओह्ह्ह आय एम इम्प्रेसज्ड..." तो पाटीवरून हात फिरवत ते वाचू लागते... "ह्या घरातील सर्व पात्र काल्पनिक आहेत..." मग वरून खाल पर्यंत मीनल ला बघतो... स्वतःशीच ते वाक्य परत बोलून हसतो, "काल्पनिक... ह्ह "
मीनल अस्वस्थ होऊन दोरी परत ओढते, "अरे वाह मस्त!! नवीन कल्पना आहे हि तर ... कोणाची कल्पना?"
"नवीन काय त्यात? मंदिरात घंटी नाही बघितलिस का कधी?" मीनल त्याच्यावर चिडते आणि रागात पुटपुटते, "कुठे गेले हे सर्व... "

एना खोलीतून बाहेर डोकावते, "आशा... दार उघड ना... " ती त्याला ओरडते...
"मी का उघडू?? मी बिझी आहे... ए.. स्कॉलर कोण आलं बघ ना..."
सुजय लॅपटॉप मधून डोकं वर काढत बघतो, "मी?? मी दार उघडू??"
"हा मग??"
"मी कामात आहे..."
"मी पण कामात आहे..." आशु आपल्या मोबाईल मध्ये गेम खेळत म्हणाला.
तिकडून रेश्मा चा आवाज आला, "दार उघडतंय का कोणी? नाही तर मी उघडते, भाजी करपलेली खावी लागली तर कोणी तक्रार करू नाही..."
आशु च्या कानात लगेच करपलेली भाजी ऐकून घंटी वाजली, तो उठून दार उघडायला जातो, समोर मीनल फणफणत होती, "इतका वेळ लागतो दार उघडायला??" त्याच्यावर बरसत ती सरळ खोलीत निघून जाते... तिच्या सोबत कोण आहे काय काही न सांगता... आशु त्याला एक ऑकवर्ड लुक देतो आणि तो आशु ला एक ऑकवर्ड लुक देतो, मग आशु त्याला म्हणतो, "ये ना ये आत ये..."
तसा तो नाही नको करत आत जातो, तिथल्या टायर पासून बनवलेल्या एका खुर्चीत तो बसतो, आशु लगेच गडबड करत सुजय कडे जातो, "स्कॉलर... ए स्कॉलर ..." सुजल काही लक्ष देत नाही...
"स्कॉलर..." आशु जरासा आवाज चढवतो आणि त्याचं शर्ट ओढतो. 
"काय आहे आशु? मी कामात आहे ना... दिसत नाही का तुला?"
"मीनल परत नवीन किरायदार घेऊन आली आहे आपल्या सोबत..."
"काय??" किरायदार शब्दानी सुजय च्या डोक्यात अलार्म झाला तो आश्चर्याने आशु कडे कुठे म्हणून बघतो, आशु त्याला दबक्या आवाजात म्हणतो, "ते बघ तिकडे..." सुजय मान वर करून बघतो, समोर कोणी बसलंय हे बघून तो परत आशु ला म्हणतो, "कशावरून तो किरायदार आहे..."
"अरे बॅग बघ ना त्याच्या..."
सुजय उठून उभा राहतो, "अरे हे कोण आहे, मीनल अशी कशी करू शकते?"
"आणि ह्या वेळेस तिनी मुलगा आणलाय सोबत... म्हणजे आपल्या रूम मध्ये अडचण... आधी ते तरी नव्हतं..."
सुजय तावातावाने कोण आलं आहे ते बघायला जातो, त्याच्या चेहेऱ्यावर नाखुषी स्पष्ट दिसत होती, तो त्याच्या समोर जातो तसं तो उठून उभा होता, सुजय च्या आणि आशु च्या चेहऱ्यावरच्या अस्वस्थता बघून तो आपला हात समोर करत म्हणतो, "हाय!! मी उरवील..."
