Monday, May 13, 2019

TLJ भाग ९

   
=====ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ९  =============

दुसऱ्या दिवशी सगळेच लवकर उठतात, ध्रुव तयार होताना बेड वर उड्या मारत असतो, "ये!! आज आपण एस्सेल वर्ल्ड ला जाणार... ये... ये...!!!"
शिवानी त्याला तयार करत असते, "हो, हो.. जाणार... पण मावशी ला त्रास नाही द्याचा आणि ती सांगेल ते ऐकायचं... तरच पाठवणार ठीक आहे?"
"हो.. ठीक आहे... "
ठरल्याप्रमाणे शिवानी आणि रंजीत रुपाली आणि ध्रुव ला एस्सेल वर्ल्ड ला सोडतात, "दोघे खूप मज्जा करा, संध्याकाळी येतो आम्ही " असे म्हणून ते तिथून पुढे वरळी ला निघतात, शिवानी रस्ताभर खूप शांत असते, "काय झाले? आग रुपाली आहे ना त्याच्या सोबत... मज्जा करतील ते तिथे.. आणि तिथे वॉटर पार्क पण आहे ध्रुव ला छान वाटेल.." शिवानी त्याला हं ... असं उत्तर देते फक्त...
"काय झाले?" रंजीत तिला वारंवार विचारतो...
"काही नाही रे, जरा काळजी वाटतीय, काय समोर येईल ह्याची..."
दोघे वरळी ला पोहचतात, रंजीत आजू बाजू ला देसाई मंडळींची चौकशी करतो,
चहा प्यायला म्हणून एका दुकानावर थांबतात तिथे ४-५ लोक जमलेली असतात त्यांना रंजीत विचारतो, "हे देसाई कुठे राहतात माहित आहे का.. "
"हो हि बघा हि बाजूची बिल्डिंग आहे त्याच्या टॉप फ्लोर वर आहे त्यांचं घर..." रंजीत त्या बिल्डिंग च्या दिशेने बघतो, ऊन डोळ्यावर पडू लागते तर हाथ ठेवून बघतो इतकी उंच इमारत ... उगाच संभाषण वाढवायला म्हणतो, "या बिल्डिंग मध्ये... अरे देवा.. इतक्या मोठ्या बिल्डिंग मध्ये?"
"हो.. का काय झाले?" त्यांच्यातील दुसरा विचारतो...
"अहो मला काम लागलय तिथे पण ...  मला काही ठीक नाही वाटत आहे माणसं"
रंजीत च्या या वाक्यावर सगळेच चिडता, "भाऊ काय बोलताय? देसाई साहेब म्हणजे देव माणूस... मदत मागेल त्याला मदत करतात..."
"असं, पण इतका पैसे कुठून आला त्यांच्या कडे इतक्या मोठ्या पॉश बिल्डिंग मध्ये रहायला...."
ते लोक त्याला वेडा आहेस का? असे बघतात, "अहो त्यांना कशाची कमी आहे? इतका मोठा बिझिनेस आहे, सोन्या सारखी मुलं आहेत सगळे तर चांगले आहे..."
"पण मी ऐकलं त्यांची मुलं काही ठीक नाहीत?"
"अहो कोण असलं भलतं सलत सांगत तुम्हाला? बापाच्या एका हुकूमावर मोठ्या मुलाने सगळा बिझिनेस सांभाळला.. स्वतःचा ते काय म्हणतात आज काल निघालाय ना... नवीन..."
"स्टार्ट अप... त्यांनी स्वतःची स्टार्ट अप कंपनी काढलेली दुसऱ्या पार्टनर ला देऊन ते आपल्या बाबांचा बिझनेस बघतात" दुसर्याने त्याला साथ देत माहिती दिली...
"हा... "
"पण मग ..." रंजीत जरा अडखळला
"काय झाले भाऊ.. तुम्हाला जी हि माहिती मिळाली आहे ना ती खोटी आहे... अहो इथे देसाई परिवार आहे ज्यांनी आपली संस्कृती जपली आहे .. "
"पण त्यांच्या छोट्या सुनेने आत्महत्या का केली?"
रंजीत ने प्रश्न विचारला तेच सगळे शांत झाले... सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आले... "तेच कळलं नाही बघा साहेब... देव चंगल्या लोकांना दुःख का देतो... ??"

