Thursday, June 25, 2020

माझा तू

सागराला कुठे माहीत असतं
तो किती अथांग पसरला आहे
माझ्या मनातले सारे दुःख तो सामावून घेतो

फुलाला कुठे माहीत असतं
त्याचा सुगंध कीती मोहक आहे
बेधुंद काही क्षणांना मनात जन्म तो देतो

मोराला कुठे माहीत असतं
त्याच्या पंखाचे रंग किती आकर्षक आहे,
परत मनाला एक जगण्याची आस लावून जातो

कोकिळेला ही कुठे माहीत असतं
तिचा आवाज किती मंजुळ आहे
मनाच्या कोपऱ्यात काही आठवणी ती जगवते

पावसाला ही हे माहीत नसतं
त्याच्या प्रत्येक थेंबात किती गारवा आहे
तापून उठलेल्या मनाला क्षणात शांत  करतो

तुला तरी कुठे माहीत आहे
तुझं माझ्या मनावर संपूर्ण राज्य आहे
माझ्या डोळ्यात तुझ्या मनाचे भाव उतरवतो

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...