सुजय त्याचा हात हातात घेत म्हणतो, "हाय, मी सुजय... तुम्ही इथे म्हणजे काय काम आहे ??"
उरवील थोडा संकोच करत त्याला बघतो, "ते ताई सांगेल ना तुम्हाला??"
मीनल ला कोणी तरी इतका मान देत आहे ताई... वगैरे?? सुजय भुवया उंचावून आशु कडे बघतो आणि ते दोघे हा तुम्ही बसा असं त्याला बघून किचन मध्ये जातात, रेश्मा त्यांना असं फुसफुस करतांना बघून म्हणते, "काय सुरु आहे तुमचं?"
"ते आम्हाला वाटतंय, मीनल नी पैश्याची चणचण दूर करायला वेगळाच मार्ग शोधून काढला आहे..."
"काय???"
"ती ह्या वेळेस आपल्या सोबत माजघरात रहायला एका मुलाला घेऊन आली आहे??"
शीळ मारत रेश्मा म्हणते, "ओह हो... नवीन एन्ट्री?"
"काय हे... बघ त्याचा असर आपल्या सभ्य रूममेट लगेच शिट्टी वगैरे ... काय हे शोभत का तुला रेश्मा..." सुजय आपली मान हलवून हे काही ठीक नाही असं तिला बघतो. रेश्मा हसत त्याला म्हणते, "अरे तुम्ही का इतकं टेन्शन घेताय? मीनल ला माहित आहे आपण नाही ठेवून घेणार कोणाला, कोणी नवीन मेंबर नाही ना अड्जस्ट होणार..."
"तेच ना आणि ह्या वेळेस ती मुलाला घेऊन आली आहे चक्क... ह्या आधी मुलींना घेऊन यायची, मुंबईत ह्या नवीन मुली कुठे जाणार असे कारण देऊन... पण हा तर चांगला बॉडी बिल्डर दिसतोय..." आशु त्याच्या बॉडी वर एक नजर टाकतो आणि मग आपल्यावर एक टाकतो त्याची चिडचिड होणं साहजिक होतं... 
रेश्मा ला ह्या दोघांची सुरु असलेली धडपड बघून हसायला होत होतं, "रेश्मा तुला हसायला येतंय ना, अगं पण तुला पण एका मेम्बर च जेवण बनवायचं काम वाढेल ना..."
"आ... हा मी विचारच नाही केला... " रेश्मा हातातलं भांडी पुसायचं कापड ओट्यावर फेकत मी बघते ह्या मीनल ला म्हणत निघते ... 
मीनल ला जाब विचारायला रेश्मा रागारागात निघते खरी पण खोलीत जाताच, एना घाबरलेली रूम च्या एका कोपऱ्यात उभी दिसते, रेश्मा तिला डोळ्यांनीच काय झालं विचारते... एना डोळ्यांनी मीनल कडे इशारा करते आणि घाबरून ती चिडलेली आहे, रागात आहे आणि फार आऊट ऑफ कंट्रोल आहे असं सांगते ... रेश्मा मी बघते असं तिला हाताने इशारा करते. एना हम्म असं डोकं हलवून बघ असं बघते. 
मीनल रागारागात कपाटातून कपडे काढून बेडवर फेकत होती, तिच्या सारख्या बेड ते कपाट फेऱ्या सुरु होत्या, स्वतःशी मोठ्या मोठ्याने बडबड सुरु होती, "समजतात काय? आम्ही कोण? आता काय? का?" ती स्वतःशीच बोलत होती, रेश्मा तिचा राग बघून तिच्या जवळ जाते, एक वेळ वळून एना ला बघते, सुजय आणि आशु हि आले होते, रेश्मा एक आवंढा गिळत मीनल कडे बघते, "मीनल!"

