काल असंच बसल्या बसल्या विचार आला, आपण नेहमीच ऐकत आलोत
मुली जास्ती जबाबदार असतात, तुम्हाला असं नाही वाटत आपण त्यांच्या कडून जास्तीच अपेक्षा करतो..
मुलीं वर बंधनं तर असतातच लहान पण पासूनच.. तिच्या मना जोगे तीला काही करयला मिळत नाही... साध कधी आपल्या मैत्रिणीन सोबत सिनेमाला जायचा म्हंटला तर आधी भाऊ मग बाबा,आई संग्ल्या खानदाना ला विचारावा लागता... पण हेच मुलाच्या बाबतीत.. तो सरळ फोन करतो आणि सांगतो... "आई गं मला आज यायला उशीर होईल मी मित्रां बरोबर सिनेमाला जातोय... " का आपण असे वागतो... ???
मग हळू हळू आपणच आपल्या मुलीला ह्या बंधनाची सवय करून देतो... प्रत्येक पावलावर तीला आपल्या इच्छा, आकांक्षा ह्यांची मुरड घालावी लागते कधी लोक काय म्हणतील ह्या भीती खाली तर कधी सासू सासरे काय म्हणतील ह्या भीती खाली... समाज एकंच आहे पण मुलांना कधी असा विचार करावा लागतो? मी असं बोलू का कि तसं? असा ठीक राहील का? मी jeans घालू का? मी इथे जावू का? मी असा वागलो तर त्यला बारा वाटेल का? कधीच नाही... मुलीना पडणार्या १०० प्रश्नान पैकी ९० % प्रश्न तर कधी मुलांच्या डोक्यात हि येत नसतील...
आपण म्हणतो एकंच आयुष्य आहे ... काय हे फक्त मुलां साठीच? मुलींना ही तर एकंच आयुष्य आहे... मग का ती आपल्या मना च्या इच्छे प्रमाणे उंच भरारी घेवू नाही शकत का तीला , घरातले, बाहेरचे, समजा च्या विचाराने स्वताला गुरफटून घ्यावे लागते... का हा भेद भाव?
आपण क्षणो क्षोणी स्त्री काडना त्याग मागतो... मग ती आपली आई असो.. बहिण असो.. बायको असो कि मुलगी असो.. सून असो... स्त्री ला प्रत्येक क्षण दुसर्याचा विचार करून जगावे लागते... आपला विचार करायला तीला वेळच मिळत नाही... आणि असंच तिचा आयुष्य कधी संपत तेच कळत नाही...
उद्या करते उद्या करते म्हणत मनातल्या इच्छा मनातच राहतात आणि हो.. तीला मिळालेलं एकंच आयुष्य असंच संपून जाता... मनातल्या इच्छा मनातच राहून जातात...
No comments:
Post a Comment