Friday, July 12, 2019

क्षितिजा पलीकडचे


"आदी... आज कुठला दिवस आहे आठवते का तुला... चल लवकर उठ" तिचा आवाज ऐकून आदी नि स्वतःला पांघरुणात झाकून घेतले.. त्याला त्या २ मिनिटात भरपूर मनसोक्त झोप घ्याची होती. त्याला माहित होते ती लगेच नेहमीप्रमाणे तिथे येईल, त्याचे पांघरून काढून त्याची सकाळची गोड किस घेईल... आणि त्याच्या दिवसाची गोड सुरवात होईल, त्याला जाणीव होत होती कि ती रूम मध्ये आली आहे आणि साऱ्या वस्तू आवारात आहे... कधी कधी तर तो त्या सकाळच्या किस साठी झोपायचे नाटक करत रहायचा.

"आदी... शोना उठ ना.. आज कोणता दिवस आहे? कुठे जायचे .. आहे आठवते का... " त्याला फ़ुटबाँल रॅक मध्ये ठेवत तिने आवाज दिला, त्याच्या बेडशेजारी येऊन बसली आणि त्याच्या तोंडावरून पांघरून काढले, तिच्या सुगंधाने आदी चा श्वास भरून गेला, मनभरून त्याला बघितल्यावर तिने त्याला त्याची इतक्या वेळ वाट पाहत असलेली किस दिली. पण आदी चे कसले पोट भरते... तो घट्ट डोळे बंद करून परत झोपण्याचे नाटक करू लागला... त्याचे ते नाटक बघून ती थोडं आपला स्वर वाढवत म्हणाली, "मला माहित आहे आदी तू जागा आहेस... लवकर उठलास तर बरं होईल.. उठ आणि ...."

तिचे वाक्य पूर्ण होण्या आधी आदी उठून बसला आणि म्हणाला, "आई... तुला कसे कळते ग आधीच सगळे... " आदी पांघरून बाजूला करत म्हणाला.

"कारण मी तुझी आई आहे... " असे म्हणतात सायली नि त्याला कडेवर उचलून घेतले आणि बाथरूम मध्ये घेऊन गेली.. त्याला तयार करून देत त्याच्या मनातल्या साऱ्या प्रश्नांचे जमेल तसे उत्तर देते. सायली त्याला पटपट भरवून तयार ठेवते. तितक्यात आर्यन येतो.. "मग चॅम्प तयार का आजच्या मोठ्या दिवसासाठी..."

"हो!! " आदी त्याला टाळी देत म्हणाला. "तू पण येणार आहेस पप्पा..."

"बिलकुल... माझ्या शोन्याचा आज शाळेचा पहिला दिवस आणि मी नाही येणार!!" असे म्हणत ते सर्व कार मध्ये बसतात आणि शाळेला जायला निघतात.



आर्यन आणि सायली नुकतेच बदली होऊन दिल्ली ला आले होते. त्यांनी आपल्या  ५ वर्षाच्या मुलाचे म्हणजे आदी चा दाखला एका नामांकित शाळेत करून घेतला होता आणि आज त्याचा शाळेचा पहिला दिवस होता.... आदी नि आपल्या शिक्षिकेला दह्याला बागेतले एक गुलाबाचे फुल घेतले असते.त्याला शाळेत सोडून आर्यन आणि सायली निघून जातात. आर्यन शाळेत आपल्या शिक्षिकेला गुलाबाचे फुल देण्याकरिता त्यांची वाट पाहत बाहेर थांबला असतो,... त्याच्या बाजूला एक मुलगी उभी असते, टपोरे डोळे, दोन वेण्या घातलेली, नाजूक बांधा  तिच्या हि हातात गुलाबाचे फुल असते... त्याचं हातातले फुल बघून ती गोड हस्ते आणि विचारते "तू हे रिया मॅम ला द्यायला आणले आहे.." आदी मान हलवून हो म्हणतो. "मी पण..." तीच पुढे म्हणते.

तितक्यात रिया मॅम येतात त्या दोघांकडून फुल घेऊन त्या दोघांना धन्यवाद देतात. वर्ग सुरु होतो... आदी न कळतच जाऊन त्या मुलीच्या शेजारी बसतो... ती त्याला आपला हाथ देत म्हणते, "हाय, मी विराली ..."

"हाय... माझे नाव आदी..." ती परत त्याला छान गोड स्माईल देते.



