ती लाजते जेव्हा | पर्व ३ | श्वास माझा होशील का? - भाग १०
पायावरून मोरपीस फिरवल्यावर होणाऱ्या संवेदनांनी रुपाली शहारून गेलेली ... जसा जसा हाथ वर फिरू लागला हळू हळू त्या संवेदना हि वाढू लागल्या... तिच्यावर होणाऱ्या त्या प्रेमाच्या वर्षावात ती ओली चिंब भिजून गेलेली. जसा त्याचा हाथ तिच्या कमरेवरून पोटाकडे वळला तसं सर्रर्रर्रर्र कण तिच्या अंगावर काटा आला.... तिचा श्वास चढू लागलेला, त्याने जसा तिचा पदर बाजूला केला तिच्या छातीत धडधडायला लागले...
तिच्या कानात तो म्हणाला... "रुपाली मला तू खूप आवाडतेस... !! माझी होशील का...??"
ते एकूण रुपाली स्वतःशीच हस्ते... लाजते... "अजून किती तुझी व्हायची राहिली आहे रे... "
असे म्हणत ती त्याचा चेहरा हातात घेते आणि त्याच्या ओठावर ओठ टेकवणार तेच तिची नजर त्याच्याशी मिळते... तेच डोळे ... रुपाली दचकून त्याला मागे ढकलते... आणि घाबरून उठून बसते...
आज हि तिला दरदरून घाम फुटलेला... हे असे स्वप्न?? कोण होता तो? तिला प्रश्न पडत होते, ती पूर्ण आतून हलून गेली होती. इतकं वास्तववादी स्वप्न होतं, ह्यावर विश्वासच बसेना... पण एकीकडे स्वप्न होतं म्हणून कुठे तरी मनाला बरं सुद्धा वाटत होतं. वास्तवात ती असं काही करेल किंवा तिच्या हातून घडले तर ती स्वतःला कधी माफ करू नाही शकणार, आयुष सोबत दगा करायचा ती विचार हि मनात नव्हती आणू शकत मग हे असलं स्वप्न पडण्याचा काय अर्थ? विचारात असतांनाच ती बाजूला बघते तर आयुष नव्हता... घड्याळ पहिले तर रात्रीचे ३ वाजलेले...
"३!! वाजले... आयुष कुठे आहे?" तिच्या मनात प्रश्न आला... ती उठून त्याला बघू लागली, पण आयुष कुठेही दिसेना... त्याची ऑफिस ची बॅग हि नव्हती. आपल्याला फारच गाढ झोप लागलेली ह्याची जाणीव तिला होते
आणि काही विचार करण्याच्या आत तिच्या हातानी आयुष्य ला फोन लावला होता... पण फोन वाजत असून हि कोणी उचलत नव्हते. ती २-३ दा लावते. हळू हळू काळजी वाटू लागते. काय करायचे तिला काही समजत नाही. आनंद ला सांगावे म्हणून ती जाते...
समोर आरोही ला बघून रुपलाई संकोच करत तिला म्हणते.. "वाहिनी... " रुपाली आरोही ची झोप मोड केली म्हणून सॉरी म्हणते...
"रुपाली... अगं काय झालं?" आरोही डोळे चोळत तिला विचारते.
"वाहिनी, आयुष चा फोन लागत नाही आहे तो अजून घरी आला नाही आहे... मला काही कळत नाही आहे... दादा आहेत का? त्यांना माहित आहे का कुठे गेला आयुष ते?"
"आनंद तर रात्रीच घाई घाईत कुठे निघाले, मला काही बोललेच नाही... थांब मी फोन करते त्यांना ... " आरोही रुपाली ला बसायला सांगते आणि फोन आणायला जाते.
तिकडे पोलीस स्टेशन मध्ये...
"अहो.. सर तुमचा गैरसमाज झाला आहे काही तरी... प्लिज सोडा त्याला... " आनंद इन्स्पेक्टर ला समजावण्याचा प्रयत्न करत होता...
"हे बघा ते तर आता उद्याच कळले... "
"अहो पण गुन्हा काय आहे ते तरी कळेल का... आणि तुम्ही त्याला असं लॉकअप मध्ये कसं काय टाकू शकता?? काय पुरावा आहे तुमच्याकडे?"
