Friday, July 12, 2019

ताऱ्यांच्या बेटावर

ताऱ्यांच्या बेटावर



"सर ओमिक्रोन वर जाणारे आपले यान तयार आहे. विश्वनाथ सर ठरल्या वेळी निघू शकतात."
"हम्म, ठीक आहे... विश्वा शी मला काही बोलायचे आहे त्याला पाठव... " असे आदेश देत विवेक परत आपल्या कामात व्यस्त झाले.

काही वेळाने विश्वनाथ तिथे पोचतो,
"आपण मला बोलावले सर?"
"विश्वा ये, मला काही बोलायचे होते महत्वाचे..." त्यांनी खुर्ची समोर करत त्याला बसायला सांगितले, विश्वा बसतो आणि त्यांच्या कडे आता निघायच्या या वेळी त्यांना काय बोलायचे आहे अश्या प्रश्नार्थी नजरेने त्यांच्या कडे बघू लागतो. ते खूप विचार करून पुढे बोलतात, "विश्वा मी कधीच तुला आपल्याहून परके नाही समजलो उलट तुला माझ्या मुलाप्रमाणे प्रेम केले, तुझ्या हट्टापायी मी ह्या कामगिरीवर तुला पाठवायला तयार झालो, तुला हि माहित आहे आणि मला हि बहुतेक हे एकमार्गी तिकीट असणार आहे. ओमिक्रोन वर जीवन जगण्यासाठी उपयुक्त गोष्टी आहेत कि नाही, तिथे काय आहे आपण नीट काहीच प्रमाणित करू शकलो नाही आहोत. खरं म्हणजे असे तुलाच काय कोणाला हि तिथे पाठवणे खूप धोक्याचे आहे, तुझ्या सोबत आम्ही प्राणवायू चे जास्तीचे सिलेंडर पाठवत आहोत ज्याने तुला तिथे १ आठवडा तरी घालवता येईल. पृथ्वी पासून ११ प्रकाश वर्ष लांब आहे हा तारा. तुला बाकी सर्व काही माहित आहे, तू जाण्या अगोदर चांगला अभ्यास केला अशील.. मी अशा करतो... "
"नाही सर... मला माफ करा... मी ह्या अभियानास जायला तयार झालो त्या मागचे कारण वेगळे आहे.. आई बाबा जाऊन २ वर्ष झालेत पण अजून हि त्यांच्या शिवाय रात्री झोप लागत नाही. बाकी कोणाकडे बघून जगावे असे कोणी नाही, जसे तुम्ही म्हणालात होऊ शकते हे माझ्यासाठी एकमार्गी तिकीट आहे आणि मी तिथून परत नाही येऊ शकणार... पण त्याने मला काहीच फरक नाही पडणार सर, दुसरे कोणी आपल्या परिवाराला सोडून जाईल, त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून.. माझे इथे वाट पाहणारे कोणी नाही... त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका... "
"काळजी करू नको??? अरे तू माझ्या मुलासारखा आहेस.... " विवेक हळवे होत म्हणले.
"माफ करा सर... मुलासारखा आहे ना... नका जास्ती काही अपेक्षा ठेवू...." विशवनाथ ठाम होता आपल्या बोलण्यात.
विवेक जरा नाराज झाले त्याच्या त्या बोलण्याने... मग काही वीचार कात म्हणाला, "ठीक आहे मी या अभियानाचा प्रमुख म्हणून तुला सांगतोय... हे मिशन यशस्वी व्हायला  हवे... अजून नासा ला सुद्धा माहित नाही आहे कि आपण तुला आत्ता नवीन शोधलेल्या ताऱ्यावर म्हणजे ओमिक्रोन वर पाठवतोय.. आत्ता पर्यंतच्या अंतरिक्ष अभियानातले हे खूप म्हणत्वाचे अभियान आहे पहिल्यांदा कोणी एका ताऱ्यावर जाणार आहे... "
विश्वा आपली मान होकारार्थी हलवतो आणि म्हणतो, "मला अभिमान आहे सर या गोष्टीचा, मी तुम्हाला निराश नाही करणार... मी परत येईल ते खुशखबर घेऊन...!! "
"आपल्या नावा प्रमाणेच... या विश्वालाच काय तर या ओमिक्रोन वर विजय मिळवून काम फत्ते करून ये..."