त्यांच्या गप्पा चालू असतात तेव्हा तिथे आनंद येतो... "अरे रंजीत तुम्ही इथे? सांगितले नाही तुम्ही मुंबई ला येणार आहेत ते... आम्ही घ्यायला आलो असतो ना... " आनंद ला तिथे बघून रंजीत गोंधळून जातो...
"हो हे काय तुम्हाला भेटायलाच येत होतो... पत्ताच विचारात होतो... " रणजित आपली बाजू सांभाळून घेतो...
"चला या माझ्या सोबत" असे म्हणत आनंद त्यांना आपल्या सोबत यायला सांगतो... "आल्यावर तरी फोन करायचा ना, गाडी पाठवली असती तुमच्या साठी, मुंबई मध्ये बिना गाडीचे नवीन माणसाला खूप त्रास होतो... कशी वाटली मग मुंबई? फिरले का कुठे?"
"नाही अजून ... जाऊ नंतर" रंजीत हसण्याचा प्रयत्न करत शिवानी कडे बघतो, ते सगळे लिफ्ट मध्ये जातात, रंजीत लिफ्ट मध्ये सारखा अस्वस्थ होऊन कोणता फ्लोर आला त्याकडे बघत असतो... लिफ्ट मधून बाहेर पडल्यावर आनंद दार उघडतो, समोर महालाच असल्याचा भास होतो त्यांना...
ते तिथेच स्तब्ध उभे असतात, "दादा आत या ना... " आनंद त्याला आत बोलवत म्हणतो, "आम्ही सगळे एकत्र राहतो ना... आणि मुंबईत जागा मिळणे इतके कठीण आहे शेवटी आम्ही हि युक्ती लढवली, हि बिल्डिंग बनताना आम्ही हिचा वरचा मजला पूर्ण बुक केलेला.. इथे प्रत्येक फ्लोर वर ६ फ्लॅट आहते इथे पेन्टहाऊस असे म्हणतात आणि मग आम्ही सर्व आपल्या मनानी एकत्र करून घेतले आहेत. एका फ्लॅट मध्ये ताई जीजू राहतात, एकात आई बाबा, एकात आम्ही , एकात आयुष्य, एक गेस्ट साठी ठेवली आहे आणि एकात आधी आजी आजोबा राहायचे पण आता त्यांना आई बाबांच्या कडे शिफ्ट केले आहे तर सध्या रिकामा आहे... ह्याने कसे एकत्र राहतो हि आणि प्रायव्हसी हि राहते प्रत्येकाला आपली आपली...  म्हणजे तुम्ही एकत्र विभक्त कुटुंब म्हणू शकता..."

शिवानी आणि रंजीत थक्क होऊन ऐकत होते... रंजीत ला आपण किती चुकीचा विचार करत होतो ह्याची जाणीव झाली, जेव्हा त्याला कळलेले कि देसाई ह्या बिल्डिंग च्या टॉप फ्लोर ला राहतात त्याला वाटलेले 2BHK मध्ये एवढा परिवार कसा राहत असेल... आपली शंका दूर झाली ह्याचा त्याला आनंद होता.तो प्रसन्न मुद्रेने शिवानी कडे बघतो.
आनंद त्यांना सांगतो, "आई आता मंदिरात गेली असेल... मी बघतो बाबा आहेत का तुम्ही आरामात बसा आपले घर समजा... " असे म्हणून आनंद निघायला जातो...
"मंदिरात या वेळेला? सकाळी सकाळी कीर्तन असते का?" शिवानी विचारते
"कीर्तनाला नाही आई तिथे मुलांना शिकवते, सकाळी ८ ते १२ गरीब होतकरू विद्यार्थयांसाठी, तिचे हि मन रमून राहते आणि त्या मुलांना हि शिकायला मिळते... " आनंद छान हसतो आणि जायला निघतो..."आलोच मी..."
थोड्या वेळात देसाई काका येतात, "काय रंजीत आम्हाला एक्दम चकित केले तू... आधी कळवायचे ना... येतोस ते..."
"अचानकच ठरले काका.. म्हणून नाही सांगितले..." रणजित हसण्याचा प्रयत्न करत म्हणतो...
"चल लबाड... मला माहित आहे का नाही सांगितलेस ते..." त्यांचे ते बोलणे ऐकून शिवानी आणि रंजीत गंभीर होतात, "मुलाचे घर बघायचे होते ना...?? अ अ... बरोबर कि नाही..."

