Friday, July 12, 2019

क्षितिजा पलीकडचे


"आदी... आज कुठला दिवस आहे आठवते का तुला... चल लवकर उठ" तिचा आवाज ऐकून आदी नि स्वतःला पांघरुणात झाकून घेतले.. त्याला त्या २ मिनिटात भरपूर मनसोक्त झोप घ्याची होती. त्याला माहित होते ती लगेच नेहमीप्रमाणे तिथे येईल, त्याचे पांघरून काढून त्याची सकाळची गोड किस घेईल... आणि त्याच्या दिवसाची गोड सुरवात होईल, त्याला जाणीव होत होती कि ती रूम मध्ये आली आहे आणि साऱ्या वस्तू आवारात आहे... कधी कधी तर तो त्या सकाळच्या किस साठी झोपायचे नाटक करत रहायचा.

"आदी... शोना उठ ना.. आज कोणता दिवस आहे? कुठे जायचे .. आहे आठवते का... " त्याला फ़ुटबाँल रॅक मध्ये ठेवत तिने आवाज दिला, त्याच्या बेडशेजारी येऊन बसली आणि त्याच्या तोंडावरून पांघरून काढले, तिच्या सुगंधाने आदी चा श्वास भरून गेला, मनभरून त्याला बघितल्यावर तिने त्याला त्याची इतक्या वेळ वाट पाहत असलेली किस दिली. पण आदी चे कसले पोट भरते... तो घट्ट डोळे बंद करून परत झोपण्याचे नाटक करू लागला... त्याचे ते नाटक बघून ती थोडं आपला स्वर वाढवत म्हणाली, "मला माहित आहे आदी तू जागा आहेस... लवकर उठलास तर बरं होईल.. उठ आणि ...."

तिचे वाक्य पूर्ण होण्या आधी आदी उठून बसला आणि म्हणाला, "आई... तुला कसे कळते ग आधीच सगळे... " आदी पांघरून बाजूला करत म्हणाला.

"कारण मी तुझी आई आहे... " असे म्हणतात सायली नि त्याला कडेवर उचलून घेतले आणि बाथरूम मध्ये घेऊन गेली.. त्याला तयार करून देत त्याच्या मनातल्या साऱ्या प्रश्नांचे जमेल तसे उत्तर देते. सायली त्याला पटपट भरवून तयार ठेवते. तितक्यात आर्यन येतो.. "मग चॅम्प तयार का आजच्या मोठ्या दिवसासाठी..."

"हो!! " आदी त्याला टाळी देत म्हणाला. "तू पण येणार आहेस पप्पा..."

"बिलकुल... माझ्या शोन्याचा आज शाळेचा पहिला दिवस आणि मी नाही येणार!!" असे म्हणत ते सर्व कार मध्ये बसतात आणि शाळेला जायला निघतात.



आर्यन आणि सायली नुकतेच बदली होऊन दिल्ली ला आले होते. त्यांनी आपल्या  ५ वर्षाच्या मुलाचे म्हणजे आदी चा दाखला एका नामांकित शाळेत करून घेतला होता आणि आज त्याचा शाळेचा पहिला दिवस होता.... आदी नि आपल्या शिक्षिकेला दह्याला बागेतले एक गुलाबाचे फुल घेतले असते.त्याला शाळेत सोडून आर्यन आणि सायली निघून जातात. आर्यन शाळेत आपल्या शिक्षिकेला गुलाबाचे फुल देण्याकरिता त्यांची वाट पाहत बाहेर थांबला असतो,... त्याच्या बाजूला एक मुलगी उभी असते, टपोरे डोळे, दोन वेण्या घातलेली, नाजूक बांधा  तिच्या हि हातात गुलाबाचे फुल असते... त्याचं हातातले फुल बघून ती गोड हस्ते आणि विचारते "तू हे रिया मॅम ला द्यायला आणले आहे.." आदी मान हलवून हो म्हणतो. "मी पण..." तीच पुढे म्हणते.

तितक्यात रिया मॅम येतात त्या दोघांकडून फुल घेऊन त्या दोघांना धन्यवाद देतात. वर्ग सुरु होतो... आदी न कळतच जाऊन त्या मुलीच्या शेजारी बसतो... ती त्याला आपला हाथ देत म्हणते, "हाय, मी विराली ..."

"हाय... माझे नाव आदी..." ती परत त्याला छान गोड स्माईल देते.



त्यांच्या मैत्रीची सुरवात होते, रोज दोघे एकमेकांशेजारी बसायचे... दोघे हि हुशार, कोणता हि प्रश्न विचारला कि वर्गात पहिले उत्तर त्यांच्या कडूनच मिळणार... खेळ असो कि अभ्यास साऱ्या शाळेत दोनच नाव असायचे आदी नि विराली. दोघांना हि जिंकायची जितकी सवय झाली असते तितकीच एकमेकांची सवय झाली असते. हळू हळू दोघे मोठे होतात... १०... १२.. दोघे उत्तम गुण घेऊन पास होतात... दोघांच्या हि मनात त्यांना माहित होते आपण एकमेकांवर प्रेम करतो पण ते प्रेम अव्यक्त होते. शेवटी एक दिवस येतो जेव्हा आदी आपल्या मनातले विरली  ला एका कागद वर लिहून देतो आणि घरी जाऊन वाचून उत्तर सांगायला सांगतो... त्या दिवशी आदी पहिल्यांदा तिची ती झुकलेली नजर बघतो... नाही तर विराली  नेहमी तोर्यातच असायची... कदाचित आज तिला वाचण्याआधीच माहित होते त्या चिट्ठीत काय लिहिले होते... घरी जाऊन कधी वाचते असे तिला झालेलले... घरी पोचल्या क्षणी ती आपल्या खोलीत धावून जाते आणि दार लावून घेते... हृदयाची धडधड वाढलेली... हातात गुंडाळून ठेवलेली ती चिट्ठी तिने नीट बघितली थरथरत्या हाताने तिने ती उघडली, डोळ्यां पुढे अक्षर होते पण काही समजेना...

थोडं स्वतःला सावरत मग ती वाचू लागली,



पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते... 
कोण ग तो तुझा म्हटल्यावर गुलाबी झालेले गाल बघून 
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते.... 
रोज निरोप घेताना पुन्हा कधी भेटशील म्हणताना पाणावलेले डोळे आणि कपकपनारा कंठ बघून 
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते.... 
कारण नसताना तासभर फोनवर भांडायच स्वतः राग करून फोनही ठेवायचं फोन ठेवल्यानंतर मिनिटात आलेला मँसेज बघून 
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते.... 
नकळत स्पर्श झाल्यावर तुझ्या हृदयाचा चुकणार ठोका आणि थरथरणारे ओठ बघून 
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटत....
मला पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते... तुला??



मनात कारंजे... प्रेमाची जादू परत परत ती ते शब्ध वाचते, खूप विचार करून आपले उत्तर लिहिते..



माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे आहे, एक असा कागद ज्यावर तू तुझी भावनालिहू शकतेस , तुझा राग खरडू शकतेस ,तुझे आश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतेस , फक्त वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैव तुझ्याबरोबर राहायचे आहे. पण हो, जर तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उब मिळविण्यासाठी तू मला जाळू शकतेस.....



.... दोघांची मैत्री आता प्रेमाचे रूप घेते... दोघांच्या घरी सांगण्याचे ठरवतात. दोघांचे घरचे त्यांच्या मर्जी खातर लग्नाला तयार होतात आणि भेटायला तयार असतात. दोघांच्या आनंदाचे पारे नसते. भेटण्याची वेळ आणि दिवस ठरतो तसे विराली आपल्या आई बाबांना घेऊन कॅफे शॉप मध्ये येऊन बसली असते. ती आपल्या आई बाबांना आनंदाने आदी बद्दल सांगत असते कसा तो तिला समजून घेतो आणि ते दोघे किती एकसारखे आहेत... त्यांची जोडी तर वरून देवानेच बनवून पाठवली आहे. विरालीचे गोड कौतुक अजून संपलेच नसते जेव्हा तिला समोरून आदी आपल्या आई बाबा सोबत येताना दिसतो... ती आपल्या आई बाबांना त्याची आणि त्याच्या आई बाबा शी ओळख करून देते...

"सायली??"

"पायल!!" दोघी एकमेकीला बघून प्रश्नार्थी नजरेने बघतात. आणि लगेच दोघी म्हणतात... "नाही नाही... हे लग्न शक्य नाही... "

"हो मुळीच नाही... हे लग्न शक्य नाही..."

एवढे म्हणून दोघी आप आपल्या नवऱ्याला घेऊन तिथून निघून जातात... विराली आणि आदी ला काही समजण्याच्या आत त्यांनी पाहिलेली स्वप्न तुटली असतात...

"अरे पण का शक्य नाही हे लग्न... काही कारण तर हवे ना..." विराली रागारागाने म्हणाली...

"तेच ना... काही न सांगता निघून गेल्या... मला वाटते त्या आधीपासून ओळखतात एकमेकीला..." आदी आपली शंका व्यक्त करत म्हणाला... दोघांचे डोके चालू लागते... "हम्म... ह्या एकमिकीच्या शत्रू असतील...."

"नाही.. रे... सांगितले असते ना मग त्यांनी ... मला काही तरी घोळ वाटतोय..." विराली गहण विचार करत म्हणाली...

 बरेच दिवस दोघे कारण जाणून घेण्याचे प्रयन्त करू लागतात पण सर्व व्यर्थ... विराली साठी स्थळ येऊ लागतात पण तीने स्पष्ट केले असते लग्न करेन तर आदी शी नाही तर लग्न नाही करणार...

विराली च्या हट्टापायी पायल ला हार मानावी लागते...

"ठीक आहे.. तयार राहा... उद्या तुला कुठे न्याचे आहे... "

"मी कुठेच येणार नाही..." विराली उर्मटपणे उतर देते...

"आदी ला हि घेऊन ये... त्याच्या आई बाबा सोबत... तुला कारण हवे ना मी का ह्या लग्नाला नाही म्हणत आहे... उद्या कळेल.." ते एकूण विराली डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली... "खरं?? ठीक आहे..."



दुसऱ्या दिवशी आदी आपल्या आई बाबांना घेऊन विराली च्या घरी येतो...

सायली पायल च्या कानात काही कुजबुजत... "तुला नक्की खात्री आहे तुला ह्यांना सर्व काही सत्य सांगायचे आहे??" तिचे वाक्य ऐकून पायल म्हणते, "त्या शिवाय हि मुलगी काही लग्न करणार नाही..."



सर्व आपल्या गाड्या काढतात आणि निघतात... "आपण कुठे चाललोय आई.. एवढा काय सस्पेन्स?"

"पुण्याला..."

"काय?? पुण्याला... का पण... "

"कळेल म्हणले ना... तिथे "

सगळे विमानाने पुण्याला येतात, पुण्याला पोचल्यावर पायल सगळ्यांना एका प्रयोग शाळेत घेऊन जाते, संशोधन लॅब खूप मोठी असते आणि आधुनिक उपकरणांनी पूर्ण असते, पायल तिथल्या रिसेप्टिनिस्ट ला सांगते, "डॉक्टर आचार्य आहेत का? त्यांना सांगा पायल सिन्हा त्यांना भेटायला आल्या आहते."

"मॅडम सर खूप बिझी असतात त्यांची आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल..."

"मी त्यांना फोन वर बोलले होते त्यांनीच आज यायला सांगितले होते.." पायल स्पष्टीकरण देत म्हणाली.

ती एक कॉल करते आणि मग त्यांना आत जायला सांगते... त्यांच्या सोबत तिथला एक कर्मचारी येतो त्यांना तो आपल्या मागे यायला सांगतो... विराली आणि आदी इतकी आधुनिक लॅब बघून दंग राहतात, त्यांची उत्सुकता पूर्ण ताणली गेली असते कि त्यांच्या लग्नाचा आणि ह्या माणसाचा काय संबंध आहे...

