Saturday, April 20, 2019

TLJ भाग ३

ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ३  



बघता बघता तो दिवस उजाडला...

जिसे धुंडता हू मै हर कही जो कभी मिली मुझे है नाही... जिसके प्यार पे हो एकीनं वो लाडकी है कहा... जो ये केहने  को भी तयार हो तुम ही हो मेरे दिलदार वो लाडकी है कहा... 

सकाळी सकाळी रुपाली च्या कानात शान गाणं गुणगुणू लागला
स्वतःला आरशात बघून रुपाली स्वतःशीच लाजत होती, ती स्वतःशीच विचार करू लागली, "काय होतंय मला? मी अशी लाजरी बुजरी का वागतीय? कोण तो कुठला पाटील मला पहायला येणार आणि इथे माझे हाथ का थंड पडतायत? असच होतं का सगळ्यांना? कोण सांगेल मला? वाहिनी च बाई बरं होता अशी वेळच नाही आली... "

"मग तुला कोणी मनाई केली होती का स्वतःसाठी मुलगा बघण्यासाठी?" तिचेच मन तिच्याशी गप्पा टाकत होते... स्वतः मध्ये रमली असताना तिला शिवानी ची हाक ऐकू आली.. "रुपाली तू तयार हो लवकर... तुझ्या दादानी त्यांना सकाळीच बोलावलं आहे... " वाहिनीची हाक ऐकून ती भानावर आली... लवकर जाऊन तिनी अंघोळ आवरली, ती कोणता ड्रेस घालू विचार करतच होती तितक्यात शिवानी तिच्या खोलीत आली, "रुपाली ही बघ तुला ह्यातली कोणती साडी आवडेल का बघ!!"
"वाहिनी, मी नाही साडी घालणार..."
"तुला तर आवडते ना साडी नेसायला.. मग आज मिळतोय ना चान्स... नेस कि..."
"नको ना.. "
"आज काल च्या मुली ना तुम्ही... जे कर म्हंटल ते काही करत नाही..."
"वाहिनी आज काल च्या मुली तुम्ही... म्हणजे म्हणायचे काय आहे तुला... तू ही माझ्याच वयाची आहेस हा.. तू तर असं बोलतेस जसा कि आपल्या वयात किती फरक आहे..."
"अगं हो.. ते मी जरा आता तुझ्या आई च्या रोल मध्ये आहे ना... म्हणून निघून गेला... पण ह्याचा हा अर्थ नाही कि मी सांगेन ते तू ऐकायचं नाही... साडी घालायची..."
"पण का??"
"आता कसं सांगू मी तुला... बघ... त्याच असं आहे कि तू ड्रेस कसा ही घे... किती ही महाग पण मुलीचं रूप जे साडीत खुलत ना ते ड्रेस मध्ये नाही खुलत..."
शिवानी चे वाक्य ऐकून रुपाली गालातल्या गालात हासली, "मग काय? घालणार ना..."
"ठीक आहे.. पण मला नेसता येत नाही साडी... " रुपाली संकोच व्यक्त करत म्हणाली.
"त्यात काय मी नेसवते तुला... तू बाकी तयार हो मी आलेच ध्रुव ला बघून ठीक आहे... तो वर साडी निवडून ठेव..."
रुपाली साड्या चाळत बसली कोणती साडी नेसू हा विचार करत, "शी वाहिनी पण ना... कोणती साडी नेसू सरळ सांगायचं ना... मला नाही कळत... किती गरम होतंय... " रुपाली जाऊन पंखा लावते आणि रेडिओ ही चालू करते...

तू नझ्म नझ्म सा मेरे हौटो पे ठेहर जा में ख्वाब ख्वाब सा तेरे आँखों में जागु रे... 

