=====ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ७ =============
"रंजीत आता तुम्ही या मुंबई ला ... " देसाई काका निघताना म्हणतात "आपण व्याही होऊ नाही तर नाही.. मला माणूस म्हणून तुम्ही आवडलात जेव्हा कधी जमेल मुंबई ला नक्की या... "
"तुमच्या सारख्या मोठ्यांच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकून काम करण्याचा वेगळाच हुरूप येतो..."
"तुमच्या पिढीचे असे विचार आहेत हे ऐकून खूप बरे वाटले... आम्ही अजून २ दिवस थांबणार आहोत, आलोच आहोत तर सर्वांचा ऐक टूर होऊन जाईल नाही तर सगळ्यांचं असं एकत्र जुळून बाहेर पडण्याची वेळ खूप क्वचित येतो... मी मनमोकळं बोलणारा माणूस आहे रंजीत, आम्हाला तुमची रुपाली आवडली आहे आमच्याकडून होकार आहे. मी लगेच होकार कळवळा म्हणून तुम्ही हि तसे करावे ह्याचे तुमच्यावर काहीच बंधन नाही, तुम्ही आपसात चर्चा करा आणि आम्हाला सांगा. आम्ही २-४ दिवस तसे हि आहोत इथे तो पर्यंत निर्णय घेता आला तर बघ... "
रंजीत ला त्यांचे समजूतदार बोलण्याने भरून आले, तो त्यांना आश्वासन देतो कि मी नक्की कळवतो.. सगळे जायला निघतात. रंजीत चे तेव्हा लक्ष जाते बाहेर दोन स्कोडा kodiaq गाड्या उभ्या असतात, त्याला आश्चर्य वाटते दोन्ही गाड्यांच्या मागे "A A Desai " असे लिहिले असते न राहून तो विचारतो, "काका हे A A Desai कोण आहे?"
सगळे खुद्कन एकमेकांना बघून हसायला लागतात तरी रंजीत ला काही कळत नाही... शेवटी काका म्हणतात "नाही आले का लक्षात तुमच्या? अहो आम्ही सगळे... आमचे सगळ्यांचे initial A A आहेत ना.. "
"अरे हो.. काय मस्त आयडिया केलीत ओ तुम्ही कोणाला राग नाही लोभ नाही... पण तुम्ही मुंबई हुन गाडीत आलात इतक्या लांब?"
"नाही नाही.. आई बाबांना इतक्या लांब गाडीने कसे आणणार, आमची इथे दिल्ली ला शाखा आहे, आम्ही विमानाने दिल्ली ला आलो आणि मग तिथून गाडी ने आलो..."
"छान छान... " रंजीत शिवानी कडे बघत म्हणाला..
"चला निघतो मग आम्ही आता, खूप वेळ झाला.. " देसाई काका गाडीचे दार ओढून घेत म्हणाले...
"आम्हाला रुपालीचा नंबर मिळेल का दादा?" अर्चिता निघता निघता विचारते.
"हो हो, का नाही... " रंजीत त्यांना रुपाली चा नंबर देतो.
देसाई मंडळींना निरोप देऊन रंजीत आणि शिवानी सुटकेचा श्वास घेतात... ऐक मोठी जबाबदारी पार पडल्यासारखे वाटते, "किती मोठा परिवार आहे ह्यांचा... " शिवानी सोफ्यावर बसून पाणी पीत म्हणते. "आज तर नाक कापल्याच जाणार होत"
"हो ना.. मी हि आधी गोंधळलो इतके लोक बघून, मला वाटलेला येतील ३-४ लोक."
गप्पा मारत घर आवरत वेळ निघून जातो...
......
...
..
.
असेच २ दिवस निघून जातात ...