विवेक त्याला निघण्या अगोदरचे शेवटचे गळे भेटतो. दोघांचे हि डोळे न कळत पाणावतात. विश्वा त्यांना सलामी देऊन तिथून निघून जातो, तो आपल्या यान कडे वळतो त्याचा पूर्ण तपशील करून घेतो... सर्व काही व्यवस्थित आहे कि नाही ह्याची स्वतः खात्री करून घेतो...

थोड्याच वेळात ती वेळ आली असते जेव्हा यानाला भरारी घ्यायची असते, विश्वनाथ आपले स्पेससूट घालून तयार असतो.त्याने आपली जागा घेतली असते... सर्व पहिली ताऱ्यावर घेणाऱ्या यानाची भरारी बघायला स्पेससेंटर वर तयार असतात आणि गिनती सुरु होते... १०...९...८....   ३...२...१..०.... एका झटक्या सोबत ते यान विश्वा ला घेऊन निघते... सर्वांच्या काळजात तीर सोडून.... विश्वा यानात बेफिकीर बसला असतो, पहिली वेळ होती त्याची अंतरिक्षात जायची आणि ते हि एकटा, डेरिंग लागते पण विश्वा काही कमी नव्हता, आजू बाजू ला काय दिसते म्हणून डोकावून बघू लागला तर अंधारच अंधार, पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पडलोय हे त्याच्या लक्षात आले, आता हे अंधार काय बघत राहायचे म्हणून त्याने झोप काढून घ्यावी असे ठरवले...म्हणून तो डोळे बंद करतो... आपले सारे आयुष्य त्याच्या डोळ्या पुढून सर्रर्र निघून गेले... २ वर्ष पूर्वी आई बाबा एका कार ऍक्सीडेन्ट मध्ये वारले, विश्वा तेव्हा ट्रेनिंग ला हैदराबाद ला होता, त्याला ट्रेनिंग सोडून त्यांचे अंतिम दर्शन हि घेता आले नव्हते. तेव्हा पासून रोज स्वप्नात आई बाबांना बघायचा, तो जणू या कामगिरीवर त्यांनाच शोधायला निघाला होता, ओमिक्रोन कसे असेल काय असेल, जगू शकू कि नाही, वापस जात येईल कि नाही ह्या सर्व प्रश्नाचे त्याला जणू काही फिकीरच नव्हती. एक थ्रिल अनुभवायला म्हणून तो तयार झालेला, त्याचे वय हि जास्ती नव्हते २५ वर्ष होते त्यामुळे अल्लडपणा काही अजून पूर्ण गेला नव्हता. काही करून दाखवण्याची इच्छा मात्र होती.
"विश्वा... स्टेटस काय आहे... कॉपी विश्वा.. तू ऐकू शकतोस का आम्हाला... स्टेटस काय आहे..." सेंटर वरून आलेल्या आवाजाने त्याची तंद्री तुटते... "Y389 कॉपी सर... सर्व काही ठीक चालले आहे... यान निर्धारित गतीने व्यवस्थित चालले आहे..."
विश्वा जरा पाय मोकळे करावे म्हणून आपल्या जागे वरून उठतो, गुरुत्वाकर्षण नसल्या मुळे तो यानात उडूच लागतो...