एका केबिन मध्ये आणून त्यांना बसायला सांगून तो कर्मचारी निघून जातो. सर्व काही एकाद्या इंग्रजी चित्रपटात दाखवतात तसे सुरु असते त्या वातावरणात विराली घाबरलेली असते ती आदी च्या शेजारी उभी असते. तितक्यात आचार्य सर येतात, एक वृद्ध पुरुष डोळ्यावर भिंगाचा चष्मा, आपल्या पांढऱ्या केसांना मॅटचिंग असा पंधरा कोट घालून येतात, "अरे पायल... बऱ्याच दिवसांनी आलीस... बोल... काय झाले.. .काय म्हणत्वाचे बोलायचे होते तुला कि दिल्ली वरून पाहिलं विमान घेऊन आलीस इथे... " त्यांचे लक्ष केबिन मध्ये बसलेल्या बाकी लोकांकडे जाते... ते सायली ला बघून काही आठवण्याचा प्रयत्न करतात ... "उम्म्म ... मी आपल्याला कधी भेटलो आहे का... आज काळ काही लक्षात राहत नाही... "

"सर तुम्ही मला ओळखले नाही... मी सायली, पायल सोबत एक्सपिरिमेंट साठी यायचे..."

"अरे हो... तेच म्हणतो मी कुठे बघितले... कशे आहेत तुम्ही..."

"मी ठीक आहे सर... हे माझे मिस्टर आणि हा मुलगा आदी..."

"आदी... हम्म किती मोठा झाला... " तिच्या कानात काही खुसफुस करत ते  म्हणतात  ... "काही प्रॉब्लेम झाला का... ??"

सायली मान हलवून नाही असे सांगते.. ."मग तुम्ही सगळे इथे कसे काय..."

"सर... हि माझी मुलगी विराली..." पायल पुढे बोलत म्हणाली..

"विराली... आठवते मला ह्या दोघांना जन्मल्या जन्मल्या हातात घेतलेले.. " आचार्य सर जरा भारावून जात म्हणले...

"सर... हे दोघे आता लग्न करायचे म्हणतात ..."

"काही हि काय... ते शक्य नाही... " प्रश्न पूर्ण होण्या आधीच ते शक्यता लाथाडून लावतात...

"एक मिनिट... " विराली सगळ्यांना मध्ये थांबवत म्हणाली... "आम्हाला कोणी सांगेल का काय चाललेय? आपण इथे माझ्या आणि आदी च्या भविष्य बद्दल बोलतोय... "

तिला शांत करत आचार्य सर म्हणाले... "हो हो... सर्व काही सांगतो बेटा ... मला सांग तू कधी आजारी पडलीस का?"

खूप विचार करून विराली आठवायचा प्रयत्न करते पण आपण कधी आजारी पडलोय हे तिला आठवत नाही... ती सर्व काही आठवून संकोच व्यक्त करत नाही म्हणाली... आचार्य सर मग आदी कडे वळतात आणि त्याला हि तोच प्रश्न विचारात..."आदी तू??? कधी आजारी पडलास का??"

आदी नि आपले उत्तर विराली ला प्रश्न विचारला तेव्हाच तयार ठेवला होता पण त्याच्या मनात आता वेगळेच चक्र सुरु झाले... "आम्ही कधी आजारी पडलो नाही म्हणजे आम्ही माणूस नाही?? आम्ही मशीन किंवा रोबोट आहोत का?? म्हणजे तुम्ही आमच्यावर एक्सपिरिमेंट करत आहेत..."

"ह्म्म्म... बरोबर... तुझे हे जे विचार चक्र सुरु झाले ना.. तुझ्या बाबांना तरी हा विचार आला का कधी? आपली मुले आजारी पडत नाही... का ?? कधी विचार केला का त्यांनी?"

"मी एक रोबोट आहे?? शक्यच नाही... नाही नाही... मी हे मान्य करूच शकत नाही..." आदी स्वतः कडे निरखून बघू लागला...

"नाही नाही... तुम्ही रोबोट नाहीत बाळा... तुम्ही डिझायनर बेबी आहेत... ह्या जगातले पहिले वहिले..."

"काय??" आदी विराली दोघे एक्दम म्हणाले..

"आज पासून २५ वर्ष आधी ... " आचार्य सर त्यांना हकीकत सांगू लागले... " मी तरुण हुशार आणि ह्या जगावर आपली छाप सोडण्याच्या ठाम निश्चयाचा होतो... मला मानव जाती साठी खूप काही करायचे होते.. खूप कष्टानी मी असा उपाय शोधून काढला ज्याने मनुष्य स्वतः मध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकतील.. मी माझ्या वरिष्ठांशी बोललो त्यांना माझे संशोधन दाखवले... पण त्यांना ते नाही पटले.. पण मला स्वतःला सिद्ध करायचे होते मी पेपरात जाहिरात दिली, मला बराच  चांगला प्रतिसाद मिळाला, अश्या बऱ्याच स्त्रिया होत्या ज्यांना मूल हवे होते पण काही ना काही कारणांनी त्या ह्या सुखाला मुकल्या होत्या मी सगळ्यांचे काही टेस्ट केले आणि त्यातल्या १० जणींची निवड केलेली... त्यात तुमच्या आई ची निवड झाली होती... "

आदी आणि विराली एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते आपण काय ऐकतोय ह्या सर्व गोष्टींवर कसा विश्वास ठेवावा हेच कळेना...

सर पुढे बोलू लागले... "डिझायनर बेबी म्हणजे काय? आपल्या बाळाचे जिन्स आपण बदलून आपल्याला पाहिजे तश्या निवडायच्या, अश्या काही जिन्स ज्या अनुवांशिक आजार पुढच्या पिढीला देतात त्या बदलून टाकायच्या ज्याने पुढच्या पिढीला तो आजार होणारच नाही... थोडक्यात सांगायचे तर आपल्या बाळाचे डोळे कोणत्या रंगाचे व्हावेत, केस कसे असावेत, त्याचा रंग कसा हवा हे सर्व आपण ठरवू शकतो... त्याने आजी चे डोळे घ्यावे, आई चे ओठ, अत्याचा बोलकेपणा, बाबांचा मोकळेपणा... हे सर्व आपण त्याच्या जन्माच्या अगोदरच ठरवू शकतो... तुम्ही कधी कोणत्या स्पर्धेत भाग घेतलात आणि हरलात?" परत आदी आणि विराली आठवू लागतात पण त्यांना अशी कोणतीच स्पर्धा आठवत नाही... ते दोघे नकारार्थी मान हलवतात...

"कारण... मी सांगतो... तुमच्या मेंदूची ठेवण ह्या बाकी मुलांपेक्षा वेगळा आहे... तुमची आकलन शक्ती वेगळी आहे... तुम्ही म्हातारे झालात तरी तुमची मेंदूची आकलन शक्ती १६ वर्षाच्या व्यक्ती सारखी असेल... "



स्वतःच्या कानावर विश्वास बसे नासा झाला, आदी आणि विराली ला खुश व्हावे कि दुखी कळत नव्हते... "म्हणजे आज पर्यंत मी जे यश मिळवले आहे ते माझ्या मेहनतीच्या बळावर नाही तर मी बाकी मुलांच्या तुलनेने वेगळी रचना घेऊन जन्म घेतला म्हणून...?? बरोबर ना??"

"हो.. पण ह्या साठी तुम्ही आपल्या आई ला धन्यवाद दिला पाहिजे त्या जर माझे बोलणे समजावून घेऊन तयार झाल्या नसत्या तर हे शक्य नव्हते.. . म्हणजे आज च्या कळत आपण जिन्स, टेस्ट ट्यूब बेबी हे सर्व सर्वसाधारणपने ऐकतो पण आज पासून २५ वर्षे आधी हे सर्व काही नवीन होत कोणी आपल्या बाळा साठी इतके मोठे पाऊल उचलेल का ह्याची मला खात्री हि नव्हती... माझा प्रयोग यशस्वी झाला पण मी हे सर्व कायद्याने केले नसल्याने मी हे कोणाला सांगू शकलो नाही... पण माझ्या प्रयोगाचे यश हे तुमच्या यशात आहे..."



एक मोठा श्वास घेत सर शांत झाले...

विराली त्यांना म्हणली, "ठीक आहे आम्ही डिझायनर  बेबी आहोत पण त्याचा अर्थ असा तर नाही ना कि तुम्ही आमच्या कडून आमचे हक्क हिरावून घ्याल... आम्ही दोघे हि बलिग आहोत आणि लग्न करायचा आम्हाला हक्क आहे... "

"विराली... मी कुठे लग्न करू नका म्हणालो... ?? तुमचे आई बाबा तयार नाहीत... " ते सायली आणि पायल कडे बघतात...



आदी अजून हि गोंधळलेला असतो... "म्हणजे सर तुम्हाला असे म्हणायचे आहे कि डिझायनर बेबी ला जन्म द्यायला शारीरिक संबंध येण्याची गरज नाही... "

"हम्म ... बरोबर... पण ते तुमच्या हातात आहे... त्या काळात हि नैसार्गिग गर्भधारणा होऊन प्रसूती होऊ शकेल..." त्यांनी मान होकारार्थी हलवली...


"कोण नैसार्गिग रित्या जन्म देईल? कोणाला हवे असेल कि आपले मूल आजारी पडावे अश्या जगात जिथे बाकी सगळे रोग प्रतिकारक शक्ती घेऊन जन्माला येतील? नाही... कोणालाच नाही वाटणार... पण मग अश्या प्रयोगाचा काय उपयोग ज्याने जगातून प्रेम संपून जाईल.. ?? मी मान्य करतो तुमच्या ह्या प्रयोग मुले आपण माणुसकीची खूप मदत करू शकू... पण काय तुम्ही हा विचार केला कि प्रेमाशिवाय ह्या जगाचे काय होईल..??? आपण श्रुष्टि च्या नियम विरुद्ध वागतोय?"

"हम्म... अगदी बरोबर म्हणतोस तू... कदाचित मी जेव्हा हा प्रयोग हातात घेतला तेव्हा मी इतका प्रौढ विचार करत नव्हतो... म्हणूनच माझ्या वरिष्ठानी ह्याला सहमती दिली नाही..." ते जरा शांत बसतात आचार्य सरांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते ... ते पुढे म्हणतात, ".. पण तुम्ही आता दोन्ही ध्येय सद्य करू शकता... "



"काय कसे??"

"तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता... बरोबर??"

"हो..." दोघे ठामपणे सांगतात ...

"म्हणजे तुमची संतती तुमच्या प्रेमातून उत्पन्न होईल??"

"अर्थात... पण त्या साठी आधी लग्न करावे लागेल..." विराली व्यंग्यात्मक म्हणाली...

"काळजी करू नका... मी देतो लावून तुमचे लग्न... " त्यांचे बोलणे ऐकून दोघांचा चेहरा खुलला...

"कसे... तयार कसे कराल ह्यांना..." आदी त्यांच्या कानात फुसफुसला...

थोडा विचार करत ते पुढे म्हणले... "आपण एक प्रयोग करू... " त्यांचे ते वाक्य ऐकून सायली आणि पायल दोघी काळजी नि एकमेकींना बघतात...

"हे बघा.. .तुम्ही काळजी करायचे काहीच कारण नाही... आता धोका पत्करायची तयारी ह्या दोघांची हवी..."

"धोका?? कसला धोका..." विराली घाबरून म्हणाली

"धोका नाही खरं तर ... मज्जा मज्जा आहे... "

"सर... प्लिज नीट सांगा... काहीच कळत नाहीय..." आदी काळजीने म्हणाला.

