ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ४
==================
पाटील साहिबांचा वाईट अनुभव आल्यामुळे रंजीत ने कानाला खडा लावलेला या पुढे पाहुण्यांना घरी बोलवणार त्याच्या आधी रुपालीचे सत्य सांगणार, शिवानी नि सांगितल्याप्रमाणे रंजीत ने रुपाली चा लग्नाच्या संकेतस्थळी नाव सुद्धा नोंदवले.
दिवसा मागून दिवस निघून गेले, रंजीत च्या हि लक्षात आले कि शिवानी चे म्हणणे बरोबर होते. कोणत्याच स्थळ ची बोलणी पुढे जात नव्हती. रंजीत ला आश्चर्य वाटत होते कि आज च्या जगात हि अशी लोक आहेत. आपल्या विचारात मग्न रंजीत व्हरांड्यात बसला असताना शिवानी तिथे आली, त्याला गंभीर बघून ती म्हणाली, "काय झाले, एवढा कसला गहाण विचार करतोस?"
रंजीतने दचकून तिच्याकडे बघितले आणि मान हलवून म्हणाला, "काही नाही असच..."
"असच कसं काय? काही नाही... सांग ना.."
"अगं खरंच काही नाही यार, मी फक्त रुपाली च्या लग्नाची काळजी करत होतो... मला आता थोडी काळजी वाटू लागली आहे.. "
शिवानी त्याला धीर देत म्हणते, "काळजी करून काय होणार आहे, त्याने ना हि रुपाली चे लग्न लवकर जमणार आहे ना हि लोकांची वृत्ती बदलणार आहे... "
तिच्या मताशी सहमत होत तो पुढे म्हणाला, "हो ते सर्व ठीक आहे पण काळजी वाटण हि स्वाभाविक आहे ना..."
शिवानी त्याच्या शेजारी बसते आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हणते, "हे बघ, जसे ह्या जगात अशी लोक आहेत जे रुपाली च दुसरं लग्न आहे हे ऐकताच पळ काढतात, कुठेतरी रुपाली साठी कोणी तरी वाट हि बघत आहे. आपल्याला फक्त धीर धरावा लागणार आहे. आणि तसं हि रुपाली च वय आहेच किती आता.. तू त्यामुळे वाट बघ त्या व्यक्तीची ज्याला रुपाली साठी बनवले आहे..."
"ते सर्व ठीक आहे... पण बघता बघता आता वर्ष होईल अशीच दिवस गेली तर?? आपल्याला लवकरच काही करावे लागणार आहे..." रंजीत च्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती...
इतक्या लोकांचा नकार आलेला बघून रुपाली चा लग्नाचा हुरूप हि उडून गेलेला... तिला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला होतो...
एक दिवस रंजीत बागेत झाडांची काम करत बसला होता, त्याला एक फोन आला हाथ खराब असल्यामुळे त्याला फोन उचलायला वेळ लागतो, खिशातला फोन कसा बसा काढून तो त्यावरचा नंबर बघतो, landline चा नंबर असतो आश्चर्य वाटून तो स्वतःशी बोलतो, "मुंबई वरून कोण आठवण काढत आहे माझी?" शंका करताच तो फोन उचलतो आणि कानाला लावतो, "हॅलो"
"रंजीत बोलताय का?"
"हो, आपण कोण?"
"मी देसाई बोलतोय, मी तुमच्या मुलीचा प्रोफाइल बघितला मॅट्रिमोनी साईटवर"
समोरच्याचे ते वाक्य एकूण रंजीत ला इतका आनंद होतो, कोणी तरी फोन केला ह्याचाच त्याला आनंद जास्ती... तो धावत शिवानी कडे जातो... "शिवानी शिवानी.... " तिला हाक मारतो, ती स्वयंपाकघरात काम करत असते, तो लगेच फोन च स्पीकर चालू करतो... "ऐक... रुपाली साठी स्थळ आलंय..."
शिवानी हि आंनदाने ऐकते.. "हॅलो... तुम्ही आहेत का?? हॅलो...."
"हो हो.. बोला ना देसाई साहेब..." रंजीत आपण ऐकत असल्याचे आश्वासन देतो.
"तर मी तुमच्या मुलीचा प्रोफाइल बघितला, आम्हाला पुढे बोलणी करायची आहे... तर पुढे जाण्या अगोदर तुम्ही पण आमच्या मुलाचा प्रोफाइल बघून घ्या"
"हो चालेल" रंजीत आनंदाने सांगतो... शिवानी त्याला त्यांच्या मुलाचं नाव वगैरे विचार म्हणून आठवण करून देते..
"माझ्या मुलाचे नाव आयुष देसाई आणि त्याचा प्रोफाइल id ५६७३४२ आहे."
"ठीक आहे मी बघतो आणि कळवतो.... "
ठीक आहे म्हणत ते फोन ठेवणार इतक्यात रंजीत ला लक्षात आले फोने मुंबई वरून आलाय... "देसाई जी... ऐक ऐक मिनिट, तुम्ही मुंबई ला असता का?"
"हो, आम्ही मुंबई ला आहोत... काही अडचण आहे का.."
