ती पहिली पावसाची सर
मनातील इच्छा जागवणारी
आपल्याला परत लहान बनवणारी
काही हि पूर्व तयारी नसताना येणारी
आणि आपल्याला चिंब भिजवणारी
मातीचा सुगंध सगळीकडे पसरवणारी
आपल्या मनाला नाचवणारी
अशीच एक सर आज आली
माझ्या मनाला ताझं तावण करून गेली
मला परत माझ्या विश्वात रमवून गेली
जुन्या आठवणी ताज्या करून गेली
दु:खाचा विसर पडून गेली
मला ओळ चिंब भिजवून गेली
अजून एक हवी हवी शी बावन जागवून गेली....
No comments:
Post a Comment