आपल्या डोक्यातली भारी कल्पना सगळयांना ते सांगू लागतात त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज असते..."बघा... तुमची संतती प्रेमानी जन्म घेईल... आणि त्या संततीत तुमचे जिन्स येतील ह्याचा अर्थ तुमच्या मधले गुण सर्व त्यांच्या येतील... रोग प्रतिकारक शक्ती.. बुद्धी, शक्ती सर्व काही .. म्हणजे... तुमच्या पासून जे सुरु होईल ती एक अशी दुनिया असेल ज्यांना आजार होणारच नाही आणि त्यांचा जन्म सुद्धा नैसर्गिक रित्या होईल... म्हणजेच त्यांना  बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड मिळेल... तुम्ही त्या नवीन जगाचे ऍडम अन इव्ह असाल...."



सर्व ते ऐकून जणू मोहूनच जातात आदी आणि विराली तर आधीपासूनच तयार असतात आणि आता हे सर्व कळल्यावर तर ठामपणे एकमेकांसाठी उभे राहतात.

त्यांचे आई बाबा हि तयार होतात...थाटामाटात त्यांचे लग्न लावून देतात ...

दोघांना आपल्या पहिल्या रात्रीचे वेध लागले असतात ...



"ये चंद्राला या जागवू या जरा... ये रातीला या चातुया जरा.. संगतीने खेळू खेळ हा... सर सर मावळतो वेळ हा...  घे जवळ तू मला मी तुला पांघरू मधाहुनी मधुर मेल हा... सर सर मावळतो वेळ हा... "



आणि... ती वेळ येते जेव्हा विराली सगळ्यांना ती गोड बातमी ... काही दिवसांनी ती एका गोंडस मुलीला जन्म देते आणि अश्या प्रकारे सुरवात होते एका अश्या विश्वाचे जिथे रोग नाहीत... रोगी नाहीत... 1000



कदाचित असे हे जग ह्या क्षितिजा पलीकडे कुठेतरी आहे...

आज पासून १००० वर्षानंतर आपल्या सगळीकडे सगळे असेच जिन्स बदललेली माणसे असतील...

ताऱ्यांच्या बेटावर

ताऱ्यांच्या बेटावर



"सर ओमिक्रोन वर जाणारे आपले यान तयार आहे. विश्वनाथ सर ठरल्या वेळी निघू शकतात."
"हम्म, ठीक आहे... विश्वा शी मला काही बोलायचे आहे त्याला पाठव... " असे आदेश देत विवेक परत आपल्या कामात व्यस्त झाले.

काही वेळाने विश्वनाथ तिथे पोचतो,
"आपण मला बोलावले सर?"
"विश्वा ये, मला काही बोलायचे होते महत्वाचे..." त्यांनी खुर्ची समोर करत त्याला बसायला सांगितले, विश्वा बसतो आणि त्यांच्या कडे आता निघायच्या या वेळी त्यांना काय बोलायचे आहे अश्या प्रश्नार्थी नजरेने त्यांच्या कडे बघू लागतो. ते खूप विचार करून पुढे बोलतात, "विश्वा मी कधीच तुला आपल्याहून परके नाही समजलो उलट तुला माझ्या मुलाप्रमाणे प्रेम केले, तुझ्या हट्टापायी मी ह्या कामगिरीवर तुला पाठवायला तयार झालो, तुला हि माहित आहे आणि मला हि बहुतेक हे एकमार्गी तिकीट असणार आहे. ओमिक्रोन वर जीवन जगण्यासाठी उपयुक्त गोष्टी आहेत कि नाही, तिथे काय आहे आपण नीट काहीच प्रमाणित करू शकलो नाही आहोत. खरं म्हणजे असे तुलाच काय कोणाला हि तिथे पाठवणे खूप धोक्याचे आहे, तुझ्या सोबत आम्ही प्राणवायू चे जास्तीचे सिलेंडर पाठवत आहोत ज्याने तुला तिथे १ आठवडा तरी घालवता येईल. पृथ्वी पासून ११ प्रकाश वर्ष लांब आहे हा तारा. तुला बाकी सर्व काही माहित आहे, तू जाण्या अगोदर चांगला अभ्यास केला अशील.. मी अशा करतो... "
"नाही सर... मला माफ करा... मी ह्या अभियानास जायला तयार झालो त्या मागचे कारण वेगळे आहे.. आई बाबा जाऊन २ वर्ष झालेत पण अजून हि त्यांच्या शिवाय रात्री झोप लागत नाही. बाकी कोणाकडे बघून जगावे असे कोणी नाही, जसे तुम्ही म्हणालात होऊ शकते हे माझ्यासाठी एकमार्गी तिकीट आहे आणि मी तिथून परत नाही येऊ शकणार... पण त्याने मला काहीच फरक नाही पडणार सर, दुसरे कोणी आपल्या परिवाराला सोडून जाईल, त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून.. माझे इथे वाट पाहणारे कोणी नाही... त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका... "
"काळजी करू नको??? अरे तू माझ्या मुलासारखा आहेस.... " विवेक हळवे होत म्हणले.
"माफ करा सर... मुलासारखा आहे ना... नका जास्ती काही अपेक्षा ठेवू...." विशवनाथ ठाम होता आपल्या बोलण्यात.
विवेक जरा नाराज झाले त्याच्या त्या बोलण्याने... मग काही वीचार कात म्हणाला, "ठीक आहे मी या अभियानाचा प्रमुख म्हणून तुला सांगतोय... हे मिशन यशस्वी व्हायला  हवे... अजून नासा ला सुद्धा माहित नाही आहे कि आपण तुला आत्ता नवीन शोधलेल्या ताऱ्यावर म्हणजे ओमिक्रोन वर पाठवतोय.. आत्ता पर्यंतच्या अंतरिक्ष अभियानातले हे खूप म्हणत्वाचे अभियान आहे पहिल्यांदा कोणी एका ताऱ्यावर जाणार आहे... "
विश्वा आपली मान होकारार्थी हलवतो आणि म्हणतो, "मला अभिमान आहे सर या गोष्टीचा, मी तुम्हाला निराश नाही करणार... मी परत येईल ते खुशखबर घेऊन...!! "
"आपल्या नावा प्रमाणेच... या विश्वालाच काय तर या ओमिक्रोन वर विजय मिळवून काम फत्ते करून ये..."
विवेक त्याला निघण्या अगोदरचे शेवटचे गळे भेटतो. दोघांचे हि डोळे न कळत पाणावतात. विश्वा त्यांना सलामी देऊन तिथून निघून जातो, तो आपल्या यान कडे वळतो त्याचा पूर्ण तपशील करून घेतो... सर्व काही व्यवस्थित आहे कि नाही ह्याची स्वतः खात्री करून घेतो...