रुपाली खूप विचार करते, अयुष बद्दल तिच्या मनात फक्त आकर्षण आहे कि तिला खरंच तो आवडायला लागला हेच तिला कळत नाही, तिला जाणीव फक्त या गोष्टीची असते कि त्याच्या विचारातून स्वतःला ती बाहेर काढू शकत नाही आहे ... त्याचे चालणे, बोलणे ज्याचे तिने त्या छोट्याशा वेळेत निरीक्षण केले होते ते क्षण वारंवार तिला आठवायचे आणि सातवायचे... आपण आपल्या नशिबाची का परीक्षा घ्याची म्हणून ती अयुष ला होकार द्याचे ठरवते, नशिबात नसेल तर होणारच नाही लग्न आणि असेल तर मी अयुष आणि त्याच्या परिवाराला गमावणार नाही म्हणून... असा विचार करून ती मनाशी निश्चय करते रंजीत ला आपला निर्णय कळवण्याचा...
रणजित आणि शिवानी रुपाली चा होकार ऐकून खूप खुश होतात, "तू एक्दम बरोबर निर्णय घेतलायेस रुपाली, मला तुझ्यावर कोणतेच दडपण आणायचे नव्हते, तुझा तुझा निर्णय घेऊ द्याचा होता... मला आज किती आनंद होतोय म्हणून सांगू... आज खरंच तू मोठी झाल्याचा विश्वास बसतोय" रंजीत तिला जवळ घेत म्हणाला..
"हो ना.. देसाई मंडळी खूप चांगली आहेत... मला त्यांचा संपूर्ण परिवार आवडला..." शिवानी रंजीत शी सहमत होत म्हणाली..."त्यांना कळव ना आपला होकार... "
"हो लगेच कळवतो..." रंजीत फोन लावत म्हणाला. रांजेते चा फोन लागला तसं तो उत्साहात बोल्ला...
"हॅलो देसाई काका, रंजीत बोलतोय, रुपाली नि लग्नाला होकार दिलाय..."
"काय सांगताय... तुम्ही सकाळी सकाळी खूपच चांगली बातमी दिलीत... मग आता पुढे कसं करायचं?"
"तुम्ही जसं म्हणाल काका.. आता आम्हाला तर या सगळ्याचा अनुभव नाही त्यामुळे तुम्ही म्हणाल तसे..." रंजीत थोडा अडखळत म्हणाला...
"हो.. ते ठीक आहे.. मग मुंबई ला कधी येताय तुम्ही?"
"मुंबई ला? कशाला?" रंजीत ला काही कळले नाही मुंबई ला का जायचे.
"अहो मुलाचे घर बघायला नाही येणार का?" देसाई काका स्पष्टीकरण देत म्हणाले..."तुमची बहीण कुठे राहणार, घर ठीक आहे कि नाही, सुविधा आहेत कि नाही वगैरे वगैरे?"
"काका.. तुमचा पूर्ण परिवार बघितला, घर काय हो २*२ ची खोली हि पुरे होते पण घर माणसांनी बनते... त्याला घरपण माणसातल्या आपुलकीने येतो, आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही आमच्या रुपाली ची चांगली काळजी घ्याल आणि रुपाली खूप खुश राहील तुमच्या परिवारात...."
"असं म्हणताय... मग साखरपुडा आटपून घ्यायचा का? आम्ही अजून २ दिवस आहोत इथे... कामात काम होऊन जाईल..." थोडा विचार करून ते म्हणाले.
"पण तयारी करायला वेळ तर हवा ना काका... "
"अरे साखरपुड्याची तयारी ला काय वेळ लागतो... तू काही काळजी करू नकोस... आम्ही सर्व तयारी करतो... " देसाई काकांना आनंदाने फोन वर बोलताना काकू ऐकत होत्या सर्व, त्या त्यांना म्हणतात उद्या शॉपिंग ला जाऊ सांगा त्यांना...
ठरल्या प्रमाणे सर्व जण दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची खरेदी करायला जातात, अयुष रुपाली साठी कपडे, अंगठी वगैरे वगैरे अख्खा दिवस जातो. थाटात त्यांचा साखरपुडा उरोकतो दुसऱ्या दिवशी... पंडितजी लग्नाची तारीख २ महिन्यांनी काढतात.