त्यांच्या मैत्रीची सुरवात होते, रोज दोघे एकमेकांशेजारी बसायचे... दोघे हि हुशार, कोणता हि प्रश्न विचारला कि वर्गात पहिले उत्तर त्यांच्या कडूनच मिळणार... खेळ असो कि अभ्यास साऱ्या शाळेत दोनच नाव असायचे आदी नि विराली. दोघांना हि जिंकायची जितकी सवय झाली असते तितकीच एकमेकांची सवय झाली असते. हळू हळू दोघे मोठे होतात... १०... १२.. दोघे उत्तम गुण घेऊन पास होतात... दोघांच्या हि मनात त्यांना माहित होते आपण एकमेकांवर प्रेम करतो पण ते प्रेम अव्यक्त होते. शेवटी एक दिवस येतो जेव्हा आदी आपल्या मनातले विरली  ला एका कागद वर लिहून देतो आणि घरी जाऊन वाचून उत्तर सांगायला सांगतो... त्या दिवशी आदी पहिल्यांदा तिची ती झुकलेली नजर बघतो... नाही तर विराली  नेहमी तोर्यातच असायची... कदाचित आज तिला वाचण्याआधीच माहित होते त्या चिट्ठीत काय लिहिले होते... घरी जाऊन कधी वाचते असे तिला झालेलले... घरी पोचल्या क्षणी ती आपल्या खोलीत धावून जाते आणि दार लावून घेते... हृदयाची धडधड वाढलेली... हातात गुंडाळून ठेवलेली ती चिट्ठी तिने नीट बघितली थरथरत्या हाताने तिने ती उघडली, डोळ्यां पुढे अक्षर होते पण काही समजेना...

थोडं स्वतःला सावरत मग ती वाचू लागली,



पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते... 
कोण ग तो तुझा म्हटल्यावर गुलाबी झालेले गाल बघून 
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते.... 
रोज निरोप घेताना पुन्हा कधी भेटशील म्हणताना पाणावलेले डोळे आणि कपकपनारा कंठ बघून 
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते.... 
कारण नसताना तासभर फोनवर भांडायच स्वतः राग करून फोनही ठेवायचं फोन ठेवल्यानंतर मिनिटात आलेला मँसेज बघून 
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते.... 
नकळत स्पर्श झाल्यावर तुझ्या हृदयाचा चुकणार ठोका आणि थरथरणारे ओठ बघून 
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटत....
मला पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते... तुला??



मनात कारंजे... प्रेमाची जादू परत परत ती ते शब्ध वाचते, खूप विचार करून आपले उत्तर लिहिते..



माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे आहे, एक असा कागद ज्यावर तू तुझी भावनालिहू शकतेस , तुझा राग खरडू शकतेस ,तुझे आश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतेस , फक्त वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैव तुझ्याबरोबर राहायचे आहे. पण हो, जर तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उब मिळविण्यासाठी तू मला जाळू शकतेस.....



.... दोघांची मैत्री आता प्रेमाचे रूप घेते... दोघांच्या घरी सांगण्याचे ठरवतात. दोघांचे घरचे त्यांच्या मर्जी खातर लग्नाला तयार होतात आणि भेटायला तयार असतात. दोघांच्या आनंदाचे पारे नसते. भेटण्याची वेळ आणि दिवस ठरतो तसे विराली आपल्या आई बाबांना घेऊन कॅफे शॉप मध्ये येऊन बसली असते. ती आपल्या आई बाबांना आनंदाने आदी बद्दल सांगत असते कसा तो तिला समजून घेतो आणि ते दोघे किती एकसारखे आहेत... त्यांची जोडी तर वरून देवानेच बनवून पाठवली आहे. विरालीचे गोड कौतुक अजून संपलेच नसते जेव्हा तिला समोरून आदी आपल्या आई बाबा सोबत येताना दिसतो... ती आपल्या आई बाबांना त्याची आणि त्याच्या आई बाबा शी ओळख करून देते...

"सायली??"

"पायल!!" दोघी एकमेकीला बघून प्रश्नार्थी नजरेने बघतात. आणि लगेच दोघी म्हणतात... "नाही नाही... हे लग्न शक्य नाही... "

"हो मुळीच नाही... हे लग्न शक्य नाही..."