थोड्याच वेळात ती वेळ आली असते जेव्हा यानाला भरारी घ्यायची असते, विश्वनाथ आपले स्पेससूट घालून तयार असतो.त्याने आपली जागा घेतली असते... सर्व पहिली ताऱ्यावर घेणाऱ्या यानाची भरारी बघायला स्पेससेंटर वर तयार असतात आणि गिनती सुरु होते... १०...९...८....   ३...२...१..०.... एका झटक्या सोबत ते यान विश्वा ला घेऊन निघते... सर्वांच्या काळजात तीर सोडून.... विश्वा यानात बेफिकीर बसला असतो, पहिली वेळ होती त्याची अंतरिक्षात जायची आणि ते हि एकटा, डेरिंग लागते पण विश्वा काही कमी नव्हता, आजू बाजू ला काय दिसते म्हणून डोकावून बघू लागला तर अंधारच अंधार, पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पडलोय हे त्याच्या लक्षात आले, आता हे अंधार काय बघत राहायचे म्हणून त्याने झोप काढून घ्यावी असे ठरवले...म्हणून तो डोळे बंद करतो... आपले सारे आयुष्य त्याच्या डोळ्या पुढून सर्रर्र निघून गेले... २ वर्ष पूर्वी आई बाबा एका कार ऍक्सीडेन्ट मध्ये वारले, विश्वा तेव्हा ट्रेनिंग ला हैदराबाद ला होता, त्याला ट्रेनिंग सोडून त्यांचे अंतिम दर्शन हि घेता आले नव्हते. तेव्हा पासून रोज स्वप्नात आई बाबांना बघायचा, तो जणू या कामगिरीवर त्यांनाच शोधायला निघाला होता, ओमिक्रोन कसे असेल काय असेल, जगू शकू कि नाही, वापस जात येईल कि नाही ह्या सर्व प्रश्नाचे त्याला जणू काही फिकीरच नव्हती. एक थ्रिल अनुभवायला म्हणून तो तयार झालेला, त्याचे वय हि जास्ती नव्हते २५ वर्ष होते त्यामुळे अल्लडपणा काही अजून पूर्ण गेला नव्हता. काही करून दाखवण्याची इच्छा मात्र होती.
"विश्वा... स्टेटस काय आहे... कॉपी विश्वा.. तू ऐकू शकतोस का आम्हाला... स्टेटस काय आहे..." सेंटर वरून आलेल्या आवाजाने त्याची तंद्री तुटते... "Y389 कॉपी सर... सर्व काही ठीक चालले आहे... यान निर्धारित गतीने व्यवस्थित चालले आहे..."
विश्वा जरा पाय मोकळे करावे म्हणून आपल्या जागे वरून उठतो, गुरुत्वाकर्षण नसल्या मुळे तो यानात उडूच लागतो...
अश्या बऱ्याच काही क्षणानंतर त्याचे यान ओमिक्रोन वर येऊन पोचते. विश्वा ची छाती गर्वाने भरून जाते, जसा तो यानातून बाहेर पडू लागतो  त्याच्या कानात लोकांचे ओरडणे गुंजू लागते... "विश्वा विश्वा... !!! विश्वा...!!!" एका ताऱ्यावर जाणारा तो पहिला मानव होणार होता. मेल्यावर लोक तारा होतात असे त्याने ऐकले होते... आज तो एका तार्याची सैर करणार होता. तो क्षण आपल्या आठवणीत रुजू करत त्याने पहिले पाऊल ठेवले, त्याला आश्चर्य वाटले, पृथ्वी सारखेच आपले वजन जाणवू लागले, "चला फेरफटका तर मारता येईल" असा विचार करत त्याने दुसरे पाऊल ठेवले... पहिली नजर चौफेर ठेवतो आणि त्याला एक मिनिटाला शंका येऊन जाते... नक्की आपण ओमिक्रोन वर आलोय कि वापस पृथ्वीवर आलोय? सगळी कडे पहाड, अवकाश , हिरवळ असते, पण माती मात्र वेगळी असते काळी चमकणारी... आजू बाजू चे मातीचे खडकाचे नमुने तो गोळा करतो. पृथ्वीवर नेवून त्याला संशोधन करण्यात मदत होईल असा विचार असतो, तोंडावर मास्क आणि पाठीवर प्राणवायू चे सिलेंडर असल्या मुळे जरा कठीण जाते वाकणे. फेर फटका मारत मारत तो आपल्या यानापासून बराच लांब निघून येतो... त्याला तिथे एक तळे सारखी लँडस्केप दिसते, कोणते द्रव्य आहे ते तपासायला तो तिथले द्रव्य आणलेल्या बॉटल मध्ये भरत असतो, तो वाकून बॉटल भारत असतो तितक्यात त्याला त्या द्रव्यात काही हलताना दिसल्याचा भास होतो, तो सावध होतो, इथे काही हि असू शकते ह्याची जाणीव त्याला होते, जलपरी दिसल्या सारखे वाटते, उत्सुक होऊन तो मागे मागे जाऊ लागतो, थोड्या वेळाने तिचे हि लक्ष त्याच्या कडे जाते... ती त्या द्रव्यातच एक उंच उडी मारून त्याला दर्शन देते... तिला बघून जणू विश्वा चा श्वासच थांबतो... लांबसडक सोनेरी केस, सोनेरी अंग त्या क्षणात त्याला तिला आपल्या ताब्यात घेण्याचा मोह होतो, तो तिच्या मागे पळत जातो, बरेच प्रयत्न करून तो तिला पकडून बाहेर काढतो... तिला तिथे बांधून ठेवून तो मनात विचार करतो इथे अजून हि अश्या जलपर्या असतील... तो अजून शोधू लागतो... ह्या धावपळीत त्याला वेळेचे भान राहत नाही, त्याच्या सिलेंडर मधील प्राणवायू संपत होता, त्याच्या हाताला बांधलेले प्राणवायू सिलेंडर चे घड्याळ वाजू लागते ते बघून त्याच्या लक्षात येते कि सिलेंडर लवकरच संपणार आहे आणि त्याला ते बदलावे लागेल, आपल्या यानापासून तो बराच लांब आला असतो त्या मुळे तो पटकन  परत निघू लागतो... तो अर्ध्या रस्त्यात पोचला असतो तेव्हा त्याचे सिलेंडर संपते, प्राणवायू चा सोत्र संपल्यामुळे त्याला त्रास होऊ लागतो हळू हळू चालणे कठीण होऊ लागते, त्याचे शरीर त्याची साथ सोडू लागते, तिथेच पडतो, न राहून शेवटी तो आपले तोंडावरचे मास्क काढतो आणि मोठ मोठ्याने खोकलू लागतो, त्याच्या आश्चर्याने तो अजून हि जिवंत असतो... त्याच्या आनंदाचा पारा राहत नाही... तो लगेच ते सर्व जड सिलेंडर, मास्क, बूट, कपडे सर्व काढून टाकतो... हवेत मोकळा श्वास घेतो... "व्वा, म्हणजे इथल्या वातावरणात सुद्धा प्राणवायू असला पाहिजे... " तो स्वतःशी पुटपुटतो, म्हणजे इथे मनुष्य जगू शकतो... हम्म पण खाण्या पिण्याचे काय... त्याला ती जलपरी आठवते... मासे हि असतील.. जलपरी आहे म्हणजे...??? स्वतःशी विचार करत तो परत त्या तळ्यापाशी जायला निघतो. तिथे पोचल्यावर तो त्या ठिकाणी बघायला जातो जिथे त्याने जलपरी ला बांधून ठेवले होते तिथे जाऊन बघतो तर जलपरी नसते... त्याला आश्चर्याचा धक्का बसतो.. तिथे एक तरुणी असते... आपल्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसत नाही, तो डोळे मोठे करून तिला बघत असतो, तेच सोनेरी केस आणि तेच टपोरे मत्स्य सारखे डोळे, तिचे तो चमकणारे अंग, ती त्याला काही म्हणू लागते... खुणावत असते पण त्याला काही तिची भाषा कळत नाही. तो मग तिला आपल्या जवळचा एक अनुवाद करणारे यंत्र कानात लावून देतो आणि तसेच यंत्र स्वतः हि लावतो... काही वेळ ते दोन्ही यंत्र स्वतःला प्रोग्रॅम करतात आणि मग त्याच्या हातावरच्या घड्याळीवर एक लाईट जाळतो ज्याने त्याला कळते कि यंत्राचे एकमेकांशी प्रोग्रॅम यशस्वी झाले... आता तो जे काही बोलेल ते तिच्या कानाला लावलेले यंत्र तिच्या भाषेत अनुवाद करून तिला ऐकवेल... आणि ती जे बोलेल ते विश्वाच्या कानातले यंत्र त्याच्या भाषेत अनुवाद करून देईल... विश्वा तिला विचारतो, "तुझे नाव काय?"
"तुहिरा!!" ती कळवळत सांगते
"तू इथे कशी आलीस...?? तू इथेच राहतेस का?"
"आधी मला सोडव मग मी सर्व प्रश्नाचे उत्तर देईल..." तिचे ते बोलणे ऐकून विश्वा स्वतःला सावध करतो, जी जलपरीतून स्वतःला मुलीत रूपांतर करू शकली ती अजून खूप काही करू शकेल मला स्वतःलाच सावध राहावे लागेल. स्वतःशी असा विचार करून तो तिला म्हणतो, "तू माझ्या कैदीत आहेस त्यांमुळे मी सांगेल तसे होईल... आधी तू इथे काय करतेस ते सांग... "
"मी... मी त्या तळ्यात अडकले होते... मी इथे खूप लांबून आले आहे, मी वेगळ्या ग्रहावर राहते... माझ्या ग्रहाचे नाव ह्यूगो आहे... "
"ह्युगो.. .??? कुठे येते हे... "
"हे बघ... मी तुला काहीच हानी नाही पोहचवणार ... मला खूप यातना होत आहे, तू मला सोडल असते तर मी तुला इथल्या अजून काही गोष्टी दाखवीन ज्या तू कल्पना हि नाही करू शकत... "
विश्वा ला वाटते हिने आपल्या आधी इथे बरंच काही बघून ठेवले आहे हिची आपल्याला मदत होईल, त्यामुळे तो तिला सोडतो... "तू त्या द्रव्यात जलपरी कशी झालेलीस?"
"मी नाही झाली... ते जादुई द्रव्य आहे... इथे तुला ज्या वेळी ज्या गोष्टी ची गरज असते ते तुला आपोआप मिळते... तसे मला त्या द्रव्यात पोहता येत नव्हते म्हणून मी मासा झालेले, म्हणजे मी ते द्रव्य तपासले आहे ते H2o आहे... आपण तो प्यायला वापरू शकतो, खूप सौम्य आहे..."
"H2O... काय?? ते पाणी आहे..." विश्वा आनंदाने उद्गारला... "म्हणजे खरेच इथे मानवी जीवन ..."
त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधीच ती त्याला म्हणते... "चल मी तुला इथली सर्व श्रुष्टि दाखवते..."
ते दोघे निघतात... विश्वा ला आपण पृथ्वीवरच फिरत आहोत असा भास होत असतो, मोठे मोठे डोंगर.. सर्वत्र हिरवळ, नजर जाईल तिथवर मोकळे आकाश आणि जमिनीला हिरवा शालू नेसवलेला ...  समोर एक मोठे पहाड असते.. "तिकडे.. त्या पहाडावर काय आहे? गेलीस का कधी इतक्या लांब?" विश्वा तुहिरा ला उत्सुकतेने विचारतो..
"जायचे तुला?" ती भुवया उंचावत विचारते... विश्वा मान हलवत हो म्हणतो...
तुहिरा आपले हाथ पसरवते आणि त्याला म्हणते "धावत ये तिथून आणि उडी मर ..."
"काय? इतक्या उंचावरून उडी मारू... ?? वेड लागलंय कि काय?"
"बघ तुला काय ठीक वाटते... " असे म्हणतात ती आपले हाथ पसरवते आणि धावत पहाडाच्या चोटीवरून उडी मारते... विश्वा धावत जाऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण उशीर झाला असतो तिने उडी मारली असते... ती परत वर गिरक्या घेत झेप घेते ... विश्वा चा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही... तुहिरा एका पक्षी सारखी उडत असते... तिला पंख आले असतात... तो ओरडून तिला विचारतो... "तू पंख कुठून आणलेस..."
"माझ्यावर विश्वास ठेव... उडी मार...." तुहिरा आनंदाने सांगते
विश्वा धावत येऊन हाथ पसरवून उडी मारतो... तसे त्याचे हाथ पंखात बदलतात... "उह्ह हू ..... व्वा व...." तो जोऱ्यात किंचाळतो... "तुहिरा मला खूप मज्जा वाटतीय!!!"
ते दोघे उडत उडत त्या समोरच्या पहाडावर पोचतात... "म्हणजे... इथे काय आहे??" आपण आत्ताच अनुभवलेल्या जादूचे संशोधन करू इच्छित विश्वा म्हणाला म्हणजे जसे मी कल्पवृक्ष बद्दल ऐकले होते, तसे इथे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात...
तुहिरा त्याला म्हणाली, "सर्व इच्छा... पण साफ मानाने मागितलेल्या ..."
मग काही संकोच करत विश्वा म्हणाला, "मग तू त्या तळ्यात का अडकून होतीस? बाहेर येण्याची इच्छा नव्हती झाली तुला??"
"झाली होती ना... म्हणून तर तू आलास इथे ...." तुहिरा चे बोलणे ऐकून विश्वाचे डोळे चमकतात... तिच्या बोलण्यात तथ्य हि असेल... तो स्वतःशी विचार करू लागला..
पाण्याचा एक मोठा झरा हि असतो तिथे...त्याचा खळखळ पाणी पडतानाचा आवाज ऐकून तो दोघे त्या दिशेनी जातात, समोर बघतात तर मोठा पांढरा शुभ्र पाण्याचा झरा होता आणि झऱ्याच्या खाली मोठे तलाव.... विश्वा त्यात जाऊन मनसोक्त डुबकी मारतो, त्याच्या पाठोपाठ तुहिरा हि पाण्यांत उडी मारते मत्स्य सारखे जलतरंग क्रीडा करून येतात... दोघे पकडा पकडी खेळतात...