शेवटी ती एका साडी ची निवड करते त्यावर बांगड्या, गळ्यातले वगैरे काढून ठेवते... तितक्यात शिवानी येते, "निवडलीस साडी?" ती आल्याआल्या विचारते..
"ही ठीक राहील का?" रुपाली थोडं गोंधळून विचारते..
"हम्म.. ठीक आहे, बांगड्या वगैरे आहेत का matching ?" शिवानी सगळ्या वस्तू बघत म्हणते... "ठीक आहे चल तुला नेसवून देते..."
साडी ची घडी मोडत शिवानी रुपाली ला सांगते, "ही साडी खूप खास आहे, तुझ्या दादा नि आणलेली मला पहिली भेट आहे ही... " शिवानी बोलत बोलत साडी रुपलाई च्या पारकर मध्ये खोचते...
तिचा कंबरेला हाथ लागताच रुपाली गुदगुल्या होऊन हसायला लागते... "अगं.. काय झालं... नीट उभी रहा ना... "
"तू गुदगुल्या नको करुस ना... " रुपाली म्हणते... शिवानी च्या लक्षात येते आणि ती तिला म्हणते.. हे बघ हे घे तूच खोच.. नाही तर आज काही साडी नेसणं होणार नाही... दोघी खिदळत असतात....
रुपाली ला साडी नेसवून शिवानी बाकीची कामं बघायला निघते...
रुपाली तयार होऊन बसते..
साडी चा गडद गुलाबी रंग तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत असतो. टपोरे डोळे eyeliner नि अजूनच रेखीव दिसतात. तिचे लांब सडक केस तिने मोकळेच सोडले असतात, केसांची एक बट येऊन गालावर संपते.

पाटील मंडळी वेळेवर येतात, रंजीत-शिवानी त्यांचे स्वागत करतात आणि त्यांना बसायला सांगतात, व्हरांड्यात छान भारतीय बैठक मंडळी असते, मध्य भागी एका फुलदाणी मध्ये निशिगंधा ची फुलं लावली असतात ज्या मुळे सर्वत्र वाड्याभर सुवास पसरला असतो...
शांतात मोडत पाटील साहेब रंजीत ला आपल्या मुलाची ओळख करून देतात, "हा माझा मुलगा विकास"

सगळे लोक गप्पा मारत बसतात,
"रंजीत साहेब आपण काय एकमेकाला ओळखत नाही असं नाही, त्यामुळे बोलायला किंवा चौकशी करायला काही नाही आमच्याकडे, तुम्ही रुपाली ला बोलवा... "
रंजीत हसत त्यांना संमती देत शिवानी ला हाक मारतो... "अगं शिवानी, रुपाली ला घेऊन ये.."

शिवानी रुपाली च्या खोलीत जाते, रुपाली ला बघून ती २ मिन स्तब्ध राहते, "किती छान दिसतेस, दृष्ट नको लागायला कोणाची..." म्हणत ती तिची दृष्ट काढत कपाळाला आपली बोट मोडते. "चल... बोलावतात..."
रुपाली चा काही पाय निघत नाही, "वाहिनी मला खूप भीती वाटतं आहे... "
"भीती, कशाची...??? अगं विकास ला ओळखत नसलीस तरी पाटील साहेबांशी तर रोजच बोलतेस ना.. भीती कशाची... चल..." तिला धीर देत शिवानी आपल्या सोबत नेते..

रुपाली ला बघता क्षणी विकास तिला पसंती देतो...

ध्रुव रुपाली ला बघून शिवानी च्या कानात बोलतो, "मावशी छान दिसते ना आई..." जे सर्वांना ऐकू येते आणि सगळे हसू लागतात...
मावशी शब्ध ऐकून कुतूहल व्यक्त करत पाटील साहेब म्हणतात " रंजीत रुपाली तुमची बहीण आहे ना मग ध्रुव ची मावशी कशी काय?"
त्यांचा प्रश्न ऐकून रंजीत आधी हसतो, "तुमचा प्रश्न तुमच्या ठिकाणी एकदम बरोबर आहे... त्याचं काय... आम्ही सगळे परिस्थितीने एकत्र आलो आहोत... तुम्हाला तर माहीतच आहे,  रुपाली माझी बहीण नाही आणि शिवानी ची ही बहीण नाही पण त्या बहिणीहून जास्त आहेत ...  आत्या कि मावशी काय म्हणायचं ते आम्ही ध्रुव वर सोडलं आहे. त्याला ती मावशी म्हणून जास्त आवडते तो तिला मावशीच म्हणतो...  "

ध्रुव शिवणीच्या कडेवरून उतरून रुपाली कडे धावत जाऊन तिच्या कुशीत शिरतो...
"...आणि आमच्या पेक्षा त्याला रुपालीची जास्त सवय आहे... " रंजीत खुलासा करतो...
सगळे त्याच्या निरागस वागण्यावर हसून आपल्या गप्पा सुरु ठेवतात.

"तुला तिच्याशी काही बोलायचे असेल तर आमची काहीच हरकत नाही..." रंजीत विकास ला म्हणतो...
"नाही... मला काही नाही विचारायचं... त्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकतात... "
रुपाली कडे सगळ्यांची नजर असते... रुपाली चोरट्या नजरेने विकास ला बघण्याचा प्रयत्न करत असते.. ती ही मान हलवून काही नाही विचारायचे सांगते...

