Friday, April 26, 2019

TLJ भाग ६

================ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ६  ==================
 

आज वाड्यात धावपळ सुरु होती, रंजीत नि सगळ्यांना कमला लावले होते, सगळा वाडा स्वछ करायचा  होता. शिवानी सगळी धावपळ  बघून रंजीत कडे चौकशी करू लागली, "काय चाललंय हे सगळं?"
"अगं वेळ नाही ना जास्ती, ते लोक येतील, आपल्याला तयारी नको का करून ठेवायला...??"
"कोण लोक येणार आहे आज आत्ता?" शिवानी ला काही उमजेना..
"मी बोललो ना तुला पुढच्या आठवड्यात देसाई मंडळी येणार आहेत... मग तयारी नको का करायला..."
"रंजीत ते पुढच्या आठवड्यात येणार आहेत आणि तू असा वागतोयेस जणू पुढच्या आठवड्यात लग्न आहे रुपाली चे..." शिवानी ला हसू आले
"हसतेस काय? मला ना या वेळेस १% हि चान्स सोडायचा नाही आहे... त्यांना सगळे आवडलंच पाहिजे , आपला वाडा राहणीमान, त्यांनी न बघता क्षणी पसंती दिली पाहिजे.."
"हो मान्य आहे पण म्हणत्वाचे म्हणजे त्यांना रुपाली ला आणि रुपाली ला ते आवडायला नको का?"
"हो... ते तर होईलच... मला ना आतून असं फीलिंग येतेय कि या वेळेस सगळं नीट होईल आणि आपल्या रुपालीचे लग्न जमणार.."
"तुझ्या तोंडात साखर... तू म्हणतोय तसंच घडो... " शिवानी आनंदानी म्हणते त्याचा उतसह बघून ती काही त्याला थांबवत नाही फक्त बजावते कि सगळं काळजी नि कर.
रुपाली रंजीत ला विचारते, "कधी येणार आहेत रे ते?"
"सांगितलं ना पुढच्या आठवड्यात" रंजीत पंखा पुसत म्हणतो...
"आठवड्यात ७ दिवस असतात, मग पूर्ण आठवडा सुरु झाला कि आपण वाट बघत बसायची का त्यांची?" रुपाली त्याला त्याच्या बावळटपणा वर चिडवतो...
स्टूल वरून खाली उतरून रंजीत तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, "का वाट बघवत नाही आहे का? खूपच अधीर झालंय कोणीतरी कोणाला भेटायला...."
"अधीर काय? तुम्हालाच सोपं जाईल तयारी करायला..." रुपाली आपली बाजू सांभाळत बोल्ली...
"हम्म ते आहे, त्याच काय त्यांना मुंबई वरून यायचे आहे ना मग त्यांना तिकीट वगैरे काढून यावे लागेल, कधीचे तिकीट मिळतील ते बघून ते सांगतील... मी त्यांना सक्ती तर नाही करू शकत आत्ताच सांगा म्हणून..."
नाक मुरडत रुपाली तिथून निघून गेली... तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत रंजीत म्हणतो... "तुझी झाली का तयारी...???"
हातवारे करत रुपाली त्याला मला गरज नाही तयारी ची असा इशारा करत अंगठा दाखवून निघून जाते...स्वतःशी हसत रंजीत परत आपल्या कमला लागतो...

तितक्यात त्याला देसाईंचा फोन येतो ते सांगतात कि ते मंगळवारी येतील... रंजीत त्यांना घरचा पूर्ण पत्ता सांगतो आणि काही अडचण अली तर कळवण्यास सांगतो, फोन ठेवल्यावर तो विचार करतो, कसलं भारी कनेक्शन आहे रुपाली च तिला जे पाहिजे ते त्यांनी लगेच कळवलं... खूपच छान चालय सगळं असं स्वतःला समजावत तो कमला लागतो.

