Friday, April 26, 2019

TLJ भाग ६

================ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ६  ==================
 

आज वाड्यात धावपळ सुरु होती, रंजीत नि सगळ्यांना कमला लावले होते, सगळा वाडा स्वछ करायचा  होता. शिवानी सगळी धावपळ  बघून रंजीत कडे चौकशी करू लागली, "काय चाललंय हे सगळं?"
"अगं वेळ नाही ना जास्ती, ते लोक येतील, आपल्याला तयारी नको का करून ठेवायला...??"
"कोण लोक येणार आहे आज आत्ता?" शिवानी ला काही उमजेना..
"मी बोललो ना तुला पुढच्या आठवड्यात देसाई मंडळी येणार आहेत... मग तयारी नको का करायला..."
"रंजीत ते पुढच्या आठवड्यात येणार आहेत आणि तू असा वागतोयेस जणू पुढच्या आठवड्यात लग्न आहे रुपाली चे..." शिवानी ला हसू आले
"हसतेस काय? मला ना या वेळेस १% हि चान्स सोडायचा नाही आहे... त्यांना सगळे आवडलंच पाहिजे , आपला वाडा राहणीमान, त्यांनी न बघता क्षणी पसंती दिली पाहिजे.."
"हो मान्य आहे पण म्हणत्वाचे म्हणजे त्यांना रुपाली ला आणि रुपाली ला ते आवडायला नको का?"
"हो... ते तर होईलच... मला ना आतून असं फीलिंग येतेय कि या वेळेस सगळं नीट होईल आणि आपल्या रुपालीचे लग्न जमणार.."
"तुझ्या तोंडात साखर... तू म्हणतोय तसंच घडो... " शिवानी आनंदानी म्हणते त्याचा उतसह बघून ती काही त्याला थांबवत नाही फक्त बजावते कि सगळं काळजी नि कर.
रुपाली रंजीत ला विचारते, "कधी येणार आहेत रे ते?"
"सांगितलं ना पुढच्या आठवड्यात" रंजीत पंखा पुसत म्हणतो...
"आठवड्यात ७ दिवस असतात, मग पूर्ण आठवडा सुरु झाला कि आपण वाट बघत बसायची का त्यांची?" रुपाली त्याला त्याच्या बावळटपणा वर चिडवतो...
स्टूल वरून खाली उतरून रंजीत तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, "का वाट बघवत नाही आहे का? खूपच अधीर झालंय कोणीतरी कोणाला भेटायला...."
"अधीर काय? तुम्हालाच सोपं जाईल तयारी करायला..." रुपाली आपली बाजू सांभाळत बोल्ली...
"हम्म ते आहे, त्याच काय त्यांना मुंबई वरून यायचे आहे ना मग त्यांना तिकीट वगैरे काढून यावे लागेल, कधीचे तिकीट मिळतील ते बघून ते सांगतील... मी त्यांना सक्ती तर नाही करू शकत आत्ताच सांगा म्हणून..."
नाक मुरडत रुपाली तिथून निघून गेली... तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत रंजीत म्हणतो... "तुझी झाली का तयारी...???"
हातवारे करत रुपाली त्याला मला गरज नाही तयारी ची असा इशारा करत अंगठा दाखवून निघून जाते...स्वतःशी हसत रंजीत परत आपल्या कमला लागतो...

तितक्यात त्याला देसाईंचा फोन येतो ते सांगतात कि ते मंगळवारी येतील... रंजीत त्यांना घरचा पूर्ण पत्ता सांगतो आणि काही अडचण अली तर कळवण्यास सांगतो, फोन ठेवल्यावर तो विचार करतो, कसलं भारी कनेक्शन आहे रुपाली च तिला जे पाहिजे ते त्यांनी लगेच कळवलं... खूपच छान चालय सगळं असं स्वतःला समजावत तो कमला लागतो.

मंगळवार ची सकाळ आपल्यासोबत सगळ्यांसाठी नवीन उमेद आणि हुरूप घेऊन येते. शिवानी नि रुपाली ला आदल्या दिवशीच कोणती साडी घालायची ह्याची आणि त्यावर मॅचिंग बांगड्या, गळ्यातले सर्व काढून दिले होते सगळी तयारी करून दिली होती ज्याने सकाळी तिचा वेळ जाणार नाही.
सकाळी शिवानी रुपाली ला उठवायला तिच्या खोलीत जाते तर काय बघते, रुपाली तर कधीची उठलेली... "अरे आज स्वारी लवकर उठलेली दिसतीय... "
शिवानी च्या आवाजाने रुपाली ला तिच्या चिडवण्याच्या मूड चा अंदाज आलेलाच त्यामुळे ती स्वतःशीच बोलते, "झोपच नाही लागली तर उठायचा प्रश्न येतोच कुठे... पण कोणाला सांगणार..."
"काय बर्ळतेस ?? मोठ्यांनी बोल ना..." शिवानी तिचे पुटपुटणे ऐकून म्हणते..
"काही नाही वाहिनी मी असच... तू कशी काय आलीस?"
"कशी काय म्हणजे? तू उठली कि नाही बघायला... नाही तर रोज प्रमाणे झोपत राहिली असतीस ना... " शिवानी हसते...
"नाही गं.. होते मी तयार आता थोड्या वेळात... तुला काही मदत हवी आहे का?"
"मी बघून घेईल ते बाकीचे, तू छान तयार हो" शिवानी तिला आवरायला सांगून निघते, "... आणि खोली हि आवार... ते घर पाहायला आत आले तर?"
माझी खोली बघून काय करणार आहेत ते... रुपाली स्वतःशी पुटपुटली तरी ती खोली आवरायला घेते.

शिवानी ला काही मदत हवी का बघायला रंजीत  स्वयंपाकघरात येतो, "रंजीत किती चा वेळ दिला आहे त्यांनी?" शिवानी त्याला विचारते.
"सकाळीच येऊ म्हणाले, मला वाटते ते काल रात्रीच आले असतील.. " रंजीत शंका व्यक्त करत म्हणाला
"ते येतच असतील... सगळी तयारी झाली ना?"
"हो रे... पोहे करायला किती वेळ लागतो आणि तू जामून आणलेस ना ते हि मी ठेवलेत फ्रिज मध्ये"
 शिवानी फ्रिज उघडून दाखवू लागली.
"आणि सरबत तयार आहे ना.. ते हि फ्रिज मध्ये ठेव.. उन्हाळा सुरु आहे ना ते आले कि आधी सरबत दे... छान वाटेल त्यांना"
"बरं ठेके आहे अजून काही?" शिवानी हसत म्हणाली, "कुठपर्यंत आलेत ते बघ ना..."
"येतील ग.. उगाच आपण अधीर वाटायला नको अजून वेळ हि नाही झाली, येतील... " रंजीत सरबत ची चव चाखत म्हणतो, "आह... मस्त झालंय सरबत..."
"चला माझी ऐक काळजी मिटली... आता जरा हे पोहे हि चाखून बघ..."
"पोहे बिघडायला का तू पहिल्यन्दा कारतीयेस, मस्तच असणार... "
"तरी एकदा सांग ना ठीक झालेत का.."
"नाही माझ्या तोंडाची सरबताची चव जाईल... नको.. त्यापेक्षा तूच बघ ना पोह्याची चव... " असं म्हणत तो तिथून निघून गेला.
हम्म आता ह्याला कोण सांगणार कि नवऱ्यानी पुष्टी दिली कि वेगळाच आनंद मिळतो बायकोला... आपल्या हातचे किती हि चांगले झाले असले तरी नवऱ्याला आवडले पाहिजे... शिवानी स्वतःशी बोलत पोहे झाकून ठेवते आणि आपल्या खोली कडे निघते...
ती ध्रुव ला उठवते आणि त्याला लवकर लवकर तयार हो सांगते...
"मी रुपाली मावशी च्या हातून तयार होणार.. मावशी कुठे आहे?? " डोळे चोळत ध्रुव उठतो
"ध्रुव, ऐकत जा ना आई चं... आज रुपाली मावशी ला खूप काम आहेत, आज ती नाही मी तयार करून देणार आहे तुला..." शिवानी त्याला समजावत म्हणते.
"का आई... आज काही आहे का??"
"हो आज ना आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, मग ध्रुव छान तयार होणार ना... गुड बॉय सारखा?"
ध्रुव लगेच ऐकतो आणि तयार व्हयला लागतो, ब्रश घेतो "कोण येणार आहे आई?"
"मुंबई वरून काका येणार आहेत रुपाली मावशी ला भेटायला... तू मस्ती नाही करायची हं, मी सांगेन ते ऐकायचं मग मी संध्याकाळी ध्रुव ला गम्मत देणार..."
"खरंच? ठीक आहे... " ध्रुव खुश होऊन आई ला आवरायला मदत करतो अजिबात त्रास देत नाही...
शिवानी ध्रुव च आवरून रुपाली ला काही हवंय का बघायला जाते, रुपाली नि आपली खोली छान आवरून ठेवली असते, रेडिओ वर मागे

फुलपाखरू... छान किती दिसते फुलपाखरू... या वेलीवर, फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू....
चालू असते...