"मत्स्य सारखे पोहून झाले, पक्ष्यासारखे उडून झाले... मला ना ह्या वाऱ्या सोबत धावायची इच्छा आहे... घोड्या सारखी? पूर्ण होईल?" विश्वा तिच्या कडे बघत म्हणाला...
"धावून बघ... " ती खांदे वर करत होऊ हि शकते असे भाव देत त्याला म्हणाली.
"पण हे सर्व कसे शक्य आहे.. इथे काय रहस्य आहे... कोणती शक्ती आहे.."
"वैज्ञानिक साहेब... कधी कधी मनसोक्त काही अनुभव हि घ्याचे असतात ...." तुहिरा त्याला निहारात म्हणते...
विश्वा हळू हळू धावायला सुरु करतो आणि जसा जसा तो वेग घेऊ लागतो त्याला कळते कि त्याचे पाय घोड्या सारखे वाऱ्याच्या वेगाने धाव घेतायेत... तो परत जुन्या तळ्या  पाशी येतो... तिथली माती हातात घेतो त्यात काही तुकडे चमकत असतात.. तितक्यात तुहिरा तिथे उडत येते, त्याला माती निरखून बघताना पाहून विचारते "काय झाले..."
"हे चमकणारे कोणते पदार्थ आहे?" विश्वा चे संशोधक मेंदू सारखे त्याला प्रश्न विचारात असते
"तें कार्बन आहे..."
"कार्बन... म्हणजे हे हिरा आहे ??? " विश्वा आपल्या हातातली माती झटकत त्या हिर्या कडे बघत म्हणाला... इथल्या मातीत हिरे आहेत ... मी इथून ५-६ जरी घरी परत घेऊन गेलो तर पृथ्वी वरचा सर्वात श्रीमंत व्यक्ती होईल...
तुहिरा त्याच्या मनातले विचार ओळखते..."तुला अजून हि परत जायचे आहे?"
"अर्थात.. मी इथे फक्त ७ दिवसांसाठी आलो आहे... माझी लोक माझी वाट पाहत आहेत... "
"तुझी लोक? खरंच? कोणी वाट पाहत आहे तुझी?? ७ दिवस? ७ दिवस कधी ची होऊन गेलीत तुझ्या पृथ्वीवरची...."
"काय?? कसे काय...तें शक्य नाही...  रात्र तर झालीच नाही..."
"तू ओमिक्रोन वर आहेस... हा तारा आहे... ह्याला स्वतःचा प्रकाश आहे... इथे रात्र कशी होईल... " तुहिरा त्याला स्पष्टीकरण देत म्हणाली...
विश्वा ला धक्का बसतो... आपण इतके म्हणत्वाचे कसे काय विसरलो कसे झाले..हे ... "पण मला माझ्या टीम ला सांगावे लागेल... इथले हे जादुई जग त्यांना दाखवावे लागेल... "
"खरंच? म्हणजे या सुंदर विश्वाची सुद्धा तुला पृथ्वी सारखी दयनीय अवस्था बघायची आहे.. ?"
विश्वा तुहिरा कडे अविश्वासाने बघतो... आणि विचार करतो, "हिला कसे हे सर्व माहित... पृथ्वी वर तर हि कधी आली नाही.. मग दयनीय अवस्था आहे पृथ्वीची का म्हणतीय??" तो मनात विचार करतो...
"ह्युगो वर आम्ही मनातले ओळखू शकतो..." तुहिरा त्याचे चलबिचल मनस्थिती पाहून आपल्या रहस्याचा खुलासा करते...
"काय?" विश्वा चा परत विश्वास बसेना.....
"तुझे डोळे पापण्या तुझ्या मनात चाललेल्या भावनां प्रमाणे हालचाल करतात मला त्या वाचता येतात... त्या मुळे तू काही बोलला नाहीस तरी मी तुझ्या मनातले ओळखू शकते... तू जेव्हा त्या हिरव्या पहाडात इथल्या हिरवळीत व्यस्त स्वच्छंद वावरत होतास... तेव्हा तुझ्या मनात चाललेले विचार हि मला कळलेले, तुला हि असेच वाटते ना कि पृथ्वी वर जेव्हा जीवनाची सुरवात झाली असेल पृथ्वी पण इतकीच सुंदर असणार...."
विचार करत तो हे काबुल करतो कि हो त्याच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले..."पण हे मस्त आहे मनातले ओळखणे खरंच... व्वा मला शिकवशील..."
"नक्की... पण एका अटीवर... "
"अट?? कसली?" शंकेने विश्वा म्हणतो..
"तू ह्या जागा बद्दल अजून कोणालाच काही नाही सांगायचे...." तुहिरा आपली अट सांगते
"मी भले नाही सांगणार पण तुझ्या ग्रहावरचे इथे आले म्हणजे...?"
"माझ्या ग्रहावरचे लोक हे समजून शांत आहेत कि मी इथे मेली, मी ह्या पाण्यांत अडकली असल्याने त्यांना इथले काही सांगू नाही शकले..."
विश्वा स्वतःशीच हसला... आपण एका अश्या जागी आलो आहोत जिथे आपल्याला पाहिजे ते सर्व काही आहे.. तो विचारात मग्न असतो तेव्हा तुहिरा म्हणते... "हो... नक्की..."
"काय??" विश्वा गोंधळून विचारतो... कारण तो काही बोललाच नसतो...
"आपण ह्या जगाचे सौंदर्य असेच जपून ठेवुयात... इथे कोणते संशोधन नाही काही नाही होणार... " विश्वा तिच्या कडे बघत राहतो... आणि त्याच्या लक्षात येते हिला मनातले विचार कळतात ... ते लक्षात येताच तो विचार करतो "मला आता मनात विचार करताना सावध रहावे लागेल... "
तुहिरा तें कळून हस्ते.. विश्वा परत गोंधळतो... "अगं, एक सांग.. तू तें यंत्र का घेतलेस माझ्याकडून.. तुला न बोलताच कळते सर्व... "
"मला कळते पण तुला थोडीच कळते... तुला तर त्याची गरज लागली असती ना... "
"हम्म.. " विश्वा विचार करत म्हणाला... "पण हे डेंजर आहे.. म्हणजे मी मनात कोणता विचार नाही करू शकत...??"
"हम्म... करू शकतोस पण मी नाही सांगणार कसे ... मला तुझ्या मनातले सर्व काही कळायला हवे..."
"उम्म..." विश्वा नाराज झाला...
"अरे मी तुला विचार ओळखता येतात सांगितले तेव्हाच उपाय हि सांगितलं... मी डोळे वाचून मनातले ओळखते... तू डोळे बंद करून काही विचार केलास तर मग कसे ओळखता येईल मला?"
"अरे हो..." विश्वा आनंदला... "लोक एकांत शोधतात पण आपण तर एकांतातच आहोत... आपण बोर होऊन जाऊ..."
"आपण आपले छोटेसे विश्व् इथेच निर्माण केले तर?" तुहिरा आपला विचार मांडत म्हणाली जे विश्वा ला हि पटते. तो तिच्या विचारांशी आपली सहमती दर्शवतो...
विश्वा चे यान हे त्यांचे घर बनते, तिथल्या वनस्पती खाऊन ते आपला उदर निर्वाह करू लागतात ....

तिकडे पृथ्वीवर
विश्वा चा बरेच दिवस काही संपर्क होत नसल्याने पृथ्वी वर ओमिक्रोन ला निषेध क्षेत्र घोषित केले जाते. विश्वा इतिहासात शामिल झाला असतो...त्याच्या बहादुरी चे किस्से सर्व एका दुसर्या सांगतात कसा तो एकटा त्या ताऱ्यावर संशोधन करायला गेला... नासा सुद्धा ओमिक्रोन ला जीवन जगण्या योग्यतेच्या शक्यतेच्या यादीतून काढून टाकते.

ओमिकॉर्न वर ...
"तुहिरा मी तुला या आकाश गंगेच्या सर्व ताऱ्यांच्या साक्षी ने जन्मो जन्मासाठी स्वीकारतो... " ते वाक्य ऐकून तुहिरा त्याच्या कुशीत शिरते... दोघे असे विश्व् निर्माण करायचा निर्णय घेतात ज्याने पुढची १०००० वर्षे त्या बेटावरचे निसर्ग सौंदर्य टिकून राहीन. आपल्या येणाऱ्या पिढीला निसर्गाची जाणीव राहावी म्हणून ते पृथ्वीवरच्या संशोधनाच्या  कहाण्या बनवतात, त्यांनी मानव जाती ला झालेल्या कष्ट आणि कसे मानवाने स्वतःच स्वतःचा काळ निवल्डला हे दर्शवतो... त्या कहाण्या तिथे प्रचलित करतात ज्याने पुढची पिढी आपल्या जवळ असलेल्या निसर्गाच्या संपत्ती चा मान ठेवेल...

विश्वा जेव्हा या मिशनवर आला होता त्याला त्याच्या साठी इतके सुंदर विश्व् वाट पाहतंय हे माहीतच नव्हते...
विश्वा आणि तुहिरा त्या ताऱ्याच्या बेटाला आपल्या प्रेमाने प्रेमाचे बेट बनवतात ...

समाप्त


शुश..!! कोणी आहे...

रात्रीचा अंधार पसरलेला त्यात पावसाने भर घातलेली, धो धो पाऊस पडत होता आणि थांबायचं नाव घेत नव्हता. साऱ्या रेटली वीज गेलेली, कुठे तरी शॉर्ट सर्किट झालेले संता आणि बंता आपली रात्रपाळी देत होते, अचानक संता ला काही जाणवले आणि तो एका दिशेने धावत गेला त्याच्या मागे मागे बंता हि गेला..
"काय झाले?" बंता ने त्याला विचारले... काही न बोलता तो असा धावत का निघाला हे बंता ला कळले नाही.
"मी तिथे काही तरी हलताना पहिले... " संता त्या दिशेने बोट दाखवत म्हणाला...
"अरे भास झाला असेल तुला... इतक्या रात्री अंधारात कोण जाणार आहे त्या नाल्याकडे..."
"थांब बघून येतो ... " संता पुढे होत म्हणाला...
"अरे कुत्रा वगैरे असेल काही... नको जाऊस मला भिति वाटते ... तू इथेच थांब" बंता आजू बाजू ला बघत घाबरून म्हणाला.. सगळीकडे अंधार आणि शुकशुकाट पसरलेला फक्त पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज येत होता..
"अरे आता इतक्या जोऱ्यात वीज कडकली... मला त्या विजेच्या उजेडातच इथे काही तरी हलताना दिसले... खूप मोठे होते, त्या विजे बरोबर आकाशातून तर नाही पडले? कोणाला काही झाले असेल तर.. मदत हवी असेल टॉर्च बघू.." संता चिडून म्हणाला..
बंता त्याच्या हातात टॉर्च न देता त्याला म्हणाला, "संभाळून... अंधार आहे ना.." टॉर्च चा लाईट दाखवत तिथे काही न दिसल्याने तो म्हणाला  "बघ काही नाही आहे तिथे.." आपल्या हातातली काठी बंता ने संता ला दिली, संता ने तिथे पडलेल्या त्या हिरव्या वस्तूला  डिवचण्याचा प्रयन्त केला... काही हालचाल नाही झाली...
"बघ मी म्हणालो ना काही नाही आहे तिथे... " बंता वळत म्हणाला.. "चल आता"
"पण काठीला हा पदार्थ चिटकला आहे... " संता काठीवरून काढण्याचा प्रयत्न करत म्हणाला. संता जितकी वर काठी करून बघायचा प्रयन्त करी तो पदार्थ तितका लांब होई आणि परत काठी जमिनी ला टेकवली कि परत एक छोटासा बॉल बनून जाई.
"अरे चल... काही नाही आहे... मुलांनी चुईंग गम खाऊन टाकले असेल... " वळून बंता संता कडे बघतो  तर संता गायब... टॉर्च इकडे तिकडे करून बघू लागला तर त्याचे डोळेच पांढरे पडले, समोर एक मोठे  हिरवे सरपटणारे प्राणी उभे होते, हो सरपटणारा प्राणी उभे होते... त्याच्या शेपटी वर, त्याला ३ तोंड होती आणि प्रत्येक तोंडाला ४ डोळे! आणि त्याच्या बाजूला संता च्या हातातली ती काठी... त्याच्या तोंडून लाळ टपकत होती आणि काही कळण्याच्या आत त्याने बंता वर ताव मारली आणि तो त्याचे भक्ष बनला होता.

परत सर्व वातावरण शांत... तोच शुकशुकाट... येणाऱ्या जाणाऱ्याला फक्त पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता...

तिथून काही वेळाने दुसरी २ मुले जात असतात  ...
"ए तिकडे काही तरी हल्ले...  " बबली घाबरून बंटी चा हाथ धरत म्हणाली...
"कुठे??"
"तिकडे..." बबली बोट दाखवत म्हणाली... ते दोघे तिकडे जातात
"ए हे काय आहे...किती गुळगुळीत बॉल आहे... घेऊन जायचा?!!!" बंटी बबली ला तो हिरवा पदार्थ हातात घेऊन दाखवत म्हणाला..


... म्हणून मुलांनो जी वस्तू आपली नाही त्याला हाथ लावू नाही... 

तुझे माझे एका नाव


"कायरा!!!" मागून विशाखा ची हाक ऐकून कायरा थांबते... आणि हाकेच्या दिशेने वळून बघते, विशाखा तिच्या दिशेने आपली बॅग आणि ओढणी सांभाळत धावत पळत येते,
"हळू हळू.. श्वास घे जरा.. काय झाले...?" कायरा आपल्या नम्र आवाजात तिला विचारते.. विशाखा आपली बॅग बाजूच्या बाकावर ठेवत आपला हाथ पुढे करते, "हैप्पी बर्थडे!! मला कॉलेज मध्ये सर्वात प्रथम तुला विष करायचे होते.. "
कायरा गालात हसली आणि म्हणाली, "थँक यु!! पण त्या साठी इतकं धावत पळत यायची काय गरज होती... "
"गरज?? अरे मी अजून २ सेकंड उशीर केला असता तर बहुतेक साऱ्या कॉलेज चे विष करून झाले असते तुला.. "
"चल... काही तरीच ..." असे म्हणत दोघी लेक्चर ला बसतात.

