Friday, April 26, 2019

TLJ भाग ५

ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ५


रुपाली ध्रुव ला घेऊन खेळवत बसली होती. ती त्याला खेळवत होती पण मनात वेगळेच विचारांचे वादळ चालू होते. आपल्या आयुष्यात खुश तर होती पण मनात शंका हि होत्या, तिने जे आपल्या राजकुमाराचे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होईल कि नाही? कोण आहे कि नाही? असला तर तिच्या समोर कधी येईल? आता तिने हि सत्य मान्य केलेले कि तिचा राजकुमार काही घोड्यावर स्वार होऊन नाही येणार. मनात विचित्र विचार यायचे, देवानी आपल्या साठी कोणी बनवलाच नसेल तर?

उस रब ने जब दिल दिये दिल के दो तुकडे किये, दोनो पे ऐक नाम लिखा ऐक राधा ऐक श्याम लिखा, अब ये दिल धडकते है, मिळते और बिछाडते है... ऐक दुजे के वास्ते....

शिवानी तेथे येते आणि रुपाली ला अश्या चलबिचल अवस्थेतेत बघून तिला सर्व लक्षात येते, जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हाथ फिरवते, शिवानी ला तिथे बघून रुपाली चा भावनांचा बांध फुटतो, आपल्या भावना आवरत ती ध्रुव ला जवळ घेऊन त्याला काही समजावण्याचा आव आणते. शिवानी तिला काहीच बोलत नाही, तिला काय बोलावे काय सांगावे शिवानीला हि समजत नाही, अश्या परिस्थिती मध्ये तिला अयुष बद्दल काही बोलावे कि नाही हे हि तिला समजत नव्हते, सध्या रंजीत ला निर्णय घेऊ द्यावा आणि मग आपण रुपाली शी काही बोलणे उचित राहील असे मनाशी ठरवून ती शांत राहण्याचा निर्णय घेते.
ती रुपाली च्या आणि ध्रुव च्या हसण्यात खेळण्यात सामील होते, शिवानी ला ते लपायला सांगतात आणि ध्रुव तिला शोधतो, जेव्हा ध्रुव ची लपायची वेळ येते तो आपल्या मावशीच्या मागे लपतो. रुपाली जाईल तिथे तिच्या मागे मागे जातो आणि शिवानी ला हैराण करतो, शिवानी ला तो सापडतच नाही शेवटी तिला हार मानवी लागते.

खेळ खेळता खेळता कधी संध्याकाळ होते त्यांना कळत नाही, रंजीत ला आलेले बघून ध्रुव धावत त्याच्या जवळ जातो आणि दिवसा भाराचा रिपोर्ट देतो त्याने काय काय मस्ती केली आणि आई ला कसे हरवले सर्व सांगतो.. रंजीत मन लावून त्याचे बोलणे ऐकत असतो..
"ध्रुव, बाबांना फ्रेश तर होऊ दे, आत्ताच आले ना ते?" रुपाली त्याला आठवण करून देत सांगते...
"असू देत गं त्याच्यामुळे तर मला मी तुमच्यासोबतचे क्षण मिस केले तरी परत जगल्यासारखे वाटते!!"
गप्पा गोष्टी करता सगळ्यांचे जेवण संपते...