शिवानी रुपाली शेजारी जाते आणि म्हणते.... "छान किती दिसते फुलपाखरू... " रुपाली ला शिवानी खोलीत आल्याची चाहूलच लागत नाही... ती दचकते आणि स्वतःची स्तुती ऐकून लाजते, "वाहिनी तू कधी आलीस..."
"तुझी तंद्री लागलेली तेव्हा... पाहायला आलेले कि काही हवंय का तुला... तू तर छान तयार झाली आहे... एकाच गोष्टी ची कमी आहे.." ती आपल्या डोळ्यातलं काजळ बोटाला घेते आणि तिच्या कानामागे लावते, "कोणाची नजर नको लागायला ... ते येतीलच आता मी व्हरांड्यात बघते काही राहिले का... " असे म्हणत शिवानी व्हरांड्यात पोहचते, रंजीत नि सर्व तयारी करून ठेवली असते, ती बघून चकित राहते... बघतच राहते, त्यांनी तीन बाजूनी सोफा ची बैठक मंडळी असते आणि मध्ये टेबलं ठेवला असतो. रंजीत ला बघून ती म्हणते, "आज भारतीय बैठक नाही का?"
"मुंबईचे पाहुणे आहेत ना... माहित नाही त्यांना काय आवडले म्हणून म्हंटल... मॉडर्न लुक बारा राहील... कशी झाली आहे तयारी??" रंजीत विचारतो...
"तू केली आहेस म्हंटल्यावर काय बघावं लागणार... " शिवानी रंजीत चा बदला घेत काहीच नीट सांगत नाही...
"अगं पण तुला कशी वाटली... "
"हम्म आता कसं.. काय वाटतंय? का मी सांगावेसे वाटतंय?"
"शिवानी.. तू प्रशंसा केली म्हणजे माझ्या कष्टाचे सार्थक होईल ना..."
"हो मग हे मघाशी का नाही लक्षात आले जेव्हा मी पोहे कसे झाले ते सांग म्हंटले..."
"अगं तू अजून तेच घेऊन बसलीस... बरं नाही लक्षात आलं मला.. खरंच सॉरी... सांग ना सगळं ठीक आहे का?"
"एक्दम मस्तच.. " शिवानी सांगते आणि तिच्या लक्षात येते, "अरे तू त्यांना फोन लावलास का किती वेळ झाला आता.. अजून कसे आले नाहीत?"
"अरे मी विसरलो सांगायचे, त्यांचा फोन आलेला.. त्यांची ना गाडी खराब झाली रस्त्यात, त्यांना यायला थोडा उशीर होईल... "
"अरे अजून किती उशीर... बघ आता तास भरात जेवायची वेळ होईल... मग जेवायच्या वेळेला पोहे खाऊ घालणार का आपण त्यांना..." शिवानी गंभीर होत म्हणाली..
"हम्म अरे हे तर माझ्या लक्षातच नाही आलं... शिवानी तू ऐक काम करतेस का, जेवायची तयारी सुरु कर मला वाटते आपण तयांना जेवायलाच आग्रह करावा... इतक्या लांबून येणार आहेत ते फक्त आपल्या रुपाली ला बघायला आणि आता उशीर पण झालाय... नुसते पोहे नको..."
शिवानी ठीक आहे म्हणते तितक्यात देसाई मंडळी दरवाज्यात उभी असतात, त्यांना बघून रंजीत आणि शिवानी चाट पडतात, शिवानी रंजीत तात्यांचे स्वागत करतात तोंडावर हसू ठेवून, शिवानी रंजीत ला त्याची कुर्त्याची भाई खेचत विचारते, "तू कोना कोना ला आमंत्रण दिले आहेस घरी यायला..."
रंजीत पण गोंधळलेला असतो... "सह परिवार या म्हणालो होतो, मला काय माहित ते अख्या वस्तीलाच घेऊन येतील... "
"अरे रमेश त्या खुर्च्या लाव जरा..." रंजीत आपली व्यवस्था कमी पडेल ह्याचा आडाखा घेत रमेश ला आवाज देत सांगतो. रमेश आणि अजून काही त्याचे मित्र ४-५ खुर्च्या आणून लावतात, तो पर्यंत सगळे बसून घेतात. शिवानी स्वयंपाक खोलीत जाते, पार गोंधळलेली असते. तिला मदत करायला रंजीत हि येतो,
स्वतःची झालेली चिडचिड ती रंजीत वर काढते... "कितीदा सांगितले आहे मी किती लोक येणार ते विचारत जा... बघ आता... पोहे पण कमी पडणार .... जेवण तर लांबची गोष्ट राहिली.."

"अगं हो... आता मला काय माहित... ते इतके लोक येतील... तू काळजी नको करुस, मी करतो काही प्रबंध, सरबत पुरेल ना?"
"मी सरबत अख्खा उन्हाळा आपल्याला पुरावे असे केले म्हणून पुरेल..."
रंजीत सुटकेचा श्वास सोडतो, "चल.. ठीक आहे... ते आण मग... मी बघतो काय करायचे ते तू नको काळजी करू... "
शिवानी रंजीत नि सांगितल्याप्रमाणे सरबत बनवते आणि सर्वाना नेवून देते. रंजीत तिला तिथे दिसत नाही म्हणून त्याला शोधू लागते तर तो  तिकडे रमेश ला त्यांच्या खोलीत बोलावून काही तरी सांगताना दिसतो... रमेश लगबगीने रंजीत ने सांगितल्या प्रमाणे निघतो शिवानी ला फक्त इतकेच ऐकायला येते, "मागच्या दारानी आणशील... "
शिवानी तेथे बसून त्यांची विचारपूस करते, "घर शोधायला काही त्रास तर नाही ना झाला... "
"नाही नाही, तुमचे नाव सांगितले तर २-३ लोक इतपर्यंत सोडायला आले आम्हाला... खूपच चांगले आहेत इथले लोक... " रंजीत ला आलेला बघून देसाई म्हणतात, "गावाची खूपच सुधारणा झाली आहे." रंजीत हसतो आणि म्हणतो, "मी ओळख करून देतो, हि माझी बायको शिवानी आणि हा मुलगा ध्रुव"
"रुपाली दिसत नाही, बोलवा ना तिला" त्यांच्यातल्या ऐक ताई म्हणतात.
रंजीत शिवानी ला इशारा करतो, शिवानी म्हणते "हो बोलावते मी तिला... "

रुपाली ला घेऊन शिवानी येते, रुपाली अगदी लक्ष्मी सारखी सजली असते, तिच्या साडीचा गडद आकाशी रंग तिच्या सौंदर्याला आणखीनच खुलवत असतो, घट्ट बांधलेली वेणी आणि तरी त्यातून सुटलेली ऐक वाऱ्याच्या तालावर नाचणारी बट. तिचे टपोरे डोळे सलग खाली बघत असतात पण ते अयुष ला शोधत असतात. तिला बघून देसाई काका म्हणत, "रुपाली ला बघितलं आणि सगळा थकवा निघून गेला... ये बेटा बस" ते आपल्या शेजारच्या खुर्ची कडे हाथ दाखवत तिला बसायला सांगतात, शिवानी हि तिला जा बस म्हणते, "त्या आधी मी तुझी सगळ्यांशी ओळख करून देतो.. मी अनंत अयुष चा बाबा" रुपाली त्यांच्या पाय पडते. "हि माझी बायको अंकिता" ते आपल्या बायको कडे हाथ दाखवून सांगतात, रुपाली त्यांच्या हि पाया पडते,
"हे माझे बाबा म्हणजे अयुष चे आजोबा, आणि हि आजी, हा माझा मोठा मुलगा आनंद, आणि हि त्याची बायको आरोही, हि माझी मुलगी अर्चिता आणि ह्या तिच्या दोन मुली रिद्धी सिद्धी जुळ्या आहेत" रुपाली त्यांच्या हि पाया पडायला जाते तेव्हा सगळे हसायला लागतात... रुपाली ला हि स्वतःचे हसू येते...
"... आणि हा माझा लहान मुलगा आयुष.... " रुपालीच्या  जणू हृदयाचा ऐक ठोकाच चुकतो, ती त्याच्या कडे बघतच आपल्या खुर्चीत जाऊन बसते, त्याच्या शेजारीच ठेवली असते तिची खुर्ची. चोरून चोरून रुपाली तिरक्या नजरेने अयुष ला नीट बघायचा प्रयत्न करत असते.. पण अयुष च तिच्याकडे लक्षच नसते, रुपाली ला हे खूप वेगळं वाटत, ती स्वतःची समजूत घालत म्हणते, लाजाळू असेल, ओळख झाल्यावर बोलेल, तिला धडधडायला लागते...
प्रियकरू ... प्रियकरम   .. प्रियकरू....प्रथमं.... . गाणं रुपाली च्या मनात वाजत राहते...