अश्या बऱ्याच काही क्षणानंतर त्याचे यान ओमिक्रोन वर येऊन पोचते. विश्वा ची छाती गर्वाने भरून जाते, जसा तो यानातून बाहेर पडू लागतो  त्याच्या कानात लोकांचे ओरडणे गुंजू लागते... "विश्वा विश्वा... !!! विश्वा...!!!" एका ताऱ्यावर जाणारा तो पहिला मानव होणार होता. मेल्यावर लोक तारा होतात असे त्याने ऐकले होते... आज तो एका तार्याची सैर करणार होता. तो क्षण आपल्या आठवणीत रुजू करत त्याने पहिले पाऊल ठेवले, त्याला आश्चर्य वाटले, पृथ्वी सारखेच आपले वजन जाणवू लागले, "चला फेरफटका तर मारता येईल" असा विचार करत त्याने दुसरे पाऊल ठेवले... पहिली नजर चौफेर ठेवतो आणि त्याला एक मिनिटाला शंका येऊन जाते... नक्की आपण ओमिक्रोन वर आलोय कि वापस पृथ्वीवर आलोय? सगळी कडे पहाड, अवकाश , हिरवळ असते, पण माती मात्र वेगळी असते काळी चमकणारी... आजू बाजू चे मातीचे खडकाचे नमुने तो गोळा करतो. पृथ्वीवर नेवून त्याला संशोधन करण्यात मदत होईल असा विचार असतो, तोंडावर मास्क आणि पाठीवर प्राणवायू चे सिलेंडर असल्या मुळे जरा कठीण जाते वाकणे. फेर फटका मारत मारत तो आपल्या यानापासून बराच लांब निघून येतो... त्याला तिथे एक तळे सारखी लँडस्केप दिसते, कोणते द्रव्य आहे ते तपासायला तो तिथले द्रव्य आणलेल्या बॉटल मध्ये भरत असतो, तो वाकून बॉटल भारत असतो तितक्यात त्याला त्या द्रव्यात काही हलताना दिसल्याचा भास होतो, तो सावध होतो, इथे काही हि असू शकते ह्याची जाणीव त्याला होते, जलपरी दिसल्या सारखे वाटते, उत्सुक होऊन तो मागे मागे जाऊ लागतो, थोड्या वेळाने तिचे हि लक्ष त्याच्या कडे जाते... ती त्या द्रव्यातच एक उंच उडी मारून त्याला दर्शन देते... तिला बघून जणू विश्वा चा श्वासच थांबतो... लांबसडक सोनेरी केस, सोनेरी अंग त्या क्षणात त्याला तिला आपल्या ताब्यात घेण्याचा मोह होतो, तो तिच्या मागे पळत जातो, बरेच प्रयत्न करून तो तिला पकडून बाहेर काढतो... तिला तिथे बांधून ठेवून तो मनात विचार करतो इथे अजून हि अश्या जलपर्या असतील... तो अजून शोधू लागतो... ह्या धावपळीत त्याला वेळेचे भान राहत नाही, त्याच्या सिलेंडर मधील प्राणवायू संपत होता, त्याच्या हाताला बांधलेले प्राणवायू सिलेंडर चे घड्याळ वाजू लागते ते बघून त्याच्या लक्षात येते कि सिलेंडर लवकरच संपणार आहे आणि त्याला ते बदलावे लागेल, आपल्या यानापासून तो बराच लांब आला असतो त्या मुळे तो पटकन  परत निघू लागतो... तो अर्ध्या रस्त्यात पोचला असतो तेव्हा त्याचे सिलेंडर संपते, प्राणवायू चा सोत्र संपल्यामुळे त्याला त्रास होऊ लागतो हळू हळू चालणे कठीण होऊ लागते, त्याचे शरीर त्याची साथ सोडू लागते, तिथेच पडतो, न राहून शेवटी तो आपले तोंडावरचे मास्क काढतो आणि मोठ मोठ्याने खोकलू लागतो, त्याच्या आश्चर्याने तो अजून हि जिवंत असतो... त्याच्या आनंदाचा पारा राहत नाही... तो लगेच ते सर्व जड सिलेंडर, मास्क, बूट, कपडे सर्व काढून टाकतो... हवेत मोकळा श्वास घेतो... "व्वा, म्हणजे इथल्या वातावरणात सुद्धा प्राणवायू असला पाहिजे... " तो स्वतःशी पुटपुटतो, म्हणजे इथे मनुष्य जगू शकतो... हम्म पण खाण्या पिण्याचे काय... त्याला ती जलपरी