Thursday, May 16, 2019

TLJ भाग १०

   
=====ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग १०  =============

बघता बघता वेळ पळू लागला... तो दिवस हि उगवला... हो आज आहे रुपाली आणि आयुष चे लग्न...
लग्न साधच होत रेजिस्टारऑफिस मधे सकाळी ९च्या टोल्यावर दोघांनी एकमेकांना हार घातले आणि सर्वांच्या साक्षी ने दोघांनी एकमेकांचा स्वीकार केला...

ठरल्याप्रमाणे लग्नाचा होणार खर्च आयुष नि रुपालीच्या नावाने त्याच्या हॉस्पिटल मधे दान करायचे ठरवले असते, तो आणि रुपाली सोबतच हॉस्पिटल ला निघतात आणि घरच्यांना पुढे घरी जायला सांगतात, आयुष आणि रुपाली हॉस्पिटल ला येतात, रुपाली कार च्या बाहेर पडून बघते तर भले मोठे हॉस्पिटल तिच्या समोर असते, "इतके मोठे हॉस्पिटल?"
"हम्म.. हे multispeciality हॉस्पिटल आहे, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांसाठी इथे एक डिपार्टमेंट आहे... " रुपाली थक्क होऊन बघत असते..."मी neurosurgeon आहे, नेओरोलॉजि डिपार्मेंट मधे आहे चल तुला माझं केबिन दाखवतो..."
हॉस्पिटल मधे गेल्यावर रुपाली सगळीकडे बघत चालत असते, स्वछ, नीट नेटके सगळीकडे शांत वातावरण आयुष च्या मागे मागे चालत ते नयूरॉलॉजि डिपार्टमेंट ला येतात तिथे आयुष कोणाला बोलावतो आणि त्याला काही समजावून सांगतो... रुपाली त्याच्या केबिन मधे खिडकी शेजारी उभी राहते, तिला तिथून समोरचे जनरल वॉर्ड दिसतो, सर्व मेंटल आजार असलेले लोक दिसतात ज्यांना आपल्या आजू बाजू ला काय चाले हे हि लक्षात येत नव्हते, रुपाली जरा शी घाबरलेली, ती त्यांना बघत राहते त्यांचे वागणे निरखून बघते.. आयुष तिला चल म्हणतो... घाबरलेली रुपाली आयुष च्या बाजू ला धरून त्याच्या मागून चालते... सर्व सोपस्कार पूर्ण करून ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा रुपाली च्या लक्षात आले कि तिने आयुष चा हात  किती घट्ट धरून ठेवला होता, आपला हाथ मागे घेत ती त्याला सॉरी म्हणते, आयुष तिच्याकडे बघून गोड स्माईल देतो आणि कार चे दार उघडतो, "इतकं काय घाबरायला झालं?"
"माहित नाही त्या लोकांच्या नजरा... वेड्यांना तरी... म्हणजे... काय सांगू... तुम्ही कसे काम करता या लोकांमध्ये, कसे ह्यांच्यावर उपचार करता.. ?? म्हणजे मला ना एक प्रश्न पडलाय विचारू?"
"विचार ना..."
"आपण कोण आहोत काय करतो, कोणाबरोबर वावरतो, कोण आपले नातेवाईक कोण मित्र , कोण वैरी या वर तर आपले सर्व आयुष्य असते.... आपण जर तेच विसरलो... तर कसं होईल... मी त्यांच्या प्रियजनांच्या डोळ्यात वेदना पाहिल्यात... त्यांच्यावर किती प्रहार करत असेल हे सत्य... आपण ज्याच्यावर कधी इतकं प्रेम केलं, ज्याने आपल्यावर इतका जीव लावला, ती.. ती व्यक्ती .. ती व्यक्ती आज आपल्याला विसरली... ओळखत नाही...?? आपल्या स्मृती किती महत्वाच्या आहेत ना... म्हणजे मला वाटत होत आज पर्यंत कि हृदय सगळ्यात महत्वाचे अव्यय आहे, ते बंद पडले तर झाले आपण गेलो... पण आज वाटतंय नाही... डोकं महत्वाचे आहे... डोकं नीट नसेल, आपल्या स्मृती आपल्या सोबत नसतील तर त्या जगण्याला काय महत्व? प्रेम असून हि नसेल...  आपण  कोणावर प्रेम करतो हेच विसरलो तर जगणार कसं?"
आयुष तिला फक्त हूं असे उत्तर देतो आणि कार चालवत राहतो... रुपाली हि आपल्या विचारात मग्न होते...

