Sunday, July 15, 2012

ती लाजते जेव्हा .... १.३

नवीन आयुष्य सुरु झाले होते शिवानी च्या आयुष्यात... 
नवीन नौकरी नवीन जोश, नवीन अपेक्षा नवीन आकांक्षा, आभाळाकडे झेप घेण्याची इच्छा... 
शिवणीचा जीव तोडून प्रयत्न चालला होता कि तिने सगळा सगळा शिकून छान काम करायला सुरुवात करावी!!
सुरवातीला तिला ट्रेनिंग देण्यात आली,
आधी तांत्रिक गोष्टीन बद्दल ट्रेनिंग झाले मग ग्राहकांना हाताळण्याची होती -  कॅल कसे घ्याचे कसा बोलायचा, ग्राहकांशी कसं बोलायचा, त्यांच्या समस्यांचे निवारण कसे करायचे.
काही हि झालं तरी नम्रपणे बोलायचा हा मंत्र लक्षात ठेवायचा होता.
दिवस पट पट जात होते थोड्याच दिवसात तिला कॅल घेणा चालू करयचा होता ... त्यांचे वेळापत्रक आले, शिवानी खुश होती कारण तिला रात्र पाळी नवती करावी लागणार, तिला दिवसाची वेळ मिळाली होती... 
६ महिने तरी आता तिला काही काळजी नव्हती, ती खुश होती, आपला काम ती मन लावून करत होती, २ मानिण्यात तिने चांगला जम बसवला आपला सगळ्यांच्या मनात 
ग्राहक संतुष्ट होते, तिला सगळ्यांचे कौतुकास्पद पत्र येत होते, तिचे वरिष्ट तिच्या कामा ने प्रसन्ना होते, ६ महिन्याचा काळ असा निघून गेला, आता तिला रात्रपाळीत काम करावे लागणार होते,
कधी असे काम केले नव्हते त्या मुले तिला भीती वाटत होती.. ती ह्या ६ महिन्यात कामात इतकी मग्न होती कि आपण ही नौकरी तात्पुरती घेतली आहे, आपल्याला दुसरी नौकरी शोधायची आहे ह्याचा तिला जणू विसरच पडला होता, ६ महिने संपले आणि आता तिला रात्री काम करावे लागणार होते... ह्या विचारानेच तिचा मन सुन्न पडायचा, अजून ६ महिने आणि तिचा बोंड संपणार होता... ती स्वताला सांगत होती... जसे हे ६ महिने निघून गेले तसेच हे ही निघून जातील.. उलट चांगलाच होईल... माल अदिवास भर वेळ मिळेल नौकरी शोधायला, हा विचार मनात येताच ती खुश झाली... 
बस १ आठवडा होता, त्या नंतर तिची शिफ्ट बदलणार होती... आता पर्यंत चे बनवलेले मित्र मैत्रीण पण राहणार नाहव्ते, सगळाच बदलणार होता, पण ती सगळ्याला सामोरे जायला तयार होती... 
झालं... तो दिवस येवून पोचला...

आज शिवानी चा रात्र पालीचा पहिला दिवस...      
कॅब्वाला दरवाज्यावर येवून पोचला होता... त्यने तिला फोने लावला, आपल्या बी मस्त पांघरून घेवून स्वप्नाच्या कुशीत झोपलेल्या, फोने वाजतोय हे ही कळण्याच्या पलीकडे गेलेल्या, 
कॅब चा चालक बिचारा कंटाळला, किती फोन करायचे एकाध्याने शेवटी कंटाळून तो फोन ठेवणार तोच शिवानी ने फोने उचलला ... 
डोळे चाच्पालातच ती हेल्लो म्हणाली.. 
मी खाली थांबलो आहे madam लवकर या... 
शिवानी ला लागला जोरदार झटका.. ती आपला घड्याळ हातात घेवून बघू लागली.. स्वताशीच पुटपुटत म्हणाली... 
"गजर कसं काय नाही झालं ... मी तर लावला होता... अगं बाई मी सकाळ चा गजर लावला वाटतं, शी सवय नाही न... " ती अवरु लागली पटपट... 
धावपळ करत बाग भरली.. कंगवा केसांवरून फिरवत, मोबाईल हातात हेत ती सांडल पायाला अडकवत पळत सुटली... 
खाली तिला एक कार दिसली, घाई घाईत ती त्यात जावून बसली... 
आधी पासून त्यात २ मुला आणि १ मुलगी होती तिच्या साठीच थांबले होते सगळे... ती मुलगी तिच्या कडे विचित्र नजरेने बघू लागली... 
आज पहिला दिवस आहे का तुझ्हा... 
"नाही... अं.. हो... रात्रपाळी चा पहिला दिवस आहे.. " 
"हं, वाटलंच मला " आणि ती स्वतः शी हसली.
"का कशावरून... "  शिवानी ला काही कळला नाही
"काही नाही ग... होते ते.. सगळ्यांच्याच बाबतीत होत, मला ही असाच झाल होतं... होईल तुला ही सवय "
"मला काही कळलं नाही "... 
"अगं तू एकाच कानातला घातलस आणि ते धावत पळत आलीस न म्हणून कळलं मला.. अंदाज घेतला मी ... "
"ओ तास होय...  " आणि शिवानी हसू लागली... तिची झोप उडाली.. "मी शिवानी" 
"अरे हो... मी कुसुम "ती गोड हसत म्हणाली 
"आणि ह्या पुढे लक्षात ठेव गाडीत बसण्य अगोदर चालक कोण आहे तो कंपनी चा माणूस आहे न ह्याची खार्ती करून मगच गाडीत बसत जा... "
शिवानी ला तिची चूक कळली ती काही ही चौकशी न करता त्या गाडीत बसली होती.. मान हलवत ती कुसुम ला आश्वासन देले कि ह्या पुढे ती ह्याची काळजी घेईल... 
कधी कार्यालय आला ते गप्पा मध्ये कळलेच नाही...