"नाही .. मी सहजच विचारलं, कळवतो मी तुम्हाला... " फोन ठेवल्या बरोबर शिवानी त्याला लॅपटॉप घेऊन ये सांगते...
"अगं हो मला जरा हाथ धुवून घेऊ दे " तो तिला आपले माती नि भरलेले हाथ दाखवत म्हणतो... लगबगीने जाऊन तो हाथ धुवून लॅपटॉप घेऊन येतो... साईट लोड होईपर्यंत दोघांनाही दम निघत नाही... "शी बाई... किती वेळ... "
"अगं हो ना... मला ऐक प्रश्न आहे... आज कोण landline वापरत गं"
"का.. आज हि कंपन्यांमध्ये दुकानांमध्ये landline वापरतात ना..." शिवानी स्पष्टीकरण देत म्हणाली
"इतक्या सकाळी कोण दुकानातून फोन करेन... म्हणजे त्यांच्या कडे स्वतःचा मोबाईल हि नाही... गरीब असतील का गं ते?? रुपाली खुश राहील ना..."
शिवानी त्याच्या प्रश्नांना आश्चर्याने डोळे मोठे करून बघते... "रंजीत... आता फक्त स्थळ आले आहे.. तू तर तिच्या सासरी जाऊन आलास मला वाटतंय... इतकी काय घाई.. आणि आपण हो सगळं व्यवस्तीत असल्यावरच म्हणायचे आहे... " शिवानी त्याला बजावते...त्याचा उतावीळ पणा तिला खटकतो...तितक्यात साईट लोड झाली असते.
"अरे टाक ना त्याचा आयडी... " शिवानी अधीर होत म्हणते. रंजीत त्यांनी लिहून घेतलेला आयडी टाकतो, ते दोघेही त्याचा प्रोफाइल वाचण्यात व्यस्त होतात. राहणार मुंबई... उंची ५.१०" रंग गोरा, आवडी मध्ये क्रिकेट ... शिवानी मोठयाने वाचत असते... अचानक ती थबकतो... ती रंजीत कडे आणि रंजीत तिच्याकडे बघतो... त्यांचा सर्व उत्साह स्वः होतो... रंजीत ला खूप राग येतो.. "अगं विधुर आहे हा... "
"हो ना... मी हि तेच वाचतीय... माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे... " शिवानी हि धक्यातून सावरत म्हणाली...
"ह्या लोकांची हिंमतच कशी झाली रुपाली ला मागणी घालायची...." रंजीत चिडून राग राग करत होता...
शिवानी त्याला सावरत पुढे म्हणाली, "रंजीत अरे थोडं शांत डोक्यानी विचार कर... त्यांच्या साठी रुपाली चे हि हे दुसरे लग्न आहे ना.. म्हणून त्यांना वाटले असेल..."
रंजीत शांत होतो, "हो तरी काय झालं... "
"ऐक काम कर ना.. तू त्यांना फोन कर आणि कळव आम्ही विधुर नाही बघत आहोत म्हणून..."
"हो... तेच ठीक राहील... अगं पण फोन कुठे करू... त्यांनी तर मला दुकानातून केला होता..."
"थांब, इथे त्याच्या प्रोफाइल मध्ये असेल नंबर दिलेला..." शिवानी नंबर बघू लागली... त्यात तोच नंबर नोंदवलेला असतो ज्यावरून फोन आला असतो..."त्यांचे स्वतःचे दुकान असेल अरे... तू लाव फोन"
रंजीत फोन लावतो... तिकडे फोन वाजतो आणि देसाई साहेब फोन उचलतात, "हॅलो"
"हॅलो देसाई जी मी रांजेते बोलतोय... तुम्ही तोड्या वेळ पूर्वी फोन लावला होता बघा..."
"हो हो... रुपाली चे बाबा ना..."
"ते आणि ऐक.. त्याचे काय आहे कि रुपाली माझी मुलगी नाही आहे.. मी भाऊ आहे तिचा..."
"ओह ! असं आहे का.. माफ करा मला वाटले तुमची मुलगी आहे... " त्यांचा बोलण्याने रंजीत चा राग पळाला... तो शांत होईन बोलू लागला.. इकडे साईट वर तितक्यात आयुष्य चा फोटो लोड झालेला, शिवानी च त्याकडे लक्ष गेले ... तो फोटो बघून ती जणू मंत्रमुगध झालेली, इतके बोलके डोळे... गोरा, कुरळे केस, पिळदार मिशा. ती रंजीत ला फोटो दाखवण्यास वेळो वेळी लक्ष वेधून घ्याचा प्रयत्न करते पण तो बोलण्यात व्यस्त असतो...
"देसाई साहेब आम्ही आयुष चे प्रोफाइल बघितले, पण आम्ही रुपाली साठी विधुर बघत नाही आहोत.. मला माफ करा पण आम्ही या स्थळ सोबत पुढे नाही जाऊ शकत"
"अहो पण हे रुपाली चे सुद्धा दुसरे लग्न आहे... डिवोर्स नंतर कोणता मुलगा तिला स्वीकारेल..."