दोघे घरी पोचतात, रुपाली पहिल्यांदा आपल्या घरी येत असते ती सर्व निरक्षण करत असते... सोसायटी, लिफ्ट, प्रत्येक क्षण नवीन आयुष्याचे नवीन उमेद देऊन जात असतात. लिफ्ट चे दार उघडते, दोघे बाहेर येतात शिवानी दारावर बघते "किलबिल" ची पाटी लागली असते... तिला ते नाव खूप आवडते ती स्वतःशीच विचार करत राहते, किती छान घरात नेहमी किलबिल सुरु राहिली पाहिजे... मोठ्यांची छोट्यांची... तेवढ्यात दार उघडते... सर्व त्यांची वाट बघत असतात... रुपाली चा रीतसर गृहप्रवेश होतो.... आपले नवीन घर नवीन परिवार बघून रुपाली चे डोळे भरून येतात... शिवानी तिला जवळ घेत... चला थोडा अराम करून घ्या सगळे परत मग संध्याकाळी रिसेप्शन ची तयारी करायची आहे... सगळे हो हो म्हणत आपल्या आपल्या खोल्यां मधे जातात.

संध्याकाळी....
रिसेपशन किलबिल च्या रुफटॉप वर असते...
"मस्त आहे ना वाहिनी... पेंट हाऊस ... आपला प्रायव्हेट टेरेस!!"
"हो ना.. चल तयार हो पटकन..." शिवानी तिला सांगते..

रुपाली तयार झाली असते सगळे अतिथी मंडळी हि आले असतात, अंकिता शिवानी ला रुपाली ला घेऊन यायला सांगते, आयुष तिची वाट बघत असतो... आयुष नि सोनेरी रंगाची शेरवानी घातली असते, रुपाली नि मरून रंगाचा ग्राउंड टच गाउन घातला असतो जो तिच्या गोऱ्या रंगला अजून खुलवतो, मोकळे केस कंबरेवर खेळात असतात, आयुष तिला आपला हाथ देतो... त्याच्या हातात हाथ देऊन ते दोघे टेरेस च्या पायऱ्या चढू लागतात...

फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर नि अगदी बरोबर गाणे निवडले होते....

हा तुझा ग रंग रागिणी कणा कणा ने खुलू लागला... आज तुझ्या ग सौंदर्याचा श्रुष्टि ला ग साज नवा...


प्रसंगाला साजेशे असे सगळे टेरेस सजवले असते... त्यांच्या साठी तिथे एक स्टेज असतो ज्यावर छान बैठक केली असते... सगळे आलेले अतिथी त्यांना येऊन भेटतात, अभिनंदन करतात, सगळ्यांची ओळख करून घेण्यात रुपाली मग्न असते... मागे मंद आवाजात वाद्य संगीत वाजत असते, मंद मंद वारा हि चालू असतो जो रुपाली च्या केसांशी खेळत असतो, सर्व कार्यक्रम संपायला खूप उशीर होतो... भुकेची वेळ हि निघून गेली असते तरी आयुष आणि रुपाली सोबत जेवण करतात.
हळू हळू सर्व लोक निघून जातात, फक्त घरची मंडळी राहतात, आरोही रुपाली ला बोलावते आणि खाली आपल्या घरात घेऊन जाते, "रुपाली कशी वाटली आज ची पार्टी?"
"छानच होती वाहिनी.. मी तर पहिल्यांदा इतके लोक एकत्र पहिले..." रुपाली हसत म्हणते...
"ये इकडे बस... " ती एका खुर्ची कडे दाखवत म्हणते रुपाली जाऊन बसते..
"गोड दिसतेस... " असे म्हणत ती स्वतःचे बोट मोडते आणि रुपालीचे केस विंचरू लागते...
"वाहिनी मी करते.. तुम्ही कशाला त्रास.. कर.... " रुपाली अडखळत म्हणते
"असू देत... आज स्पेशिअल दिवस आहे ना... मी तयार करते तुला..."
ते वाक्य ऐकून रुपाली लाजते... पुढे काय बोलावे तिला काही कळत नाही...
"रुपाली... आज तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे.. भाऊजी खूप हळवे आहेत... हळू हळू जसे तुम्ही वेळ घालवाल एक मेकाला ओळखालच ... " आरोही तिला समजावू लागते.. रुपाली चे अर्धे लक्ष तिच्या बोलण्या कडे असते आणि अर्धे पुढचे क्षण कसे असतील ह्या कडे... तिच्या लक्षात येते कि ती तर विसरलीच होती या सर्व तयारी मधे... आरोही तिचा मेकअप, केस  व्यवस्तीत करून देते आणि तिला आयुष च्या घरी नेते... "आपले.. स्वतःचे हक्काचे घर बघून घ्या जाऊ बाई... " आरोही चिडवत म्हणते...
रुपाली फक्त हम्म करत सगळीकडे नजर फिरवते...
आरोही तिला सर्व घर दाखवते... "... आणि हि आज ची स्पेशिअल खोली... " म्हणत ती बेडरूम चा दरवाजा उघडते... रुपाली बघते तर मंद दिव्यांच्या उजेडाने खोली मंदावली असते, गुलाबाची फुलांची सजावट, खोली ला वेगळंच आकर्षण देत होते, रुपाली ची नजर खोलीत लावलेल्या एका फोटो फ्रेम वर पडते... तिच्या मनातले प्रश्न ओळखून आरोही पुढे बोलते.. "फोटो मधे आयुष आणि काव्य आहेत.. काव्य जरी आयुष च्या आयुष्यातून गेली असली तरी... "
"काही हरकत नाही वाहिनी... मी समजू शकते.."रुपाली समजून घेत म्हणते.
तितक्यात आनंद तिथे येतो, "आरोही.. झाली का तयारी??"
"हो.. तुमची?" आरोही त्याला विचारते, रुपाली गोंधळून तिला विचारते, "ह्यांची कसली तयारी?"
"कळेल तुम्हाला... " आरोही आणि आनंद एकमेकाला डोळा मारत म्हणतात आणि खोलीतून बाहेर जातात ...आरोही वळून परत येते आणि म्हणते, "तू इथेच थांब आम्ही भाऊजींना पाठवतो... "
रुपाली ला कुठे तोंड लपवू असे होते, काय बोलू... ती फक्त होकारार्थी मान हलवते...