कायरा ... जणू एक अप्सरा, निळे डोळे, काळे केस, चॉकलेटी त्वचा. हसली कि गालावर एक खोल खळी पडायची. सहसा केस लांब असल्यामुळे वेणीत बांधून असायचे पण आज बर्थडे असल्यामुळे तिने केस मोकळे सोडले होते आणि त्या केसांच्या तालावर सारे कॉलेज दिवाने होत होते. पण कायरा कोणाला भाव नाही द्याची  .. तिचे विश्व् वेगळेच होते. कॉलेज तर तिच्या मागे दिवाने होते पण कायरा ची एकमात्र जीवष्ट मैत्रीण कॉलेज मध्ये आणि ती म्हणजे विशाखा. मुंबईच्या प्रसिद्ध वाणिज्य कॉलेजात CA चा अभ्यास करत होती.

"मग आज किती वास्ता आहे पार्टी घरी?"
"पार्टी ?? कसली पार्टी..." कायरा आश्चर्याने म्हणाली
"बस का... बोलवायचे नाही तर तसे सांग.. आज बर्थडे आहे मग पार्टी तर असणारच ना..." विशाखा डोळे मिचकावत म्हणाली... पण तिच्या त्या वाक्याने जणू कायराच्या चेहऱ्याचे हसू हिरावून घेतले..
"विशाखा तुला माहित आहे ना... माझ्या बाबांना मी अजिबात नाही आवडत, मी काय गुन्हा केलाय मला नाही माहित पण आज पर्यंत त्यांनी मला प्रेमानी जवळ घेतलेले मला आठवत नाही, नेहमी शाळेत पालकांना बोलवायचे पण नेहमी आईच यायची.. कधी बाबांनी मला त्यांच्या मुलीचा दर्जा दिलाच नाही... असे असताना ते माझ्या जन्माचा आनंद का मानवतील?" तिचे वाक्य ऐकून विशाखाला खूप वाईट वाटले ... तिला काय बोलावे आता असा मनात विचार करत असते तेव्हा कायरा तिला पुढे म्हणते.. "तू नको काळजी करुस... मला सवय झाली आहे ह्याची आता... "
विशाखा तिला गालातल्या कोपऱ्यातून एक स्माईल देण्याचा प्रयत्न करते... कॉलेज संपल्यावर कायरा आपल्या सकूटीवर घरी जायला निघते. रस्त्यात बरीच गर्दी जमलेली दिसते म्हणून ती गाडी बाजूला लावून  बघायला जाते, तिथे एक २०-२२ वर्षाचा तरुण रक्तबंबाळ होऊन पडला असतो, कायरा चा जीव काही राहत नाही ती सगळ्या गर्दीला चिरत त्याच्या जवळ जाते, "कोणी ऍम्ब्युलन्स ला फोन करा..." ती विंनती करते पण सर्व लोक फक्त उभे राहून तमाशा बघतात. कायराच शेवटी धावून एक ऑटो बोलावते आणि त्याला घेऊन हॉस्पिटल ला जाते, हॉस्पिटल मध्ये इमर्जन्सी केस म्हणून त्याला लगेच ऑपेरेशन करायला घेऊन जातात, बऱ्याच वेळानी डॉक्टर बाहेर येतात ते पेशंट चे नातेवाईक शोधात असतात तेव्हा कायरा त्यांच्या पुढे जाते, तिचा पिवळ्या रंगाचा बांधणीचा नावा ड्रेस लाल झाला असतो, "तुम्ही कोण पेशंट च्या?"
"कोणी नाही डॉक्टर, मला रस्त्यात त्यांचा एक्सीडेंट झालेला दिसला, रहावले नाही म्हणून एका चांगल्या नागरिकाचे कर्तव्य म्हणून मी हॉस्पिटल ला घेऊन आले.. मला घरी जायला उशीर होत आहे, पण सिस्टर मला जाऊ देता नाहीत पोलीस आल्यावर साक्ष देऊन जा म्हणतात ..."
डॉक्टर तिला शांत व्हायला सांगतात " ठीक आहे तुम्ही जाऊ शकता मी सांगेन पोलिसांना.. तुम्ही घाबरू नका... "
कायरा त्यांचे आभार मानून निघू लागते तेच मनात प्रश्न येऊन ती थांबते वळून त्यांना विचारते, "पेशंट कसे आहेत..."
डॉक्टर एक उसकारा सोडत डोके नकारार्थी हलवून म्हणतात, "त्यांच्या यकृत ला खूप नुकसान झाले आहे. आम्ही त्यांना कोणी यकृत दाता मिळाला तरच वाचवू शकू आणि इतक्या लवकर यकृत मिळणे म्हणजे चमत्कारच होईल... आम्ही आमच्या परी ने पूर्ण प्रयत्न करत आहोत... तुम्ही काही काळजी नका करू, निघा तुम्ही.." ते तिच्या खांद्यावर थोपटत सांगतात... ते ऐकून कायरा निशब्ध होऊन जाते.. सुन्न त्या हॉस्पिटल च्या बेंच वर बसते मग काही विचार करत ती डॉक्टर ला हाक मारते ते वळून बघतात, ती धावत त्यांच्या कडे जाते आणि विचारते  "माझे यकृत चालेल?"
"बेटा तू आणखीन लहान आहेस, बरंच आयुष्य पडलं आहे तुझ्या पुढे आम्ही बघतो काय करायचे ते..."
"नाही डॉक्टर... तुम्ही माझे एक यकृत त्यांना देऊन टाका.. तसंहि मी एकावर जगू शकते ना..." तिचे ते वाक्य ऐकून डॉक्टर उडालेच...
"बेटा माणसाला एकच यकृत असते... "
"नाही डॉक्टर... २ असतात " ती त्यांच्याशी वाद घालू लागते... डॉक्टर हि गोंधळतात कि हिला कसे समजवावे...
"माझे ऐक, २ किडनी असते यकृत एकच असते... " किडनी म्हंटल्यावर कायराच्या डोक्यात प्रकाश पडतो... "ओह सॉरी डॉक्टर ते काय माझे ससान्स विषय नाही ना.. माझा जरा गोंधळ उडाला.. पण मग यकृत एकच असते तर कोणी का देईल आपले यकृत?? " कायरा ला प्रश्न पडतो..
"म्हणूनच शक्यतो मृत लोक ज्यांनी आपले यकृत दान केले असते आम्ही त्यांच्या शी मॅच करून बघतो... पण खूप मोठी लाईन असते... आता जिवंत लोकांचे यकृत प्रत्यारोपण पण करता येते!!" ते ऐकून कायरा दचकते... "म्हणजे ऐक जीव वाचवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचा जीव घेता?"
"नाही नाही... मानवी शरीरात यकृत हा एकच असा अवयव आहे जो कि परत स्वतः वाढू शकतो म्हणून दात्या कडून आम्ही ६०% यकृत काढून रुग्णात प्रत्यारोपण करतो...  "
"अच्छा ... आता कळले.. मग माझे यकृत घ्या पण त्यांना वाचवा... " कायरा विनंती करत म्हणते
"असे इतके सोपे नसते... आम्हाला टेस्ट करावे लागतात आणि मॅच झाले तरच करू शकतो प्रत्यारोपण "
"हो मग चला करू यात ना टेस्ट..." कायरा अधीर होती म्हणते
"त्या साठी तू १८ वर्षाच्या वर हवीस ... "
"काय योगायोग आहे डॉक्टर... माझा आज १८वा वाढदिवस आहे... प्लिज लवकर चला कोणाचा जीव धोक्यात आहे..." डॉक्टर तिचे ते बोलणे ऐकून टेस्ट करायला तयार होतात. टेस्ट चे निकाल यायला वेळ असतो.
कायरा हॉस्पिटल मधेच बसून असते. तिला विशाखाचा फोन येतो, "कायरा... संध्याकाळी ६ वास्ता CCD ला भेटू..."
"मला शक्य नाही विशाखा.. "
"ए काय भाव खातेस ग.. तुझा १८वा वाढदिवस साजरा करू आपण..." ते एकूण कायरा च्या डोळ्यात पाणीच येते आणि तिचा आवाज हि रडवेला होतो...
"काय झाले कायरा?? तू रडत का आहेस? कुठे आहेस तू?" कायरा तिला झाला प्रकार सांगते... आणि कळवते कि अजून ती हॉस्पिटल ला आहे. विशाखा तिला ती तिथे पोचते म्हणून सांगते.

टेस्ट चे निकाल सकारात्मक येतात ज्याने डॉक्टरांना हि नवीन उमेद मिळते... ते कायरा जवळ येतात आणि सांगतात, "अभिनंदन तुमचे टेस्ट सकारात्मक आलेत, आपण तुमचे यकृत घेऊ शकतो प्रत्यारोपण ला...फक्त ऐक अडचण आहे तुम्हाला १ लाख ऍडव्हान्स जमा करावा लागेल हॉस्पिटल ला तेव्हाच आम्ही केस पुढे घेऊ शकतो..."
कायरा विचारात पडते १ लाख कुठून आणायचे... विशाखा हि आली असते दोघी एकमेकींच्या तोंडाकडे बघतात, कायरा रिसेप्शन ला जाऊन आपल्या गळ्यातली सोन्याची चैन जमा करत त्यांना म्हणते, "सध्या आमच्या कडे पैसे नाहीत... मी उद्या पर्यंत पैसे जमा करते तो पर्यंत हि चैन ठेवा पण ऑपेरेशन सुरु करा..."
"आजच आई नि दिली आहे ना तुला ती चैन बर्थडे गिफ्ट?" विशाखा आश्चर्यचकित होऊन म्हणाली..
"चैन काय कधी हि मिळेल परत जीव गेला तर थोडीच मिळवता येईल परत..." कायरा विना संकोच त्यांना आपली चैन देत म्हणाली.

डॉक्टर तिचे हे वागणे पाहून खूप प्रभावी होतात... ऑपरेशन यशस्वी रित्या पार पडते. कायरा ला हि स्टिचेस लागले असतात डॉक्टर तिला ऐक दिवस हॉस्पिटल मध्ये थांबायला सांगतात पण ती काही करणे देऊन घरी निघून येते. रस्त्यात विशाखा तिला म्हणते, "कायरा तुझा १८वा बर्थडे तर जगावेगळा झाला... कोणाचातरी  जीव वाचवलास तू आज.. "
"हो ना.. मला खूप भारी वाटतंय!! आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो..." ती गोड हस्ते आणि तिच्या गालावरची खळी अजूनच उठून दिसते.. विशाखा तिला घेऊन तिची गाडी घरी सोडते. घरी तिची आई तिची वाट पाहत असते, तिला असा रक्तबंबाळ ड्रेस मध्ये बघून त्या घाबरून जातात, "कायरा बाळा काय झाले... ?? तू ठीक आहेस ना.."
"आई मी ठीक आहे.. काही नाही झाले..."
"मग विशाखा का अली तुला सोडायला तू का नाही चालवली गाडी..." बोलता बोलता त्यांचा हात तिच्या  स्टिचेस ला लागतो ज्याने ती कळवळते... "काय झाले कायरा?" त्यांना काही राहवेना...
विशाखा शेवटी त्यांना सर्व हकीकत सांगते, तिचे बाबा हि तिथे आले असतात तोवर सर्व ऐकून ते कपाळाला हाथ मारून बसतात "झाले ... ह्या मुलीला आम्हाला कळवावेसे पण नाही वाटले... इतका मोठा निर्णय स्वतःच घेऊन टाकला? आता कोण लग्न करणार हिच्याशी? मालती तुझ्या शी बोलतोय मी..." कोणीच उत्तर देता नाही हे बघून ते आपल्या बायको कडे नजर रोखून रागारागाने बघत राहतात ...
"आज पर्यंत मी मेली कि जिवंत आहे ह्याची कोणाला पडली नव्हती... आज लग्नाची काळजी कुठून आली..." कायरा झटक्यात उठून तिथून निघून जाते... विशाखाला काय करावे कळत नाही, ती मालती कडे बघते आणि मी निघते असे इशार्यानेच सांगते..
सर्व काही शांत झाल्यावर मालती कायरा च्या खोलीत जाते, "कायरा चल जेवून घे बघू... " कायरा मुसमुसत भिंतीकडे तोंड करून झोपली असते त्या तिला आपल्याकडे वळायला लावतात ज्याने परत तिच्या टाक्यांना ताण पडतो आणि ती कळवळते.. "आई ग... सॉरी बेटा माझ्या लक्षातच नाही राहिले... चल जेवण करून घे... नाहीतर थांब मी इथेच घेऊन येते तुझे जेवण..." असे म्हणत त्या ताट आणायला निघून जातात. लगबगीने ते गरम जेवणाचा ताट घेऊन येतात आणि तिला उठवून बसवतात, "२ घास पोटात गेले म्हणजे बरं वाटेल, सकाळ पासून काही खाल्लंस कि नाही..." त्या तिला हसवण्याचा प्रयत्न करतात हळू हळू ती त्यांना प्रतिसाद देऊ लागते, "कसलं ग धाडस केलंस एवढं... एकटी नि त्याला नेलस काय... आपली चैन हि देऊन आलीस, चैन चे जाऊ दे पण यकृत हि देऊन आलीस... "
"माहित नाही आई त्या क्षणी जे ठीक वाटले ते केले... मी ठीक केले ना.."
"तुझा निर्णय बरोबर होता बेटा पण सोबतीला कोणी मोठे हवे होते, मला ऐक फोन तर करायचास... त्या विशाखाला काय समजते.. ती हि तुझ्या एवढीच ना..."
"मी विशाखाला नाही बोलावले.. तिचा फोन आला होता तेव्हा मी तिला सर्व सांगितले..."
"मी किती काळजीत होते, तुझा फोन हि लागत नव्हता... ह्या पुढे काही हि असले तर आई ला सांगायचे कळले?" कायरा होकारार्थी मान हलवते त्या तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाल्या, "झोप आता!! हैप्पी बर्थडे परत एकदा... १८ व लागलं आणि तू आपले निर्णय स्वतः स्वतः घेऊ लागलीस...!!" त्या जाता जाता दार लोटून घेत म्हणाल्या..