"कोट्यवधी रुपयांचा फ्राड करणारे तुम्ही लोक... आता पुरावे मागता आम्हाला... येतोय हा येतोय... पुरावा पण येतोय.... सकाळ पर्यंत देतो तुमच्या हातात... "
"सर.. मला काय झालं आहे कळेल का??" आनंद जरा आपला सूर नामवंत म्हणला.
तितक्यात आनंद ला आरोही चा फोन आला...
"आनंद कुठे आहात तुम्ही?"
"आरोही मी इथे एका कामात अडकलोय... येतो मी सकाळ पर्यंत सांगतो मग आल्यावर सर्व... फोन वर नाही काही बोलू शकत... "
"बरं ... पण ते भाऊजी बद्दल माहित आहे का काही तुम्हाला?? ते अजून घरी नाही आलेत... आम्हाला खूप काळजी वाटतीय... "
"आम्हाला म्हणजे रुपाली पण आली का तिथे?"
"हो... तिनेच सांगितलं ना... "
"हे बघ... हा... आयुष माझ्या सोबत आहे... काळजी नका करू तुम्ही... " रुपाली आरोही ला आनंद काय बोलतोय विचारात असते ती अधीर होते आणि फोन तिच्या कडून घेते...
"दादा आयुष कुठे आहे माहित आहे का तुम्हला... मला खूप काळजी वाटत आहे... तो ठीक आहे कि नाही माहित नाही... फोन हि उचलत नाही आहे... "
फोन कसा उचलणार... त्याचा फोन तर जप्त आहे... आनंद स्वतःशीच बोलला... रुपाली ला काय उत्तर द्यावे विचार करत तो तिला म्हणाला... "हो हो... आहे आयुष हि माझ्या सोबत आहे... तुम्ही झोपा काळजी नका करू... " आनंद चा आवाज डगमगत होता आणि रुपाली ला त्यामुळे शंका आली...
"दादा सर्व ठीक आहे ना? तुम्ही कुठे आहात?"
"कुठे म्हणजे... हे माझ्या कंपनीत आहॊत आम्ही... "
"का? काय करताय तुम्ही इतक्य रात्रीचे तिथे... ?" तितक्यात त्या इन्स्पेक्टर चा कोणावर ओरडण्याचा आणि त्याला मारण्याचा आवाज होतो जो रुपाली ऐकते, "कोण आहे दादा तिकडे, का ओरडतायेत? मारामारी सुरु आहे का तिकडे? दादा तुम्ही कुठे आहात ना ? आयुष कुठे आहे... मला नीट कळेल का? मला खूप भीती वाटत आहे... प्लिज दादा ... "
"हो हो... हे बघ रुपाली... " आनंद चा नाईलाज होतो आणि त्याला सांगावे लागते
"आम्ही इथे पोलीस स्टेशन ला आलो आहे... ह्यांचा आयुष ला घेऊन काही तरी गैर समाज झाला आहे... मी बघतोय काय आहे ते... तुम्ही काळजी करू नका मी येतो आयुष ला घेऊन सकाळी..."
"पोलीस स्टेशन???" रुपाली स्तब्ध झाली... तिच्या तोंडून पोलीस स्टेशन चे नाव ऐकून आरोही हि घाबरली...
"हॅलो... रुपाली... काळजी करू नका आणि घरी सध्या कोणाला काही सांगू नका... हॅलो... ऐकताय का??"
"दादा... मला आयुष शी बोलायचं... "
आनंद आता काय सांगणार... आयुष लॉकअप मध्ये आहे बोलला तर ती अजूनच काळजी करेल... "तो इन्स्पेक्टर शी बोलतोय... मी आता नाही देऊ शकत त्याला... "
"कुठे आहात तुम्ही मला सांगा... मी आता येते तिकडे..."
"हे बघ रुपाली... मी आहे ना.. तू नको काळजी करू... मी घेऊन येतो त्याला सकाळी घरी..."
"सकाळी का..?? आता का नाही??"