टेरेस वर...
"अरे चला सगळे, खाली नाही जायचे का आज?" आयुष सगळ्यांना म्हणतो...
"आयुष आज आम्ही सगळे तर खाली जाऊ शकतो पण तुला खाली जायचे असेल तर टॅक्स लागणार आहे... "
"कसला टॅक्स? ते हि आपल्या घरी जायला... "
"अरे वाह वाह... ह्या टेरेस ची हद्द पार करायचा टॅक्स बच्चू..." अर्चिता त्याचा कान पिळत म्हणते..
"ताई अगं हळू... दुखतोय ना... " कान चोळत आयुष म्हणतो..
सगळे त्याला घेरून उभे राहतात "बऱ्या बोलाने ऐकणार आहेस कि..."
"कि..?? दादा तू? मी तुझी साथ दिली होती ना... आणि तू??"
"मला काही माहित नाही आज मी ह्यांच्या पार्टीत आहे..." आनंद त्याला हिदायत देत म्हणाला
खूप विचार करून आयुष शेवटी विचारतो, "काय पाहिजे?"
"भावजी तुम्ही काय पाहिजे विचारलं तर सगळ्यांची फर्माईश पुरवता पुरवताच रात्र संपेल... त्या पेक्षा किती पाहिजे विचारा..." आरोही हसत म्हणाली...
"ओके, किती पाहिजे... " सगळे आपला आपला आकडा बोलू लागतात... "एक मिनिट शांत व्हा सगळे... "
"दादा तू बघ काय ते आणि मला फायनल सांग...."
"प्रत्येकाच्या नावाचे २००० ठीक राहतील... " आनंद सगळ्यांना डोळा मिचकावत इशारा करतो आणि आयुष ला बोलतो...
"काय?? प्रत्येकाच्या नावाचे?? नाही नाही... मी नाही देणार.. ठीक आहे... आज मी इथेच झोपतो... " आयुष जाऊन स्टेज वरच्या खुर्ची वर जाऊन बसतो...
बराच वेळ घास घिस सुरु राहते... पण आयुष काही ऐकायला तयार नसतो... शेवटी सगळे त्याला ठीक आहे म्हणतात आणि जा म्हणतात ...

रुपाली त्याची वाट बघून थकून गेली असते... तिला झोप येऊ लागते...
थोड्या वेळाने आयुष येतो... त्याला दरवाजा उघडून आत येताना बघून रुपालीच्या हृदयाची धड धड वाढते...

क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा? काय वाटते तुम्हाला?

वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...