एवढे म्हणून दोघी आप आपल्या नवऱ्याला घेऊन तिथून निघून जातात... विराली आणि आदी ला काही समजण्याच्या आत त्यांनी पाहिलेली स्वप्न तुटली असतात...

"अरे पण का शक्य नाही हे लग्न... काही कारण तर हवे ना..." विराली रागारागाने म्हणाली...

"तेच ना... काही न सांगता निघून गेल्या... मला वाटते त्या आधीपासून ओळखतात एकमेकीला..." आदी आपली शंका व्यक्त करत म्हणाला... दोघांचे डोके चालू लागते... "हम्म... ह्या एकमिकीच्या शत्रू असतील...."

"नाही.. रे... सांगितले असते ना मग त्यांनी ... मला काही तरी घोळ वाटतोय..." विराली गहण विचार करत म्हणाली...

 बरेच दिवस दोघे कारण जाणून घेण्याचे प्रयन्त करू लागतात पण सर्व व्यर्थ... विराली साठी स्थळ येऊ लागतात पण तीने स्पष्ट केले असते लग्न करेन तर आदी शी नाही तर लग्न नाही करणार...

विराली च्या हट्टापायी पायल ला हार मानावी लागते...

"ठीक आहे.. तयार राहा... उद्या तुला कुठे न्याचे आहे... "

"मी कुठेच येणार नाही..." विराली उर्मटपणे उतर देते...

"आदी ला हि घेऊन ये... त्याच्या आई बाबा सोबत... तुला कारण हवे ना मी का ह्या लग्नाला नाही म्हणत आहे... उद्या कळेल.." ते एकूण विराली डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली... "खरं?? ठीक आहे..."



दुसऱ्या दिवशी आदी आपल्या आई बाबांना घेऊन विराली च्या घरी येतो...

सायली पायल च्या कानात काही कुजबुजत... "तुला नक्की खात्री आहे तुला ह्यांना सर्व काही सत्य सांगायचे आहे??" तिचे वाक्य ऐकून पायल म्हणते, "त्या शिवाय हि मुलगी काही लग्न करणार नाही..."



सर्व आपल्या गाड्या काढतात आणि निघतात... "आपण कुठे चाललोय आई.. एवढा काय सस्पेन्स?"

"पुण्याला..."

"काय?? पुण्याला... का पण... "

"कळेल म्हणले ना... तिथे "

सगळे विमानाने पुण्याला येतात, पुण्याला पोचल्यावर पायल सगळ्यांना एका प्रयोग शाळेत घेऊन जाते, संशोधन लॅब खूप मोठी असते आणि आधुनिक उपकरणांनी पूर्ण असते, पायल तिथल्या रिसेप्टिनिस्ट ला सांगते, "डॉक्टर आचार्य आहेत का? त्यांना सांगा पायल सिन्हा त्यांना भेटायला आल्या आहते."

"मॅडम सर खूप बिझी असतात त्यांची आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल..."

"मी त्यांना फोन वर बोलले होते त्यांनीच आज यायला सांगितले होते.." पायल स्पष्टीकरण देत म्हणाली.

ती एक कॉल करते आणि मग त्यांना आत जायला सांगते... त्यांच्या सोबत तिथला एक कर्मचारी येतो त्यांना तो आपल्या मागे यायला सांगतो... विराली आणि आदी इतकी आधुनिक लॅब बघून दंग राहतात, त्यांची उत्सुकता पूर्ण ताणली गेली असते कि त्यांच्या लग्नाचा आणि ह्या माणसाचा काय संबंध आहे...

एका केबिन मध्ये आणून त्यांना बसायला सांगून तो कर्मचारी निघून जातो. सर्व काही एकाद्या इंग्रजी चित्रपटात दाखवतात तसे सुरु असते त्या वातावरणात विराली घाबरलेली असते ती आदी च्या शेजारी उभी असते. तितक्यात आचार्य सर येतात, एक वृद्ध पुरुष डोळ्यावर भिंगाचा चष्मा, आपल्या पांढऱ्या केसांना मॅटचिंग असा पंधरा कोट घालून येतात, "अरे पायल... बऱ्याच दिवसांनी आलीस... बोल... काय झाले.. .काय म्हणत्वाचे बोलायचे होते तुला कि दिल्ली वरून पाहिलं विमान घेऊन आलीस इथे... " त्यांचे लक्ष केबिन मध्ये बसलेल्या बाकी लोकांकडे जाते... ते सायली ला बघून काही आठवण्याचा प्रयत्न करतात ... "उम्म्म ... मी आपल्याला कधी भेटलो आहे का... आज काळ काही लक्षात राहत नाही... "

"सर तुम्ही मला ओळखले नाही... मी सायली, पायल सोबत एक्सपिरिमेंट साठी यायचे..."

