Sunday, September 29, 2019

८ | TLJ ३ | श्वास माझा होशील का?


ती लाजते जेव्हा | पर्व ३ | श्वास माझा होशील का? - भाग ८   

आज शिवानी खूप खुश होती... पण मनात एक शंका आली... आनंद नि तिला हे प्रोमोशन त्यांच्या वयक्तिक ओळखी मुळे तर नाही दिले? इतक्या लवकर इतके मोठे प्रोमोशन ती खरंच डीसर्व करते?
ती आनंद च्या केबिन मध्ये जाते... तिला बघून आनंद तिला आनंदाने हाथ समोर करत काँग्रट्स म्हणतो... पण शिवानी च्या चेहऱ्यावर त्याला अपेक्षित आनंद दिसत नाही...
"काय झालं शिवानी तुम्ही खुश नाही का तुमच्या प्रोमोशन नि?"
शिवानी शांत होती... "आनंद मला नाही वाटत मी इतकी मोठी जबाबदारी हॅन्डल करू शकेल..."
"का शिवानी... आत्ता हि सर्व तुम्हीच तर बघताय... हे फक्त कागदावर तुमची पोसिशन ची पुष्टी करत आहे... ह्या आधी तुम्ही तेच काम करत आहात... "
"आनंद मला... नाही वाटत मी करू शकेल..." शिवानी काळजी ने म्हणली.
"तुम्ही काळजी का करताय... मी आहे तुमच्या सोबत... मी काही तुम्हाला एकटं टाकून नाही जात आहे... " आनंद दिला धीर देतो.
"पण हा इतका म्हणत्वाचा प्रोजेक्ट आहे... आपल्या कंपनी साठी खूप म्हणत्वाचा आहे छोटीशी चूक पण खूप भुदंड देऊ शकते..."
"तुम्हाला काय वाटते मी माझ्या कंपनी चा इतका म्हणत्वाचा निर्णय असाच घेईल? मी खूप विचारपूर्वक तुम्हाला हि जबाबदारी देत आहे... "
"पण..."
"तुम्हाला नसेल पण मला आहे तुमच्या वर विश्वास... तुम्ही करू शकता... मी बघितली आहे तुम्ही घेतलेली मेहनत..." आनंद शिवानी ला धीर देत म्हणाला... "मी आज च्या आपल्या पार्टीत हे सर्वां समोर घोषित करणार आहे..."
"पार्टी?" शिवानी आश्चर्याने बघते...
"बघा तुम्ही इतके मग्न आहात कि तुम्हाला दादा च्या यशाची पार्टी हि लक्षात राहिली नाही... " शिवानी ला तो काय बोलतोय काही कळत नव्हते... तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आनंद पुढे म्हणतो...
"वाहिनी... आज आपल्या डायमंड च्या बिझनेस च्या २५ वर्षाच्या अनिव्हर्सरी निमित्य आपण नवीन स्टोर चे उदघाटन करत आहोत आणि हे स्टोर पूर्णपणे दादा च्या नेतृत्व खाली राहणार आहे... दादा चे हे किती मोठे यश आहे... आणि हे तुमचे... खरं म्हणजे आज ची पार्टी तुमच्या दोघांचे यश साजरे करायची पार्टी आहे... " शिवानी सर्व ऐकून शांत होती... तिला हे काही आठवतच नव्हते... ती स्वतःशीच विचारात होती... ती तिथून आपल्या डेस्क वर येते...
"रंजीत माझ्याशी कधी बोलला हे सर्व?? मला आठवत का नाही आहे... नाही हा माझ्या शी बोललाच नाही आहे... " ती रंजीत ला फोन लावते...

"मग... कशी झाली मॅडम मीटिंग?" फोन उचलल्या उचलल्या म्हणाला.
"रंजीत... तू मला काही सांगितले का नाही... " शिवानी ला त्याला एक्दम विचारावेसे वाटले पण ती स्वतःला शांत करत त्याला म्हणली... "रंजीत तुला मला काही सांगायचे आहे का?"
"हम्म... हो... पण आधी तू घरी ये मग बोलणार... " शिवानी चे तो काही एकात नसल्याने ती फोन ठेवते.

