Wednesday, June 6, 2012

मला तो खूप आवडतो...


तो आला कि नकळतच माझ्या चेहऱ्यावर हसू उमलतं, 
त्याचा स्पर्श माझ्या मनाला हळुवार कुरवाळून जातो... 
आमचं नातं हे असंच आहे आज पासून नाही... 
मला काही कळायचे नाही तेव्हापासून, 
तो आला की मी मला छान वाटायचा, 
त्याच्या मुळे मला कधी कधी मग शाळे ला सुट्टी सुद्धा मिळायची,
तो आला की आईच मला म्हणायची आज नको जावूस शाळेला... 
मग कसं नाही आवडणार तो मला... 
त्याच्या मुले मला शाळा सोडून खेळायला मिळायचा, 
मज्जा करायला मिळायची 

मी दर वर्षी आतुरतेने त्याची वाट बघायची कधी येतो ते 
उन्हाळ्याच्या सुट्टी पेक्षा मला त्याला भेटण्याची आतुरता जास्त असायची 
असायची काय... आहे.. अजून ही मला तो आला की छान वाटतं
पण आज काल मी त्याच्या सोबत मनसोक्त बागडू शकत नाही 
पाहिजे ते करू शकत नाही 
आज काल माहित नाही काय झालं तो आला तरी मी त्याच्या कडे लक्ष देत नाही... 
कामात busy आहे असं दाखवते, 
मनाला खूप वाटतं कि त्याच्या सोबत २ शब्द बोलावेत 
काय मी खरच इतकी व्यस्त झाली आहे ?
माझ्या लहानपणीच्या मित्राला भेटायला माझ्या जवळ वेळ नाही?
काय मी इतकी मोठी झाली कि त्याचं सोबत खेळू शकत नाही.. 
तो दर वर्षी न चुकता येतो मला भेटायला ... माझी वाट बघतो.. 
मला ही खूप जावसं वाटतं त्याला भेटायला.. 
पण लोक काय म्हणतील? ह्या प्रश्न नि शांत बसते... 
खिडकीतून त्याच्या कडे बघत राहते... 
तो हाक मारतो मला, त्याचा तो मंजुळ स्वर आज हि घुमतो माझ्या कानात 
पण मी माझं मन मारून तिथेच बसून राहते खिडकीच्या पलीकडे... 
ह्या विचाराने कि उद्या जाईल मी आणि मनसोक्त वेळ घालवेल त्याच्या सोबत... 

असं म्हणत म्हणत पावसाळा कधी स्माप्तो हे काळात हि नाही... 
आणि माझी मनातली इच्छा तशीच मनात हरवून जाते ... 
माझ्या मित्राशी माही भेट होत नाही ...
मला काही काळात नवते तेव्हाच चांगला होता... तो आला की मी धावत जायचे त्याच्या पाशी... 
आज मला सारा काही कळतं, पण काही उपयोग नाही त्यला भेट ही येत नाही... 
पण मला एकदा भेटून त्यला दाखवायचे आहे मी आज ही तीच निशी आहे... 
त्याला परत सांगायचा आहे... 
"मला तू खूप आवडतोस.. आजही मला तसंतास तुझ्या कडे बघत राहायला आवडते... तुझ्हा रीम्झ्हीम आवाज आवडतो..."
हो मला पाऊस खूप आवडतो... !!

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...