"अरे हो... तेच म्हणतो मी कुठे बघितले... कशे आहेत तुम्ही..."

"मी ठीक आहे सर... हे माझे मिस्टर आणि हा मुलगा आदी..."

"आदी... हम्म किती मोठा झाला... " तिच्या कानात काही खुसफुस करत ते  म्हणतात  ... "काही प्रॉब्लेम झाला का... ??"

सायली मान हलवून नाही असे सांगते.. ."मग तुम्ही सगळे इथे कसे काय..."

"सर... हि माझी मुलगी विराली..." पायल पुढे बोलत म्हणाली..

"विराली... आठवते मला ह्या दोघांना जन्मल्या जन्मल्या हातात घेतलेले.. " आचार्य सर जरा भारावून जात म्हणले...

"सर... हे दोघे आता लग्न करायचे म्हणतात ..."

"काही हि काय... ते शक्य नाही... " प्रश्न पूर्ण होण्या आधीच ते शक्यता लाथाडून लावतात...

"एक मिनिट... " विराली सगळ्यांना मध्ये थांबवत म्हणाली... "आम्हाला कोणी सांगेल का काय चाललेय? आपण इथे माझ्या आणि आदी च्या भविष्य बद्दल बोलतोय... "

तिला शांत करत आचार्य सर म्हणाले... "हो हो... सर्व काही सांगतो बेटा ... मला सांग तू कधी आजारी पडलीस का?"

खूप विचार करून विराली आठवायचा प्रयत्न करते पण आपण कधी आजारी पडलोय हे तिला आठवत नाही... ती सर्व काही आठवून संकोच व्यक्त करत नाही म्हणाली... आचार्य सर मग आदी कडे वळतात आणि त्याला हि तोच प्रश्न विचारात..."आदी तू??? कधी आजारी पडलास का??"

आदी नि आपले उत्तर विराली ला प्रश्न विचारला तेव्हाच तयार ठेवला होता पण त्याच्या मनात आता वेगळेच चक्र सुरु झाले... "आम्ही कधी आजारी पडलो नाही म्हणजे आम्ही माणूस नाही?? आम्ही मशीन किंवा रोबोट आहोत का?? म्हणजे तुम्ही आमच्यावर एक्सपिरिमेंट करत आहेत..."

"ह्म्म्म... बरोबर... तुझे हे जे विचार चक्र सुरु झाले ना.. तुझ्या बाबांना तरी हा विचार आला का कधी? आपली मुले आजारी पडत नाही... का ?? कधी विचार केला का त्यांनी?"

"मी एक रोबोट आहे?? शक्यच नाही... नाही नाही... मी हे मान्य करूच शकत नाही..." आदी स्वतः कडे निरखून बघू लागला...

"नाही नाही... तुम्ही रोबोट नाहीत बाळा... तुम्ही डिझायनर बेबी आहेत... ह्या जगातले पहिले वहिले..."

"काय??" आदी विराली दोघे एक्दम म्हणाले..

"आज पासून २५ वर्ष आधी ... " आचार्य सर त्यांना हकीकत सांगू लागले... " मी तरुण हुशार आणि ह्या जगावर आपली छाप सोडण्याच्या ठाम निश्चयाचा होतो... मला मानव जाती साठी खूप काही करायचे होते.. खूप कष्टानी मी असा उपाय शोधून काढला ज्याने मनुष्य स्वतः मध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकतील.. मी माझ्या वरिष्ठांशी बोललो त्यांना माझे संशोधन दाखवले... पण त्यांना ते नाही पटले.. पण मला स्वतःला सिद्ध करायचे होते मी पेपरात जाहिरात दिली, मला बराच  चांगला प्रतिसाद मिळाला, अश्या बऱ्याच स्त्रिया होत्या ज्यांना मूल हवे होते पण काही ना काही कारणांनी त्या ह्या सुखाला मुकल्या होत्या मी सगळ्यांचे काही टेस्ट केले आणि त्यातल्या १० जणींची निवड केलेली... त्यात तुमच्या आई ची निवड झाली होती... "

आदी आणि विराली एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते आपण काय ऐकतोय ह्या सर्व गोष्टींवर कसा विश्वास ठेवावा हेच कळेना...