शिवानी घरी पोचते... तशी ती रंजीत ला गाठते...
"ह्म्म्म बोल आता ... काय सांगायचे आहे तुला..." शिवानी अधीर झाली होती...
"किती अधीरता... ती... आधी तुझी मीटिंग कशी झाली ते सांग... "
"रंजीत !!! प्लिज... मला सांगशील का?? बरं... चांगली झाली माझी मीटिंग... आता तू सांगशील का...??"
रंजीत तिचे डोळे झाकतो आणि तिला म्हणतो एक मिनिट असंच थांब हा... "काय सुरु आहे रंजीत ... मला ना आधी ऐकायचे आहे तू नंतर दाखव काय ते... तुला वाटते तू नाही सांगितले तर मला काही कळणार नाही ना..." शिवानी चा पारा चढत होता. पण तितक्यात रंजीत ने तिचे मानेवरचा केस एका बाजूला घ्यायला लावले आणि तिला काही कळण्याच्या अगोदर त्याने तिला आरश्या समोर उभे केले... "ह्म्म्म बघ आता, उघड डोळे "
शिवानी डोळे उघडते तर तिच्या गळ्यात निळ्या रंगाचा इमरल्ड चा तिच्या बांधायला शोभेल असा नाजूक सा सेट होता. ती आरशातून रंजीत ला बघते... "काय हे?? कशा साठी??"
"खरं तर काल रात्रीच बोलायचे होते, काही सांगायचे होते पण तू खूप म्हणत्वाच्या मीटिंग च्या तयारीत बिझी होतीस ना... म्हणून थांबलो... "
"अरे पण का?" शिवानी अजून हि धक्क्यातून बाहेर आली नव्हती...
"आज संध्याकाळी म्हणजे आता काही वेळाने... आपल्या कडे एक पार्टी आहे... देसाई काकांच्या मदतीने मी आपले पहिले डायमंड स्टोर खोलतोय... त्यांच्या मार्गदर्शनाखाली... DD ची नवीन ब्रांच आणि त्याचा मालक मी म्हणजे आपण असणार आहोत...!! देसाई काकांचा नवीन पार्टनर"
शिवानी नि तोंडाला हाथ लावून घेतलेला... "काय!!" ती आंनदाने त्याला मिठी मारते, "इतकी मोठी बातमी रंजीत... काल का नाही सांगितली? माझी तयारी झाली तेव्हा तर सांगू शकत होतास ना... "
"मी प्रयत्न केला होता पण तू म्हणालीस सांगायची गरज नाही... " रंजीत डोळे गोल फिरवत म्हणाला...
शिवानी त्याला पोटात कोपऱ्याने मारते तसं तो म्हणतो...
"तुझं लक्ष विचलित नव्हतं करायचं... चल आता पटकन तयार हो!!" रंजीत तिच्या हातात त्याने तिच्या साठी चॉईस करून आणलेला ड्रेस हातात देत म्हणला... शिवानी बघते तर त्या सेट ला मॅच होईल असा त्याचा निळा रंग होता... ती हातात घेऊन बघू लागते आणि डोळे चक्रावून जातात... "रंजीत... तू हा ऑनलाईन बोलावला आहेस का?"
"नाही का... मी दुकानात जाऊन सिलेक्ट करून आणला आहे..."
"रंजीत .... मी हा घालू आज?" शिवानी ला विश्वासच बसत नव्हता...
"हो... आज साठी खास आणला आहे मी... " रंजीत ला ती अशी का विचारतोय हे कळत नव्हते.
"नक्की?? तू बघितल्यास ना ह्या ड्रेस ला??" ती त्याला ड्रेस दाखवत म्हणली...
"काय झालं? इतके का प्रश्न येतात तुला... आवडला नाही का तुला... ?"