"ते ज्यानी तक्रार केली आहे त्याच्या विरुद्ध ती व्यक्ती सकाळी येत आहे... "
"कसली तक्रार आहे दादा ???"
"मी हि तेच माहिती करायचा प्रयत्न करतोय पण इथे कोणी उत्तर देईल कोणाला तर कळेल ना... तू काळजी नको करू मी सर्व कळवतो तुम्हाला मला कळले कि... आणि घरी तेव्हढं सांभाळा... चल चल ते आले इन्स्पेक्टर मी बोलतो त्यांच्याशी... " असे म्हणत आनंद फोन ठेवतो...
रुपाली ला डोळ्या पुढे अंधारी येणेच बाकी होते... आरोही तिला सांभाळते आणि बेडवर बसायला लावते, ती पाणी देत रुपाली ला म्हणते... "आनंद आहेत ना तिथे... तू काळजी नको करू. नक्कीच काही गैरसमज झाला असेल... " रुपाली आपला चेहरा हातात घेऊन खाली मान घालून बसलेली...
"वाहिनी मला काही कळत नाही आहे... आयुष येईल ना ठीक परत... "
"हो ग... " आरोही तिला जवळ घेत म्हणाली... तिला धीर देत होती पण स्वतःच्या मनात हि शंका होत्याच...
रुपाली आरोही जवळच बसून राहते, मनात सुरु असलेल्या विचारांना शांत करायचा प्रयत्न करत कसा बसा वेळ काढायचा प्रयत्न करत असतात. सकाळ कधी होते आणि कधी आयुष घरी परत येईल असे झाले होते दोघीना ... तो घरी आला कि हे विचारांचे चक्र थांबेल तरी... असं वाटत होत सारखं त्यांना...
सकाळी...
"आई... आज तू सोडणार शाळेला..." क्यू तयार होतांना म्हणाली...
"हो शोना...आज आई सोडणार..." रुपाली आपल्या आवाजात आनंद आण्याचा प्रयत्न करत म्हणाली..
"का बाबा कुठे आहे? रोज तो सोडतो न..."
रुपाली त्या प्रश्नानी दचकली... काही विचार करत म्हणाली... "क्यू बाबा ला ना ऑपरेशन आले अचानक.. मग जावे लागले ना.. म्हणून आज आई सोडणार.. क्यू ला आई नि सोडलेलं नाही चालणार का?" रुपाली तिची पोनी घालून देत म्हणाली.
क्यू तशी तिच्या कडे वळते आणि म्हणते... "चालेल ... का धावेल ना क्यू ची आई फेव्हरेट आहे ना... " असे म्हणत ती रुपाली ला गालावर किसी देते आणि म्हणते... "आय लव्ह यु टू आई... !!"
रुपाली त्या वाक्य नि भानावर येते... आज तिनी क्यू ला आय लव्ह यु म्हण्टलेच नाही... ती स्वतःला रागावते आणि मग क्यू ला जवळ घेत म्हणते... "आय लव्ह यु बेटा!!"
रुपाली घाई घाई नि क्यू आणि ध्रुव ला शाळेत सोडते. आणि मग तिथून आनंद ला फोन करते... त्यानी सांगितलेल्या पोलीस स्टेशन ला जमेल तितकं लवकर पोचते...
पोलीस स्टेशन ला पोचल्यावर तिथे आनंद, इन्स्पेक्टर आणि ऐक पांढरा कोट घातलेला माणूस गॉगल लावून बसलेले दिसतात आणि ते काही चर्चा करत होते, आयुष तिला तिथे दिसत नाही... ती पटकन आनंद कडे जाते आणि त्याला विचारते... "दादा आयुष कुठे आहे..."
आनंद ऐक सुस्कारा सोडत तिला लॉक उप कडे दाखवतो... आयुष जमिनीवर आपल्या गुडघ्यावर डोकं ठेवून बसला होता. रुपाली त्याच्या जवळ जाते... "आयुष!! काय हे... काय झाले तू इथे का??? आणि मला का नाही कळवलेस... ??"