सगळ्यांच्या गप्पा गोष्टी होतात, सगळे रुपाली ला प्रश्न  विचारतात शिवानी बघते तर रंजीत स्वयंपाकघरात काही तरी उचापती करत असतो... ती हि त्याच्या मागे जाते..
"काय चाललंय?" तिथे सर्व जेवणाची तयारी झालेली असते. शिवानी आश्चर्याने विचारते... "हे कसं काय झालं? कोणी केलं?"
"When  Ranjeet  is  here  don 't  fear !!" रंजीत असे म्हणता तिला पुढे सांगतो, "रमेश ला पाठवून बोलावला सगळा मेनू राजभोग मधून"
सगळी तयारी बघून शिवानी खुश होते, ती रंजीत च्या हातून प्लेट घेते आणि म्हणते, "मी करते जा तू त्यांच्याशी बोल... "
रंजीत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसतो, शिवानी रंजीत ला जेवण तयार आहे सांगते, तेव्हा रंजीत सगळ्यांना जेवायला चला म्हणतो, देसाई मंडळी जेवण नको असं म्हणतात पण रंजीत च्या अग्रहः खातर तयार होतात. सगळ्यांचे जेवण होते.
"ताई जेवण खूप छान झालं... आता तर खूप झोप येणार आहे... " अर्चिता म्हणते आणि सगळे तिच्या मताला आपली संमती देतात.
"छान वाटले तुम्हाला आवडले ते." सगळे व्हरांड्यात जमतात. रुपाली ची बैचैनी शिवानी च्या लक्षात येते, "काकू तुम्हाला हरकत नसेल तर अयुष आणि रुपाली ला एकांतात बोलू द्यावं का?" शिवानी अंकिता ला विचारते...
"अगं त्यात काय विचारायचं आहे? थांब मी अयुष ला सांगते... " त्या अयुष जवळ जातात आणि म्हणतात, "बेटा तुम्ही दोघे हि एकमेकांशी बोलून घ्या जा..."
रुपाली अयुष ला आपली खोली दाखवायला नेते, ते तिथे बसून असतात, रुपाली ला खूप प्रश्न पडतात खूप काही...अयुष काय विचारेल ते हि आणि आपण काय विचारावे ते हि... अयुष शांत बसला असतो.. शांतता मोडत रुपाली त्याला म्हणते, "तुम्ही जास्ती बोलत नाही वाटतं?"
"नाही तास काही नाही... " अयुष तिच्याकडे बघत म्हणाला आणि शेवटी रुपाली ची नजर त्याच्या नजरे शी मिळाली. ते घरे डोळे... त्याच्या पेक्षा त्याचे डोळेच जास्त बोलत होते... तिला सांगत होते त्यांना किती प्रश्न विचारायचे आहेत, "तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारू शकता... " रुपाली त्याला बोलायला चान्स देत म्हणाली... "नाही मला काही नाही विचारायचे..."
"तुम्ही सर्जन आहात असे कळले, खूप काठीन काम आहे ना.. "
"हम्म " अयुष नि एवढेच उत्तर दिले...
इकडचे तिकडचे कुठले हि प्रश्न विचारले तरी अयुष चे उत्तर हम्म, हो, नाही एवढेच... शेवटी रुपाली त्याला म्हणते, "तुम्हाला काही सांगायचे पण नाही का..."
"नाही... " अयुष तिच्या कडे न बघताच म्हणाला, मग काही तरी आठवल्यासारखे करून पुढे बोल्ला, "रुपाली, मी हे लग्न माझ्या आई बाबांच्या मर्जी खातर करतोय... " असे म्हणत तो निघायला उठतो, "तुम्हाला अजून काही विचारायचं?"  रुपाली मान हलवून नाही सांगते, आणि तो तिच्या खोलीतून निघून जातो...

रुपाली एकटीच आपल्या खोलीत विचारात म्हणजे अयुष च्या विचारात मग्न असते, सारखे तिच्या मनात तेच ते गाणं येत असत... राधा...

वृंदावनी सारंग हा का लावी घोर जीवाला... झाली अशी वेडी पिशी कोणी जाऊन सांगा त्याला... हा मंद गंध भवताली राधे ला वाट गवसली...

ती अयुष सोबत घालवलेला प्रत्येक क्षण परत जगत असते... त्याचे ते वाक्य लक्षात येत ती थोडी गंभीर होते, आई बाबांच्या मर्जी खातर म्हणजे? आयुष खुश नाही का या लग्नाने? त्यांच्या मर्जी विरुद्ध आहे का? असे अनेक प्रश्न येत असतात तितक्यात तिथे ध्रुव येतो त्याच्या सोबत ऐक छोटी मुलगी हि असते, रुपाली ध्रुव ला बघून लाडाने विचारते, "कुठे फिरताय साहेब, आज मावशी ची आठवण नाही आलाय ना.. हि कोण नवीन मैत्रीण.. "
ध्रुव तिचा हाथ धरून सांगतो,  "हि कियारा आहे हिला सगळे लाडानी क्यू म्हणतात आणि क्यू हि माझी मावशी"
रुपाली क्यू ला जवळ बोलावते आणि तिला विचारते, "तू जेवण केलंस का बाळ?" ती मान हलवूनच हो सांगते ध्रुव पुढे म्हणतो, "मी आणि क्यू नि आज एकत्र जेवण केलं मला तिच्या आजी नि खाऊ घातलं.. "
"आजी नि... ?? कुठे आहे तिची आजी... " ध्रुव अंकिता कडे बोट दाखवत सांगतो.. तेव्हा रुपाली च्या लक्षात येते कि ती देसाई मंडळी सोबत आली आहे. ती त्या दोघांशी गप्पा मारत असते तेव्हा तिथे अयुष येतो, "क्यू चला बेटा निघायचं आहे आपल्याला.." रुपाली आपल्याला अयुष ला परत बघायला मिळालं म्हणून खुश होते.
"ओके पप्पा" म्हणत क्यू अयुष चा हाथ धरून निघते....
त्या दोघांना जाताना रुपाली आपल्या खिडकीतून बघते ४००० वाट चा शॉक बसल्या सारखा तिला झटका बसतो... "पप्पा ??? "

क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा?

१. काय होईल आता रुपाली चे? ती हे सत्य कसे स्वीकारेल कि अयुष विधुरच नाही तर त्याला मुलगी पण आहे? क्यू? काय ती अयुष ला क्यू सोबत स्वीकारेल?
२.  काय रुपाली सावत्र आई होणे स्वीकारेल?
३. काय आयुष  तिच्या स्वप्नाचा राजकुमार आहे?
४.अयुष ची मर्जी आहे ह्या लग्नाला?

आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...

वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २

TLJ भाग ५

ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ५


रुपाली ध्रुव ला घेऊन खेळवत बसली होती. ती त्याला खेळवत होती पण मनात वेगळेच विचारांचे वादळ चालू होते. आपल्या आयुष्यात खुश तर होती पण मनात शंका हि होत्या, तिने जे आपल्या राजकुमाराचे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होईल कि नाही? कोण आहे कि नाही? असला तर तिच्या समोर कधी येईल? आता तिने हि सत्य मान्य केलेले कि तिचा राजकुमार काही घोड्यावर स्वार होऊन नाही येणार. मनात विचित्र विचार यायचे, देवानी आपल्या साठी कोणी बनवलाच नसेल तर?

उस रब ने जब दिल दिये दिल के दो तुकडे किये, दोनो पे ऐक नाम लिखा ऐक राधा ऐक श्याम लिखा, अब ये दिल धडकते है, मिळते और बिछाडते है... ऐक दुजे के वास्ते....