शिवानी ध्रुव ला झोपवते आणि शतपावली करत असलेल्या रंजीत जवळ जाते, ती हि त्याच्या सोबत फिरते, व्हरांड्यात छान वारं वाहत असत पूर्णिमेचं चांदणं छतावर डोकावत असते, चंद्राचा लाख प्रकाश वाड्याला भरभरून टाकतो... काही वेळ रंजीत सोबत शांत चालल्यावर शिवानी त्याला विचारते, "काय ठरवलेस मग?"
आपल्या विचारांतून बाहेर येत रंजीत विचारतो, "कशाचे?"
"अयुष चे अजून कशाचे?"
"हम्म ते ना.. मला असे वाटतंय कि भेटायला काही हरकत नाही, तसे हि ते काका बोलण्यावरून तर खूप सज्जन वाटले.. " त्याचे वाक्य ऐकल्यावर शिवानी ला खूप आनंद होतो.
"मग मी रुपाली शी बोलू?"
"म्हणजे तू अजून रुपाली शी बोलली नाहीस?" रंजीत ला आश्चर्य वाटते...
"तेच अपेक्षित आहे ना.. आधी तुझा निर्णय काय ते कळल्यावर मी तिच्याशी विचार विनिमय करणार ना?"
बरोबर आहे असे रंजीत मन हलवून सांगतो... "बरं मग तिचं हि काय विचार आहे ते बघुयात, तिला ठीक वाटले तर मग उद्या मी सांगतो फोन करून त्या काकांना परत"
शिवानी त्याच्या मताला होकार देत तिथून निघायला जाते तो रंजीत तिचा हाथ धरून थांबवतो, "थँक यू"
आश्चर्य वाटून शिवानी म्हणते, "कशासाठी?"
तिला जवळ ओढत रंजीत पुढे म्हणतो, "माझ्या आयुष्यात आल्याबद्दल... मला योग्य दिशा दाखवण्याबद्दल ... मला समजून घेण्याबद्दल.. आमची सगळ्यांची इतकी काळजी घेण्याबद्दल... अजून किती करणं सांगू? "
शिवानीला भरून येते, "वेडा आहेस का? त्यासाठी थँक यू काय?? मी तर फक्त आपले कर्तव्य करतीय तू पण ना.. " ती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागते रंजीत आणखीनच घट्ट करतो, "रंजीत जाऊ देत ना.. रुपाली शी बोलायचं ना.."
"आधी मला नीट थँक यू तर म्हणू दे... " रंजीत तिच्या आणखीन जवळ जात म्हणतो...
"ध्रुव उठेल.. बघेल... रंजीत अरे सोड ना... " काही यश येत नसतानाही ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत राहते...
"ध्रुव ना खोलीत झोपलाय... तो इथे नाही येणार..." रंजीत तिच्या कानात सांगतो, ज्याने तिला गुदगुल्या होतात आणि ती नको नको करत हसत राहते... "रंजीत...तत.. नको ना..." रंजीत ला चांगल्या प्रकारे माहित असतात तिचे वीक पँट्स "आपण व्हरांड्यात आहोत... तुला काही भान आहे कि नाही..."
"असं का... अरेच्या हो कि ... चल मग... "
"कुठे.." शिवानी त्याला प्रश्न विचारत राहते, तो पर्यंत तर रंजीत ने तिला उचलून घेतले असते, तिला घेऊन तो आपल्या खोलीत जातो... "रंजीत मला रुपाली शी बोलायचं आहे... जाऊ देत ना.. मी लवकर येते..."
रंजीत तिचे काही ऐकत नाही... "रुपाली झोपली आहे आता उद्या बोल तिच्याशी..." असे म्हणत तो तिला गादी वर झोपवतो आणि तिला सोडून उठताना तिच्या मानेवर फुंकर मारून अलगद चुंबन घेतो. .. त्याच्या त्या स्पर्शाने शिवानी बेभान होते आणि त्याला आपल्या कडे ओढून घट्ट मिठीत घेते...