"रुप्स... तू इथे कशाला आली...? दादा नि सांगितले ना आम्ही येतो घरी... "
"आधी मला सांग काय झाले आहे... मला खूप काळजी वाटत होती... "
आयुष तिच्या कडे बघतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो... "रुप्स... मी काहीच केले नाही आहे... आणि हे सांगत हि नाहीत अजून काय झाले ते..."
आयुष चा हात हातात घेत रुपाली म्हणते..."हे बघ... मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे... आणि मी कायम तुझ्या सोबत आहे... मग हे तुझ्यावर कसला का आरोप करेनात ... "
तितक्यात ऐक कॉन्स्टेबल येऊन आयुष ला बाहेर यायला सांगतो... आणि मग ते दोघे तिथे सुरु असलेल्या चर्चेत सामील होतात...
आनंद आयुष कडे उदास चेहऱ्याने बघतो... आयुष ला त्यामुळे काय चालू आहे काही कळत नाही... त्याला आनंद पुढे म्हणतो ... "आयुष हे इन्शुरन्स कंपनीतुन आलेत... त्यांची अशी तुझ्या विरुद्ध तक्रार आहे कि काव्य जिवंत असतांना हि तू तिला मृत घोषित केले आणि त्यांच्या कंपनी कडून विम्याचे पैसे लुबाडले..."
"काय!!!" रुपाली आणि आयुष दोघे हि एक्दम रिऍक्ट झाले...
"हॅलो... मिस्टर तुम्ही जे पण आहात... तुम्हाला सत्य माहित तरी आहे का??? आम्ही काही पैसे लुबाडले नाही... " रुपाली रागा रागात त्याला बोलू लागली... रुपाली त्याच्या शी भांड्याच्या सुरात बोलत होती आणि त्याने जणू तो मंत्रमुग्ध संगीत ऐकत असावे असे चेहऱ्यावर हसू ठेवले होते... रुपाली आपले बोलून झाल्यावर त्याला विचारते.. "कळले का??" तसं तो आपला गॉगल काढतो... त्याचा गॉगल उतरताच रुपाली स्तब्ध होते... तेच डोळे... हो हे तेच डोळे होते जे तिला सारखे दिसत होते... तिला छळत होते. दिवस काय रात्र काय त्याच्या डोळ्यात बघून रुपाली च्या मनात वेगळेच विचार सुरु झाले... तिला न कळतच त्याचा राग येऊ लागला... त्याने काहीच केले नव्हते अजून तरी तिला त्याचा तिरस्कार वाटू लागला...
त्याचा चेहरा हि बघावासा वाटेना... तिला त्याच्या समोर उभे राहणे कठीण होऊ लागले... त्यात तिला आज सकाळी पडलेलं स्वप्न आठवून तर स्वतःचीच लाज वाटू लागली...
रुपाली मनात सुरु असलेल्या द्वंद्व शी सामना देत होती तेव्हा आयुष आणि आनंद त्या माणसाला समजावण्याचा प्रयत्न करत होते...
"हे बघा मिस्टर पीटर... काव्या खरंच सुसाईड करायला गेली होती पण नंतर ती वाचली... म्हणजे हे तेव्हा आम्हाला माहित नव्हते... " आनंद चा पूर्ण गोंधळ उडालेला... त्याला कसं समजवावं...?? पण पीटर च हि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते त्याचे लक्ष होते ते रुपाली कडे...
आनंद आणि आयुष चे बोलणे संपते तेव्हा पीटर त्या इन्स्पेक्टर कडे बघतो आणि म्हणतो... "सर... आमची कंपनी ह्यांना ४८ तासांची मुदत देऊ इच्छित आहे, हे निर्दोष आहेत हे सिद्ध करण्या साठी... जर ४८ तासात सिद्द करू शकले तर ठीक... नाही तर मी तक्रार लेखी नोंदवेल..." तो रुपाली कडे बघत कुत्सित हसत म्हणाला.