मंगळवार ची सकाळ आपल्यासोबत सगळ्यांसाठी नवीन उमेद आणि हुरूप घेऊन येते. शिवानी नि रुपाली ला आदल्या दिवशीच कोणती साडी घालायची ह्याची आणि त्यावर मॅचिंग बांगड्या, गळ्यातले सर्व काढून दिले होते सगळी तयारी करून दिली होती ज्याने सकाळी तिचा वेळ जाणार नाही.
सकाळी शिवानी रुपाली ला उठवायला तिच्या खोलीत जाते तर काय बघते, रुपाली तर कधीची उठलेली... "अरे आज स्वारी लवकर उठलेली दिसतीय... "
शिवानी च्या आवाजाने रुपाली ला तिच्या चिडवण्याच्या मूड चा अंदाज आलेलाच त्यामुळे ती स्वतःशीच बोलते, "झोपच नाही लागली तर उठायचा प्रश्न येतोच कुठे... पण कोणाला सांगणार..."
"काय बर्ळतेस ?? मोठ्यांनी बोल ना..." शिवानी तिचे पुटपुटणे ऐकून म्हणते..
"काही नाही वाहिनी मी असच... तू कशी काय आलीस?"
"कशी काय म्हणजे? तू उठली कि नाही बघायला... नाही तर रोज प्रमाणे झोपत राहिली असतीस ना... " शिवानी हसते...
"नाही गं.. होते मी तयार आता थोड्या वेळात... तुला काही मदत हवी आहे का?"
"मी बघून घेईल ते बाकीचे, तू छान तयार हो" शिवानी तिला आवरायला सांगून निघते, "... आणि खोली हि आवार... ते घर पाहायला आत आले तर?"
माझी खोली बघून काय करणार आहेत ते... रुपाली स्वतःशी पुटपुटली तरी ती खोली आवरायला घेते.

शिवानी ला काही मदत हवी का बघायला रंजीत  स्वयंपाकघरात येतो, "रंजीत किती चा वेळ दिला आहे त्यांनी?" शिवानी त्याला विचारते.
"सकाळीच येऊ म्हणाले, मला वाटते ते काल रात्रीच आले असतील.. " रंजीत शंका व्यक्त करत म्हणाला
"ते येतच असतील... सगळी तयारी झाली ना?"
"हो रे... पोहे करायला किती वेळ लागतो आणि तू जामून आणलेस ना ते हि मी ठेवलेत फ्रिज मध्ये"
 शिवानी फ्रिज उघडून दाखवू लागली.
"आणि सरबत तयार आहे ना.. ते हि फ्रिज मध्ये ठेव.. उन्हाळा सुरु आहे ना ते आले कि आधी सरबत दे... छान वाटेल त्यांना"
"बरं ठेके आहे अजून काही?" शिवानी हसत म्हणाली, "कुठपर्यंत आलेत ते बघ ना..."
"येतील ग.. उगाच आपण अधीर वाटायला नको अजून वेळ हि नाही झाली, येतील... " रंजीत सरबत ची चव चाखत म्हणतो, "आह... मस्त झालंय सरबत..."
"चला माझी ऐक काळजी मिटली... आता जरा हे पोहे हि चाखून बघ..."
"पोहे बिघडायला का तू पहिल्यन्दा कारतीयेस, मस्तच असणार... "
"तरी एकदा सांग ना ठीक झालेत का.."
"नाही माझ्या तोंडाची सरबताची चव जाईल... नको.. त्यापेक्षा तूच बघ ना पोह्याची चव... " असं म्हणत तो तिथून निघून गेला.
हम्म आता ह्याला कोण सांगणार कि नवऱ्यानी पुष्टी दिली कि वेगळाच आनंद मिळतो बायकोला... आपल्या हातचे किती हि चांगले झाले असले तरी नवऱ्याला आवडले पाहिजे... शिवानी स्वतःशी बोलत पोहे झाकून ठेवते आणि आपल्या खोली कडे निघते...
ती ध्रुव ला उठवते आणि त्याला लवकर लवकर तयार हो सांगते...
"मी रुपाली मावशी च्या हातून तयार होणार.. मावशी कुठे आहे?? " डोळे चोळत ध्रुव उठतो
"ध्रुव, ऐकत जा ना आई चं... आज रुपाली मावशी ला खूप काम आहेत, आज ती नाही मी तयार करून देणार आहे तुला..." शिवानी त्याला समजावत म्हणते.
"का आई... आज काही आहे का??"
"हो आज ना आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, मग ध्रुव छान तयार होणार ना... गुड बॉय सारखा?"
ध्रुव लगेच ऐकतो आणि तयार व्हयला लागतो, ब्रश घेतो "कोण येणार आहे आई?"
"मुंबई वरून काका येणार आहेत रुपाली मावशी ला भेटायला... तू मस्ती नाही करायची हं, मी सांगेन ते ऐकायचं मग मी संध्याकाळी ध्रुव ला गम्मत देणार..."
"खरंच? ठीक आहे... " ध्रुव खुश होऊन आई ला आवरायला मदत करतो अजिबात त्रास देत नाही...
शिवानी ध्रुव च आवरून रुपाली ला काही हवंय का बघायला जाते, रुपाली नि आपली खोली छान आवरून ठेवली असते, रेडिओ वर मागे

