Friday, September 27, 2019

६ | TLJ ३ | श्वास माझा होशील का?


ती लाजते जेव्हा | पर्व ३ | श्वास माझा होशील का? - भाग ६

रात्र बरीच उलटून गेली होती ... शिवानी अजून हि आपल्या लॅपटॉप वर काम करत बसली होती. उद्या खूप महत्वाची मीटिंग होती आणि त्याच्याच तयारीत ती लागली होती. रंजीत ने येऊन तिला कॉफी आणून दिली... तिला कॉफी देत म्हणाला, "आज खूप काम आहे का?"
"हम्म .." शिवानी त्याच्या कडे न बघता म्हणाली. त्याने परत कॉफी चा मग पुढे केला... "घेते ना... थांब ना आणि तू का जागा आहेस अजून? झोप ना..."
"हम्म... तू नाहीस ना बाजूला... मग झोपच येत नाही मला... " रंजीत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला...
शिवानी त्याच्या हातातून कॉफी घेत म्हणते ... "प्लिज... नको ना जगूस राज्या ... मला अजून बराच वेळ लागेल... झोप तू... येते मी..."
"इतकं काय काम आहे... मी काही मदत करू का... " रंजीत तिच्या लॅपटॉप मध्ये लक्ष घालत म्हणाला...
"उद्या क्लायंट मीटिंग आहे त्या साठी काही रिपोर्ट तयार करायचे आहेत, नवीन जॉईन झालेल्या ट्रेनी नि काही चुका करून ठेवल्या आहेत त्याच सुधारत आहे... " शिवानी डोक्याला हाथ लावून बसलेली... रंजीत तिचे डोके चेपून देतो...छान चोळून देतो...  "उम्म्म रंजीत मी झोपेल तू असं चोळत राहिलास अजून काही वेळ तर.... मी ठीक आहे... " शिवानी त्याचे हाथ दहरुन त्याला आपल्या समोर यायला लावत म्हणली...
"काय झालं? झोप नाही येत का..??"
रंजीत मान हलवून हो म्हणतो... "मी काही मदत करू का सांग ना... " शिवानी मान हलवून नाही म्हणते आणि परत कमला लागते... रंजीत खाली वाकून तिच्या गाळाचे चुंबन घेतो आणि मग आपल्या साठी खुर्ची घेऊन येतो आणि तिच्या बाजूला बसतो... त्याच्या जवळ थांबण्याने शिवानी ला छान वाटते, तीनि न मागता तो तिच्या साठी थांबून होता. बराच वेळ तो आपल्या मोबाईल मध्ये काही करत बसतो... मग गाणी लावून ऐकत बसतो, बराच वेळ आपले काम केल्यावर सर्व नीट झाले ह्याची शहनिशा करून शेवटी आपला लॅपटॉप बंद करत शिवानी त्याला म्हणते "झाले... चल!!"

रंजीत उठतो आणि मोबाइलला बंद करतो तितक्यात छान गाणे सुरु होते... रंजीत तिला थांबवतो आणि म्हणतो... ऐक ना... आणि स्पीकर ऑन करतो...

केह दु तुम्हे... या चूप रहू... दिल में मेरे आज क्या है... ?

रंजीत कोणत्या डिरेकशन नि चाललेला लक्षात येताच शिवानी त्याच्या कडे बघून हस्ते आणि म्हणते...
"सांगायची काही गरज आहे का... ??" आणि ती झोपायला जाऊ लागते... रंजीत तिला थांबवतो
"न सांगता कळणार आहे का तुला...???" शिवानी त्याच्या डोळ्यात बघते आणि काय असे नजरेनेच म्हणते
रंजीत तिच्या जवळ जातो आणि तिच्या कानावर आलेले केस बाजूला करतो, त्याच्या त्या हलक्या स्पर्शाने शिवानी शहारते, रंजीत पुढे तिच्या कानात म्हणतो.... "उद्या साठी ऑल द बेस्ट !! तू बेस्ट आहेस... तुला कोणाची तोड नाही..."

शिवानी हस्ते  आणि थँक यु म्हणते... "बस... इतकेच सुरु आहे नक्की?"
रंजीत डोळ्यानेच हो म्हणतो...
"हम्म... मला वाटले..."
"काय??" रंजीत डोळे मोठे करून विचारते...
शिवानी स्वतःशीच विचार करून लाजत डोळे गोल फिरवत ... "काही नाही" म्हणते... तास रंजीत तिला स्वतःकडे ओढून मिठीत भरतो... डोळ्यांनी काय?? काय वाटले तुला..?? आणि तिला उचलून घेतो... "अरे... उतरावं मला... रंजीत... काय करतोस..."
रंजीत कुठे आता तीच काही ऐकणार होता...