शिवानी तेथे येते आणि रुपाली ला अश्या चलबिचल अवस्थेतेत बघून तिला सर्व लक्षात येते, जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हाथ फिरवते, शिवानी ला तिथे बघून रुपाली चा भावनांचा बांध फुटतो, आपल्या भावना आवरत ती ध्रुव ला जवळ घेऊन त्याला काही समजावण्याचा आव आणते. शिवानी तिला काहीच बोलत नाही, तिला काय बोलावे काय सांगावे शिवानीला हि समजत नाही, अश्या परिस्थिती मध्ये तिला अयुष बद्दल काही बोलावे कि नाही हे हि तिला समजत नव्हते, सध्या रंजीत ला निर्णय घेऊ द्यावा आणि मग आपण रुपाली शी काही बोलणे उचित राहील असे मनाशी ठरवून ती शांत राहण्याचा निर्णय घेते.
ती रुपाली च्या आणि ध्रुव च्या हसण्यात खेळण्यात सामील होते, शिवानी ला ते लपायला सांगतात आणि ध्रुव तिला शोधतो, जेव्हा ध्रुव ची लपायची वेळ येते तो आपल्या मावशीच्या मागे लपतो. रुपाली जाईल तिथे तिच्या मागे मागे जातो आणि शिवानी ला हैराण करतो, शिवानी ला तो सापडतच नाही शेवटी तिला हार मानवी लागते.

खेळ खेळता खेळता कधी संध्याकाळ होते त्यांना कळत नाही, रंजीत ला आलेले बघून ध्रुव धावत त्याच्या जवळ जातो आणि दिवसा भाराचा रिपोर्ट देतो त्याने काय काय मस्ती केली आणि आई ला कसे हरवले सर्व सांगतो.. रंजीत मन लावून त्याचे बोलणे ऐकत असतो..
"ध्रुव, बाबांना फ्रेश तर होऊ दे, आत्ताच आले ना ते?" रुपाली त्याला आठवण करून देत सांगते...
"असू देत गं त्याच्यामुळे तर मला मी तुमच्यासोबतचे क्षण मिस केले तरी परत जगल्यासारखे वाटते!!"
गप्पा गोष्टी करता सगळ्यांचे जेवण संपते...

शिवानी ध्रुव ला झोपवते आणि शतपावली करत असलेल्या रंजीत जवळ जाते, ती हि त्याच्या सोबत फिरते, व्हरांड्यात छान वारं वाहत असत पूर्णिमेचं चांदणं छतावर डोकावत असते, चंद्राचा लाख प्रकाश वाड्याला भरभरून टाकतो... काही वेळ रंजीत सोबत शांत चालल्यावर शिवानी त्याला विचारते, "काय ठरवलेस मग?"
आपल्या विचारांतून बाहेर येत रंजीत विचारतो, "कशाचे?"
"अयुष चे अजून कशाचे?"
"हम्म ते ना.. मला असे वाटतंय कि भेटायला काही हरकत नाही, तसे हि ते काका बोलण्यावरून तर खूप सज्जन वाटले.. " त्याचे वाक्य ऐकल्यावर शिवानी ला खूप आनंद होतो.
"मग मी रुपाली शी बोलू?"
"म्हणजे तू अजून रुपाली शी बोलली नाहीस?" रंजीत ला आश्चर्य वाटते...
"तेच अपेक्षित आहे ना.. आधी तुझा निर्णय काय ते कळल्यावर मी तिच्याशी विचार विनिमय करणार ना?"
बरोबर आहे असे रंजीत मन हलवून सांगतो... "बरं मग तिचं हि काय विचार आहे ते बघुयात, तिला ठीक वाटले तर मग उद्या मी सांगतो फोन करून त्या काकांना परत"
शिवानी त्याच्या मताला होकार देत तिथून निघायला जाते तो रंजीत तिचा हाथ धरून थांबवतो, "थँक यू"
आश्चर्य वाटून शिवानी म्हणते, "कशासाठी?"
तिला जवळ ओढत रंजीत पुढे म्हणतो, "माझ्या आयुष्यात आल्याबद्दल... मला योग्य दिशा दाखवण्याबद्दल ... मला समजून घेण्याबद्दल.. आमची सगळ्यांची इतकी काळजी घेण्याबद्दल... अजून किती करणं सांगू? "
शिवानीला भरून येते, "वेडा आहेस का? त्यासाठी थँक यू काय?? मी तर फक्त आपले कर्तव्य करतीय तू पण ना.. " ती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागते रंजीत आणखीनच घट्ट करतो, "रंजीत जाऊ देत ना.. रुपाली शी बोलायचं ना.."
"आधी मला नीट थँक यू तर म्हणू दे... " रंजीत तिच्या आणखीन जवळ जात म्हणतो...
"ध्रुव उठेल.. बघेल... रंजीत अरे सोड ना... " काही यश येत नसतानाही ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत राहते...
"ध्रुव ना खोलीत झोपलाय... तो इथे नाही येणार..." रंजीत तिच्या कानात सांगतो, ज्याने तिला गुदगुल्या होतात आणि ती नको नको करत हसत राहते... "रंजीत...तत.. नको ना..." रंजीत ला चांगल्या प्रकारे माहित असतात तिचे वीक पँट्स "आपण व्हरांड्यात आहोत... तुला काही भान आहे कि नाही..."
"असं का... अरेच्या हो कि ... चल मग... "
"कुठे.." शिवानी त्याला प्रश्न विचारत राहते, तो पर्यंत तर रंजीत ने तिला उचलून घेतले असते, तिला घेऊन तो आपल्या खोलीत जातो... "रंजीत मला रुपाली शी बोलायचं आहे... जाऊ देत ना.. मी लवकर येते..."
रंजीत तिचे काही ऐकत नाही... "रुपाली झोपली आहे आता उद्या बोल तिच्याशी..." असे म्हणत तो तिला गादी वर झोपवतो आणि तिला सोडून उठताना तिच्या मानेवर फुंकर मारून अलगद चुंबन घेतो. .. त्याच्या त्या स्पर्शाने शिवानी बेभान होते आणि त्याला आपल्या कडे ओढून घट्ट मिठीत घेते...

सकाळी लवकरच आवरून शिवानी तयार होते, ती स्वयंपाक घरात नाष्ट्याची तयारी करत असते, तितक्यात रुपाली हि आवरून तिला मदत करायला येते, "काय बनवतेस वाहिनी... ?"
तिचा फ्रेशआवाज बघून शिवानी ला हायसं वाटते मनातल्या मनात ती तिच्याशी बोलायचं निश्चय करते "स्वारी आज खुश दिसतीय... झोप छान झाली वाटते.. "
"वाहिनी... आपण खुश असलो कि जग खुश वाटते... " रुपाली पाण्याचा ग्लास घेऊन पाणी घेत म्हणाली
ती काय बोलतीय न कळून शिवानी तिला काय हाताने खुणावून विचारते... "मला माहित आहे काल संध्याकाळी काय चाललेलं... दादा... आणि तुझं ...."
शिवानी लाजून काय बोलावे काय करावे काही न समजून फक्त खाली बघत राहते ... तिचे गाल लाजून लाल झालेले, आपल्या हातातल्या ग्लास मधले पाणी संपवत रुपाली शिवानी ची मज्जा घेत होती... "वाहिनी.. अजून हि नव्या नावरीसारखेच लाजतेस दादा वरून चिडवलं कि..."
शिवानी गालातल्या गालात हसते, "पण मला ऐक सांग... तू झोपलेलीस ना... "
"हम्म.. जागा साठी... पण झोपच नव्हती येत... म्हणून व्हरांड्यात येऊन बसलेली... मग तुमची चेष्टा मस्करी बघत बसले... मला भेटेल ना गं वाहिनी असं जीव लावणारा कोणी राजकुमार?"
"हो गं राणी... बघ आपण शोध सुरु केलाय ना... " शिवानी तिला समजावत म्हणते "...आणि मला तुला ऐक गम्मत दाखवायची आहे... जरा लॅपटॉप घेऊन येतेस?" रुपाली जाऊन लॅपटॉप घेऊन येते, "तू मला तो पर्यंत कांदा चिरून दे..." शिवानी लॅपटॉप घेऊन टेबलं वर बसते, ती रंजीत ने दाखवलेली साईट उघडते, पण तिला अयुष चा आयडी आठवत नव्हता, रंजीत ला उठल्यावर विचारावे लागेल असा विचार करताच असते कि साईट लोड होते आणि तिला तिच्या मागील बघितलेलले प्रोफाइल तिथे दिसतात, ती खुश होते... ती अयुष चा फोटो रुपाली ला दाखवते, "रुप्स, हा फोटो बघ कसा आहे मुलगा?"
ती अयुष चा फोटो बघत रुपाली ला विचारते, बघते तर काय रुपाली च्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहत असतात... शिवानी घाबरून जाते..."अगं रडायला काय झालं? असं काय करते... नाही आवडला का तुला मुलगा.. ठीक आहे आपण दुसरा बघू... तू रडू नकोस ना.."
"अगं हो हो वाहिनी... ऐक मिनिट थांबशील का...? मला काहीच दिसत नाही आहे आणि मी रडत नाही आहे, कांदा चिरत असल्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी येतेय... ठीक आहे? ओक???" रुपाली हातवारे करत तिला शांत राहायला सांगते... आपले डोळे ड्रेस च्या बाही नि पुसत ती लॅपटॉप कडे बघते.. पाण्यानी डोळे डबडबल्यामुळे सुरवातीला तिला पुसटशी आकृती दिसते आणि हळू हळू अयुष चा फोटो नीट दिसू लागतो... त्याचा फोटो बघून ती त्याच्या घाऱ्या डोळ्यात जणू डुबून जाते, ती क्षणभर सारं विसरून जाते...
अधीर होऊन शिवानी तिला विचारते, "कसा वाटला??"
रुपाली ला काय बोलावे काही कळत नाही, "कोणी तरी इतकं तल्लीन होऊन फोटो बघत आहे... आम्ही होकार समजावा का??"
शिवानी चे चिडवणे लक्षात येताच रुपाली, "वाहिनी... " म्हणत तिच्या गळ्यात पडते, "मला न... असं वाटलंच नाही कि मी फोटो बघतीय... आता बोलेल माझ्याशी असं वाटलं.... इतके बोलके डोळे आहेत त्याचे.. म्हणजे... त्यांचे..."
"हो ना... तू कस संभाळशील गं स्वतःला तो पुढे आल्यावर?" शिवानी तिला चिडवत म्हणाली...
"म्हणजे...?? " रुपाली काही समजले नाही असे दाखवत म्हणते...
"म्हणजे .. म्हणजे वाघाचे पंजे..." शिवानी तिला चिडवत उठते.. आणि रंजीत ला तिचा होकार कळवायला निघते तितक्यात तिला आठवते अरे आपण मुद्याची गोष्ट तर सांगितलीच नाही, ती वळते आणि बघते रुपाली अजून हि स्वतः मध्ये लीन असते... ती जवळ जाऊन तिला म्हणते, "ते रुपाली... ऐक महत्वाचे सांगायचे राहून गेले..." शिवानी विचार करतच असते सांगावा कि नाही..??? त्यात रुपाली म्हणते, "काय झाले ?" परिस्थिती सांभाळत शिवानी म्हणते, "ते मुलगा ना मुंबई चा आहे... "
"मुंबई??" रुपाली थोडं घाबरते...
"आणि... "
"आणि काय??" रुपाली गंभीर होत म्हणाली...
"... आणि तो ना.. "
"लवकर बोल ना वाहिनी... अशी काय?" अधीर होत रुपाली म्हणाली...
"तो ना... सर्जन आहे... डोक्याचा... मेंदूचा .... कळले का... म्हणजे तशी हि चांगली गोष्ट आहे, तुझा बावळटपणा, वेडेपणा तो ठीक करेल.." आणि ती तिथून पळाली...
"वाहिनी... काय हे... " रुपाली पाय आपटत म्हणाली ...