फुलपाखरू... छान किती दिसते फुलपाखरू... या वेलीवर, फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू....
चालू असते...

शिवानी रुपाली शेजारी जाते आणि म्हणते.... "छान किती दिसते फुलपाखरू... " रुपाली ला शिवानी खोलीत आल्याची चाहूलच लागत नाही... ती दचकते आणि स्वतःची स्तुती ऐकून लाजते, "वाहिनी तू कधी आलीस..."
"तुझी तंद्री लागलेली तेव्हा... पाहायला आलेले कि काही हवंय का तुला... तू तर छान तयार झाली आहे... एकाच गोष्टी ची कमी आहे.." ती आपल्या डोळ्यातलं काजळ बोटाला घेते आणि तिच्या कानामागे लावते, "कोणाची नजर नको लागायला ... ते येतीलच आता मी व्हरांड्यात बघते काही राहिले का... " असे म्हणत शिवानी व्हरांड्यात पोहचते, रंजीत नि सर्व तयारी करून ठेवली असते, ती बघून चकित राहते... बघतच राहते, त्यांनी तीन बाजूनी सोफा ची बैठक मंडळी असते आणि मध्ये टेबलं ठेवला असतो. रंजीत ला बघून ती म्हणते, "आज भारतीय बैठक नाही का?"
"मुंबईचे पाहुणे आहेत ना... माहित नाही त्यांना काय आवडले म्हणून म्हंटल... मॉडर्न लुक बारा राहील... कशी झाली आहे तयारी??" रंजीत विचारतो...
"तू केली आहेस म्हंटल्यावर काय बघावं लागणार... " शिवानी रंजीत चा बदला घेत काहीच नीट सांगत नाही...
"अगं पण तुला कशी वाटली... "
"हम्म आता कसं.. काय वाटतंय? का मी सांगावेसे वाटतंय?"
"शिवानी.. तू प्रशंसा केली म्हणजे माझ्या कष्टाचे सार्थक होईल ना..."
"हो मग हे मघाशी का नाही लक्षात आले जेव्हा मी पोहे कसे झाले ते सांग म्हंटले..."
"अगं तू अजून तेच घेऊन बसलीस... बरं नाही लक्षात आलं मला.. खरंच सॉरी... सांग ना सगळं ठीक आहे का?"
"एक्दम मस्तच.. " शिवानी सांगते आणि तिच्या लक्षात येते, "अरे तू त्यांना फोन लावलास का किती वेळ झाला आता.. अजून कसे आले नाहीत?"
"अरे मी विसरलो सांगायचे, त्यांचा फोन आलेला.. त्यांची ना गाडी खराब झाली रस्त्यात, त्यांना यायला थोडा उशीर होईल... "
"अरे अजून किती उशीर... बघ आता तास भरात जेवायची वेळ होईल... मग जेवायच्या वेळेला पोहे खाऊ घालणार का आपण त्यांना..." शिवानी गंभीर होत म्हणाली..
"हम्म अरे हे तर माझ्या लक्षातच नाही आलं... शिवानी तू ऐक काम करतेस का, जेवायची तयारी सुरु कर मला वाटते आपण तयांना जेवायलाच आग्रह करावा... इतक्या लांबून येणार आहेत ते फक्त आपल्या रुपाली ला बघायला आणि आता उशीर पण झालाय... नुसते पोहे नको..."
शिवानी ठीक आहे म्हणते तितक्यात देसाई मंडळी दरवाज्यात उभी असतात, त्यांना बघून रंजीत आणि शिवानी चाट पडतात, शिवानी रंजीत तात्यांचे स्वागत करतात तोंडावर हसू ठेवून, शिवानी रंजीत ला त्याची कुर्त्याची भाई खेचत विचारते, "तू कोना कोना ला आमंत्रण दिले आहेस घरी यायला..."
रंजीत पण गोंधळलेला असतो... "सह परिवार या म्हणालो होतो, मला काय माहित ते अख्या वस्तीलाच घेऊन येतील... "
"अरे रमेश त्या खुर्च्या लाव जरा..." रंजीत आपली व्यवस्था कमी पडेल ह्याचा आडाखा घेत रमेश ला आवाज देत सांगतो. रमेश आणि अजून काही त्याचे मित्र ४-५ खुर्च्या आणून लावतात, तो पर्यंत सगळे बसून घेतात. शिवानी स्वयंपाक खोलीत जाते, पार गोंधळलेली असते. तिला मदत करायला रंजीत हि येतो,
स्वतःची झालेली चिडचिड ती रंजीत वर काढते... "कितीदा सांगितले आहे मी किती लोक येणार ते विचारत जा... बघ आता... पोहे पण कमी पडणार .... जेवण तर लांबची गोष्ट राहिली.."