तिकडे डॉक्टर आदिश च्या घरी...
राहून राहून त्यांना कायरा चा विचार येत होता, आपल्या खोलीत टेबलं लॅम्प जवळ सिगारेट फुकत ते दिवसभर झालेल्या घटनेचा विचार करत बसले होते... "कोणी इतकं निस्वार्थी कसे असू शकते...  चांगले नागरिक तर बरेच असतात जे रुग्णाला हॉस्पिटल ला घेऊन येतात, पण त्याच्या साठी आपले यकृत हि दिले तिने... आणि पैसे नाहीत म्हणून स्वतःची नवीन आई ने गिफ्ट केलेली सोन्याची चैन हि दिली... मानायला पाहिजे ह्या मुलीच्या धाडसाला.. खरी जिगरबाज आहे ती.." आदिश स्वतःशीच विचार करण्यात मग्न होता. त्याला अचानक मनात ऐक विचार येतो, "मी हिच्यावर अभ्यास केला पाहिजे माझ्या संशोधनात खूप मदत होईल... हिचा DNA चा नमुना मिळवला पाहिजे" खूप मोठे युद्ध जिंकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर येतो..

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये ...
डॉक्टर ला कायरा भेटते, "आता कशी आहे त्यांची तब्येत?"
"हो शुद्धीवर आलाय तो.. त्याचे आई वडील हि काल आलेत, जाऊन भेटू शकते तू त्याला... चल मी भेटवतो. " असे म्हणत ते तिला घेऊन त्याच्या रूम मध्ये येतात, डॉक्टर ला बघून तो उठायचा प्रयत्न करू लागतो...
"नाही नाही.. झोपून रहा मिस्टर करण.. .मी तुम्हाला तुमच्या प्राणदात्यांशी भेटवायला आलोय .." असे म्हणत ते कायरा ला समोर करतात. त्यांचे ते शब्ध ऐकून कायरा कावरी बावरी होते... "मी फक्त माझे कर्तव्य केले डॉक्टर... "
करण चे आई बाबा कायरा चे आभार मानतात. कायरा सगळ्यांची अनुमती घेऊन निघू लागते, तिला आदिश बाजूला घेऊन म्हणतात, "कायरा काल १-२ टेस्ट करायच्या राहून गेल्या.. "
ते ऐकून कायरा घाबरते "म्हणजे??"
"घाबरायचे काही करण नाही... ह्या टेस्ट ऑपेरेशन नंतरच करायच्या असतात मला तुझे रक्ताचा नमुना घ्यायचा आहे" आदिश तिला घेऊन जातो.

असेच काही दिवस निघून जातात करण हि पूर्णपणे बारा होतो, कायरा रोज त्याला भेटायला जायची ज्याने दोघांची घनिष्ट मैत्री होते कायरा च्या लक्षात येते कि त्याला पैंटिंग करायला आवडते आणि त्यातच तो आपले करिअर करू इच्छित आहे. तो वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी क्लास घेतो. कॉलेज संपल्यावर दोघे भेटायचे आणि हळू हळू मैत्री प्रेमात बदलू लागली...


दोघे एकमेकांना खुप प्रेम होते करत.. येता जाता नयनांनी भावनांना होते जपत... ती त्याला पाहुन गोड हसायची .. तो ह्रदयावर हात ठेवून होता म्हणत.. देवा हीला नेहमी असेचं हसतमुख ठेव, जो पर्यंत मी नाही मरत.. 

आदिश च्या सिगारेट च्या व्यसनामुळे त्याचे यकृत बिघडायला लागते, त्याला हि यकृत प्रत्यारोपण ची गरज पडते, डॉक्टर असल्यामुळे त्याला माहित असते कि यकृत दाता मिळणे किती कठीण आहे... अश्या वेळी त्याला कायरा ची आठवण येते आणि त्याच्या लक्षात येते त्याने तिचे रक्ताचे नमुने हि ठेवून घेतले होते आपल्या संशोधनासाठी, दुसऱ्या दिवशी तो त्याचे आणि कायरा चे रक्त टेस्ट साठी पाठवतो आणि आपल्या संशोधन साठी कायरा चा DNA टेस्ट हि करायला सांगतो आणि घरी लवकर निघून जातो..
त्याने ज्या सिस्टर ला टेस्ट कायला सांगितले असते तिला वाटते DNA मॅच करायचा आहे, दुसऱ्या दिवशी टेस्ट चे निकाल येतात आणि आदिश ला धक्का बसतो करण त्याचे आणि कायरा चे DNA मॅच झाले असतात. "कायरा माझी मुलगी आहे?" २ क्षण त्यांना काही कळेना... अशी धाडसी जिगरबाज मुलगी आपली मुलगी आहे हे कळून त्यांना आनंद होतो, मनात काही नसतांना हे सत्य कळल्यावर ते तिचा पत्ता शोधून काढतात काही ना काही कारणाने तिला फोन करून बोलू लागतात कायरा हि त्यांची मदत व्हावी म्हणून होईल ते मदत करायची. असे बरेच दिवस सुरु राहते, आदिश तिला रोज न विसरता फोन करायचा ! करण कधी हि कायरा शी बोलायचं तर ती आदिश बद्दल बोलायची.. ऐक दिवस करण ला राहवत नाही आणि तो आदिश च्या घरी जातो, आदिश आरामखुर्चीत अराम करत बसला असतो... सिगारेट काही सोडली नसते... करण ला बघून तो बिचकतो, करण रागातच असतो..."डॉक्टर तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर.. तुम्ही मला जीवन दान दिले आहे.. पण ह्याचा अर्थ हा नाही कि मी कायरा ला माझ्या पासून दूर होताना बघू शकेन..." करण रागाने लाल झालेला असतो, "तुमचे वय काय? तुम्ही तिच्या वडलांच्या वयाचे आहेत... काय चालले तुमचे? का फोन करता तिला रोज?"
करण चे बोलणे ऐकून आदिश च्या डोळ्यात पाणी येते पण तो काहीच उलट बोलत नाही... "अहो आता का शांत आहेत... "
आदिश ची काळजी घेणारी नर्स तिथे येते, "तुम्ही काही हि आरोप लावणार आणि सर ऐकून घेणार का? "
"काही हि नाही... विचारा त्यांना कायरा ला का रोज फोन करतात?"
"कायरा त्यांची मुलगी आहे..." ती नर्स खुलासा करते...
"काय??" ते ऐकून करण सुन्न पडतो... आदिश त्याला टेस्ट चे रिपोर्ट दाखवतो...
"काय बोलणार मी आता...पण तुम्ही हे टेस्ट केलेच कसे...?"
"सरांचे यकृत निकामी झालं आहे त्यांना यकृत प्रत्यारोपण करावे लागणार आहे... तेव्हा त्यांना कायरा ची आठवण झाली म्हणून त्यांनी टेस्ट केले... तेव्हा त्यांना हे कळले..."
"काय? यकृत निकामी झाले... " कारण ला धक्का बसतो
"आपल्या मुलीला आता धोक्यात टाकायची त्यांची इच्छा नाही म्हणून ते स्वतः आता स्वइच्छेने मरण स्वीकारत आहेत.. "
"अहो काय बोलताय तुम्ही... कोणी दुसरे दाता मिळेल ना..." करण हळवा होत म्हणाला...
"आदिश सर... अहो माझं यकृत हि कायरा नेच दिले आहे... तुम्हाला ते हि चालेल... हो ना... मी देतो तुम्हला माझे यकृत माझे घ्या यकृत... " असे म्हणत तो त्या नर्स ला आपले रक्ताचे नमुने घायला लावतो आणि सांगतो मी उद्या येतो आपण प्रत्यारोपण करून टाकू... तुम्हाला नावासाठी काय टेस्ट करायच्या त्या तुम्ही करून घ्या. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे करण हॉस्पिटल ला जातो... आणि यकृत प्रत्यारोपण चे ऑपेरेशन यशस्वी हि होते. कायरा ला जेव्हा कळते कि करण हॉस्पिटल ला आहे ती त्याला भेटायला जाते आणि तिला तेव्हा कळते कि त्याने आदिश ला आपले यकृत दिले आहे.. तिचा पूर्ण गोंधळ उडाला असतो, आदिश तिच्याशीं रोज बोलायचं पण त्याने तिला का नाही सांगितले कि तो आजारी आहे आणि त्याने करण ला सांगितले.. करण कडे हि तिचे यकृत होते मग मला का नाही सांगितले... करण तिला आपल्या जवळ बोलावतो, तो तिला सर्व हकीकत सांगतो... कायरा चे डोके गरगरायला लागते... ती पाणी पिते.. "म्हणजे आदिश माझे बाब आहेत!! खरे बाबा !!"
"हो..."

कायरा च्या तेव्हा लक्षात येते कि का तिचे बाबा तिच्यावर कधी प्रेम नाही करू शकले... त्यांना तिला पहिले कि आपल्या पत्नीने केलेला विश्वासघात आठवत असेल.. तरी त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी ठेवले.. लाड नाही केले पण घराबाहेर हि नाही काढले... न कळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तिचे पाऊल घराकडे वळतात. आज ती आपल्या बाबांना वेगळ्याच नजरेने बघत होती... ती जाऊन त्यांना बिलगते, ते तिला आपल्या पासून दूर करतात पण आज कायरा त्यांचे हे वागणे समजू शकत होती...

