Wednesday, September 5, 2012

तुमच्याकडे देवासाठी वेळ आहे?


काल काय झाले माझ्या स्वप्नात देव आले, माल खुप आनंद झाला, खूप वेळ मी गप्पा मारत बसले त्यांना माझ्हे गाराने सांगत बसले हि अशीच करते आणि ती तसाच बोलते, मला हे नाही आवडत आणि ते करावेसे वाटते   आणि म्हणाले काय गम्मत करतोस का रे.. मला तुझ्यासाठी नाही तर कोण साठी वेळ असणार? देव म्हणाला... नक्की, विचार करून सांग, मी अगदी म्हणाले... नक्की...
बघ हा... मी परीक्षा घेईन मग तुझही..
बिंदास घे मी म्हणाले..
ठीक आहे येतोय मग मी तुझ्या परीक्षेला..
काय.. मला खूप आनंद झाला.. परीक्षा कसली?
तू म्हणालीस न माझ्या साठीच वेळ आहे.. मग मी तुझ्या घरी येतोय...
खरा.. नक्की?? मला तर विश्वासच बसत नाही आहे देवा.. खरा.. कधी?
कधी ते सांगण्या आधी तू ठाम ठराव.. नक्की वेळ देवू शकशील?
हो रे.. नक्की...
ठीक आहे मी येतोय मग ४ दिवसांनी तुझ्या कडे राहायला..
राहायला.. खरा... मला इतका आनंद झाला कि मी नाचू लागले.. मनन आनंद हि आनंद गडे.. जिकडे तिकडे चोही कडे गुणगुणू लागले..
हो.. मी तुझ्या सोबत १० दिवस राहील... २४ तास तुझ्या सोबत असेन पण तुला माझ्या सोबत ते १०*२४ तास घालवायला वेळ असेल..  ?
असा काय रे वेळ वेळी वेळ असेल का वेळ असेल का विचार्तोयेस?  मी माझह पूर्ण वेळ तुला देईन माल अतुल चं चं  पदार्थ करून खावू घालायचे तुझही सेवा करायची, तुला छान छान अभूशानानी सजवायचा आहे.. ईशः किती कामा आहेत मला मला तयारी ला लागावा लागणार...  मी स्वताशीच विचार करत मनात ठरवले..

आतुरतेने मी दिवस मोजू लागले...  फार कमी दिवस होते आणि आतुरता इतकी कि ते कधी गेले काही कळला हि नाही...
मग काय आला दिवस नो. १:  माझ्या डोळे अगदी दर कडे लागले होते, कधी पाहते देवाला असे झाले.. आणि तोः क्षण आला तेव्हा अगदी डोळ्याचे पर्ण फिटले असे वाटले... काय ते नक्षत्र सारखे डोळे म्हणून सांगू... त्यात सारे जागच सामावले होते त्यांच्या कडे बघत रहावसे वाटले, आम्ही छान आरडा ओरडा केला देवाला हि कळला पाहिजे न आम्ही किती आतुरतेने त्याची वाट पाहत होतो ते, घरतल्या लहान मंडळीनी तर घेरावआच टाकला होता २ मीन हि हलायला तयार नवते.. कसा बस त्यना शांत केला, देवाला त्याच्या साठी तयार केलेल्या सिंहासन वर बसायला सागितलं, त्याचे पाय धुतले आणि मग पुसून त्या वर पुलंचा वर्षाव केला, देव हि आनंदात होता, आपल्या साठी सगळे जन घरी थांबले अगदी लहाञान पासून म्हातार्या कोतार्या पर्यंत.

सगळे जन सेवा करण्यात लागले होते..
स्वयंपाकाला लागे मी लवकर पुरण पोळी चा स्वयंपाक.. आज तर नैवैद्य खुद्द देव खाणार होते नुसताच वास नवते घेणार... आनंदानि मन भरले होते थोडा वेळ निवांत बसल्यावर, सगळी तयारी झाली, देवाचे ताट मांडले रांगोळी नि सजवले, अगरबत्ती चा सुवास घर भर पसरला... आरती चे ताट सजले, देवा चा छान पैकी अभिषेक झाला दुध पाण्या नि, गंध गुलाल उधळला, फुलांचा वर्षाव, डाग दागिने आणि अलंकार चाडवले, आरती झाली टाळ्यांच्या तालावर, देवाला मग जेवायला बसवले... वाह काय प्रसन्ना वाटत होते म्हणून सांगू.. माझ्या हातचा स्वयंपाक आज देव जेवणार, आवडले त्याला जेवण, देव खोटा तर बोलत नसतीलच असा स्वताला सांगत मी स्वयंपाक देवाला अवद्ल्याचा आनंद व्यक्त करत होते... सगळ्यांची जेवणं आटपली, मग विश्रांती चा वेळ, देवा साठी तयार केलेल्या खोलीत देवाला आराम करायला सोडून मी आले आणि संध्याकाळच्या तयारी ला लागले...
दिवस कसा गेला काही कळलेच नाही...  सुट्टी असल्या मुले देवाच्या सानिध्यात राहता आले...
पण दुसर्या दिवशी काही सुट्टी नवती.. मला ८ वस्त ओफ्फिचे ला पाळायची घाई... ७: ३० लाच घरून निघावे लागते... मग पट पट आवरायचे आणि निघायचे.. पूजा करायची ... पण घरी साक्षात देव आले असून त्यांचे दर्शन हि न करता मला निघावे लागले.. त्यांची एकांत ची वेळ... ओफ्फिचे ला गेले कि कसला काही भान राहता काही १२ वाजतात आणि कधी ६ हे काळात हि नाही.. घड्यालीचे काटे पाळतात, थकून घरी आले... लक्षात आले... देव आहेत आलेले आपल्या घरी... थोडा हुरूप चढला... छान स्वयंपाक केला... जेवणं आटपली आणि आम्ही झोपलो...
ससा म्हणत म्हणत ४-५ दिवस गेले असाच मी संध्याकाळी office मधून आले.. कंटाळा आला होता मला ती office मधली कट कट.. घरी आले तेव्हा काहीच करायची क्षमता उरली नवती... पण देव आलेत न... स्वयंपाक तर करावा लागणार... कदाचित ते नसते तर मी खिचडी लावली अति ती निमूट पाणी आम्ही दोघांनी नि खाली असती आणि झोपलो असतो.. पण देव आलेत न... किती हि कंटाळा आला असला तरी स्वयंपाक तर करावा लागणार... तुम्ही विचार करत असाल ती बाकीची मंडळी कुठे गेली पहिल्या दिवशी आली होती ती आमच्या घरी... गेली न सगळे आपापल्या घरी... ते आले होते फक्त स्वागता साठी...  परत कुठेय कोणाला वेळ...