शिवानी तिला घेऊन आत जायला निघते, विकास तिच्या पाठमोऱ्या आकृती ला बघतच असतो, शिवानी वळून त्याला म्हणते, "नक्की काही नाही बोलायचं तुम्हाला दोघांना... " आपल्याला रुपाली ला निहारताना पकडले असे कळत्या क्षणी विकास कावरा बावरा होतो... सगळे त्याची खेचतात, "अरे आतापासून हे हाल आहेत... "

सगळ्यांचा चहा झाल्यावर शिवानी रंजीत ला बोलण्याचे आठवण करून देते..

"बाकी पाटील साहेब आपले मैत्रीचे नाते आहे, तुम्हाला आमच्या विषयी सर्व काही माहित आहे तरी मी कोणत्याच गोष्टी मोघम ठेवू इच्छित नाही ज्याने पुढे चालून नात्यांवर परिणाम होईल..  "

"असे बोलून मला छोटं केलंत रंजीत तुम्ही... मी काय आज ओळखतोय तुम्हाला? तुम्ही या गावाच्या विकासात किती हातभार लावला आहे काय माहित नाही का मला... "
"आभार आहेत त्या बद्दल तुमचे पण काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला वाटते सांगितलेले बरे... तुम्हाला रुपाली बद्दल सर्व माहिती असली पाहिजे, तिच्या वर्तमान आणि भूतकाळ तुम्हाला माहित असावा... त्याचा तिच्या भविष्यकाळावर काही परिणाम होऊ नाही अशीच आमची इच्छा आहे."

"तुम्ही म्हणताय म्हणून सांगा... तुमचे मनावरचे दडपण कमी होईल, पण खरंच दादा मला काही फरक नाही पडत रुपाली च्या भूतकाळात काय घडले आहे त्याचे... प्रत्येकाचा भूतकाळ असतो...त्याला काय " विकास विश्वासाने म्हणाला, ते ऐकून शिवानी ला धीर आला.रंजीत तिच्याकडे, बघ मी म्हणालो होतो ना... असे बघतो... परत विषयाला हात घालत रंजीत त्यांना सांगतो,  "हे रुपालीचे दुसरे लग्न आहे... "

"काय??" पाटील घराण्यातले सर्व जागचे उडाले...
"अहो... हे कसलं स्थळ आणलात तुम्ही आपल्या विकास साठी? मुलीचे तर आधीच लग्न झालेले आहे..." पाटलीन बाई आपल्या नवऱ्यावर ओरडल्या...
"अगं मला नाही माहित... काय बोलताय रंजीत तुम्ही... आधी का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला.. असं अंधारात का ठेवलंत... मी तर तुम्हाला चांगला मित्र समजत होतो... "

"पाटील साहेब अहो ऐकून तर घ्या.. "
"आम्हाला काहीच नाही ऐकायचं, इतकी मोठी गोष्ट तुम्हाला आम्हाला आधी सांगावीशी नाही वाटली... चला... निघतो आम्ही" त्यांनी आपल्या बायको आणि मुलाला निघण्याचा इशारा केला...
रंजीत विकास चा हात धरून त्याला थांबवतो, "विकास तू तर ऐकून घे... "
"दादा, मी काय ऐकू... तुम्ही बाकी काही ही सांगितलं असतं तर मला फरक नास्ता पडला... पण माझ्या ही काही अपेक्षा आहेत माझ्या बायको कडून... मी कसं एका विवाहित मुलीशी लग्न करू तुम्ही सांगा... मला माफ करा..." विकास आपला हात सोडवत म्हणाला
"अरे पण एकूण तर घे... " रंजीत बोलत होता पण विकास त्याच काही न एकता आपल्या बाबा च्या मागे निघून गेला. सरी पाटील मंडळी आपल्या SUV मध्ये बसून तडका फडकी निघून गेले...

