Friday, March 25, 2022

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट...


भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे कुतूहल वाटले नाही, त्याला कारण म्हणजे आयुष्याच्या उतार वयात देव देव तर करायचे आहे असा समज असणारी मी ! 


पण आयुष्यात तू आलीस, तुझं ते अध्यात्मिक ज्ञान मला अचंबित करायचं, माझ्याच एवढी तू, पण किती समजदार, सहनशील? कसं जमतं, माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला गीतेत मिळणार म्हणालीस, एकदा माझ्या खातर गीता वाच म्हणालीस, मी पण चक्क घेतली वाचायला, अगदी न विसरता रोज एक अध्याय वाचून काढला, माझा हा प्रवास सुरु झाला! 

माझा असा समज झाला की तुला माझ्या आयुष्यात देवानी अध्यात्माकडे वळवण्यासाठी आणले, तुझं माझ्या आयुष्यात येण्याचं हेच कारण आहे! माझी अध्यात्माकडे ओढ वाढू लागली, नवीन नवीन गोष्टी समजत होत्या, किंवा एक नवा दृष्टिकोन मिळत होता.


अश्यातच मी जोडले गेले गीता परिवाराशी! 

गीता शिका, शिकवा, आचरणात आणा!!💐

माझ्या यासोबत अर्थात तू ही क्लास जॉईन केले, रोज सकाळी त्या क्लास साठी उठण्याची ओढ!! खूप सुंदर सुरवात व्हायची दिवसाची! किती किती चुकलं आपलं हे लक्षत आलं, गीता उतार वयात शिकायची नाही तर आयुष्यभर आचरणात आणायची गोष्ट आहे!


गीता शिकत असतांना आपण ही एक दुसऱ्याला समजू लागलो, एक दुसऱ्याच्या विचारांची देवान घेवान होऊ लागली, 


तू मला मी तुला ओळखू लागलो!

तू मला मी तुला गुंगूनू लागलो!


दिवस सरत होते लेवल 1 ची परीक्षा संपली, खरं तर तुझ्या मूळ3च मी ही परीक्षा दिली!! काही स्वप्न रंगवणे सुरू झाले! गीता च्या सर्व परीक्षा पास करायच्या आहेत, एक दुसऱ्याला ध्येय देऊ लागलो!!


तुझ्यामुळे माझा हा आध्यात्मिक प्रवास इतका सुंदर सुरू झाला आणि अजून ही सुरू आहे! 


पण मला खूप मोठे सुखद बक्षीस मिळाले, अगदी मन लावून गीता शिकण्याचे, एकाग्र राहण्याने! 


त्याच भगवंतांनी माझी भेट घडवून दिली तुझ्या सोबत - गीता मैत्री मिलन कार्यक्रमामुळे! माझं एक स्वप्न पूर्णत्वाला गेले!

तुझी भेट झाली!! बस अजून काय हवे होते!


मी हे सर्व समजत होते त्यांनी मला त्याच्या भेटीसाठी अग्रेसर करण्यासाठी केले होते, पण ह्या सर्व चक्रमागे करण होते तुझी माझी भेट घडवणे!!


आता असं वाटतं, गीता ला तू आयुष्यात नाही आणलं तर गीता नि तुला माझ्या आयुष्यात आणलं, माझी रुची गीतेत वाढणे, ते एकत्र गीता शिकणे, त्या सोबतच भेटीची ओढ निर्माण होणे... आणि चक्क गीता परिवाराने हा मिलन कार्यक्रम पुण्याला ठेवावा? 

त्यात तुला येत यावे? 

हे स्वप्न पूर्ण करायला त्यानी किती प्लांनिंग केली असेल ना? किती सूत्र हलवले असतील त्यानी? तुला मला एक छताखाली आणण्यासाठी? 


खूप कविता वाचल्या आज पर्यंत, खूप कथा वाचल्या 

एक अपूर्ण स्वप्न वाल्या, पण मी त्याची खूप आभारी आहे, माझं स्वप्न पूर्ण झाले, तुला भेटता आले!


आता ही जी तज्झ्या सोबतीची वाट त्यांनी दाखवली आहे ना मला त्यावर चालत राहायचं!! 



 Thank You Geeta Pariwar for these memories!!💐


 


मी कशी ग विसरेल तुला ?



तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...