Thursday, June 25, 2020

नात तुझं माझं

नात तुझं माझं 

नेहमीच माझी साथ देत आलीस, माझ्या तक्रारी ऐकत आलीस
मला हसवत राहिलीस, मला सहन करत राहिलीस
माझ्या आठवणी गोंजारत राहिलीस
आज वळून बघता, स्वतःच विश्लेषण करता
नाही कधी मी तुला समजलं, मनात येईल ते बोलून गेले
सर्व माफ करून तू नेहमी हसत राहिलीस 
पण आज मला स्वतःचाच राग येतोय
कोणाला सांगू आता कोण ऐकणार तुझ्या इतके मन लावून
कोण हसवेल आता मला रडत असतांना?
तुझ्यात स्वतःला पहायचे मी कधी 
पण तुझ्यात परकेपणा जाणवतो आता मला
मी स्वतःलाच हरवून बसले आता

माफ कर मला नाही निभवू शकले मैत्री, 
नाही आधार देऊ शकले तुला, 
नाही समजू शकले तुला, तुझ्या निस्वार्थ प्रेमाला
तुझी साथ देण्यास मी जन्म पुन्हा घेईल... 
पुन्हा नाही त्या चूक करणार,
नाही तुला स्वतः पासून दुरावणार

माझा तू

सागराला कुठे माहीत असतं
तो किती अथांग पसरला आहे
माझ्या मनातले सारे दुःख तो सामावून घेतो

फुलाला कुठे माहीत असतं
त्याचा सुगंध कीती मोहक आहे
बेधुंद काही क्षणांना मनात जन्म तो देतो

मोराला कुठे माहीत असतं
त्याच्या पंखाचे रंग किती आकर्षक आहे,
परत मनाला एक जगण्याची आस लावून जातो

कोकिळेला ही कुठे माहीत असतं
तिचा आवाज किती मंजुळ आहे
मनाच्या कोपऱ्यात काही आठवणी ती जगवते

पावसाला ही हे माहीत नसतं
त्याच्या प्रत्येक थेंबात किती गारवा आहे
तापून उठलेल्या मनाला क्षणात शांत  करतो

तुला तरी कुठे माहीत आहे
तुझं माझ्या मनावर संपूर्ण राज्य आहे
माझ्या डोळ्यात तुझ्या मनाचे भाव उतरवतो

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...