शिवानी रंजीत च्या खोलीत जाते, "अजून हि झोपले आहेत साहेब ... " ती स्वतःशी पुट्पुटते ती त्याच्या जवळ जाऊन त्याला त्रास द्याच्या हेतूने त्याच्या कानात फुंकर मारते, रंजीत झोपेतच आळे पीळे घेऊन वळून झोपतो...
"रंजीत ऐक ना... " शिवानी त्याच्या कानात बोलते...
"उम्म काय? काय झाले?" तो झोपेतच महतो.... "झोपू दे ना थोड्या वेळ.. रात्रभर झोपू नाही दिलंस..."
"उठ ना... मला तुला ऐक गुड न्युज द्याची... " गुड न्युज ऐकताच रंजीत आनंदाने उठतो...
"खरंच...??? मला लगेच उठवायचं ना...?? या वेळेस मला परी पाहिजे हा... " रंजीत आपला आपल्याशीच बडबड करत असतो आणि शिवानी त्याला वेड लागले असे त्याच्याकडे बघत बसली असते...
रंजीत शांत झाल्यावर शिवानी त्याला म्हणते, "झाले? बोलू का पुढे??"
"नाही थांब... आधी माझा ऐक प्रश्न आहे... इतक्या लवकर कसे काय कळले तुला...काल तर आपण... कन्फर्म आहे?? "
"हो मग रुपाली शी बोलून तिची संमती घ्यायला किती वेळ लागणार आहे मला?" शिवानी चा पूर्ण गोंधळ उडालेला...
"अच्छा,अच्छा ती गुड न्युज, मला वाटले... "
शिवानी त्याच्या कडे आश्चर्याने बघताच राहते, "काय, तुला काय वाटले.."
"नाही मी हि तोच विचार करत होतो... काल तर झाले... इतक्यात गुड न्युज कशी..."
त्याचे बोलणे ऐकून शिवानी आ वासून बघताच राहते... "रंजीत तू ना..." ती त्याला मारत सुटते... तिच्या त्या नाजूक हातांचा मार आवडीने खात असतो रंजीत, मग तिचे दोन्ही हाथ धरून तिला शांत करतो, "तू खरंच खूप मोठी न्युज दिलीस... आता फोन लावतो त्या देसाई काकांना" रंजीत फोन घेत म्हणतो..
"आधी तयार तर हो... अंघोळ वगैरे कर..."
"का? मी काही विडिओ कॉल नाही करत आहे त्यांना कळायला कि मी अजून अंथरुणातच बसलोय... " रंजीत शिवानी वर हसत फोन लावतो...
"हॅलो"
"हॅलो देसाई काका मी रंजीत बोलतोय, ओळखलंत का..."
"हो हो बोला, कसं काय फोन केलात...."
"ते आम्ही पुनःविचार केला, आम्हाला अयुष आवडला आहे आणि आम्ही पुढे बोलणी करायला उत्सुक आहोत"
......
...
..
.
रंजीत त्यांच्या बोलून झाल्यावर शिवानी ला बोलावतो आणि सांगतो कि सगळे पुढच्या आठवड्यात येणार आहे.शिवानी ला फार आनंद होतो आणि तिला आठवते ती रंजीत ला गंभीर होत म्हणते, "फक्त ऐक सांगायचं होत..."
"काय झालं?" तिच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी बघून तो विचारतो
"मी रुपाली ला अजून नाही सांगितलं कि अयुष च हि हे दुसरं लग्न आहे...आणि तो विधुर आहे..."
"का??तेच तर महत्वाचे आहे ना..." रंजीत आश्चर्याचा धक्का बसून म्हणतो...
"हो... माहित आहे मला... पण जर बोलणी पुढे गेली तर आपण सांगू ना तिला.. मला नाही तिच्या स्वप्नांना आत्ताच चिरडून टाकावेसे वाटले... ती इतकी मग्न झालेलले अयुष चा फोटो बघून, तिच्या चेहऱ्यावर मी वेगळाच तेज पहिला, सांगूया निवांत सगळं जुळून आल्यावर तोवर जगू देत तिला तिच्या स्वप्नाच्या जगात...."
"ते सर्व ठीक आहे.. पण... सर्व कळल्यावर ती नाही म्हणाली तर?? आपण काय तोंडानी त्यांना नकार कालवायचा...??" रंजीत पुढचा विचार करत पुढे येणाऱ्या संकटाबद्दल शिवानी ला बजावत म्हणाला...
"पुढची पुढे बघू... पुढच्या भीती मुळे आत्ताच्या आनंदाला विरझण नको..." शिवानी असे म्हणत निघून गेली....
"अगं तू क्षणभंगुर आनंदात अडकतीयेस शिवानी..." रंजीत चे ऐकायला शिवानी नव्हतीच खोलीत...
क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा?
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...
वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २


Monday, April 22, 2019

TLJ भाग ४

ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ४ 
==================
 

पाटील साहिबांचा वाईट अनुभव आल्यामुळे रंजीत ने कानाला खडा लावलेला या पुढे पाहुण्यांना घरी बोलवणार त्याच्या आधी रुपालीचे सत्य सांगणार, शिवानी नि सांगितल्याप्रमाणे रंजीत ने रुपाली चा लग्नाच्या संकेतस्थळी नाव सुद्धा नोंदवले. 
दिवसा मागून दिवस निघून गेले, रंजीत च्या हि लक्षात आले कि शिवानी चे म्हणणे बरोबर होते. कोणत्याच स्थळ ची बोलणी पुढे जात नव्हती. रंजीत ला आश्चर्य वाटत होते कि आज च्या जगात हि अशी लोक आहेत. आपल्या विचारात मग्न रंजीत व्हरांड्यात बसला असताना शिवानी तिथे आली, त्याला गंभीर बघून ती म्हणाली, "काय झाले, एवढा कसला गहाण विचार करतोस?"
रंजीतने दचकून तिच्याकडे बघितले आणि मान हलवून म्हणाला, "काही नाही असच..."
"असच कसं काय? काही नाही... सांग ना.."
"अगं खरंच काही नाही यार, मी फक्त रुपाली च्या लग्नाची काळजी करत होतो... मला आता थोडी काळजी वाटू लागली आहे.. "
शिवानी त्याला धीर देत म्हणते, "काळजी करून काय होणार आहे, त्याने ना हि रुपाली चे लग्न लवकर जमणार आहे ना हि लोकांची वृत्ती बदलणार आहे... "
तिच्या मताशी सहमत होत तो पुढे म्हणाला, "हो ते सर्व ठीक आहे पण काळजी वाटण हि स्वाभाविक आहे ना..."
शिवानी त्याच्या शेजारी बसते आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हणते, "हे बघ, जसे ह्या जगात अशी लोक आहेत जे रुपाली च दुसरं लग्न आहे हे ऐकताच पळ काढतात, कुठेतरी रुपाली साठी कोणी तरी वाट हि बघत आहे. आपल्याला फक्त धीर धरावा लागणार आहे. आणि तसं हि रुपाली च वय आहेच किती आता.. तू त्यामुळे वाट बघ त्या व्यक्तीची ज्याला रुपाली साठी बनवले आहे..."