देसाई मंडळी मुंबई ला जायला निघतात काका रंजीत ला म्हणतात, "लग्नात आमची ऐक अट आहे.. लग्न मुंबई ला होईल... आमची सगळे पाहुणे तिकडेच आहेत.. " त्यांना मधेच थांबवत अयुष म्हणतो... लग्न मोठे करायची काय गरज आहे बाबा, रजिस्टर लग्न करूयात?"
"अयुष आमच्या रुपाली च्या हि लग्नला घेऊन काही अपेक्षा आहेत, रुपाली च्या स्वतःच्या हि काही आकांक्षा आहेत... प्लिज लग्न होऊ द्या... "
"तसं नाही दादा, लग्नाला येणारा इतका खर्च आपण गोर गरिबांना देऊ शकतो.. मी रोज इतक्या लोकांना बघतो, पैसे नसल्यामुळे आपला इलाज करू शकत नाहीत, ह्या लग्नात होणार वायफळ खर्च आपण काही लोकांच्या ट्रीटमेंट वर खर्च करू शकतो... पैसे कारणी लागले पाहिजे...."
"तुमचे सर्व ठीक आहे... पण..." रंजीत पुढे काही बोललेलं तेच रुपाली त्याचा हाथ धरते आणि डोळ्यांनी आपली सहमती दर्शवते...
"अयुष बरोबर बोलतात दादा, मला काहीच हरकत नाही, करूयात रजिस्टर लग्न..."
"दादा मला तुमचा हुरूप हि नष्ट नाही करायचा लोकांसाठी आपण रेसेपशन ठेवुयात, म्हणजे तुम्हाला पाहुण्यांना जेवण दिल्याचा हि आनंद होईल आणि लग्नाचा वायफळ खर्च हि मार्गी लागेल..."
"हे ऐक नंबर सुचवलंत तुम्ही अयुष..." रंजीत आंनदाने म्हणाला...
"ठरलं तर मग, आम्ही मुंबई ला ठरलेल्या तारखेच रेजिस्टर कडे अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो... तुम्ही सगळे मुंबई ला या बाकी सगळी तयारी आम्ही बघू रेसेपशन ची...."
"रेसेपशन तर आमच्या कडून आहे काका..." रंजीत गोंधळा
"नाही... ते मुलाकडून असेल रंजीत साहेब... तुम्ही लग्नाचा खर्च बघा..."
लग्नच खर्च? दोन हार आणि मुलं मुलीचे कपडे? रंजीत स्वतःशीच विचार करत होता ज्या काळात लोक खर्च मुली कडच्यांनी करायचा या विषयावरून भांडतात तिथे देसाई साहेब आम्ही खर्च करणार सांगून मोकळे झाले, रंजीत ला फार बरे वाटले कि रुपाली ला इतके चांगले कुटुंब मिळाले...
"आपली भेट आता मुंबईतच होईल... तुम्ही महिना भर तर आधी या मुंबई ला, मुंबई दर्शन पण होईल आणि बाकी तयारी पण होईल.. आम्हाला हि तुमचा सहवास लाभेल..." देसाई काका रंजीत ला निघताना म्हणाले... तितक्यात तिथे क्यू आली आणि आजोबांचा हाथ ओढून त्यांना खाली वाकायला लावते, रुपाली कडे हाथ दाखवून म्हणते "मला बोलायचं आहे..."
तोंडाला हाथ लावून ते म्हणतात, "सगळ्यात मोड्या सदस्याचे मत तर आपण विचारलेच नाही रंजीत साहेब...." सगळे जण हसायला लागतात... "जा बेटा जा..."
क्यू ला आपल्या कडे येताना बघून शिवानी च्या मनात प्रश्नांची चल बिचल सुरु होते, ती मला स्वीकारेल ना? मी तिची चांगली आई होईल ना? तीला काय बोलायचे आहे वगैरे वगैरे...