रंजीत त्यांना बघत तिथेच उभा राहिला... शिवानी तिथे येऊन त्याला आत चल म्हणते...
"मी सांगितलं होता ना... "शिवानी त्याला बजावणार इतक्यात तो तिला म्हणतो...
"अगं पण त्यांनी पूर्ण एकूणच घेतला नाही..."
"त्यांना हवा तेवढं सत्य त्यांनी ऐकलं... आज ही आपला समाज इतका विकसित नाही कि ते मान्य करतील कि रुपाली ला ही जगण्याचा अधिकार आहे... "
"इतकंच जर समाज विकसित असता ना तर रुपाली ला रासबेरी मध्ये यावेच लागले नसते... " शिवानी असे म्हणत रागा रागाने व्हरांडा आवरायला घेते... ती स्वतःशीच पुटपुटत असते, "मला माहित होते.. सगळे एका माळेचे मणी... म्हणे मला काही फरक नाही पडत भूतकाळाचा... मग चेहऱ्याचा रंग का उतरला ऐकल्यावर ... दुसरे लग्न आहे... दुसरे लग्न म्हणजे ... "

तिकडे सगळा प्रकार कळल्यावर रुपालीच्या कवळ्या मनावर घात करून जातात... तिला खिडकी शेजारी स्तब्ध उभी बघून रंजीत शिवानी ता तिला समजावण्यास सांगतो.. शिवानी तिच्या जवळ जाते... रुपाली ला आपल्या जवळ घेऊन तिला खुर्ची वर बसवते आणि सांगते, "रुपाली काही लोक कमकुवत असतात, तो तुझ्यासाठी उचित नव्हता... तू जशी मोठ्या मनाची आहेस ना, तो नाही आहे..." शिवानी चे बोलणे संपण्याच्या अगोदरच रुपाली रडायला लागते तिला पोटाशी घेऊन शिवानी समजावण्याचा प्रयत्न करते...
"मी विसरले होते वाहिनी, मला तर स्वप्न बघण्याचा अधिकारच नाही... कारण माझं तर भविष्य अंधकार आहे.. कारण माझा भूतकाळ काळा आहे... "
"असं नाही आहे रुप्स... तुला समजणारा... तुझ्या भूतकाळा पेक्षा तुला जास्ती जपणारा, तुझ्या मनाची काळजी घेणारा आहे आणि तो तुला शोधत आहे.. तो ही तुझ्या साठी अश्रू गाळत असेल... तुझी स्वप्न बघत आहे..  नाकी येईल.. विकास काय एकाच मुलगा आहे का... आपण त्याच्या हुन चांगलं स्थळ शोधू, असली कमकुवत माणसे नकोत" शिवानी तिचे अश्रू पुसते तेवढ्यात रंजीत येतो.

"रुपाली, मला नव्हतं माहित इतक्या शूद्र बुद्धीची लोक असतील.. मित्र म्हणून मी हलक्यात घेतलं, मी आधीच नीट चौकशी करायला हवी होती, माझीच चूक झाली.. मला माफ कर.. या पुढे मी कोणतंही स्थळ नीट चौकशी करून आणेल... तुला असं दुखावणार नाही "

"दादा तू काय माफी मागतोस... जे काही झालं ते माझ्या नशिबाने झालं आता ह्यात तुझी काही चूक नाही... आणि तू तर माझ्या भल्यासाठीच बोललास ना त्यांना... सत्य आपण लपवले जरी असते आत्ता आणि त्यांना उद्या हे कळले असते तर विचार कर त्यांची अशीच प्रतिक्रिया असती... आणि तेव्हा नुकसान जास्त झाले असते... तू नको काळजी करू... मी ठीक आहे..."

"किती गुणांची आहे ग माझी छकुली... " रंजीत तिच्या कपाळाची पप्पी घेत म्हणतो... "तू  फ्रेश हो मग आपण छान बाहेर जाऊ आज" रंजीत शिवानी ला घेऊन जातो आणि तिला आवरण्यात मदत करतो..
रुपाली आपल्या खोलीत शांत बसली असते आरशात स्वतःला बघत असते काही वेळा पूर्वी तिच्या सौंदर्याने तेजवलेला तिचा चेहरा आता रडून रडून सुजला होता eyeliner पसरून डोळे काळे निळे झाले होते. केस विस्कटलेले, स्वतःला बघून ती हसली, "मी नाही कोणाला माझ्या वर असा प्रभाव करू देईल... त्यांनी नकार दिला म्हणून काय... मला गरज नाही असल्या विक्षिप्त लोकांची !! ती स्वतःला सावरून फ्रेश होते..." रेडिओ लावते...

तेरे साथी मेरे कदमं के है निशाण... तू ना जाणे आस पास है खुदा... चलता  हू में तेरे साथ...  

क्रमश:
------------------

वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.. 

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...