शेवटी एकदाचा रविवार आला... सुट्टी चा दिवस मला खूप आनंद झाला... आज देवा सोबत राहायला मिळणार मनात विचार आला.. आज काही तरी छान करूया.. मी स्वताशी बोलताच होते इतक्यात देव आले...
मला म्हणाले बस थोडा वेळ माझ्या सोबत, "आज माझ्या साठी काही नको करूस" असा म्हणाले...
मी हादरले... मला काळजी वाटू लागली चिडले कि काय देव? माझह स्वयंपाक आवडला नाही? काही चुकला का माझ्हे ? स्वताला उत्तर देत होते तितक्यात माझ्हे  मनातले  जाणून देव म्हणाले... " अगं वेडे मी काही इथे तुला त्रास द्याला नाही आलो... मी तर तुझ्या सोबत वेळ घालवायला आलो, तू मला रोज म्हणतेस न.. माझ्या सोबत राहा माझ्या सोबत राहा... आलो मग तुझ्या सोबतीला पण तुला काही माझ्या साठी वेळच नाही...  "

मी काही बोलू नाही शकले... मन खाली घालून एकात बसले...
"तू मला म्हणालीस तुझ्हा सगळा वेळ माझह असेल? अतःव बारा मी आल्या पासून किती वेळ बसलीस माझ्या शी बोलत? केलास का आपला मन मोकळं? मी इथे नसतो तेव्हाच तू बरोबर माझही आठवण काढतेस, माझही पूजा करतेस... "
मी विचार करू लागले... तो काही खोटा नवता बोलत मी घरून सकाळी जायचे ते संध्याकाळी यायचे... त्याला वेळ काही द्याचे?? ?त्याची आरती आणि जेवण वायचा तेव्हा... ते तर मी रोजच देते.. तो माझ्या सोबत माझ्या घरी आहे तरी मी त्याला वेळ नाही देवू शकली.. माझी मलाच लाज वाटू लागली..

"आता मी अजून २ दिवस आहे... " मी मन हलवत होकार दिला... धक्का बसला मला कि बघता बघता ७ दिवस निघून हि गेले... " तर मला तू शांत चित्ताने आठवण केलेली आवडेल... तू मला रोज पाची तर्हेचे पकवान करून खावू घालावे अशी माझही इच्छा नाही.. मी काही त्याचाह भुकेला नाही... मी माझ्या सर्व भक्त वर समान प्रेम करतो.. कोणी मला हिर्याचा मुकुट दिला म्हणून तो लाडका नाही... आणि कोणी मला चटणी भाकर खावू घातली म्हणून तो दोडका नाही.. मला ह्या सिम्हसना वर बसण्याची सुद्धा हौस नाही.. मला राह्यचं तुमच्या हृदयात... कामस्वरूपी... मला हक ऐकायची तुमची मायेची... "
त्याचा बोलना ऐकून माझ्या डोळ्यातून तच कान एक अश्रू टपकले, देव हि आहे किती माझ्या प्रेमाचा भुकेला... हे आज कळले मला...
पुढची २ दिवस मी सुट्टी घेतली.... मना भावाने त्याची सेवा केली... त्याचं सोबत वेळ कसा गेला ते कला नाही... आणि त्याला निरोप देण्याची वेळ आली...
सोबत त्याला शिदोरी बांधून दिली.. त्याच्या साठी जरी लांब नसला तरी त्याचा घर माझ्या साठी खूप लांब होता... त्याला तट करत डोळ्यात पाणी तरले पण होता वर एकाच बोल होते.. "गणपती बाप्पा मोरया... पुढ्या वर्षी लवकर या.... "

असे... खरो खर्चे देव आले होते माझ्या घरी.... या वर्षी... मी शिकले.. माझ्या busy  आयुष्यातून त्यांच्या साठी वेळ कडणे... जेव्हा कधी त्यांचा नाव घेवू मना भावा नि घेवू...  त्याला हवे आपले फक्त प्रेम.. निखळ निस्वार्थ प्रेम!! बाकी त्याला काही नको...   "देव आहे भावाचा भुकेला... वासाचा धनी... "

:-)

गणपत्ती बाप्पा येणार आहेत न... या वेळेस त्याच्या सेवेत थोड मन लावा धन लावण्या ऐवजी.... 
Just Do It !!

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...