आठवते... मासे हि असतील.. जलपरी आहे म्हणजे...??? स्वतःशी विचार करत तो परत त्या तळ्यापाशी जायला निघतो. तिथे पोचल्यावर तो त्या ठिकाणी बघायला जातो जिथे त्याने जलपरी ला बांधून ठेवले होते तिथे जाऊन बघतो तर जलपरी नसते... त्याला आश्चर्याचा धक्का बसतो.. तिथे एक तरुणी असते... आपल्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसत नाही, तो डोळे मोठे करून तिला बघत असतो, तेच सोनेरी केस आणि तेच टपोरे मत्स्य सारखे डोळे, तिचे तो चमकणारे अंग, ती त्याला काही म्हणू लागते... खुणावत असते पण त्याला काही तिची भाषा कळत नाही. तो मग तिला आपल्या जवळचा एक अनुवाद करणारे यंत्र कानात लावून देतो आणि तसेच यंत्र स्वतः हि लावतो... काही वेळ ते दोन्ही यंत्र स्वतःला प्रोग्रॅम करतात आणि मग त्याच्या हातावरच्या घड्याळीवर एक लाईट जाळतो ज्याने त्याला कळते कि यंत्राचे एकमेकांशी प्रोग्रॅम यशस्वी झाले... आता तो जे काही बोलेल ते तिच्या कानाला लावलेले यंत्र तिच्या भाषेत अनुवाद करून तिला ऐकवेल... आणि ती जे बोलेल ते विश्वाच्या कानातले यंत्र त्याच्या भाषेत अनुवाद करून देईल... विश्वा तिला विचारतो, "तुझे नाव काय?"
"तुहिरा!!" ती कळवळत सांगते
"तू इथे कशी आलीस...?? तू इथेच राहतेस का?"
"आधी मला सोडव मग मी सर्व प्रश्नाचे उत्तर देईल..." तिचे ते बोलणे ऐकून विश्वा स्वतःला सावध करतो, जी जलपरीतून स्वतःला मुलीत रूपांतर करू शकली ती अजून खूप काही करू शकेल मला स्वतःलाच सावध राहावे लागेल. स्वतःशी असा विचार करून तो तिला म्हणतो, "तू माझ्या कैदीत आहेस त्यांमुळे मी सांगेल तसे होईल... आधी तू इथे काय करतेस ते सांग... "
"मी... मी त्या तळ्यात अडकले होते... मी इथे खूप लांबून आले आहे, मी वेगळ्या ग्रहावर राहते... माझ्या ग्रहाचे नाव ह्यूगो आहे... "
"ह्युगो.. .??? कुठे येते हे... "
"हे बघ... मी तुला काहीच हानी नाही पोहचवणार ... मला खूप यातना होत आहे, तू मला सोडल असते तर मी तुला इथल्या अजून काही गोष्टी दाखवीन ज्या तू कल्पना हि नाही करू शकत... "
विश्वा ला वाटते हिने आपल्या आधी इथे बरंच काही बघून ठेवले आहे हिची आपल्याला मदत होईल, त्यामुळे तो तिला सोडतो... "तू त्या द्रव्यात जलपरी कशी झालेलीस?"
"मी नाही झाली... ते जादुई द्रव्य आहे... इथे तुला ज्या वेळी ज्या गोष्टी ची गरज असते ते तुला आपोआप मिळते... तसे मला त्या द्रव्यात पोहता येत नव्हते म्हणून मी मासा झालेले, म्हणजे मी ते द्रव्य तपासले आहे ते H2o आहे... आपण तो प्यायला वापरू शकतो, खूप सौम्य आहे..."
"H2O... काय?? ते पाणी आहे..." विश्वा आनंदाने उद्गारला... "म्हणजे खरेच इथे मानवी जीवन ..."
त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधीच ती त्याला म्हणते... "चल मी तुला इथली सर्व श्रुष्टि दाखवते..."
ते दोघे निघतात... विश्वा ला आपण पृथ्वीवरच फिरत आहोत असा भास होत असतो, मोठे मोठे डोंगर.. सर्वत्र हिरवळ, नजर जाईल तिथवर मोकळे आकाश आणि जमिनीला हिरवा शालू नेसवलेला ...  समोर एक मोठे पहाड असते.. "तिकडे.. त्या पहाडावर काय आहे? गेलीस का कधी इतक्या लांब?" विश्वा तुहिरा ला उत्सुकतेने विचारतो..