सर पुढे बोलू लागले... "डिझायनर बेबी म्हणजे काय? आपल्या बाळाचे जिन्स आपण बदलून आपल्याला पाहिजे तश्या निवडायच्या, अश्या काही जिन्स ज्या अनुवांशिक आजार पुढच्या पिढीला देतात त्या बदलून टाकायच्या ज्याने पुढच्या पिढीला तो आजार होणारच नाही... थोडक्यात सांगायचे तर आपल्या बाळाचे डोळे कोणत्या रंगाचे व्हावेत, केस कसे असावेत, त्याचा रंग कसा हवा हे सर्व आपण ठरवू शकतो... त्याने आजी चे डोळे घ्यावे, आई चे ओठ, अत्याचा बोलकेपणा, बाबांचा मोकळेपणा... हे सर्व आपण त्याच्या जन्माच्या अगोदरच ठरवू शकतो... तुम्ही कधी कोणत्या स्पर्धेत भाग घेतलात आणि हरलात?" परत आदी आणि विराली आठवू लागतात पण त्यांना अशी कोणतीच स्पर्धा आठवत नाही... ते दोघे नकारार्थी मान हलवतात...

"कारण... मी सांगतो... तुमच्या मेंदूची ठेवण ह्या बाकी मुलांपेक्षा वेगळा आहे... तुमची आकलन शक्ती वेगळी आहे... तुम्ही म्हातारे झालात तरी तुमची मेंदूची आकलन शक्ती १६ वर्षाच्या व्यक्ती सारखी असेल... "



स्वतःच्या कानावर विश्वास बसे नासा झाला, आदी आणि विराली ला खुश व्हावे कि दुखी कळत नव्हते... "म्हणजे आज पर्यंत मी जे यश मिळवले आहे ते माझ्या मेहनतीच्या बळावर नाही तर मी बाकी मुलांच्या तुलनेने वेगळी रचना घेऊन जन्म घेतला म्हणून...?? बरोबर ना??"

"हो.. पण ह्या साठी तुम्ही आपल्या आई ला धन्यवाद दिला पाहिजे त्या जर माझे बोलणे समजावून घेऊन तयार झाल्या नसत्या तर हे शक्य नव्हते.. . म्हणजे आज च्या कळत आपण जिन्स, टेस्ट ट्यूब बेबी हे सर्व सर्वसाधारणपने ऐकतो पण आज पासून २५ वर्षे आधी हे सर्व काही नवीन होत कोणी आपल्या बाळा साठी इतके मोठे पाऊल उचलेल का ह्याची मला खात्री हि नव्हती... माझा प्रयोग यशस्वी झाला पण मी हे सर्व कायद्याने केले नसल्याने मी हे कोणाला सांगू शकलो नाही... पण माझ्या प्रयोगाचे यश हे तुमच्या यशात आहे..."



एक मोठा श्वास घेत सर शांत झाले...

विराली त्यांना म्हणली, "ठीक आहे आम्ही डिझायनर  बेबी आहोत पण त्याचा अर्थ असा तर नाही ना कि तुम्ही आमच्या कडून आमचे हक्क हिरावून घ्याल... आम्ही दोघे हि बलिग आहोत आणि लग्न करायचा आम्हाला हक्क आहे... "

"विराली... मी कुठे लग्न करू नका म्हणालो... ?? तुमचे आई बाबा तयार नाहीत... " ते सायली आणि पायल कडे बघतात...



आदी अजून हि गोंधळलेला असतो... "म्हणजे सर तुम्हाला असे म्हणायचे आहे कि डिझायनर बेबी ला जन्म द्यायला शारीरिक संबंध येण्याची गरज नाही... "

"हम्म ... बरोबर... पण ते तुमच्या हातात आहे... त्या काळात हि नैसार्गिग गर्भधारणा होऊन प्रसूती होऊ शकेल..." त्यांनी मान होकारार्थी हलवली...