"म्हणजे अजून तुम्ही लेखी तक्रार नोंदवली नव्हती... " आनंद रागाने त्याच्या कडे बघून म्हणाला... मग इन्स्पेक्टर कडे बघून म्हणाला ... "हे तुम्ही ठीक नाही केले सर... माझा भाऊ ह्या शहरातला खूप मोठा नयूरो सुर्जन आहे... त्याचे हि नाव आहे, तुम्ही तक्रार नसतांना त्याला अटक कसे करू शकता... "
पीटर त्याला चुटकी वाजवत आपल्या कडे बघायला लावतो आणि म्हणतो... "काही गोष्टी नवा गावाच्या पलीकडे असतात राजा.... " मग तो रुपाली कडे बघतो... "तुम्हाला ह्या सर्वातून मी बाहेर काढू शकतो... संध्याकाळी भेटा मला... क्लब 'टल्ली ट्विस्ट' मध्ये..." तो त्यांना आपले कार्ड हातात देत म्हणाला मग रुपाली कडे वळून म्हणतो... "तुम्हाला माझ्या कडून स्पेशिअल इन्व्हिटेशन मॅडम... याल ना...??"
रुपाली रागाने फणफणतच त्यांच्या कडे बघते... तो तिथून निघून जातो...
आनंद इन्स्पेक्टर ला रागाने बघत होता... "आम्ही काही नाही करू शकत साहेब... आम्हाला वरून जे करायला सांगतात ते करावे लागते... "
ते तिघे तिथून घरी जायला निघतात... सर्वांच्या डोक्यात आपण काय ऐकले ते घुटमळत होते...
रुपाली आयुष कडे बघते... एकाच दिवसात त्याचा चेहरा उतरला होता "आयुष... मला सांगितले का नाहीस... मी किती काळजीत होते ... "
"काय सांगणार बघ तुला?? मलाच आता कळतंय सर्व... "
"आता काय आयुष?? कसं सिद्ध करणार आपण तू निर्दोष आहेस..."
"हम्म... तसं पाहिलं तर आपल्या कडून फ्राड तर झाला आहे ना... काव्या जिवंत असतांना तिच्या विमा चे पैसे उचलले होते... "
"अरे पण ते तर नंतर कळले ना... तेव्हा तुम्हाला कुठे माहित होते ती जिवंत आहे..."
"हम्म... तेच तर आहे ना... तेच सिद्ध करावे लागेल.. "
"कसं करणार...??"
"बघू काय होते ते... निघेल काही मार्ग... बोलावले आहे ना त्यानी आपल्याला संध्याकाळी..." आयुष त्या पीटर चे कार्ड बघत म्हणाला...
"काय हे नवीन आता... " रुपाली स्वतःशी बोलली आणि मग आयुष च्या खांद्यावर डोकं ठेवून बसते... त्याचा हात हातात घेते आणि म्हणते... "आयुष मला सोडून कुठे जाणार नाहीस ना... "
"नाही ग राणी मी कायम इथेच आहे तुझ्या सोबत..."
"तू काळजी करू नकॊस... सर्व ठीक होईल... मी तुला काही होऊ देणार नाही... " रुपाली त्याला बिलगत म्हणाली...
"माला माहीत आहे ते... " आयुष तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला.
क्रमश:
----------
फ्रेंड्स,
काही तांत्रिक अडचणी मुळे तुम्हाला मागचा भाग दिसत नसेल तर प्लिज menishigandha .ब्लॉगस्पॉट.कॉम वर वाचा.. मी बऱ्याच दा पुनः प्रकाशित करायचा प्रयत्न केला...
प्रतिलिपी वर हे असे प्रॉब्लेम का सुरु झालेत माहित नाही... माझा काल फोन मध्ये सिस्टिम उपडेट झाला त्यात सर्व अँप उपडेट झालेत त्या मुळे हे होतंय का माहित नाही... तू भेट ना चा ३४ पार्ट च्या वेळेस हि अशीच अडचण आली होती आणि तेव्हा सुद्धा माझा फोन उपडेट झाला होता.
तुम्हाला झालेल्या त्रासबद्दल क्षमस्व आहे...
आणि हो मी आता २ दिवस नाही आहे. पुढचा भाग आता ४ तारखेला टाकेल...
कशी वाटत आहे कथा?
अभिप्राय नक्की कळवा...
वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व ३ (श्वास माझा होशील का...?)
- निशी