सकाळी लवकरच आवरून शिवानी तयार होते, ती स्वयंपाक घरात नाष्ट्याची तयारी करत असते, तितक्यात रुपाली हि आवरून तिला मदत करायला येते, "काय बनवतेस वाहिनी... ?"
तिचा फ्रेशआवाज बघून शिवानी ला हायसं वाटते मनातल्या मनात ती तिच्याशी बोलायचं निश्चय करते "स्वारी आज खुश दिसतीय... झोप छान झाली वाटते.. "
"वाहिनी... आपण खुश असलो कि जग खुश वाटते... " रुपाली पाण्याचा ग्लास घेऊन पाणी घेत म्हणाली
ती काय बोलतीय न कळून शिवानी तिला काय हाताने खुणावून विचारते... "मला माहित आहे काल संध्याकाळी काय चाललेलं... दादा... आणि तुझं ...."
शिवानी लाजून काय बोलावे काय करावे काही न समजून फक्त खाली बघत राहते ... तिचे गाल लाजून लाल झालेले, आपल्या हातातल्या ग्लास मधले पाणी संपवत रुपाली शिवानी ची मज्जा घेत होती... "वाहिनी.. अजून हि नव्या नावरीसारखेच लाजतेस दादा वरून चिडवलं कि..."
शिवानी गालातल्या गालात हसते, "पण मला ऐक सांग... तू झोपलेलीस ना... "
"हम्म.. जागा साठी... पण झोपच नव्हती येत... म्हणून व्हरांड्यात येऊन बसलेली... मग तुमची चेष्टा मस्करी बघत बसले... मला भेटेल ना गं वाहिनी असं जीव लावणारा कोणी राजकुमार?"
"हो गं राणी... बघ आपण शोध सुरु केलाय ना... " शिवानी तिला समजावत म्हणते "...आणि मला तुला ऐक गम्मत दाखवायची आहे... जरा लॅपटॉप घेऊन येतेस?" रुपाली जाऊन लॅपटॉप घेऊन येते, "तू मला तो पर्यंत कांदा चिरून दे..." शिवानी लॅपटॉप घेऊन टेबलं वर बसते, ती रंजीत ने दाखवलेली साईट उघडते, पण तिला अयुष चा आयडी आठवत नव्हता, रंजीत ला उठल्यावर विचारावे लागेल असा विचार करताच असते कि साईट लोड होते आणि तिला तिच्या मागील बघितलेलले प्रोफाइल तिथे दिसतात, ती खुश होते... ती अयुष चा फोटो रुपाली ला दाखवते, "रुप्स, हा फोटो बघ कसा आहे मुलगा?"
ती अयुष चा फोटो बघत रुपाली ला विचारते, बघते तर काय रुपाली च्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहत असतात... शिवानी घाबरून जाते..."अगं रडायला काय झालं? असं काय करते... नाही आवडला का तुला मुलगा.. ठीक आहे आपण दुसरा बघू... तू रडू नकोस ना.."
"अगं हो हो वाहिनी... ऐक मिनिट थांबशील का...? मला काहीच दिसत नाही आहे आणि मी रडत नाही आहे, कांदा चिरत असल्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी येतेय... ठीक आहे? ओक???" रुपाली हातवारे करत तिला शांत राहायला सांगते... आपले डोळे ड्रेस च्या बाही नि पुसत ती लॅपटॉप कडे बघते.. पाण्यानी डोळे डबडबल्यामुळे सुरवातीला तिला पुसटशी आकृती दिसते आणि हळू हळू अयुष चा फोटो नीट दिसू लागतो... त्याचा फोटो बघून ती त्याच्या घाऱ्या डोळ्यात जणू डुबून जाते, ती क्षणभर सारं विसरून जाते...
अधीर होऊन शिवानी तिला विचारते, "कसा वाटला??"
रुपाली ला काय बोलावे काही कळत नाही, "कोणी तरी इतकं तल्लीन होऊन फोटो बघत आहे... आम्ही होकार समजावा का??"
शिवानी चे चिडवणे लक्षात येताच रुपाली, "वाहिनी... " म्हणत तिच्या गळ्यात पडते, "मला न... असं वाटलंच नाही कि मी फोटो बघतीय... आता बोलेल माझ्याशी असं वाटलं.... इतके बोलके डोळे आहेत त्याचे.. म्हणजे... त्यांचे..."
"हो ना... तू कस संभाळशील गं स्वतःला तो पुढे आल्यावर?" शिवानी तिला चिडवत म्हणाली...
"म्हणजे...?? " रुपाली काही समजले नाही असे दाखवत म्हणते...
"म्हणजे .. म्हणजे वाघाचे पंजे..." शिवानी तिला चिडवत उठते.. आणि रंजीत ला तिचा होकार कळवायला निघते तितक्यात तिला आठवते अरे आपण मुद्याची गोष्ट तर सांगितलीच नाही, ती वळते आणि बघते रुपाली अजून हि स्वतः मध्ये लीन असते... ती जवळ जाऊन तिला म्हणते, "ते रुपाली... ऐक महत्वाचे सांगायचे राहून गेले..." शिवानी विचार करतच असते सांगावा कि नाही..??? त्यात रुपाली म्हणते, "काय झाले ?" परिस्थिती सांभाळत शिवानी म्हणते, "ते मुलगा ना मुंबई चा आहे... "
"मुंबई??" रुपाली थोडं घाबरते...
"आणि... "
"आणि काय??" रुपाली गंभीर होत म्हणाली...
"... आणि तो ना.. "
"लवकर बोल ना वाहिनी... अशी काय?" अधीर होत रुपाली म्हणाली...
"तो ना... सर्जन आहे... डोक्याचा... मेंदूचा .... कळले का... म्हणजे तशी हि चांगली गोष्ट आहे, तुझा बावळटपणा, वेडेपणा तो ठीक करेल.." आणि ती तिथून पळाली...
"वाहिनी... काय हे... " रुपाली पाय आपटत म्हणाली ...