"अगं हो... आता मला काय माहित... ते इतके लोक येतील... तू काळजी नको करुस, मी करतो काही प्रबंध, सरबत पुरेल ना?"
"मी सरबत अख्खा उन्हाळा आपल्याला पुरावे असे केले म्हणून पुरेल..."
रंजीत सुटकेचा श्वास सोडतो, "चल.. ठीक आहे... ते आण मग... मी बघतो काय करायचे ते तू नको काळजी करू... "
शिवानी रंजीत नि सांगितल्याप्रमाणे सरबत बनवते आणि सर्वाना नेवून देते. रंजीत तिला तिथे दिसत नाही म्हणून त्याला शोधू लागते तर तो  तिकडे रमेश ला त्यांच्या खोलीत बोलावून काही तरी सांगताना दिसतो... रमेश लगबगीने रंजीत ने सांगितल्या प्रमाणे निघतो शिवानी ला फक्त इतकेच ऐकायला येते, "मागच्या दारानी आणशील... "
शिवानी तेथे बसून त्यांची विचारपूस करते, "घर शोधायला काही त्रास तर नाही ना झाला... "
"नाही नाही, तुमचे नाव सांगितले तर २-३ लोक इतपर्यंत सोडायला आले आम्हाला... खूपच चांगले आहेत इथले लोक... " रंजीत ला आलेला बघून देसाई म्हणतात, "गावाची खूपच सुधारणा झाली आहे." रंजीत हसतो आणि म्हणतो, "मी ओळख करून देतो, हि माझी बायको शिवानी आणि हा मुलगा ध्रुव"
"रुपाली दिसत नाही, बोलवा ना तिला" त्यांच्यातल्या ऐक ताई म्हणतात.
रंजीत शिवानी ला इशारा करतो, शिवानी म्हणते "हो बोलावते मी तिला... "