"ते सर्व ठीक आहे... पण बघता बघता आता वर्ष होईल अशीच दिवस गेली तर?? आपल्याला लवकरच काही करावे लागणार आहे..." रंजीत च्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती...

इतक्या लोकांचा नकार आलेला बघून रुपाली चा लग्नाचा हुरूप हि उडून गेलेला... तिला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला होतो...

एक दिवस रंजीत बागेत झाडांची काम करत बसला होता, त्याला एक फोन आला हाथ खराब असल्यामुळे त्याला फोन उचलायला वेळ लागतो, खिशातला फोन कसा बसा काढून तो त्यावरचा नंबर बघतो, landline चा नंबर असतो आश्चर्य वाटून तो स्वतःशी बोलतो, "मुंबई वरून कोण आठवण काढत आहे माझी?" शंका करताच तो फोन उचलतो आणि कानाला लावतो, "हॅलो"
"रंजीत बोलताय का?"
"हो, आपण कोण?"
"मी देसाई बोलतोय, मी तुमच्या मुलीचा प्रोफाइल बघितला मॅट्रिमोनी साईटवर"
समोरच्याचे ते वाक्य एकूण रंजीत ला इतका आनंद होतो, कोणी तरी फोन केला ह्याचाच त्याला आनंद जास्ती... तो धावत शिवानी कडे जातो... "शिवानी शिवानी.... " तिला हाक मारतो, ती स्वयंपाकघरात काम करत असते, तो लगेच फोन च स्पीकर चालू करतो... "ऐक... रुपाली साठी स्थळ आलंय..."

शिवानी हि आंनदाने ऐकते.. "हॅलो... तुम्ही आहेत का?? हॅलो...."
"हो हो.. बोला ना देसाई साहेब..." रंजीत आपण ऐकत असल्याचे आश्वासन देतो.
"तर मी तुमच्या मुलीचा प्रोफाइल बघितला, आम्हाला पुढे बोलणी करायची आहे... तर पुढे जाण्या अगोदर तुम्ही पण आमच्या मुलाचा प्रोफाइल बघून घ्या"

"हो चालेल" रंजीत आनंदाने सांगतो... शिवानी त्याला त्यांच्या मुलाचं नाव वगैरे विचार म्हणून आठवण करून देते..
"माझ्या मुलाचे नाव आयुष देसाई आणि त्याचा प्रोफाइल id ५६७३४२ आहे."
"ठीक आहे मी बघतो आणि कळवतो.... "
ठीक आहे म्हणत ते फोन ठेवणार इतक्यात रंजीत ला लक्षात आले फोने मुंबई वरून आलाय... "देसाई जी... ऐक ऐक मिनिट, तुम्ही मुंबई ला असता का?"
"हो, आम्ही मुंबई ला आहोत... काही अडचण आहे का.."
"नाही .. मी सहजच विचारलं, कळवतो मी तुम्हाला... " फोन ठेवल्या बरोबर शिवानी त्याला लॅपटॉप घेऊन ये सांगते...
"अगं हो मला जरा हाथ धुवून घेऊ दे " तो तिला आपले माती नि भरलेले हाथ दाखवत म्हणतो... लगबगीने जाऊन तो हाथ धुवून लॅपटॉप घेऊन येतो... साईट लोड होईपर्यंत दोघांनाही दम निघत नाही... "शी बाई... किती वेळ... "
"अगं हो ना... मला ऐक प्रश्न आहे... आज कोण landline  वापरत गं"
"का.. आज हि कंपन्यांमध्ये दुकानांमध्ये landline  वापरतात ना..." शिवानी स्पष्टीकरण देत म्हणाली
"इतक्या सकाळी कोण दुकानातून फोन करेन... म्हणजे त्यांच्या कडे स्वतःचा मोबाईल हि नाही... गरीब असतील का गं ते?? रुपाली खुश राहील ना..."

शिवानी त्याच्या प्रश्नांना आश्चर्याने डोळे मोठे करून बघते... "रंजीत... आता फक्त स्थळ आले आहे.. तू तर तिच्या सासरी जाऊन आलास मला वाटतंय... इतकी काय घाई.. आणि आपण हो सगळं व्यवस्तीत असल्यावरच म्हणायचे आहे... " शिवानी त्याला बजावते...त्याचा उतावीळ पणा तिला खटकतो...तितक्यात साईट लोड झाली असते.

"अरे टाक ना त्याचा आयडी... " शिवानी अधीर होत म्हणते. रंजीत त्यांनी लिहून घेतलेला आयडी टाकतो, ते दोघेही त्याचा प्रोफाइल वाचण्यात व्यस्त होतात. राहणार मुंबई... उंची ५.१०" रंग गोरा, आवडी मध्ये क्रिकेट ... शिवानी मोठयाने वाचत असते... अचानक ती थबकतो... ती रंजीत कडे आणि रंजीत तिच्याकडे बघतो... त्यांचा सर्व उत्साह स्वः होतो... रंजीत ला खूप राग येतो.. "अगं विधुर आहे हा... "
"हो ना... मी हि तेच वाचतीय... माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे... " शिवानी हि धक्यातून सावरत म्हणाली...
"ह्या लोकांची हिंमतच कशी झाली रुपाली ला मागणी घालायची...." रंजीत चिडून राग राग करत होता...
शिवानी त्याला सावरत पुढे म्हणाली, "रंजीत अरे थोडं शांत डोक्यानी विचार कर... त्यांच्या साठी रुपाली चे हि हे दुसरे लग्न आहे ना.. म्हणून त्यांना वाटले असेल..."
रंजीत शांत होतो, "हो तरी काय झालं... "
"ऐक काम कर ना.. तू त्यांना फोन कर आणि कळव आम्ही विधुर नाही बघत आहोत म्हणून..."
"हो... तेच ठीक राहील... अगं पण फोन कुठे करू... त्यांनी तर मला दुकानातून केला होता..."
"थांब, इथे त्याच्या प्रोफाइल मध्ये असेल नंबर दिलेला..." शिवानी नंबर बघू लागली... त्यात तोच नंबर नोंदवलेला असतो ज्यावरून फोन आला असतो..."त्यांचे स्वतःचे दुकान असेल अरे... तू लाव फोन"

रंजीत फोन लावतो... तिकडे फोन वाजतो आणि देसाई साहेब फोन उचलतात, "हॅलो"
"हॅलो देसाई जी मी रांजेते बोलतोय... तुम्ही तोड्या वेळ पूर्वी फोन लावला होता बघा..."
"हो हो... रुपाली चे बाबा ना..."
"ते आणि ऐक.. त्याचे काय आहे कि रुपाली माझी मुलगी नाही आहे.. मी भाऊ आहे तिचा..."
"ओह ! असं आहे का.. माफ करा मला वाटले तुमची मुलगी आहे... " त्यांचा बोलण्याने रंजीत चा राग पळाला... तो शांत होईन बोलू  लागला.. इकडे साईट वर तितक्यात आयुष्य चा फोटो लोड झालेला, शिवानी च त्याकडे लक्ष गेले ... तो फोटो बघून ती जणू मंत्रमुगध झालेली, इतके बोलके डोळे... गोरा, कुरळे केस, पिळदार मिशा. ती रंजीत ला फोटो दाखवण्यास वेळो वेळी लक्ष वेधून घ्याचा प्रयत्न करते पण तो बोलण्यात व्यस्त असतो...