 


"काय आहे?" मीनल तिच्यावर ओरडते रेश्मा दचकून तिला बघते, "ते बाहेर... "
"काय आहे बाहेर?? माहित आहे मला... कोणता मोठा तिर मारला आहे त्यानी?? मुलगा म्हणून जन्माला येणं म्हणजे तो खूप मोठा लागून गेला का??"
रेश्मा नाही तसं नाही मी तसं नाही बोलत आहे असं बघते तिला.. .
"मी मुलगी आहे ह्यात माझा दोष आहे का?? कि मी माझ्या आई बाबांवर कमी प्रेम करते?? कि माझ्या परिवाराची काळजी नाही घेऊ शकतं काय नाही करू शकतं मी मुलगी आहे तर??"
मीनल ची बडबड काय सुरु होती, कशाचा राग करत आहे ती, रेश्मा वळून सर्वांना बघते, सुजय आणि आशु खोलीत आले होते, सुजय मीनल ला शांत करत म्हणतो, "मीनल तू कोणाला घेऊन आली आहेस? आम्ही एवढंच विचारतोय... तुला माहित आहे ना आपल्या घरी अजून एक नवीन मेम्बर नाही अड्जस्ट होऊ शकतं!!"
"मग ते त्याला जाऊन सांगा... "
"आम्ही कसं जाऊन सांगणार.. तू घेऊन आलीस ना, तू जाऊन तसं कळव..." आशु सर्वांना बघून हे कारण ठीक आहे असं बघतो.. 
"का... रेश्मा ला घेऊन आली होती तेव्हा सर्वांनी मिळून विरोध केला होता ना... तसेच त्याला हि सर्व मिळून सांगा ना नाही आहे इथे जागा म्हणून?" मीनल रागारागात आपले अश्रू पुसत हातातले कपडे फेकत म्हणते.
"अगं तो कोण कुठला आम्हाला काही माहित नाही, आम्ही कसं असं डायरेक्ट जाऊन सांगाच, तुला माहित आहे ना आपण नाही कोणाला अड्जस्ट करू शकतं मग तू आणायचंच नाहीस ना..." सुजय समजावण्याचा सूर पकडून म्हणतो.
"मला हौस नाही!! त्याला घेऊन यावे लागले मला...."
"का??" सर्वांनी एकत्र विचारले.
"फोन आला होता तसा मला..." मीनल जरा शांत झाली होती आता, ती नजर खाली रोकुन बघत उत्तर देते..
"कोणाचा??" आशु सर्वांच्या वतीने विचारतो. 
"बाबांचा!!" मीनल अजून हि खाली बघत होती...
"काय?? तुझ्या बाबांचा फोन आला होता मीनल... " मीनल पेक्षा रेश्मा आनंदी होती, "अगं तू अशी चिडचिड का करत आहेस मग? इतक्या वर्षांनी त्यांचा फोन आला, तू खुश नाहीस? तुझे बाबा बोलले मीनल तुझ्याशी?? अगं मलाच किती आनंद होतोय..."
रेश्मा चे शब्द ऐकून मीनल चे डोळे परत पाणावले, "हो... इतके वर्ष मी ज्यांच्या तोंडून बेटा म्हणून घ्यायला तरसले, ज्यांच्यासाठी मी मुलगा बनून स्वतः मी मुलगी असल्याचा विसर पाडला, त्यांचा फोन आला मला... "
"मग??" रेश्मा तिला बिलगते, "खुश हो ना मग..."
"पण तो फोन माझ्या साठी नव्हता... "
"मग??" रेश्मा गंभीर झाली तसे सर्व गंभीर झाले...
"त्याच्या साठीच होता, ज्याच्या साठी त्यांनी मला स्वतः पासून लांब केले... फक्त मी मुलगी म्हणून मला त्यांनी प्रेमानी कधी बाबा म्हणून हाक मारू दिली नाही कि कधी बेटा म्हणून माझ्या डोक्यावर मायेनी हाथ ठेवला नाही... इतके दिवस मी एकटी मुंबई सारख्या शहरात आपला कसां सांभाळ करत असेल ह्याची त्यांना कधी काळजी हि नाही वाटली आणि आज त्यांच्या मुलानी काय मुंबईत यायचे ठरवले ह्यांना लगेच त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटली, तो कुठे राहणार? त्याची खाण्यापिण्याची कशी सोय होईल? सर्व प्रश्न पडले त्यांना, पण कधी एक फोन करून मला विचारावंसं हि नाही वाटलं कि मीनल बेटा तू कशी आहेस?"
मीनल ला रेश्मा मिठीत घेते, मीनल खूप रडते, "मी पण त्यांच्या रक्ताची आहे ना ग? माझी का नाही वाटतं त्यांना कधी काळजी? माझ्यासाठी का नाही तुटत त्यांचा जीव? का मी त्यांना आपली नाही वाटतं? का??"
रेश्मा, सुजय आणि आशु कडे बघते आणि त्यांना त्याला बघा असं बघते, ते आपल्या भावनांना आवरत रेश्मा ला मीनल ला सांभाळ असं बघत तिथून निघतात. आशु आपला चष्मा काढून डोळे पुसतो. ते हॉल मध्ये येतात, उरवील भिंतीवर लावलेले त्यांचे फोटो बघत असतो, त्यांची चाहूल लागताच तो वळून त्यांना बघतो आणि स्माईल करतो, "छान आहेत पिक्स, तुम्हाला रेहमान आवडतात वाटतं?" तो समोरचा रेहमान चा मोठा फोटो बघून विचारतो.
"हो ते आमचा अजून एक रूम मेट आहे कैवल्य तो त्या फिल्ड मध्ये आहे ना..." सुजय त्याला स्पष्टीकरण देतो, एक नकोशी शांतता असते तिथे, मग सुजय सोफ्यावर बसत त्याला म्हणतो, "तू मीनल चा भाऊ का?"
उरवील आनंदानी मान हलवतो... "मघाशी नीट ओळख नाही झाली आपली... मी सुजय साठे. मी सॉफ्टवेर इंजिनियर आहे, IT कंपनीत आहे कामाला मी." उरवील वाह छान असं मान हलवून सांगतो.