रुपाली सोफ्यावर बसली असते तिथे तिच्या बाजूला येऊन क्यू बसते काही वेळ काहीच नाही बोलत आणि फक्त तिला निहारात बसते, रुपाली हि तिच्या कडे बघत बसते, आपल्या पर्स मधून ती ऐक चॉकलेटे काढते आणि तिला देते पण ती घेत नाही ज्याने रुपाली ला अजून टेन्शन येत, "आई म्हणायची चॉकलेटे खाल्याने दात किडतात" तिचे ते निरागस वाक्य ऐकून रुपाली चे डोळे पाणवतात. "काय तुम्ही माझी फ्रेंड बनाल?"
रुपाली हो म्हणते... आणि तिला सांगते नक्की होईल पण त्यासाठी मला ऐक गोड गोड पापा पाहिजे... क्यू लगेच तिच्या जवळ जाते आणि तिला गालावर किसी देते.
ती परत शांत तिच्या समोर उभी राहते.. तिला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत अशी जाणीव होऊन रुपाली म्हणते, "काय झाले बेटा? चॉकलेटे पाहिजे?" मन हलवून ती नाही म्हणते तिच्या डोळ्यात बघत ती विचारते, "मी तुम्हाला काय म्हणू?"
"थोडा विचार करून रुपाली म्हणते तुला जे म्हणावे वाटेल ते म्हण, ओके?" तिच्या चेहऱ्यावर हसू पसरते "मी तुम्हाला नवीन आई म्हणू?" रुपाली च्या काळजात ऐक तीर घुसल्याची वेदना होते "नवीन आई..." ती आपले अश्रू लपवत तिला होकार देते... क्यू आनंदाने तिला बाय करत सगळ्यांसोबत जाऊन गाडीत बसते.
रुपाली ला क्यू चे निरागस बोल लक्षात राहतात, "आई म्हणायची.... फ्रँड होणार? नवीन आई!!" ती अयुष च्या आई जवळ जाऊन विचारते, "आई, ऐक विचारू?" त्या विचार म्हणतात तेव्हा रुपाली पुढे विचारते "क्यू च्या आई ला काय झाले होते?"
त्या प्रश्नांनी सगळे देसाई मंडळी शांत होतात, जणू आज च्या आनंदाला विरझण घातले त्या प्रश्नाने "तिने आत्महत्या केली होती...." शांतता मोडत अयुष म्हणाला आणि गाडी सुरु करून तो गाडी काढतो.... तीला पुढे काही बोलायचे असेल किंवा काही हि न बोलता निघून जातात.
आत्महत्या?क्यू च्या आई नि आत्महत्या केलेली...? का? रुपाली ला हे सत्य पाचटाचा नाही इतक्या लहान मुलीचा विचार तरी करायला हवा होता... ऐक आई आपल्या ३ वर्षाच्या लहान मुलीचा विचार हि नाही करणार आत्महत्या करण्याआधी?
रुपाली चे मन सैर वैर धावत होते, प्रश्नांनी कल्लोळ केलेला तिच्या मनात ..... तिच्याच नाही तर रंजीत आणि शिवणीच्या हि मनात ह्या प्रश्नांनी घर केलेले... आपले काही चुकले तर नाही असे दोघांच्या हि चेहऱ्यावर लिहिले होते!
क्रमश:
------------------
फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा? काय वाटते तुम्हाला?
१. काय करणं असेल क्यू च्या आई चे आत्महत्येचे?
२. काय देसाई मंडळी तितकेच चांगले आहेत जितके दाखवतायेत?
३. रुपलाई ने लग्नाला होकार देऊन चूक तर नाही केली?
४. काय रंजीत ने मुंबई ला जाऊन त्यांचे घर बघायला हवे होते?
तुम्हाला ह्या प्रश्नांची काय उत्तरं वाटते ते सांगा... बाकी सर्व प्रश्नांचे उत्तर लवकरच मिळतील वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...
No comments:
Post a Comment