"जायचे तुला?" ती भुवया उंचावत विचारते... विश्वा मान हलवत हो म्हणतो...
तुहिरा आपले हाथ पसरवते आणि त्याला म्हणते "धावत ये तिथून आणि उडी मर ..."
"काय? इतक्या उंचावरून उडी मारू... ?? वेड लागलंय कि काय?"
"बघ तुला काय ठीक वाटते... " असे म्हणतात ती आपले हाथ पसरवते आणि धावत पहाडाच्या चोटीवरून उडी मारते... विश्वा धावत जाऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण उशीर झाला असतो तिने उडी मारली असते... ती परत वर गिरक्या घेत झेप घेते ... विश्वा चा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही... तुहिरा एका पक्षी सारखी उडत असते... तिला पंख आले असतात... तो ओरडून तिला विचारतो... "तू पंख कुठून आणलेस..."
"माझ्यावर विश्वास ठेव... उडी मार...." तुहिरा आनंदाने सांगते
विश्वा धावत येऊन हाथ पसरवून उडी मारतो... तसे त्याचे हाथ पंखात बदलतात... "उह्ह हू ..... व्वा व...." तो जोऱ्यात किंचाळतो... "तुहिरा मला खूप मज्जा वाटतीय!!!"
ते दोघे उडत उडत त्या समोरच्या पहाडावर पोचतात... "म्हणजे... इथे काय आहे??" आपण आत्ताच अनुभवलेल्या जादूचे संशोधन करू इच्छित विश्वा म्हणाला म्हणजे जसे मी कल्पवृक्ष बद्दल ऐकले होते, तसे इथे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात...
तुहिरा त्याला म्हणाली, "सर्व इच्छा... पण साफ मानाने मागितलेल्या ..."
मग काही संकोच करत विश्वा म्हणाला, "मग तू त्या तळ्यात का अडकून होतीस? बाहेर येण्याची इच्छा नव्हती झाली तुला??"
"झाली होती ना... म्हणून तर तू आलास इथे ...." तुहिरा चे बोलणे ऐकून विश्वाचे डोळे चमकतात... तिच्या बोलण्यात तथ्य हि असेल... तो स्वतःशी विचार करू लागला..
पाण्याचा एक मोठा झरा हि असतो तिथे...त्याचा खळखळ पाणी पडतानाचा आवाज ऐकून तो दोघे त्या दिशेनी जातात, समोर बघतात तर मोठा पांढरा शुभ्र पाण्याचा झरा होता आणि झऱ्याच्या खाली मोठे तलाव.... विश्वा त्यात जाऊन मनसोक्त डुबकी मारतो, त्याच्या पाठोपाठ तुहिरा हि पाण्यांत उडी मारते मत्स्य सारखे जलतरंग क्रीडा करून येतात... दोघे पकडा पकडी खेळतात...

"मत्स्य सारखे पोहून झाले, पक्ष्यासारखे उडून झाले... मला ना ह्या वाऱ्या सोबत धावायची इच्छा आहे... घोड्या सारखी? पूर्ण होईल?" विश्वा तिच्या कडे बघत म्हणाला...
"धावून बघ... " ती खांदे वर करत होऊ हि शकते असे भाव देत त्याला म्हणाली.
"पण हे सर्व कसे शक्य आहे.. इथे काय रहस्य आहे... कोणती शक्ती आहे.."
"वैज्ञानिक साहेब... कधी कधी मनसोक्त काही अनुभव हि घ्याचे असतात ...." तुहिरा त्याला निहारात म्हणते...
विश्वा हळू हळू धावायला सुरु करतो आणि जसा जसा तो वेग घेऊ लागतो त्याला कळते कि त्याचे पाय घोड्या सारखे वाऱ्याच्या वेगाने धाव घेतायेत... तो परत जुन्या तळ्या  पाशी येतो... तिथली माती हातात घेतो त्यात काही तुकडे चमकत असतात.. तितक्यात तुहिरा तिथे उडत येते, त्याला माती निरखून बघताना पाहून विचारते "काय झाले..."