"कोण नैसार्गिग रित्या जन्म देईल? कोणाला हवे असेल कि आपले मूल आजारी पडावे अश्या जगात जिथे बाकी सगळे रोग प्रतिकारक शक्ती घेऊन जन्माला येतील? नाही... कोणालाच नाही वाटणार... पण मग अश्या प्रयोगाचा काय उपयोग ज्याने जगातून प्रेम संपून जाईल.. ?? मी मान्य करतो तुमच्या ह्या प्रयोग मुले आपण माणुसकीची खूप मदत करू शकू... पण काय तुम्ही हा विचार केला कि प्रेमाशिवाय ह्या जगाचे काय होईल..??? आपण श्रुष्टि च्या नियम विरुद्ध वागतोय?"

"हम्म... अगदी बरोबर म्हणतोस तू... कदाचित मी जेव्हा हा प्रयोग हातात घेतला तेव्हा मी इतका प्रौढ विचार करत नव्हतो... म्हणूनच माझ्या वरिष्ठानी ह्याला सहमती दिली नाही..." ते जरा शांत बसतात आचार्य सरांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते ... ते पुढे म्हणतात, ".. पण तुम्ही आता दोन्ही ध्येय सद्य करू शकता... "



"काय कसे??"

"तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता... बरोबर??"

"हो..." दोघे ठामपणे सांगतात ...

"म्हणजे तुमची संतती तुमच्या प्रेमातून उत्पन्न होईल??"

"अर्थात... पण त्या साठी आधी लग्न करावे लागेल..." विराली व्यंग्यात्मक म्हणाली...

"काळजी करू नका... मी देतो लावून तुमचे लग्न... " त्यांचे बोलणे ऐकून दोघांचा चेहरा खुलला...

"कसे... तयार कसे कराल ह्यांना..." आदी त्यांच्या कानात फुसफुसला...

थोडा विचार करत ते पुढे म्हणले... "आपण एक प्रयोग करू... " त्यांचे ते वाक्य ऐकून सायली आणि पायल दोघी काळजी नि एकमेकींना बघतात...

"हे बघा.. .तुम्ही काळजी करायचे काहीच कारण नाही... आता धोका पत्करायची तयारी ह्या दोघांची हवी..."

"धोका?? कसला धोका..." विराली घाबरून म्हणाली

"धोका नाही खरं तर ... मज्जा मज्जा आहे... "

"सर... प्लिज नीट सांगा... काहीच कळत नाहीय..." आदी काळजीने म्हणाला.

आपल्या डोक्यातली भारी कल्पना सगळयांना ते सांगू लागतात त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज असते..."बघा... तुमची संतती प्रेमानी जन्म घेईल... आणि त्या संततीत तुमचे जिन्स येतील ह्याचा अर्थ तुमच्या मधले गुण सर्व त्यांच्या येतील... रोग प्रतिकारक शक्ती.. बुद्धी, शक्ती सर्व काही .. म्हणजे... तुमच्या पासून जे सुरु होईल ती एक अशी दुनिया असेल ज्यांना आजार होणारच नाही आणि त्यांचा जन्म सुद्धा नैसर्गिक रित्या होईल... म्हणजेच त्यांना  बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड मिळेल... तुम्ही त्या नवीन जगाचे ऍडम अन इव्ह असाल...."



सर्व ते ऐकून जणू मोहूनच जातात आदी आणि विराली तर आधीपासूनच तयार असतात आणि आता हे सर्व कळल्यावर तर ठामपणे एकमेकांसाठी उभे राहतात.

त्यांचे आई बाबा हि तयार होतात...थाटामाटात त्यांचे लग्न लावून देतात ...

दोघांना आपल्या पहिल्या रात्रीचे वेध लागले असतात ...



"ये चंद्राला या जागवू या जरा... ये रातीला या चातुया जरा.. संगतीने खेळू खेळ हा... सर सर मावळतो वेळ हा...  घे जवळ तू मला मी तुला पांघरू मधाहुनी मधुर मेल हा... सर सर मावळतो वेळ हा... "



आणि... ती वेळ येते जेव्हा विराली सगळ्यांना ती गोड बातमी ... काही दिवसांनी ती एका गोंडस मुलीला जन्म देते आणि अश्या प्रकारे सुरवात होते एका अश्या विश्वाचे जिथे रोग नाहीत... रोगी नाहीत... 1000



कदाचित असे हे जग ह्या क्षितिजा पलीकडे कुठेतरी आहे...

आज पासून १००० वर्षानंतर आपल्या सगळीकडे सगळे असेच जिन्स बदललेली माणसे असतील...

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...