आशु त्याला आपला हात हातात देतो खरा पण मीनल नी त्याच्या मुळे खूप काही सोसलं त्यामुळे न कळतंच त्याच्या मनात त्याच्या विषयी राग आला होता, "हाय आणि आय एम द मिस्टर आशुतोष शिवलकर!!"


त्याचं वाक्य ऐकून सुजय स्वतःशी बोलतो, "नको तिथे ह्याला इंग्रजीत का बोलायचं असतं?"
उरवील हि गालात ते ऐकून हसतो, उरवील त्या दोघांना बघून हसतो आणि म्हणतो, "आणि मी उरवील, कोल्हापूर वरून आलोय, मला पण ताई सारखं ऍक्टिंग मध्ये कॅरिअर करायचे, म्हणून मुंबईत आलो! अजून तर एवढीच ओळख आहे, लवकरच स्वतःची ओळख बनवेल अशी अशा आहे... तुम्ही सर्व माझी साथ द्याल ना?" उरवील त्या दोघांना बघतो. सुजय हो असं बघतो.
आशु सुजय ला कोपरा मारत त्याला नजरेने बोल त्याला असं बघतो, सुजय काय? असं करतो. 
तो आशु ला कीचन मध्ये घेऊन जातो, कोपऱ्यात येताच आशु त्याच्यावर बरसतो, "तू सांग ना त्याला तो इथे नाही राहू शकतं"
"काय?? मी का सांगू?"
"तू घर मालक आहेस ना?" आशु नी एक्दम बरोबर पॉईंट मांडला होता, पहिल्यांदा सुजय ला त्यानी आपल्या हुशार उत्तरानी चूप केलं.
"अरे तू त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता बघितलिस? त्याच्या डोळ्यातली स्वप्न बघितलिस?"
"हे बघ स्कॉलर, मला ते काही माहित नाही, मला फक्त एवढं कळतं, त्याच्या मुळे आज मीनल रडली, आपली मीनल यार, चांगल्या चांगल्या मुलांना पाणी पाजणारी मीनल, तीच्या डोळ्यात पाणी आलं.. मी नाही राहणार अश्या मुलासोबत..." आशु हळवा होतं म्हणतो, त्याला समर्थन देत एना तिथे आली, 
"बरोबर बोलतोय आशूटल्या, सुजा जा आणि त्याला बाहेर काढ, ह्या घरात मीनल ला रडवणारी व्यक्ती नाही राहू शकतं"
"हे बघा.. जरा डोकं शांत ठेवा... तो आपल्या मीनल चा भाऊ आहे.. सख्खा!! त्याच्या कडे बघा, तो किती स्वप्न घेऊन आला आहे इथे... कधी आपण हि अशीच स्वप्न घेऊन आलो होतो!!"
"हे बघ सुजा मला काही माहित नाही... तू सांगतो कि मी जाऊन सांगू?" एना त्याला शेवटचं विचारते.
"नाही मी नाही सांगणार, मला त्याच्यात माझी पिहू दिसते, एक मोठा भाऊ म्हणून किंवा बहीण म्हणून आपण नाही आपल्या छोट्या भाऊ बहिणीची स्वप्न चिरडू शकत, मला नाही जमणार त्याला नाही म्हणणे... " सुजय तेवढे बोलून तिथून निघून गेला...
एना मी सांगते असं आशु ला बघून त्याच्या सोबत जाते, तिला बघून उरवील छान स्माईल देतो, "हे किती छान आहे कुठून आणलं?"
"आणलं नाही काही... ते मी बनवलं आहे..." एना आनंदानी त्याला सांगते. हातातलं ते शोपीस निहारत उरवील म्हणतो, "किती सुंदर बनवलं आहेस? मला शिकवशील बनवायला?" एना लगेच डोकं हलवून हो का नाही असं बोलते, तिचे केस हि आनंदानी डोलत होते.
"पण मला तुझं नाव नाही कळलं ..."
"मी एना... "