"हे चमकणारे कोणते पदार्थ आहे?" विश्वा चे संशोधक मेंदू सारखे त्याला प्रश्न विचारात असते
"तें कार्बन आहे..."
"कार्बन... म्हणजे हे हिरा आहे ??? " विश्वा आपल्या हातातली माती झटकत त्या हिर्या कडे बघत म्हणाला... इथल्या मातीत हिरे आहेत ... मी इथून ५-६ जरी घरी परत घेऊन गेलो तर पृथ्वी वरचा सर्वात श्रीमंत व्यक्ती होईल...
तुहिरा त्याच्या मनातले विचार ओळखते..."तुला अजून हि परत जायचे आहे?"
"अर्थात.. मी इथे फक्त ७ दिवसांसाठी आलो आहे... माझी लोक माझी वाट पाहत आहेत... "
"तुझी लोक? खरंच? कोणी वाट पाहत आहे तुझी?? ७ दिवस? ७ दिवस कधी ची होऊन गेलीत तुझ्या पृथ्वीवरची...."
"काय?? कसे काय...तें शक्य नाही...  रात्र तर झालीच नाही..."
"तू ओमिक्रोन वर आहेस... हा तारा आहे... ह्याला स्वतःचा प्रकाश आहे... इथे रात्र कशी होईल... " तुहिरा त्याला स्पष्टीकरण देत म्हणाली...
विश्वा ला धक्का बसतो... आपण इतके म्हणत्वाचे कसे काय विसरलो कसे झाले..हे ... "पण मला माझ्या टीम ला सांगावे लागेल... इथले हे जादुई जग त्यांना दाखवावे लागेल... "
"खरंच? म्हणजे या सुंदर विश्वाची सुद्धा तुला पृथ्वी सारखी दयनीय अवस्था बघायची आहे.. ?"
विश्वा तुहिरा कडे अविश्वासाने बघतो... आणि विचार करतो, "हिला कसे हे सर्व माहित... पृथ्वी वर तर हि कधी आली नाही.. मग दयनीय अवस्था आहे पृथ्वीची का म्हणतीय??" तो मनात विचार करतो...
"ह्युगो वर आम्ही मनातले ओळखू शकतो..." तुहिरा त्याचे चलबिचल मनस्थिती पाहून आपल्या रहस्याचा खुलासा करते...
"काय?" विश्वा चा परत विश्वास बसेना.....
"तुझे डोळे पापण्या तुझ्या मनात चाललेल्या भावनां प्रमाणे हालचाल करतात मला त्या वाचता येतात... त्या मुळे तू काही बोलला नाहीस तरी मी तुझ्या मनातले ओळखू शकते... तू जेव्हा त्या हिरव्या पहाडात इथल्या हिरवळीत व्यस्त स्वच्छंद वावरत होतास... तेव्हा तुझ्या मनात चाललेले विचार हि मला कळलेले, तुला हि असेच वाटते ना कि पृथ्वी वर जेव्हा जीवनाची सुरवात झाली असेल पृथ्वी पण इतकीच सुंदर असणार...."
विचार करत तो हे काबुल करतो कि हो त्याच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले..."पण हे मस्त आहे मनातले ओळखणे खरंच... व्वा मला शिकवशील..."
"नक्की... पण एका अटीवर... "
"अट?? कसली?" शंकेने विश्वा म्हणतो..
"तू ह्या जागा बद्दल अजून कोणालाच काही नाही सांगायचे...." तुहिरा आपली अट सांगते
"मी भले नाही सांगणार पण तुझ्या ग्रहावरचे इथे आले म्हणजे...?"
"माझ्या ग्रहावरचे लोक हे समजून शांत आहेत कि मी इथे मेली, मी ह्या पाण्यांत अडकली असल्याने त्यांना इथले काही सांगू नाही शकले..."
विश्वा स्वतःशीच हसला... आपण एका अश्या जागी आलो आहोत जिथे आपल्याला पाहिजे ते सर्व काही आहे.. तो विचारात मग्न असतो तेव्हा तुहिरा म्हणते... "हो... नक्की..."