रुपाली ला घेऊन शिवानी येते, रुपाली अगदी लक्ष्मी सारखी सजली असते, तिच्या साडीचा गडद आकाशी रंग तिच्या सौंदर्याला आणखीनच खुलवत असतो, घट्ट बांधलेली वेणी आणि तरी त्यातून सुटलेली ऐक वाऱ्याच्या तालावर नाचणारी बट. तिचे टपोरे डोळे सलग खाली बघत असतात पण ते अयुष ला शोधत असतात. तिला बघून देसाई काका म्हणत, "रुपाली ला बघितलं आणि सगळा थकवा निघून गेला... ये बेटा बस" ते आपल्या शेजारच्या खुर्ची कडे हाथ दाखवत तिला बसायला सांगतात, शिवानी हि तिला जा बस म्हणते, "त्या आधी मी तुझी सगळ्यांशी ओळख करून देतो.. मी अनंत अयुष चा बाबा" रुपाली त्यांच्या पाय पडते. "हि माझी बायको अंकिता" ते आपल्या बायको कडे हाथ दाखवून सांगतात, रुपाली त्यांच्या हि पाया पडते,
"हे माझे बाबा म्हणजे अयुष चे आजोबा, आणि हि आजी, हा माझा मोठा मुलगा आनंद, आणि हि त्याची बायको आरोही, हि माझी मुलगी अर्चिता आणि ह्या तिच्या दोन मुली रिद्धी सिद्धी जुळ्या आहेत" रुपाली त्यांच्या हि पाया पडायला जाते तेव्हा सगळे हसायला लागतात... रुपाली ला हि स्वतःचे हसू येते...
"... आणि हा माझा लहान मुलगा आयुष.... " रुपालीच्या  जणू हृदयाचा ऐक ठोकाच चुकतो, ती त्याच्या कडे बघतच आपल्या खुर्चीत जाऊन बसते, त्याच्या शेजारीच ठेवली असते तिची खुर्ची. चोरून चोरून रुपाली तिरक्या नजरेने अयुष ला नीट बघायचा प्रयत्न करत असते.. पण अयुष च तिच्याकडे लक्षच नसते, रुपाली ला हे खूप वेगळं वाटत, ती स्वतःची समजूत घालत म्हणते, लाजाळू असेल, ओळख झाल्यावर बोलेल, तिला धडधडायला लागते...
प्रियकरू ... प्रियकरम   .. प्रियकरू....प्रथमं.... . गाणं रुपाली च्या मनात वाजत राहते...

सगळ्यांच्या गप्पा गोष्टी होतात, सगळे रुपाली ला प्रश्न  विचारतात शिवानी बघते तर रंजीत स्वयंपाकघरात काही तरी उचापती करत असतो... ती हि त्याच्या मागे जाते..
"काय चाललंय?" तिथे सर्व जेवणाची तयारी झालेली असते. शिवानी आश्चर्याने विचारते... "हे कसं काय झालं? कोणी केलं?"
"When  Ranjeet  is  here  don 't  fear !!" रंजीत असे म्हणता तिला पुढे सांगतो, "रमेश ला पाठवून बोलावला सगळा मेनू राजभोग मधून"
सगळी तयारी बघून शिवानी खुश होते, ती रंजीत च्या हातून प्लेट घेते आणि म्हणते, "मी करते जा तू त्यांच्याशी बोल... "
रंजीत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसतो, शिवानी रंजीत ला जेवण तयार आहे सांगते, तेव्हा रंजीत सगळ्यांना जेवायला चला म्हणतो, देसाई मंडळी जेवण नको असं म्हणतात पण रंजीत च्या अग्रहः खातर तयार होतात. सगळ्यांचे जेवण होते.
"ताई जेवण खूप छान झालं... आता तर खूप झोप येणार आहे... " अर्चिता म्हणते आणि सगळे तिच्या मताला आपली संमती देतात.
"छान वाटले तुम्हाला आवडले ते." सगळे व्हरांड्यात जमतात. रुपाली ची बैचैनी शिवानी च्या लक्षात येते, "काकू तुम्हाला हरकत नसेल तर अयुष आणि रुपाली ला एकांतात बोलू द्यावं का?" शिवानी अंकिता ला विचारते...
"अगं त्यात काय विचारायचं आहे? थांब मी अयुष ला सांगते... " त्या अयुष जवळ जातात आणि म्हणतात, "बेटा तुम्ही दोघे हि एकमेकांशी बोलून घ्या जा..."
रुपाली अयुष ला आपली खोली दाखवायला नेते, ते तिथे बसून असतात, रुपाली ला खूप प्रश्न पडतात खूप काही...अयुष काय विचारेल ते हि आणि आपण काय विचारावे ते हि... अयुष शांत बसला असतो.. शांतता मोडत रुपाली त्याला म्हणते, "तुम्ही जास्ती बोलत नाही वाटतं?"
"नाही तास काही नाही... " अयुष तिच्याकडे बघत म्हणाला आणि शेवटी रुपाली ची नजर त्याच्या नजरे शी मिळाली. ते घरे डोळे... त्याच्या पेक्षा त्याचे डोळेच जास्त बोलत होते... तिला सांगत होते त्यांना किती प्रश्न विचारायचे आहेत, "तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारू शकता... " रुपाली त्याला बोलायला चान्स देत म्हणाली... "नाही मला काही नाही विचारायचे..."
"तुम्ही सर्जन आहात असे कळले, खूप काठीन काम आहे ना.. "
"हम्म " अयुष नि एवढेच उत्तर दिले...
इकडचे तिकडचे कुठले हि प्रश्न विचारले तरी अयुष चे उत्तर हम्म, हो, नाही एवढेच... शेवटी रुपाली त्याला म्हणते, "तुम्हाला काही सांगायचे पण नाही का..."
"नाही... " अयुष तिच्या कडे न बघताच म्हणाला, मग काही तरी आठवल्यासारखे करून पुढे बोल्ला, "रुपाली, मी हे लग्न माझ्या आई बाबांच्या मर्जी खातर करतोय... " असे म्हणत तो निघायला उठतो, "तुम्हाला अजून काही विचारायचं?"  रुपाली मान हलवून नाही सांगते, आणि तो तिच्या खोलीतून निघून जातो...