"अरे... बॅकलेस आहे ड्रेस रंजीत... मी नाही पार्टीत घालणार... "
"का??" रंजीत आस्चर्यने म्हणाला..
"का म्हणजे..? देसाई काका, काकू आणि बरीच लोक असतील, सर्व असतील पार्टीत... मी त्यांच्या समोर हा ड्रेस घालू... नाही नाही..."
"मी इतक्या आवडीने आणला आहे... आज साठी ...प्लिज .. घाल ना..." रंजीत केविलवाणा बघत होता तिला
"नाही रंजीत... मी तुला घालून दाखवते पण पार्टीत नाही...."
"माझ्या साठी... प्लिज... " रंजीत हट्टाला पेटलेला...
"बघ हा... नंतर तूच पछतावशील... "
"नाही... आणि मी का  पछतावशील...?? मी सांगतोय ना... "
"हम्म... बघ... मी अशी साधी राहते तेच तुझ्या साठी चांगले आहे... कोणाच्या मनात भरले तर?"
"तू मला धमकी देतेस? सांग ना हिंम्मत नाही घालायची... " रंजीत तिला चिडवत म्हणाला
"तू मला चॅलेंज करू नकोस हा... "
"केले चल... आज पार्टीत हा ड्रेस घालून येऊन दाखव... " रंजीत बेत लावत म्हणाला..
"आणि आले तर मला काय ?"
"तू मागशील ते... "
"बघ हा... "
"कधी आपला शब्द माघारी घेतला आहे का..??" रंजीत भुवया उंचावत म्हणाला..
"उम्म्म ठीक आहे... मला हि तुला काही दाखवायचे आहे... " शिवानी आपल्या हॅन्डबॅग मधून इन्व्हलोप काढत म्हणाली, तो इन्व्हलोप त्याच्या हातात देत ती त्याला नजरेने बघ म्हणते... रोबोमाईंड चा इन्व्हलोप बघून रंजीत डोळे मोठे करून बघतो मग त्यातले लेटर काढून वाचू लागतो...
"ओह माय माय... !!! शिवानी... तू आता रोबोमाईंड ची प्रोजेक्ट दिविजन हेड आहेस!!" शिवानी आनंदाने मान हलवते...   रंजीत तिला उचलून घेतो आणि २-३ गोल गिरक्या मारतो... "तुला माहित आहे मला ह्या बातमी नि किती आनंद होतोय!!!" तिला खाली उतरवत तो म्हणतो.
"हो... तुझ्या मुळेच आहे हे सर्व... तूच तर जॉब परत जॉईन करायला प्रोसाहन दिलेस... शिवानी त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली... "
"ए... मी विसरलो... काँग्रट्स!!" रंजीत चे बोल एकूण शिवानी त्याच्या कडे बघते ...
"असे... रुके सुके?" रंजीत तिच्या कडे काही कळले नाही असे बघतो... शिवानी आपल्या टाचा उंचावत त्याच्या गळ्याभवती आपले हाथ घालते आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेते आणि म्हणते... "थँक यु..." मग दोन्ही गालावर देते आणि ओठांचे चुंबन घेत म्हणते... "काँग्रट्स... अशीच प्रगती करत रहा... १ नाही असे अनेक स्टोर चा तू मालक हो..."
रंजीत तिला स्वतःकडे ओढून घेतो आणि म्हणतो... "प्रत्येक प्रगतीला अशीच शाबासकी मिळणार असेल तर मेहनत करायला अजून हुरूप येईल... " दोघे बराच वेळ एकमेकात गुंतलेले...

