Friday, July 12, 2019

शुश..!! कोणी आहे...

रात्रीचा अंधार पसरलेला त्यात पावसाने भर घातलेली, धो धो पाऊस पडत होता आणि थांबायचं नाव घेत नव्हता. साऱ्या रेटली वीज गेलेली, कुठे तरी शॉर्ट सर्किट झालेले संता आणि बंता आपली रात्रपाळी देत होते, अचानक संता ला काही जाणवले आणि तो एका दिशेने धावत गेला त्याच्या मागे मागे बंता हि गेला..
"काय झाले?" बंता ने त्याला विचारले... काही न बोलता तो असा धावत का निघाला हे बंता ला कळले नाही.
"मी तिथे काही तरी हलताना पहिले... " संता त्या दिशेने बोट दाखवत म्हणाला...
"अरे भास झाला असेल तुला... इतक्या रात्री अंधारात कोण जाणार आहे त्या नाल्याकडे..."
"थांब बघून येतो ... " संता पुढे होत म्हणाला...
"अरे कुत्रा वगैरे असेल काही... नको जाऊस मला भिति वाटते ... तू इथेच थांब" बंता आजू बाजू ला बघत घाबरून म्हणाला.. सगळीकडे अंधार आणि शुकशुकाट पसरलेला फक्त पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज येत होता..
"अरे आता इतक्या जोऱ्यात वीज कडकली... मला त्या विजेच्या उजेडातच इथे काही तरी हलताना दिसले... खूप मोठे होते, त्या विजे बरोबर आकाशातून तर नाही पडले? कोणाला काही झाले असेल तर.. मदत हवी असेल टॉर्च बघू.." संता चिडून म्हणाला..
बंता त्याच्या हातात टॉर्च न देता त्याला म्हणाला, "संभाळून... अंधार आहे ना.." टॉर्च चा लाईट दाखवत तिथे काही न दिसल्याने तो म्हणाला  "बघ काही नाही आहे तिथे.." आपल्या हातातली काठी बंता ने संता ला दिली, संता ने तिथे पडलेल्या त्या हिरव्या वस्तूला  डिवचण्याचा प्रयन्त केला... काही हालचाल नाही झाली...
"बघ मी म्हणालो ना काही नाही आहे तिथे... " बंता वळत म्हणाला.. "चल आता"
"पण काठीला हा पदार्थ चिटकला आहे... " संता काठीवरून काढण्याचा प्रयत्न करत म्हणाला. संता जितकी वर काठी करून बघायचा प्रयन्त करी तो पदार्थ तितका लांब होई आणि परत काठी जमिनी ला टेकवली कि परत एक छोटासा बॉल बनून जाई.
"अरे चल... काही नाही आहे... मुलांनी चुईंग गम खाऊन टाकले असेल... " वळून बंता संता कडे बघतो  तर संता गायब... टॉर्च इकडे तिकडे करून बघू लागला तर त्याचे डोळेच पांढरे पडले, समोर एक मोठे  हिरवे सरपटणारे प्राणी उभे होते, हो सरपटणारा प्राणी उभे होते... त्याच्या शेपटी वर, त्याला ३ तोंड होती आणि प्रत्येक तोंडाला ४ डोळे! आणि त्याच्या बाजूला संता च्या हातातली ती काठी... त्याच्या तोंडून लाळ टपकत होती आणि काही कळण्याच्या आत त्याने बंता वर ताव मारली आणि तो त्याचे भक्ष बनला होता.

परत सर्व वातावरण शांत... तोच शुकशुकाट... येणाऱ्या जाणाऱ्याला फक्त पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता...

तिथून काही वेळाने दुसरी २ मुले जात असतात  ...
"ए तिकडे काही तरी हल्ले...  " बबली घाबरून बंटी चा हाथ धरत म्हणाली...
"कुठे??"
"तिकडे..." बबली बोट दाखवत म्हणाली... ते दोघे तिकडे जातात
"ए हे काय आहे...किती गुळगुळीत बॉल आहे... घेऊन जायचा?!!!" बंटी बबली ला तो हिरवा पदार्थ हातात घेऊन दाखवत म्हणाला..


... म्हणून मुलांनो जी वस्तू आपली नाही त्याला हाथ लावू नाही... 

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...