"तू पण इथे राहते?" एना मान हलवून होकार देते, "म्हणजे तू मीनल ताई ची रूममेट आहेस? मीनल ताई कुठे आहे? तिचा फ्लॅट वेगळा आहे का? आम्ही आलो तेव्हा पासून आलीच नाही परत!!" उरवील च वाक्य ऐकून एना थक्क होती, उरवील मीनल ला ताई ताई करून किती प्रेमानी हाक मारत होता. ती आशु कडे बघते आशु अजून हि त्याच्यावर नाराजच होता. 
एना त्याला म्हणते, "अरे आम्ही सर्व इथे एकत्र राहतो, आम्ही ६ जण आहोत, आत मध्ये आमची मुलींची रूम आहे, तू घर बघितलंस का आमचं??"
उरवील मान हलवून नाही म्हणतो, "चल मी दाखवते...." आशु एना ला हि रागानी बघत होता आता. 
एना त्याला म्हणते, "हॉल तर बघितलाच आहेस तू... हे डिझाईन आयडिया माझ्या आहेत सर्व, आम्ही टायर पासून खुर्च्या बनवल्या आहेत" उरवील हम्म इथे राहणारी लोक इंटरेस्टिंग आहेत हे तर मला बाहेरूनच कळले होते... 
"का रे??" एना प्रश्नार्थी बघते.
"ते दारावर वाचलं ना, सर्व पात्र काल्पनिक आहेत तेव्हाच कळलं..." उरवील खळखळून हसतो तशी त्याच्या गालावर खळी पडते. 
"ए... तुला पण खळी पडते मीनल सारखी सेम... " एना उत्साहात म्हणते तसा उरवील ते ऐकून हा असं बघतो. 
ते समोर जातात तसं कैवल्यचं कीबोर्ड बघून उरवील त्यावरून आपली बोटं फिरवतो. खिडकीतून तो बाहेर डोकावतो... "आणि इकडे आमची मुलींची खोली आहे... " तो परत सर्व निहारत वापस येतो, बाथरूम च्या दारावर राणी चा फोटो बघून तो बघत राहतो, एना त्याच्या मनातला प्रश्न बघून तो राणी चा फोटो पलटवून त्याला बादशाह चा फोटो दाखवते... "आपण युज करतांना बरोबर साइन बाहेर लावून जायचं हा..."
उरवील ओह्ह मस्त आयडिया असं डोळे मोठे करून बघतो... 
एना त्याला कीचन दाखवायला आणते, "तुला हळू हळू घरातले सर्व रुल्स कळतील!! हे आपलं किचन... "
उरवील सर्वत्र नजर टाकत होता, "चहा बनवता येतो?"
उरवील का असं घाबरून बघतो, एना त्याला काही हरकत नाही असं बघते, "शिकशील!!"
दोघे तिथे बडबड करत उभे होते, रेश्मा पाठ करून उभी होती, आणि उरवील च्या चाहूलनीच तिचं डोकं फिरत होतं, त्यानी ह्यांना वयक्तीक काही त्रास दिला नव्हता पण त्याच्या मुळे मीनल नी खूप सहन केलं आहे हे तिच्या हि मनात घर करून होते, एना रेश्मा ला हाक मारते रेश्मा तिच्या कडे न बघतच हा असं बोलते, "रेश्मा.. हा मीनल चा भाऊ आहे..."
"हाय!!" उरवील तिला हि छान स्माईल देण्याचा प्रयत्न करतो, तिची सारखी इकडून तिकडे हे भांड घे ते ठेव चालू होतं, शेवटी तो तिच्या समोर जाऊन उभा होतो, "हाय!! मी उरवील!!"



त्याला समोर बघून रेश्मा त्याच्या कडे न बघताच त्याला म्हणते, "हाय..."
एना उरवील ला म्हणते, "हि रेश्मा... कळलंच आहे ना तुला..."