"तू नझ्म नझ्म सा मेरे होटोन पे ठहर जा.. में ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागु रे...
तू इत्र इत्र सा मेरे सासो में बिखर जा...
तू इश्क इश्क सा मेरे रुह में आके बस जा... जिस और तेरी शहनाई ऊस और में भागू रे... "


रात्री पार्टी मध्ये ...
घरचे सर्व मंडळी जमा झाली होती... घरच्या टेरेस वर रूफ टॉप पार्टी ठेवली होती...
रुपाली, आरोही आनंद आणि आयुष नि पार्टी च्या सर्व तयाऱ्या केल्या होत्या. जवळचेच काही नातेवाईक आणि बुझिनेस चे काही महत्वाच्या लोकांना बोलावले होते... त्यात आनंद नि आपल्या कंपनी च्या आज आलेल्या जर्मन क्लायंट ला हि बोलावले होते..

'गोरिया रे... छोरीया रे तेरा जलवा देखा तो दिल हुवा मिल्खा बडी तेज भागे रे... मन मा इमोशन जागे रे...
दिल जगह से हिल गया रे... तुकडो में निकाल दिल का छिलका ... मन मा इमोशन जागे रे ... '

शिवानीने रंजीत च्या आग्रहाखातर त्याने तिच्या साठी आणलेला ड्रेस घातला होता. ती एकाद्या सीताऱ्या सारखीच दिसत होती, त्या लॉन्ग स्लिमफिट निळ्या ड्रेस चा रंग तिच्या चॉकलेटी त्वचा ला अजून तेजोमय करत होते... रंजीत तर तिला बघतच राहतो त्याच्या अपेक्षेपेक्षा शिवानी किती तरी पटीने सुंदर दिसत होती... शिवानी दरवाज्यातून आत आली ते रंजीत च्या नजरेला नजर देत... दोघे एकमेकां पासून नजर हटवत नव्हते... शिवानी भुवया उंचावत त्याला नजरेने कशी दिसते विचारते... रंजीत पापण्या मिटतो आणि 'बेधुंद करणारी' असे साहतो तशी शिवानी स्वतःशी हस्ते... आणि मी जिंकले असे म्हणते तर रंजीत तिच्या जवळ जातो आणि कानात म्हणतो... "मी तर तुझा गुलाम आहे कधी पासून... जे सांगशील ते करायला तयार...तसं मी हारून हि जिंकलोय!!!... "
"हो का... पण मला खूप अवकवर्ड वाटतंय ना... "
"अरे... तू इतकी सुंदर दिसतेस ना... का काळजी करतेस... " रंजीत काही बोलतच होता तेव्हा आनंद तिथे त्यांचे जर्मन क्लायंट घेऊन येतो... आणि तो रंजीत ची ओळख करून देतो आणि सांगतो कि तो नवीन स्टोर चा मालक आहे... रंजीत ला जाम भारी वाटते .. काही वेळ ते रंजीत शी बोलतात पण त्यांची नजर शिवानी वरच असते... सकाळीच ओळख झाली होती पण सकाळी जी प्रोफेशनल शिवानी होती तिचा आता लुक पूर्ण बदलून गेलेला. शिवानी हि त्यांच्या शी मोकळेपणाने बोलते जे रंजीत ला आवडत नाही... ते तिथून गेल्यावर रंजीत गाल फुगवून बसतो... शिवानी त्याचा असा चेहरा पडलेला बघून म्हणते... "काय झालं रे एक्दम चेहरा पडायला...??"
"तू त्यांच्या शी का बोललीस?" रंजीत रागावलेल्या सुरत म्हणला..
"रंजीत मला काम करायचे आहे त्यांच्या सोबत बोलावे तर लागणारच ना आज तर पहिली मीटिंग झाली ... "
"तो कसं बघत होता तुझ्या कडे... पाहिलेस ना...???"
"हे बघ... मी आधीच बोलले ना... मी साधी राहिलेली तुझ्या साठी चांगले आहे... तुलाच हवं होत मी हा ड्रेस घालून यावे पार्टीत....साडी घातली असती ना मी नाही तर ??"
"हम्म... जाऊदे... बघू देत त्याला किती हि... पण तू आहेस तर माझीच ना... " रंजीत तिच्या पाठीवरून हळुवार हाथ फिरवत म्हणाला...
"हम्म..." शिवानी त्याचे गाल गुच्छे घेत म्हणाली... "नेहमी साठी..."
 
रुपाली आनंदात होती सर्व पार्टी ची मज्जा घेत होते...

सर्व केक कट करायला जमतात... जसे सगळे जमतात आनंद सर्वांना लक्ष द्यायला सांगतो आणि म्हणतो ...
"आज चा दिवस खूप खास आहे... खूप काही अर्थांनी खास आहे... आज आई बाबांची ३०वी एनिवर्सरी आहे आणि आजच DD म्हणजे देसाई डायमंड चे २५वे वर्धापन दिवस आहे... तर ह्या सिल्वर जुबली च्या निमित्ताने आम्ही आमच्या पार्टनर रंजीत सोबत नवीन स्टोर ओपन करण्याचे घोषित करत आहोत... "
सर्व जण टाळ्यांनी रंजीत च स्वागत करतात जस आनंद त्याला आपल्या जवळ बोलावतो...

सर्वांना शांत करत आनंद पुढे म्हणतो... "अजून एक बातमी द्याची आहे... तुम्हाला तर माझी कंपनी रोबोमाईंड
 माहित आहे, आज आपल्यात आमचे जर्मन क्लायंट आले आहेत इथे" आणि तो अल्बर्ट ला बोलावतो...
"आत्ताच अल्बर्ट नि मला निश्चित केले आहे कि ते आमच्या कंपनी सोबत मल्टि बिलियन डील करणार आहेत आणि हा प्रोजेक्ट बघणार आहेत आमच्या प्रोजेक्ट डिव्हिजन च्या हेड शिवानी... " आनंद शिवानी ला हि बोलावतो...
शिवानी ला आश्चर्याचा धक्का बसतो... ती रंजीत च्या बाजूनी जाऊन उभी राहते.. सर्व टाळ्यांनी आनंद साजरा करतात. शेवटी आनंद अनंत आणि अंकिता ला बोलावतो... त्यांच्या सोबत त्यांचा अनिव्हर्सरी केक येतो...