"नाही नाही.. तिचा डिवोर्स नाही झालेला.. त्याच कसं आहे तिचं लग्न झालेलं पण ते लीगल नव्हतं..."
"म्हणजे? मला नाही कळले काय म्हणायचे ते तुम्हाला..."
"अहो तिचं ते बाल विवाह झालेला... आणि बाल विवाह तर भारतात कायद्याने गुन्हा आहे ना... तर खरं तर तीच लग्न झाल्यात जमाच नाही... म्हणजे लग्न झाले... पण नाही झाले ... आम्हला काही लपवून ठेवायचे नव्हते म्हणून आम्ही सर्व सत्य लिहिले..."
"ओह ! बिचारी... पण तुम्ही असं कसं आपल्या लहान बहिणीचा बाल विवाह लावून दिलात... लाज नाही वाटली तुम्हाला..."
"अहो तुम्ही माझ्यावर काय ओरडताय.... "
"मग द्या फोन तुमच्या पिताश्री ना... त्यांना ओरडतो.. मुलगी इतकी काय जड झाली होती त्यांना कि त्यांनी तिचा बाल विवाह लावून दिला... "
"नाही नाही... माझ्या बाबांनी नाही तिचा बाल विवाह लावून दिला.. म्हणजे आम्ही सक्खे बहीण भाऊ नाही... "
"म्हणजे सावत्र आहेत... तुमच्या बाबांनी दुसरे लग्न केलेले का?"
"नाही सावत्र हि नाही आहोत जाऊ द्या ना.. तुम्हाला काय करायचे काका... तुम्हाला निरोप मिळाला ना..." रंजीत ची चीड चीड होत होती... इतका मोठा इतिहास होता त्याच्या आणि रुपाली च्या नात्याचा तो कोणाला फोन वर कसा समजावणार...त्याने रागा रागा ने फोन ठेवला.
शिवानी त्याचे सर्व बोलणे ऐकत होती... तो जरा शांत झाला तेव्हा तिने त्याला लॅपटॉप दाखवला आणि त्यावरचा आयुष्य चा फोटो दाखवला. आयुष्य ला बघून रंजीत आनंदी झाला... " याला बघून असे नाही का वाटत कि हा रुपाली साठीच बनला आहे.."
"हो ना.. मला हि अगदी असेच वाटले... " शिवानी त्याच्या मताला संमती देत म्हणाली...
"कोण आहे हा?"
"कोण काय.. हा आयुष्य आहे..."
"अगं... पण..." रंजीत जरा निराश झाला... "देव असं का करतो किती निरागस वाटतोय तो.. का त्याला आपल्या बायको ची साथ अशी मधेच सोडावी लागली..." रंजीत हळवा झालेला..."त्याला बघून मला ना... इन्स्टंट काँनेकशन वाटतंय पण मी रुपाली साठी विधुर नवरा नाही बघत आहे... she deserves better यार, ऐक भाऊ म्हणून मला तर माझं मन परवानगीच देत नाही आहे"
शिवाणी ला काय बोलावे ते कळत नव्हते, तिचे मान सध्या दामाडोल होते.. तिच्या लक्षात त्या काकांनी विनम्रतेणे केलेली चौकशी हि होती...
"हे बघ रंजीत आपण इतके दिवस पहिले ना कोणते तरी स्थळ चालून आले का... बाल विवाह झालेला हे कळल्यावर हि कोणी पुढाकार घेतला का... देवाची काय इच्छा आहे काय माहित आणि आयुष्य रुपाली च्या आयुष्यात येणे असेल तर आपण कितीही विरोध केला तरी ते होणार... "
"माझं सध्या डोकं तापलंय मला काही नाही बोलायचं... मी नंतर निवांत ..." रंजीत निघून गेला..
शिवानी नि आयुष्य ला FB वर शोधले... तिथे तिने त्याचे पूर्ण प्रोफाइल बघितले... त्याचे मित्र परिवार कोण कोण आहेत त्याच्या आवडी निवडी सर्व बघितल्या... तिला तो खरंच आवडला, ज्या प्रमाणे बाल विवावीत असणे ह्यात रुपाली चा दोष नव्हता तसाच विधुर असण्यात आयुष्य चा दोष नव्हता... पण रंजीत ला कोण समजावणार? ती स्वतःशीच बोलली..
संध्याकाळी रंजीत घरी आला तेव्हा ती वाट बघत होती कधी त्याच्याशी या विषयावर बोलावे..
संधी साधून तिने विषयाला हाथ घातला, " रंजीत मला वाटते आपण आयुष्य बद्दल विचार करायला हवा. तो चांगला मुलगा वाटला मला. आपण रुपाली बद्दल लोकांना नाव ठेवतो, ते ओपन माईंडेड नाहीत वगैरे पण आज तू काय करतोयस? आयुष्य ची बायको नाही ह्यात त्याचा काही दोष आहे का? आपण आता विचार करायला हवा... तू निवांत विचार कर, वेळ घे पण त्याला संधी दे." शिवानी तेवढे बोलून उठली..
क्रमश:
------------------
फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा?
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...
वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २

No comments:
Post a Comment