शिवानी रंजीत च्या खोलीत जाते, "अजून हि झोपले आहेत साहेब ... " ती स्वतःशी पुट्पुटते ती त्याच्या जवळ जाऊन त्याला त्रास द्याच्या हेतूने त्याच्या कानात फुंकर मारते, रंजीत झोपेतच आळे पीळे घेऊन वळून झोपतो...
"रंजीत ऐक ना... " शिवानी त्याच्या कानात बोलते...
"उम्म काय? काय झाले?" तो झोपेतच महतो.... "झोपू दे ना थोड्या वेळ.. रात्रभर झोपू नाही दिलंस..."
"उठ ना... मला तुला ऐक गुड न्युज द्याची... " गुड न्युज ऐकताच रंजीत आनंदाने उठतो...
"खरंच...??? मला लगेच उठवायचं ना...?? या वेळेस मला परी पाहिजे हा... " रंजीत आपला आपल्याशीच बडबड करत असतो आणि शिवानी त्याला वेड लागले असे त्याच्याकडे बघत बसली असते...
रंजीत शांत झाल्यावर शिवानी त्याला म्हणते, "झाले? बोलू का पुढे??"
"नाही थांब... आधी माझा ऐक प्रश्न आहे... इतक्या लवकर कसे काय कळले तुला...काल तर आपण... कन्फर्म आहे?? "
"हो मग रुपाली शी बोलून तिची संमती घ्यायला किती वेळ लागणार आहे मला?" शिवानी चा पूर्ण गोंधळ उडालेला...
"अच्छा,अच्छा ती गुड न्युज, मला वाटले... "
शिवानी त्याच्या कडे आश्चर्याने बघताच राहते, "काय, तुला काय वाटले.."
"नाही मी हि तोच विचार करत होतो... काल तर झाले... इतक्यात गुड न्युज कशी..."
त्याचे बोलणे ऐकून शिवानी आ वासून बघताच राहते... "रंजीत तू ना..." ती त्याला मारत सुटते... तिच्या त्या नाजूक हातांचा मार आवडीने खात असतो रंजीत, मग तिचे दोन्ही हाथ धरून तिला शांत करतो, "तू खरंच खूप मोठी न्युज दिलीस... आता फोन लावतो त्या देसाई काकांना" रंजीत फोन घेत म्हणतो..
"आधी तयार तर हो... अंघोळ वगैरे कर..."
"का? मी काही विडिओ कॉल नाही करत आहे त्यांना कळायला कि मी अजून अंथरुणातच बसलोय... " रंजीत शिवानी वर हसत फोन लावतो...
"हॅलो"
"हॅलो देसाई काका मी रंजीत बोलतोय, ओळखलंत का..."
"हो हो बोला, कसं काय फोन केलात...."
"ते आम्ही पुनःविचार केला, आम्हाला अयुष आवडला आहे आणि आम्ही पुढे बोलणी करायला उत्सुक आहोत"
......
...
..
.
रंजीत त्यांच्या बोलून झाल्यावर शिवानी ला बोलावतो आणि सांगतो कि सगळे पुढच्या आठवड्यात येणार आहे.शिवानी ला फार आनंद होतो आणि तिला आठवते ती रंजीत ला गंभीर होत म्हणते, "फक्त ऐक सांगायचं होत..."
"काय झालं?" तिच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी बघून तो विचारतो
"मी रुपाली ला अजून नाही सांगितलं कि अयुष च हि हे दुसरं लग्न आहे...आणि तो विधुर आहे..."
"का??तेच तर महत्वाचे आहे ना..." रंजीत आश्चर्याचा धक्का बसून म्हणतो...
"हो... माहित आहे मला... पण जर बोलणी पुढे गेली तर आपण सांगू ना तिला.. मला नाही तिच्या स्वप्नांना आत्ताच चिरडून टाकावेसे वाटले... ती इतकी मग्न झालेलले अयुष चा फोटो बघून, तिच्या चेहऱ्यावर मी वेगळाच तेज पहिला, सांगूया निवांत सगळं जुळून आल्यावर तोवर जगू देत तिला तिच्या स्वप्नाच्या जगात...."
"ते सर्व ठीक आहे.. पण... सर्व कळल्यावर ती नाही म्हणाली तर?? आपण काय तोंडानी त्यांना नकार कालवायचा...??" रंजीत पुढचा विचार करत पुढे येणाऱ्या संकटाबद्दल शिवानी ला बजावत म्हणाला...
"पुढची पुढे बघू... पुढच्या भीती मुळे आत्ताच्या आनंदाला विरझण नको..." शिवानी असे म्हणत निघून गेली....
"अगं तू क्षणभंगुर आनंदात अडकतीयेस शिवानी..." रंजीत चे ऐकायला शिवानी नव्हतीच खोलीत...
क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा?
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...
वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २


No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...