केक कट झाल्यावर सगळे गाण्याच्या बिट वर डान्स करू लागतात...
सर्व चिल्लर पार्टी तोंडावर मास्क लावून डान्स करू लागतात... धिंगा मस्ती सुरु होते...
'कमारिया... कमारिया... आज बिजली भी गिरवानी है... कमारिया हिला रे हिला '

जसा जसा रात्री चा अंधार पसरू लागतो पार्टीत हळू हळू  रंग चढू लागतो... 
अचानक रुपाली ची नजर कोणाच्या नजरेशी भिडते... ह्याला कोणी बोलावले? ती स्वतःशी विचार करते
ती नजर तिला टोचते... त्या व्यक्ती नि तोंडावर मास्क लावला होता, पण त्याचे डोळे दिसत होते... त्याची नजर रुपाली ला खटकते... त्या क्षणानंतर तीला काही चैन पडेना...
ती त्या व्यक्तीला शोधू लागते, ती बेचैन झालेली, कुठे पहिले होते मी ह्याला? ती स्वतःशी आठवण्याचा प्रयन्त करत होती...

तितक्यात आयुष तिला काही सांगायला येतो... आयुष ला बघून रुपाली च्या डोळ्या पुढे अंधारी येऊ लागते, तीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध होते. आयुष तिला धरतो आणि पद्मा पासून वाचवतो... 

'तू अखिया मिलके... इश्क में गल्ला तू मेनू समजणं... बम डीगी डीगी बम बम !!  ' मागे सुरु होते...

आयुष तिला एका खुर्चीत बसवतो पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो ... बाकी कोणाला त्रास नको म्हणून तो रंजीत ला सांगून तिला खाली रूम वर घेऊन जातो....

-------
क्रमश:

हाय फ्रेंड्स,

पहिले तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा... दांडिया, रंगे बी रंगे कपडे... मेजवानी ... गाणे डान्स मज्जाच मज्जा.... हो ना... आता संध्याकाळी लागतील जोर दार लाऊड स्पीकर वर दांडिया सॉंग्स!! त्या बिट्स वर वाजतील टिपऱ्या वाजतील ... मज्जा च मज्जा

मला ना एक कल्पना सुचली... सर्वांनी आपल्या मोबाईल वर एकच गाणं लावलं आणि हेडफोन लावून डान्स केला तर??? कसलं मस्त ना...?? म्हणजे दुसऱ्या कोणाला डिस्टर्ब पण नाही आणि तुमचं एन्जॉयमेंट पण फुल्ल!!

माझं जरा डोकं कुठे हि धावते... पण सोसायटी मध्ये ह्या कल्पनेचे विचार करायला हरकत नाही ना हे ऑपशन राबवायला... नॉइज पोल्युशन कमी होईल ना तितकेच!!
थँक यु थँक यु ... !! मी हुशार आहे हो... लहान असतांनापासुनच... गर्व नाही करत पण... साधी सरळ आहे मी!!

हम्म... कसा वाटला आज चा भाग??
हो हो कळेल... ती नजर कोणाची आणि रुपाली त्याला बघून का बेशुद्ध झाली सर्व कळेल...
नेक्स्ट भाग कधी?? गुड question !! लवकरच... गुड आन्सर !!

आज भाग का नाही टाकला?? अजून नाही आला??
अजून भाग का नाही आला... ?
नेक्स्ट भाग कधी?
नेक्स्ट भाग लवकर टाक...
तुमचे असे हक्कानी येणारे प्रश्न आणि टिप्पण्या हि आवडतात अहो... पण प्लिज जरा समजा ना... मला हि घर आहे ओ... नवरात्री आहे तयारी आहे... पर्सनल लाईफ हि आहे... काय करू... मी एक हॉबी म्हणून लिहिते हो... फुल्ल टाइम प्रोफेशिअन नाही ना.. सर्व सांभाळून करावे लागते... मला कळते तुमची अधीरता पण जरा patience हवा ना... मी रोज एक भाग टाकते तरी अजून किती लवकर करू प्रकाशित???

तर एन्जॉय नवरात्री गाईस!!! माझी आठवण काढत रहा... मी उद्या भेटणार आहेच!! पक्का...

अभिप्राय नक्की कळवा...
वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व ३ (श्वास माझा होशील का...?)
 - निशी


No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...