"देसाई साहेब आम्ही आयुष चे प्रोफाइल बघितले, पण आम्ही रुपाली साठी विधुर बघत नाही आहोत.. मला माफ करा पण आम्ही या स्थळ सोबत पुढे नाही जाऊ शकत"
"अहो पण हे रुपाली चे सुद्धा दुसरे लग्न आहे... डिवोर्स नंतर कोणता मुलगा तिला स्वीकारेल..."
"नाही नाही.. तिचा डिवोर्स नाही झालेला.. त्याच कसं आहे तिचं लग्न झालेलं पण ते लीगल नव्हतं..."
"म्हणजे? मला नाही कळले काय म्हणायचे ते तुम्हाला..."
"अहो तिचं ते बाल विवाह झालेला... आणि बाल विवाह तर भारतात कायद्याने गुन्हा आहे ना...  तर खरं तर तीच लग्न झाल्यात जमाच नाही...  म्हणजे लग्न झाले... पण नाही झाले ... आम्हला काही लपवून ठेवायचे नव्हते म्हणून आम्ही सर्व सत्य लिहिले..."
"ओह ! बिचारी... पण तुम्ही असं कसं आपल्या लहान बहिणीचा बाल विवाह लावून दिलात... लाज नाही वाटली तुम्हाला..."
"अहो तुम्ही माझ्यावर काय ओरडताय.... "
"मग द्या फोन तुमच्या पिताश्री ना... त्यांना ओरडतो.. मुलगी इतकी काय जड झाली होती त्यांना कि त्यांनी तिचा बाल विवाह लावून दिला... "
"नाही नाही... माझ्या बाबांनी नाही तिचा बाल विवाह लावून दिला..  म्हणजे आम्ही सक्खे बहीण भाऊ नाही... "
"म्हणजे सावत्र आहेत... तुमच्या बाबांनी दुसरे लग्न केलेले का?"
"नाही सावत्र हि नाही आहोत जाऊ द्या ना.. तुम्हाला काय करायचे काका... तुम्हाला निरोप मिळाला ना..." रंजीत ची चीड चीड होत होती... इतका मोठा इतिहास होता त्याच्या आणि रुपाली च्या नात्याचा तो कोणाला फोन वर कसा समजावणार...त्याने रागा रागा ने फोन ठेवला.

शिवानी त्याचे सर्व बोलणे ऐकत होती... तो जरा शांत झाला तेव्हा तिने त्याला लॅपटॉप दाखवला आणि त्यावरचा आयुष्य चा फोटो दाखवला. आयुष्य ला बघून रंजीत आनंदी झाला... " याला बघून असे नाही का वाटत कि हा रुपाली साठीच बनला आहे.."
"हो ना.. मला हि अगदी असेच वाटले... " शिवानी त्याच्या मताला संमती देत म्हणाली...
"कोण आहे हा?"
"कोण काय.. हा आयुष्य आहे..."
"अगं... पण..." रंजीत जरा निराश झाला... "देव असं का करतो किती निरागस वाटतोय तो.. का त्याला आपल्या  बायको ची साथ अशी मधेच सोडावी लागली..." रंजीत हळवा झालेला..."त्याला बघून मला ना... इन्स्टंट काँनेकशन वाटतंय पण मी रुपाली साठी विधुर नवरा नाही बघत आहे... she  deserves better यार, ऐक भाऊ म्हणून मला तर माझं मन परवानगीच देत नाही आहे"
शिवाणी ला काय बोलावे ते कळत नव्हते, तिचे मान सध्या दामाडोल होते.. तिच्या लक्षात त्या काकांनी विनम्रतेणे केलेली चौकशी हि होती...
"हे बघ रंजीत आपण इतके दिवस पहिले ना कोणते तरी स्थळ चालून आले का... बाल विवाह झालेला हे कळल्यावर हि कोणी पुढाकार घेतला का... देवाची काय इच्छा आहे काय माहित आणि आयुष्य रुपाली च्या आयुष्यात येणे असेल तर आपण कितीही विरोध केला तरी ते होणार... "
"माझं सध्या डोकं तापलंय मला काही नाही बोलायचं... मी नंतर निवांत ..." रंजीत निघून गेला..

शिवानी नि आयुष्य ला FB वर शोधले... तिथे तिने त्याचे पूर्ण प्रोफाइल बघितले... त्याचे मित्र परिवार कोण कोण आहेत त्याच्या आवडी निवडी सर्व बघितल्या... तिला तो खरंच आवडला, ज्या प्रमाणे बाल विवावीत असणे ह्यात रुपाली चा दोष नव्हता तसाच विधुर असण्यात आयुष्य चा दोष नव्हता... पण रंजीत  ला कोण समजावणार? ती स्वतःशीच बोलली..

संध्याकाळी रंजीत घरी आला तेव्हा ती वाट बघत होती कधी त्याच्याशी या विषयावर बोलावे..
संधी साधून तिने विषयाला हाथ घातला, " रंजीत मला वाटते आपण आयुष्य बद्दल विचार करायला हवा. तो चांगला मुलगा वाटला मला. आपण रुपाली बद्दल लोकांना नाव ठेवतो, ते ओपन माईंडेड नाहीत वगैरे पण आज तू काय करतोयस? आयुष्य ची बायको नाही ह्यात त्याचा काही दोष आहे का? आपण आता विचार करायला हवा... तू निवांत विचार कर, वेळ घे पण त्याला संधी दे." शिवानी तेवढे बोलून उठली..

क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा?
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...

वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २

Saturday, April 20, 2019

TLJ भाग ३

ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ३  



बघता बघता तो दिवस उजाडला...

जिसे धुंडता हू मै हर कही जो कभी मिली मुझे है नाही... जिसके प्यार पे हो एकीनं वो लाडकी है कहा... जो ये केहने  को भी तयार हो तुम ही हो मेरे दिलदार वो लाडकी है कहा... 

सकाळी सकाळी रुपाली च्या कानात शान गाणं गुणगुणू लागला
स्वतःला आरशात बघून रुपाली स्वतःशीच लाजत होती, ती स्वतःशीच विचार करू लागली, "काय होतंय मला? मी अशी लाजरी बुजरी का वागतीय? कोण तो कुठला पाटील मला पहायला येणार आणि इथे माझे हाथ का थंड पडतायत? असच होतं का सगळ्यांना? कोण सांगेल मला? वाहिनी च बाई बरं होता अशी वेळच नाही आली... "

"मग तुला कोणी मनाई केली होती का स्वतःसाठी मुलगा बघण्यासाठी?" तिचेच मन तिच्याशी गप्पा टाकत होते... स्वतः मध्ये रमली असताना तिला शिवानी ची हाक ऐकू आली.. "रुपाली तू तयार हो लवकर... तुझ्या दादानी त्यांना सकाळीच बोलावलं आहे... " वाहिनीची हाक ऐकून ती भानावर आली... लवकर जाऊन तिनी अंघोळ आवरली, ती कोणता ड्रेस घालू विचार करतच होती तितक्यात शिवानी तिच्या खोलीत आली, "रुपाली ही बघ तुला ह्यातली कोणती साडी आवडेल का बघ!!"
"वाहिनी, मी नाही साडी घालणार..."
"तुला तर आवडते ना साडी नेसायला.. मग आज मिळतोय ना चान्स... नेस कि..."
"नको ना.. "
"आज काल च्या मुली ना तुम्ही... जे कर म्हंटल ते काही करत नाही..."
"वाहिनी आज काल च्या मुली तुम्ही... म्हणजे म्हणायचे काय आहे तुला... तू ही माझ्याच वयाची आहेस हा.. तू तर असं बोलतेस जसा कि आपल्या वयात किती फरक आहे..."
"अगं हो.. ते मी जरा आता तुझ्या आई च्या रोल मध्ये आहे ना... म्हणून निघून गेला... पण ह्याचा हा अर्थ नाही कि मी सांगेन ते तू ऐकायचं नाही... साडी घालायची..."
"पण का??"
"आता कसं सांगू मी तुला... बघ... त्याच असं आहे कि तू ड्रेस कसा ही घे... किती ही महाग पण मुलीचं रूप जे साडीत खुलत ना ते ड्रेस मध्ये नाही खुलत..."
शिवानी चे वाक्य ऐकून रुपाली गालातल्या गालात हासली, "मग काय? घालणार ना..."
"ठीक आहे.. पण मला नेसता येत नाही साडी... " रुपाली संकोच व्यक्त करत म्हणाली.
"त्यात काय मी नेसवते तुला... तू बाकी तयार हो मी आलेच ध्रुव ला बघून ठीक आहे... तो वर साडी निवडून ठेव..."
रुपाली साड्या चाळत बसली कोणती साडी नेसू हा विचार करत, "शी वाहिनी पण ना... कोणती साडी नेसू सरळ सांगायचं ना... मला नाही कळत... किती गरम होतंय... " रुपाली जाऊन पंखा लावते आणि रेडिओ ही चालू करते...