रुपाली च्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती... तिचा हाथ धरून त्याने तिला न्यायचे तिथे आणले होते... लोणावळ्याच्या हिरव्यागार दर्यांच्या भवती होते ते, पण रुपाली ला हे सर्व अजून दिसले नव्हते... गाडीत पूर्ण रस्ताभर ती सारखे प्रश्न विचारात होती "कुठे चाललो आहे ते तर सांग... " पण तिला उत्तर काही मिळाले नव्हते... तिला दरीच्या जवळ उभे करून त्याने तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली...
रुपाली समोरचे मोकळे आकाश बघून खुश झाली ... गार वारं अंगावर शहारे आणत होता... वाऱ्यावर तिचे केस उडत होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र डोळ्यांना नैनरम्य असे हिरवी वृक्षवल्ली दिसत होती. ती आजू बाजू ला बघते पण आयुष्य कुठे दिसत नाही... जवळच कार पार्क केलेली दिसते... काही आणायला गेला असेल असा विचार करत रुपाली आजू बाजू ला निहारात बसते... तितक्यात बाजूला कोणी तिच्या सारखेच वारं आणि निसर्ग निहारात उभे आहे असे वाटते, म्हणून ती बघते ... ती बघते तर आयुष्य बाजूला उभा होता आणि तिच्या कडे मोठी स्माईल देऊन बघत होता.... ती त्याला नजरेनेच काय असे म्हणते... त्याला खूप काही बोलायचे होते बहुदा... त्याच्या डोळ्यात तिला बरेच प्रश्न आणि बरंच काही दिसत होते.... ती त्याला पुढे काही बोलेल तितक्यात त्याच्या मागून एक व्यक्ती आपला चेहरा दाखवतो, त्याला बघून रुपाली घाबरते पण तिला काही कळण्याच्या अगोदरच त्याने आयुष्य ला त्या दरीत ढकलून दिले...
"आयुष्य श श श......" रुपाली ची किंचाळी निघाली....

क्रमश:
------
हाय फ्रेंड्स,

बस बस ... बत्तीशी बंद करा आपली... अहो किती ती मोठी स्माईल... घरचे विचारत नाही का तुम्हाला का हस्ताय असे वेड्या सारखे?? मला तर विचारतात बाबा जेव्हा पण मी तुमच्या कंमेंट्स वाचून एकटीच हसत असते...

मग कसा वाटला आज चा भाग?
अजून हि सध्या किंजल आणि ओंकार डोक्यातून गेले नाहीत ...
काही दिवस वेळ कमी असल्यामुळे कदाचित भाग छोटे असतील.. तर प्लिज तक्रार करू नाही..

काय वाट्ते... कशी वाटली सुरवात?
आज काही जस्ती नाही बोलणार ... एक गाणे ऐकवते ... त्यात माझ्या मनातल्या सर्व भावना आहेत ...
म्हणजे काही दिवस झालेत आपल्याला बोलून पण कधी कधी काही न बोलता बरच काही बोलता येत ना...
तर भावना समजतात का माझ्या बघा...

थोडे हसावे थोडे रुसवे ...नाते रुजावे असे ...
तुझया सुखाचे माझ्या सुखाशी धागे जुळावे जसे ...
तू आणि मी ... मौनातले बोलणे ... !

कथेकडे वळूयात ...
मला खूप जणांनी प्रश्न विचारले तुम्ही थ्रिलर सुस्पेन्स कथा लिहिता का?
तर माझे उत्तर नाही असे होते... का?? कारण मला फक्त प्रेम आणि मैत्री हाच विषय आवडतो लिहायला...
पण परत विचार केला का नाही?? एक वेगळे काही ट्रय कराचे...
तर घेऊन येत आहे तुमच्या साठी... थ्रिलर सुस्पेन्स नि भरलेली हि लव्ह स्टोरी ...  माझ्या ह्या प्रयत्नाला तुमची साथ मिळेल हि आशा...

तुमच्या हि मनात प्रश्न आलेच असतील ना... नसतील आले तर मी कशासाठी आहे...
हे घ्या प्रश्नांची लिस्ट विचार करायला... उद्या पर्यंत मी परत भेट पर्यंत...
१. कोण आहे तो माणूस ज्याने आयुष्य ला ढाककल्ले...??
२. रुपाली का घाबरलेली?
३. आयुष्य ला काय झाले? काय आयुष्य ची ह्या कथेत एन्ट्री च्या आधीच एक्सिट?
४. का निशी का तू असे का केले... का मारलस आयुष्य ला... हो... हो देईल ना निशी उत्तर उद्याच्या भागात...

अभिप्राय नक्की कळवा...
वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व ३ (श्वास माझा होशील का...?)

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...