"काय??" विश्वा गोंधळून विचारतो... कारण तो काही बोललाच नसतो...
"आपण ह्या जगाचे सौंदर्य असेच जपून ठेवुयात... इथे कोणते संशोधन नाही काही नाही होणार... " विश्वा तिच्या कडे बघत राहतो... आणि त्याच्या लक्षात येते हिला मनातले विचार कळतात ... ते लक्षात येताच तो विचार करतो "मला आता मनात विचार करताना सावध रहावे लागेल... "
तुहिरा तें कळून हस्ते.. विश्वा परत गोंधळतो... "अगं, एक सांग.. तू तें यंत्र का घेतलेस माझ्याकडून.. तुला न बोलताच कळते सर्व... "
"मला कळते पण तुला थोडीच कळते... तुला तर त्याची गरज लागली असती ना... "
"हम्म.. " विश्वा विचार करत म्हणाला... "पण हे डेंजर आहे.. म्हणजे मी मनात कोणता विचार नाही करू शकत...??"
"हम्म... करू शकतोस पण मी नाही सांगणार कसे ... मला तुझ्या मनातले सर्व काही कळायला हवे..."
"उम्म..." विश्वा नाराज झाला...
"अरे मी तुला विचार ओळखता येतात सांगितले तेव्हाच उपाय हि सांगितलं... मी डोळे वाचून मनातले ओळखते... तू डोळे बंद करून काही विचार केलास तर मग कसे ओळखता येईल मला?"
"अरे हो..." विश्वा आनंदला... "लोक एकांत शोधतात पण आपण तर एकांतातच आहोत... आपण बोर होऊन जाऊ..."
"आपण आपले छोटेसे विश्व् इथेच निर्माण केले तर?" तुहिरा आपला विचार मांडत म्हणाली जे विश्वा ला हि पटते. तो तिच्या विचारांशी आपली सहमती दर्शवतो...
विश्वा चे यान हे त्यांचे घर बनते, तिथल्या वनस्पती खाऊन ते आपला उदर निर्वाह करू लागतात ....

तिकडे पृथ्वीवर
विश्वा चा बरेच दिवस काही संपर्क होत नसल्याने पृथ्वी वर ओमिक्रोन ला निषेध क्षेत्र घोषित केले जाते. विश्वा इतिहासात शामिल झाला असतो...त्याच्या बहादुरी चे किस्से सर्व एका दुसर्या सांगतात कसा तो एकटा त्या ताऱ्यावर संशोधन करायला गेला... नासा सुद्धा ओमिक्रोन ला जीवन जगण्या योग्यतेच्या शक्यतेच्या यादीतून काढून टाकते.

ओमिकॉर्न वर ...
"तुहिरा मी तुला या आकाश गंगेच्या सर्व ताऱ्यांच्या साक्षी ने जन्मो जन्मासाठी स्वीकारतो... " ते वाक्य ऐकून तुहिरा त्याच्या कुशीत शिरते... दोघे असे विश्व् निर्माण करायचा निर्णय घेतात ज्याने पुढची १०००० वर्षे त्या बेटावरचे निसर्ग सौंदर्य टिकून राहीन. आपल्या येणाऱ्या पिढीला निसर्गाची जाणीव राहावी म्हणून ते पृथ्वीवरच्या संशोधनाच्या  कहाण्या बनवतात, त्यांनी मानव जाती ला झालेल्या कष्ट आणि कसे मानवाने स्वतःच स्वतःचा काळ निवल्डला हे दर्शवतो... त्या कहाण्या तिथे प्रचलित करतात ज्याने पुढची पिढी आपल्या जवळ असलेल्या निसर्गाच्या संपत्ती चा मान ठेवेल...

विश्वा जेव्हा या मिशनवर आला होता त्याला त्याच्या साठी इतके सुंदर विश्व् वाट पाहतंय हे माहीतच नव्हते...
विश्वा आणि तुहिरा त्या ताऱ्याच्या बेटाला आपल्या प्रेमाने प्रेमाचे बेट बनवतात ...

समाप्त


No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...