मीनल कीचन मध्ये येते तशी उरवील ला बघून तिचं डोकं उठतं, ती रेश्मा च्या कानात ओरडते, "हा अजून इथेच आहे??"
रेश्मा हि बघ ना असं बघते. "सुजय नी ह्याला का नाही काढलं अजून?"
"सुजा..." ती रागात सुजय शी बोलायला जाते...
ती तिथून निघते तसा उरवील तिला हाक मारतो तिच्या मागे जातो, "ताई..."
मीनल रागात त्याच्याकडे वळून त्याला बघते, चुटकी वाजवून त्याला म्हणते, "मी तुझी काही ताई वगैरे नाही मला ताई म्हणायचं नाही..."
"ओके... मीनल दि म्हणू?" मीनल त्याला रागानी लुक देते, तो तिच्या मागे मागे सांग न असं फिरतो. 
"सुजा..." मीनल जोऱ्यात ओरडते, मीनल चा आवाज ऐकून उरवील हि शांत होतो.
सुजय काय झालं विचारतो, "तू ह्याला अजून काढलं नाहीस?"
"मीनल तो तुझा भाऊ आहे"
"तर?? मी म्हंटल का तुला ठेव?"
"नाही... पण मला नाही पटत आहे ते..." सुजय खांदे वर करून म्हणतो. 
"म्हणजे तू त्याला जा नाही म्हणणार?"
"सॉरी मीनल, पण खरंच तू शांत डोक्यानी विचार कर, तो तुझा भाऊ आहे, ह्यात त्याची काही चूक आहे का? जसं तू मुलगी म्हणून जन्माला आली ह्यात तुझी चूक नाही, त्याची हि चूक नाही ना? त्यानी तुला कधी त्रास दिला आहे का?"
"हे बघ स्कॉलर, तुझं ज्ञान नको देवूस... तिनी काय विचारलं, तू बाहेर जा म्हणणार आहेस कि नाही?" आशु मीनल च्या बाजूनी येऊन उभा होतं म्हणाला.

तितक्यात दारावरची बेल वाजली... 
उरवील मी बघतो असं म्हणत समोर जातो... उरवील सर्व विसरून आनंदानी उत्साहात दार उघडतो, त्याला समोर बघून समोरची मुलगी डोळे उघड झाप करत त्याला बघते, "हाय..." ती आपल्या केसांची बट बोटात गुंडाळत त्याला वरून खाल पर्यंत स्कॅन करत म्हणते.
"हाय!! मी उरवील..." तो आपला हात तिच्या हातात देत म्हणतो.त्याचा हात हातात घेत ती सेक्सी आवाजात म्हणते... 
"मी प्रगल्भा.."


ते नाव ऐकून घरात आत सुजल आणि आशु चा थरकाप उडतो तर मीनल आणि एना हि एकमेकींना बघून हा गेला असं एकमेकाला बघतात.

क्रमश:

हॅलो फ्रेंड्स,

तुम्ही भरभरून दिलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप आभारी आहे. तुमचे प्रोत्साहन आहे ज्यामुळे मी ह्याला पुढे लिहिण्याचा प्रयत्न सुरु ठेवत आहे. आज चा भाग कसा वाटला नक्की सांगा?
ज्यांनी सिरीयल बघितलं नाही आहे त्यांना पात्रांची ओळख व्हावी म्हणून मी आज च्या भागात फोटो टाकले आहे.
आशा आहे कथा आवडत आहे आणि जशी ती पुढे जाईल तुम्हाला अजून इंटरेस्ट वाटेल. 
बाकी एक नवीन पात्र आलं आहे उरवील... तुम्हाला काय वाटतं, उरवील ला हे रहायला परवाणगी देतील?
काय मीनल आपला राग सोडून त्याला आपल्या सोबत राहू देईल?

आज भारताने इतकी प्रगती केली आहे पण तरी हि मुलगा मुलगी मध्ये भेद भाव होतो, आज असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे मुली काम नाही करत, पण आज हि वंशाचा दिवा म्हणून प्रत्येकाला मुलगाच पाहिजे.
कधी बदलेल समाजाचा हा विचार? काय गुन्हा केला आहे मुलींनी मुलगी म्हणून जन्म घेऊन? तिच्या ते हातात हि नाही? मग तो तिचा कसा गुन्हा?

निशी 

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...