त्यांचे वाक्य ऐकून दोघे सुटकेचा श्वास सोडतात स्वतःशीच पुटपुटतात, "बरं आहे तुमची हेरगिरी करायला आलो असे नाही म्हणाले..."
"कधी आलात तुम्ही मुंबईत ? कशी वाटली मुंबई?"
"चांगली आहे मुंबई... फक्त धावपळ होते खूप इथे... घाम काढते मुंबई माणसाचा..."
"हा हा हा... ते अगदी बरोबर म्हणालास... काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, ड्रिंक?"
"नाही काका आम्ही ड्रिंक नाही करत..."
"अरे कोल्ड ड्रिंक म्हणायचे होते मला... घाम गाळलास ना खूप... " देसाई काका हसत म्हणाले... या वेळी रंजीत आणि शिवानी हि त्यांच्या सोबत हसतात.
सगळ्यांच्या गप्पा संपेपर्यंत संद्याकाळ होते... शिवानी रंजीत ला आठवण करून देते रुपाली आणि ध्रुव ची तेव्हा रंजीत निघायचे म्हणतो... "अरे थांब थोडा वेळ आयुष्य येईलच थोड्या वेळात, त्याला भेटून जा... "
"गेलो असतो काका पण रुपाली आणि ध्रुव गोधळतील, आम्ही त्यांना घ्यायला येणार सांगितले आहे... "
"म्हणजे? रुपाली हि आली आहे मुंबईत? तिला का नाही आणलेस?"
"ध्रुव नि आम्हाला बसू दिले नसते इतका वेळ..." शिवानी वेळ मारून नेत म्हणाली...
"बरं मग कुठे आहेत ती दोघे?"
"त्यांना आम्ही एस्सेल वर्ल्ड ला सोडून आलोय... "
"अरे... जा बाबा लवकर... तुम्ही आले नाहीत म्हणून बिचारी पोरं घाबरून जातील... निघा निघा लवकर.. आणि उद्या सगळे जेवायला या संध्याकाळी"
"नको काका... आज झालेच ना.. ठरवून नसले तरी.. आज मी एकल ना तुमचं.. रोज रोज नको तुम्हाला  त्रास... आणि आम्ही आहोत ना आता इथेच २ महिने.. परत येऊ कधी..." रंजीत त्यांचा निरोप घेत म्हणाला.
दोघे लगबगीने निघतात "खूप उशीर झालाय रंजीत... रुपाली ला फोने तरी लावून बघ..."
"मी आधीच नास्ता का फोन करून कळवलं.. तिनी फोने घेतला नाही आहे स्वतःचा..."
"का?" शिवानी आश्चर्याने म्हणाली...
"तिला rides एन्जॉय करता नाही येणार म्हणून सकाळीच मला दिला तिने तिचा फोन... आणि मला कुठे वाटलेले आपल्याला इतका उशीर होईल..."
"ठीक आहे... चल लवकर... " शिवानी घाईने बोलावलेल्या कॅब मध्ये बसली, "भैया लवकर चला एस्सेल वर्ल्ड" ती ड्राइवर ला म्हणाली तो तिच्याकडे गोंधळून बघू लागला, "मॅडम एस्सेल वर्ल्ड तर आता बंद झाले असणार... "
"काय?? तरी चला लवकर तुम्ही..." शिवानी त्याला म्हणते आणि रंजीत कडे घाबरून कसे असतील दोघे असे बघते...
"अहो एस्सेल वर्ल्ड ला सकाळीच जायचे ना... तिथे पूर्ण दिवस जातो... असं संध्याकाळी निघून नाही होत ताई ... "
"हो हो.. दादा माहित आहे आम्हाला.. तुम्ही प्लिज जरा लवकर घ्या.. "
"अहो मुंबईत नवीन आलात का? आता ऑफिस सुटलेत सगळे... हे बघा रोड वर किती ट्रॅफिक आहे लवकर कशी नेणार..."
शिवानी ला खूप राग येतो स्वतःचा... रडकुंडीला येते, ती रंजीत चा घट्ट हाथ धरून बसली असते... "दादा जितकं जमेल तितकं लवकर चला.. आम्ही नवीन आहोत मुंबई आणि आमची मुलं तिकडे आमची वाट बघत आहेत..." रंजीत ड्राइवर ला आपली परिस्थिती समजावत सांगतो...
"अहो काय साहेब.. मुलांना एकटे ठेवले तिकडे..." ड्राइवर त्यालाच ओरडू लागला... ज्याने शिवानी आणखीनच घाबरून जाते...
"तुला फोने घेऊन यायची काय गरज होती रंजीत... रुपाली कॅब वगैरे करून सरळ हॉटेल वर गेली असती... कुठे आहे काय ते विचारपूस करता आली असती... आता काय... दोघे जेवलेत कि नाही कसे आहेत काय माहित... नवीन गाव आहे.. असं कसा रे तू... " शिवानी सगळी चिडचिड रंजीत वर करू लागली...
"शिवानी शांत हो... रुपाली हुशार आहे.. थांबतील ते... सांगितले ना त्यांना आपण येऊ"
"हम्म" शिवानी आपल्या हाताची पकड घट्ट करत म्हणते...
"घाबरू नका साहेब... मुंबई खूप सुरक्षित जागा आहे... आणि इथली लोक हि खूप चांगली आहेत... काळजी नका करू... " ड्राइवर त्यांना शांत करत म्हणाला... "इथे रात्री ३ वस्त हि लोकांची वर्दळ असते... २४ * ७ लोक इथे काम करत असतात.. ठीक आतील मुलं..."