आदिश ला हॉस्पिटल मधून घरी घेऊन जातात, कायरा त्याची दिवस रात्र काळजी घेते.ती त्यांना तिच्या आणि करण बद्दल सर्व सांगते..
"तू त्याला सांगितलेस का तू त्याच्या वर प्रेम करतेस म्हणून?"
"सांगायची काय गरज आहे? त्याला कळत नाही का? माझ्या डोळ्यात दिसत नाही त्याला त्याच्या साठी चे प्रेम?"
"हम्म.. पण काही गोष्टी बोलून व्यक्त करणे चांगले असते..   कधी कधी धोकादायक ठरू शकतो..."
"ठीक आहे सांगेन त्याला... "
"कधी??"
"तुम्ही तर असे अधीर होताय बाबा जणू ... " कायरा लाजत तिथून निघून जाते. आदिश हि प्रसन्न असतो. त्याच्या मनात येते दोघे लग्न करणारच आहेत तर ह्यांच्या सर्व टेस्ट करून घेतो, कायरा चे रक्ताचा नमुना तर त्याच्या कडे असतोच आणि त्या दिवशी करण ने हि आपल्या रक्ताचे नमुने दिले होते, तो दोन्ही लॅब मध्ये पाठवतो...

जेव्हा टेस्ट चे रिपोर्ट येतात, आदिश ला ते पाहून डोळ्या पुढे गिरकी येते... त्याला आपण काय बघतोय ह्या वर विश्वासच बसत नाही... तो परत परत रिपोर्ट वाचतो, लॅब ला फोन लावतो त्यांच्या कडून काही चूक झाली आहे का त्याची खात्री करून घेतो पण कुठेच घोळ झाल्याचा लव लेश हि नसतो... तो लगबगीने करण ला फोन लावतो..."हॅलो करण.. अरे मला तुला खूप महत्वाचे बोलायचे आहे..."
"बोला ना डॉक्टर साहेब काय झाले... "
"अरे कायरा भेटली का तुला..??"
"नाही काल पासून आम्ही नाही भेटलो... आज भेटणार आहोत संध्याकाळी... काही काम होते का तिच्याशी...??"
"हे बघ... आज एखाद्यावेळी ती तुला आपल्या मनातल्या भावना सांगेल..."
"मनातल्या भावना..??"
"अरे वेड्या प्रपोस करेल..."
"काय बोलताय काका!! म्हणजे मी सुद्धा छान तयारी करायला पाहिजे... "
"नाही... तयारी नाही... तयारी करायची आहे तर तिचे प्रपोसलं नाकारायची कर..."
"काय?? काय बोलताय काका तुम्ही??" करण चा गोंधळ उडालेला होता... पण त्याला जेव्हा सत्य कळते त्याच्या हृदयाचे दोन तुकडे होऊन जातात.

ठरल्या प्रमाणे दोघे संध्याकाळी CCD मध्ये भेटतात, करण पहिले पासून तिथे आला असतो कोपर्यतली जागा घेतो... कायरा येते तेव्हा तिच्या हातात ऐक मोठी भेटवस्तू असते आणि पिवळ्या गुलाबाच्या फुलांचा गुलदस्ता  असतो..."मला ना आज तुला ऐक खूप महत्वाचे बोलायचे आहे... " कायरा अधीर होत म्हणते... त्याला आपल्या हातातली भेटवस्तू देते, "काय आहे हे?" करण काही माहित नसल्याचा आव अनंत म्हणाला.
"उघड तर आधी..." करण ते उघडतो तर कायरा नि त्याचे कॅनवास वर स्केच रंगवले असते आणि त्याच्या बाजूला ऐक कविता लिहिली असते...

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस , 
काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस , 
शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल तुझी पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस , 
तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल पण प्लिज  मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस...

करण चे  वाचून संपायच्या आत कायरा त्याला म्हणते... "तुझे उत्तर काय आहे मला माहित आहे तरी मी दोन्ही ची तयारी करून आली आहे... तुझा जर होकार असेल तर हे कॅनवस आज घरी घेऊन जा आणि नकार असेल तर मला आपली मैत्री अशीच जपायची आहे.. हे पिवळे गुलाब आणलेत मी तुझ्यासाठी ...आपापल्या मैत्री साठी... "

करण २ मिनिट स्तब्ध राहतो त्याला काय बोलावे कळेना... तो हाताला कॅनवस खाली ठेवतो आणि पिवळे गुलाब हातात घेऊन तिथून निघू लागतो... कायरा त्याचा हात धरते आणि त्याला थांबते... "खरंच? तू माझ्यावर प्रेम नाही करत? का? का नाही आवडत मी तुला...."
डबडबलेल्या डोळ्यांनी करण म्हणतो.. "मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो.. पण आपल्या नात्याला आपण नाव नाही देऊ शकत कायरा ... आपल्या नात्याचा शेवट हि पायरी... ह्या पुढे नाही जाऊ शकत... "
"प्रेम करतोस पण स्वीकारू नाही शकत... मला काहीच कळत नाही आहे... का नाही नाव देऊ शकत आपण आपल्या नात्याला?" कायरा त्याच्या नजरेत नजर देऊन रोखून बघत म्हणाली...
"करण आपल्या नात्याला आधीच ऐक नाव आहे... मी तुझा..." करण अडखळू लागतो... परत हिम्मत एकत्रित करून म्हणतो.."भाऊ आहे..."
"काय!! गंमत करायची हि ऐक लिमिट असते..." कायरा चिडून म्हणाली...
"मी खरं बोलतोय..."करण चे डोळे रडून लाल झालेले.. "विश्वास नाही बसत तर विचार तुझ्या बाबा ला.. नाही
आपल्या बाबा ला...सख्या बाबा ला.. आदेश ला... डॉक्टर आदेश ला..." करण तिथून तेवढे बोलून निघून जातो...


कायरा तिथेच स्तब्ध बसून असते.. "काय ऐकले आपण? खरं ऐकले मी हे सर्व? काय हे खरं घडतंय?"
स्वतःला सावरून ती रागारागाने सकूटी काढून घरी जायला निघाली... घरी जाऊन आपल्या रूम मध्ये जाते सरळ आणि उशीत डोके कोंबून रडू लागते. तिला असे तावातावत घरी आलेले बघून  मालती तिच्या मागे जाते... काय झाले खोदून खोदून विचारते... कायरा काहीच बोलत नाही... "अगं मला सांगणार नाही तर कसं कळणार काय झाले..." मालती तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली...
कायरा ला स्वतःचा राग आला होता... ती चिडून उठून बसते रागात आपले केस बांधते, "आई... मला माहित आहे बाबा माझ्याशी परक्या सारखे का वागतात... मला माहित आहे ते माझे खरे बाबा नाही... पण तू ठीक नाही केलंस... मला नाही माहित का तू असे केले तू मला घरी आणलेस मग करण ला का नाही आणलेस?"
"करण? कोण करण?" मालती ला कायरा काय बोलते काही उमजेना
"तुझा मुलगा.. करण... हो तुला त्याचे नाव कसे माहित असणार... तू तर त्याला टाकून दिला अशील कुठल्या कचरेच्या कुंडीत...."
"कायरा काय बोलतेस? मनाला येईल ते बरळू नकोस... "
"बोलू नको तर काय आई? आज तुझ्या मुळे... तुझ्या मुळे मी आणि करण लग्न नाही करू शकत.. तू ... जा ना... मला नाही बोलायचे काही तुझ्याशी... बाबा बरोबरच आहेत... मी नाहीच कोणाच्या प्रेमाच्या लायकीची... का असे केले..." कायरा परत रडू लागते.
मालती ला ती काय बोलते काही कळत नाही... "कायरा बेटा प्लिज मला नीट सांग काय झाले... का इतका अकांड तांडव करतेस?" ती समजण्याच्या स्वरात तिला विचारते.
कायरा आदेश ला फोन लावते आणि त्याला ताबडतोब घरी यायला सांगते... फोन ठेवत म्हणते..."सांगते.. सर्व काही सांगते.. एकदाचा सर्व सोक्ष मोक्ष लावते..." असे म्हणत ती करण ला हि घरी बोलावून घेते...
आदेश आणि करण दोघे घरी आपल्यावर ती आपल्या आई ला संबोधून म्हणते.. "आई.. ह्यांना तर तू ओळखतेच... " ती आदेश कडे बोट दाखवून म्हणते..."आणि हा तुझा मुलगा... करण..."
"मी का ओळखते ह्यांना कायरा? मी नाही ओळखत ह्यांना आणि हा माझा मुलगा कसा काय?"
"आई... हे माझे खरे बाबा ... माझेच नाही तर करण चे सुद्धा.. आणि तू ह्यांना ओळखत नाहीस?" कायरा प्रश्नचिन्ह भरल्या नजरेने तिच्या कडे बघत असते...
आदेश आपल्या खुर्चीतून उठतो आणि कायरा ला ऐक मुस्काटात मारतो... "हि पद्धत आहे का आपल्या आई शी बोलायची? मी तुला समजूतदार, धाडसी समजत होतो...." आदेश आपल्या रागावर नियंत्रण करत म्हणाला, "तू माझी मुलगी आहे करण माझा मुलगा आहे ह्यात ना तुझ्या आई ची चूक आहे ना दुसऱ्या कोणाची... तुम्ही माझे मुलं आहात  !! हो हे सत्य आहे पण तुमच्या आई ने तोंड काळ केलं म्हणून नाही तर तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी आहात म्हणून ... " कायरा आणि  करण तोंड उघडून आदेश चे बोलणे ऐकत होते..
"मी माझ्या तारुण्यात ऐक शुक्राणू दाता होतो... शिक्षणाचा खर्च भागवण्या साठी, घरखर्च मिळावा म्हणून मी हे करायचो, पण मला माझे शुक्राणू कोणाला दिलेत हे माहित नव्हते... तुम्ही माझे मुलं आहात हे ज्या क्षणी तुम्हाला कळले त्याच क्षणी मला हि कळले...!! "
सगळा गोंधळ मालतीच्या लक्षात आला... ती पुढे कायरा ला म्हणाली..."बेटा मी आणि तुझे बाबा दोघे मुलं व्हावं म्हणून खूप प्रयत्न करत होतो पण काही यश नाही आले मग काही टेस्ट केल्यावर लक्षात आले कि तुझ्या बाबांचे शुक्राणू खूप कमजोर आहेत ज्यामुळे मी कधीच आई नाही होऊ शकणार तेव्हा आम्ही खूप निराश झालो होतो... मी तर पार खचून गेली होती, मला निराश बघणे तुझ्या बाबांना सहन नाही झालं... त्यांनी डॉक्टरांना काही तरी उपाय सांगायला सांगितले... ते म्हणले कि मी आई होऊ शकते पण परपुरषाच्या शुक्राणू नि.. हि बातमी जितकी तुझ्या बाबांसाठी धक्कादायक होती ती त्याहून अधिक माझ्यासाठी होती... पण माझ्या प्रेमाखातर तुझे बाबा तयार झाले आणि त्यांनी मला हि तयार केले, खूप प्रयत्नांनी IVF द्वारे तू आमच्या जीवनात आली, तुझे बाबा हि आधी खुश होते पण समाजाने त्यांना टोमणे मारणे नाही थांबवले ज्याने ते खचून गेले आणि कधी त्यांचे तुझ्यासाठीच प्रेम तिरस्कारात रूपांतर झाले त्यांना हि नाही कळले... " मालती च्या डोळ्यात पाणी आले...
सर्व सत्य कळल्यानंतर सर्व शांत होते... कायरा आई जवळ जात तिचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, "आई मला माफ कर... तू मला या जगात आण्यासाठी, माझ्यावर प्रेम करण्यासाठी इतके कष्ट घेतले आणि मी... मी तुला समजूच नाही शकले... रागात येऊन मी काय नाही तो विचार करून बसले आणि तुला काय काय अभद्र बोलून बसले... " मालती तिला आपल्या कुशीत घेते आणि दोघी आपलं मन मोकळं करतात...

मन भरून रडून झाल्यावर कायरा करण कडे वळते, "आपल्या नशिबात ऐक व्हायचे नव्हते लिहिले वाटते करण... आपल्या नशिबात होते तुझे माझे ऐक नाव बाबा चे !!"
करण तिच्या कडे बघतो, "हम्म ... " असे म्हणत निघून जातो...

समाप्त













तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...