रुपाली एकटीच आपल्या खोलीत विचारात म्हणजे अयुष च्या विचारात मग्न असते, सारखे तिच्या मनात तेच ते गाणं येत असत... राधा...

वृंदावनी सारंग हा का लावी घोर जीवाला... झाली अशी वेडी पिशी कोणी जाऊन सांगा त्याला... हा मंद गंध भवताली राधे ला वाट गवसली...

ती अयुष सोबत घालवलेला प्रत्येक क्षण परत जगत असते... त्याचे ते वाक्य लक्षात येत ती थोडी गंभीर होते, आई बाबांच्या मर्जी खातर म्हणजे? आयुष खुश नाही का या लग्नाने? त्यांच्या मर्जी विरुद्ध आहे का? असे अनेक प्रश्न येत असतात तितक्यात तिथे ध्रुव येतो त्याच्या सोबत ऐक छोटी मुलगी हि असते, रुपाली ध्रुव ला बघून लाडाने विचारते, "कुठे फिरताय साहेब, आज मावशी ची आठवण नाही आलाय ना.. हि कोण नवीन मैत्रीण.. "
ध्रुव तिचा हाथ धरून सांगतो,  "हि कियारा आहे हिला सगळे लाडानी क्यू म्हणतात आणि क्यू हि माझी मावशी"
रुपाली क्यू ला जवळ बोलावते आणि तिला विचारते, "तू जेवण केलंस का बाळ?" ती मान हलवूनच हो सांगते ध्रुव पुढे म्हणतो, "मी आणि क्यू नि आज एकत्र जेवण केलं मला तिच्या आजी नि खाऊ घातलं.. "
"आजी नि... ?? कुठे आहे तिची आजी... " ध्रुव अंकिता कडे बोट दाखवत सांगतो.. तेव्हा रुपाली च्या लक्षात येते कि ती देसाई मंडळी सोबत आली आहे. ती त्या दोघांशी गप्पा मारत असते तेव्हा तिथे अयुष येतो, "क्यू चला बेटा निघायचं आहे आपल्याला.." रुपाली आपल्याला अयुष ला परत बघायला मिळालं म्हणून खुश होते.
"ओके पप्पा" म्हणत क्यू अयुष चा हाथ धरून निघते....
त्या दोघांना जाताना रुपाली आपल्या खिडकीतून बघते ४००० वाट चा शॉक बसल्या सारखा तिला झटका बसतो... "पप्पा ??? "

क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा?

१. काय होईल आता रुपाली चे? ती हे सत्य कसे स्वीकारेल कि अयुष विधुरच नाही तर त्याला मुलगी पण आहे? क्यू? काय ती अयुष ला क्यू सोबत स्वीकारेल?
२.  काय रुपाली सावत्र आई होणे स्वीकारेल?
३. काय आयुष  तिच्या स्वप्नाचा राजकुमार आहे?
४.अयुष ची मर्जी आहे ह्या लग्नाला?

आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...

वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...