जशी जशी घडी ठोके देत होती त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते... शेवटी तास भर असाच घालवल्यावर ते येऊन पोहचले, त्यांना दोघे कुठेच दिसत नव्हते.. रंजीत आणि शिवानी त्यांना शोधू लागले.. सगळीकडे काळोख पसरलेला आणि कुणीच दिसत नव्हते... ड्राइवर पण त्यांच्या सोबत निघाला रंजीत त्याला तुम्ही जा म्हणतो पण ते म्हणता, "अहो साहेब, तुम्ही नवीन आहेत मुंबईत.. आम्हाला काही माणुसकी नाही कि काय... पोरं एकटे कुठे थांबले असतील ? मी हि मदत करतो शोधायला... आधीच तुम्ही घाबरलेले आहेत... अश्या वेळी शांत डोकं पाहिजे..."
ते इकडे तिकडे बघतच असतात जेव्हा धावत येऊन ध्रुव रंजीत ला मागून घेरतो, "बाबा... किती उशीर, मी आणि मावशी थकलो वाट बघून..." त्याचे गराने सुरु होते...
त्याच्या मागे पळत रुपाली हि येते आणि ती शिवानी ला मिठी मारते.. "वाहिनी खूप घाबरलेले मी... माझ्या कडे फोन... " शिवानी तिला कडकडून मिठी मारते आणि म्हणते, "हो... माहित आहे मला... आलोय ना आता आम्ही... सगळं ठीक आहे" शिवानी तिचे अश्रू पुसत म्हणते... ते सगळे ड्राइवर ला थँक यु म्हणतात आणि आपल्या हॉटेल वर सोडायला सांगतात..

ध्रुव दिवस भाराची त्यांनी केलेली मज्जा सांगण्यात व्यस्त होतो...
"तिथे मी वॉटर पार्कमध्ये खूप खेळलो.. कप बशी मध्ये हि बसलो... खूप मज्जा आली बाबा आपण उद्या सगळे जाऊ... मग मी तुम्हाला दाखवीन किती छान छान आहे सगळे तिथे... खूप सारे पक्षी आहेत...उद्या जायचे ना मग आपण सगळ्यांनी?" शिवानी त्याला हो म्हणते आणि आता झोप म्हणते.
या सर्व गोंधळात रुपाली त्यांना देसाईंच्या घरी काय झाले विचारायचे विसरून जाते...

रात्री शिवानी आणि रणजित गप्पा मारत बसतात, "मी आज खूप खुश आहे... आपल्याला जी भीती होती तसे काही नाही आहे... देसाई कडचे सगळेच खूप चांगले आहेत, मी आता निश्चित होऊन रुपाली चा हाथ आयुष च्या हातात देऊ शकतो... "
"हम्म हो ना... चौकशीत त्यांना सर्व चांगलेच म्हणाले.. आणि आपण दिसल्याबरोबर आनंद नि हि किती आग्रहाने घरी नेले... मी हि निवांत आहे आता..."
शिवानी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हॉटेलरूम च्या गॅलरी मधून धावणारी मुंबई बघत बसते...

क्रमश:
-

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...