तू नझ्म नझ्म सा मेरे हौटो पे ठेहर जा में ख्वाब ख्वाब सा तेरे आँखों में जागु रे... 

शेवटी ती एका साडी ची निवड करते त्यावर बांगड्या, गळ्यातले वगैरे काढून ठेवते... तितक्यात शिवानी येते, "निवडलीस साडी?" ती आल्याआल्या विचारते..
"ही ठीक राहील का?" रुपाली थोडं गोंधळून विचारते..
"हम्म.. ठीक आहे, बांगड्या वगैरे आहेत का matching ?" शिवानी सगळ्या वस्तू बघत म्हणते... "ठीक आहे चल तुला नेसवून देते..."
साडी ची घडी मोडत शिवानी रुपाली ला सांगते, "ही साडी खूप खास आहे, तुझ्या दादा नि आणलेली मला पहिली भेट आहे ही... " शिवानी बोलत बोलत साडी रुपलाई च्या पारकर मध्ये खोचते...
तिचा कंबरेला हाथ लागताच रुपाली गुदगुल्या होऊन हसायला लागते... "अगं.. काय झालं... नीट उभी रहा ना... "
"तू गुदगुल्या नको करुस ना... " रुपाली म्हणते... शिवानी च्या लक्षात येते आणि ती तिला म्हणते.. हे बघ हे घे तूच खोच.. नाही तर आज काही साडी नेसणं होणार नाही... दोघी खिदळत असतात....
रुपाली ला साडी नेसवून शिवानी बाकीची कामं बघायला निघते...
रुपाली तयार होऊन बसते..
साडी चा गडद गुलाबी रंग तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत असतो. टपोरे डोळे eyeliner नि अजूनच रेखीव दिसतात. तिचे लांब सडक केस तिने मोकळेच सोडले असतात, केसांची एक बट येऊन गालावर संपते.

पाटील मंडळी वेळेवर येतात, रंजीत-शिवानी त्यांचे स्वागत करतात आणि त्यांना बसायला सांगतात, व्हरांड्यात छान भारतीय बैठक मंडळी असते, मध्य भागी एका फुलदाणी मध्ये निशिगंधा ची फुलं लावली असतात ज्या मुळे सर्वत्र वाड्याभर सुवास पसरला असतो...
शांतात मोडत पाटील साहेब रंजीत ला आपल्या मुलाची ओळख करून देतात, "हा माझा मुलगा विकास"

सगळे लोक गप्पा मारत बसतात,
"रंजीत साहेब आपण काय एकमेकाला ओळखत नाही असं नाही, त्यामुळे बोलायला किंवा चौकशी करायला काही नाही आमच्याकडे, तुम्ही रुपाली ला बोलवा... "
रंजीत हसत त्यांना संमती देत शिवानी ला हाक मारतो... "अगं शिवानी, रुपाली ला घेऊन ये.."

शिवानी रुपाली च्या खोलीत जाते, रुपाली ला बघून ती २ मिन स्तब्ध राहते, "किती छान दिसतेस, दृष्ट नको लागायला कोणाची..." म्हणत ती तिची दृष्ट काढत कपाळाला आपली बोट मोडते. "चल... बोलावतात..."
रुपाली चा काही पाय निघत नाही, "वाहिनी मला खूप भीती वाटतं आहे... "
"भीती, कशाची...??? अगं विकास ला ओळखत नसलीस तरी पाटील साहेबांशी तर रोजच बोलतेस ना.. भीती कशाची... चल..." तिला धीर देत शिवानी आपल्या सोबत नेते..

रुपाली ला बघता क्षणी विकास तिला पसंती देतो...

ध्रुव रुपाली ला बघून शिवानी च्या कानात बोलतो, "मावशी छान दिसते ना आई..." जे सर्वांना ऐकू येते आणि सगळे हसू लागतात...
मावशी शब्ध ऐकून कुतूहल व्यक्त करत पाटील साहेब म्हणतात " रंजीत रुपाली तुमची बहीण आहे ना मग ध्रुव ची मावशी कशी काय?"
त्यांचा प्रश्न ऐकून रंजीत आधी हसतो, "तुमचा प्रश्न तुमच्या ठिकाणी एकदम बरोबर आहे... त्याचं काय... आम्ही सगळे परिस्थितीने एकत्र आलो आहोत... तुम्हाला तर माहीतच आहे,  रुपाली माझी बहीण नाही आणि शिवानी ची ही बहीण नाही पण त्या बहिणीहून जास्त आहेत ...  आत्या कि मावशी काय म्हणायचं ते आम्ही ध्रुव वर सोडलं आहे. त्याला ती मावशी म्हणून जास्त आवडते तो तिला मावशीच म्हणतो...  "

ध्रुव शिवणीच्या कडेवरून उतरून रुपाली कडे धावत जाऊन तिच्या कुशीत शिरतो...
"...आणि आमच्या पेक्षा त्याला रुपालीची जास्त सवय आहे... " रंजीत खुलासा करतो...
सगळे त्याच्या निरागस वागण्यावर हसून आपल्या गप्पा सुरु ठेवतात.

"तुला तिच्याशी काही बोलायचे असेल तर आमची काहीच हरकत नाही..." रंजीत विकास ला म्हणतो...
"नाही... मला काही नाही विचारायचं... त्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकतात... "
रुपाली कडे सगळ्यांची नजर असते... रुपाली चोरट्या नजरेने विकास ला बघण्याचा प्रयत्न करत असते.. ती ही मान हलवून काही नाही विचारायचे सांगते...

शिवानी तिला घेऊन आत जायला निघते, विकास तिच्या पाठमोऱ्या आकृती ला बघतच असतो, शिवानी वळून त्याला म्हणते, "नक्की काही नाही बोलायचं तुम्हाला दोघांना... " आपल्याला रुपाली ला निहारताना पकडले असे कळत्या क्षणी विकास कावरा बावरा होतो... सगळे त्याची खेचतात, "अरे आतापासून हे हाल आहेत... "

सगळ्यांचा चहा झाल्यावर शिवानी रंजीत ला बोलण्याचे आठवण करून देते..

"बाकी पाटील साहेब आपले मैत्रीचे नाते आहे, तुम्हाला आमच्या विषयी सर्व काही माहित आहे तरी मी कोणत्याच गोष्टी मोघम ठेवू इच्छित नाही ज्याने पुढे चालून नात्यांवर परिणाम होईल..  "

"असे बोलून मला छोटं केलंत रंजीत तुम्ही... मी काय आज ओळखतोय तुम्हाला? तुम्ही या गावाच्या विकासात किती हातभार लावला आहे काय माहित नाही का मला... "
"आभार आहेत त्या बद्दल तुमचे पण काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला वाटते सांगितलेले बरे... तुम्हाला रुपाली बद्दल सर्व माहिती असली पाहिजे, तिच्या वर्तमान आणि भूतकाळ तुम्हाला माहित असावा... त्याचा तिच्या भविष्यकाळावर काही परिणाम होऊ नाही अशीच आमची इच्छा आहे."

"तुम्ही म्हणताय म्हणून सांगा... तुमचे मनावरचे दडपण कमी होईल, पण खरंच दादा मला काही फरक नाही पडत रुपाली च्या भूतकाळात काय घडले आहे त्याचे... प्रत्येकाचा भूतकाळ असतो...त्याला काय " विकास विश्वासाने म्हणाला, ते ऐकून शिवानी ला धीर आला.रंजीत तिच्याकडे, बघ मी म्हणालो होतो ना... असे बघतो... परत विषयाला हात घालत रंजीत त्यांना सांगतो,  "हे रुपालीचे दुसरे लग्न आहे... "

"काय??" पाटील घराण्यातले सर्व जागचे उडाले...
"अहो... हे कसलं स्थळ आणलात तुम्ही आपल्या विकास साठी? मुलीचे तर आधीच लग्न झालेले आहे..." पाटलीन बाई आपल्या नवऱ्यावर ओरडल्या...
"अगं मला नाही माहित... काय बोलताय रंजीत तुम्ही... आधी का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला.. असं अंधारात का ठेवलंत... मी तर तुम्हाला चांगला मित्र समजत होतो... "

"पाटील साहेब अहो ऐकून तर घ्या.. "
"आम्हाला काहीच नाही ऐकायचं, इतकी मोठी गोष्ट तुम्हाला आम्हाला आधी सांगावीशी नाही वाटली... चला... निघतो आम्ही" त्यांनी आपल्या बायको आणि मुलाला निघण्याचा इशारा केला...
रंजीत विकास चा हात धरून त्याला थांबवतो, "विकास तू तर ऐकून घे... "
"दादा, मी काय ऐकू... तुम्ही बाकी काही ही सांगितलं असतं तर मला फरक नास्ता पडला... पण माझ्या ही काही अपेक्षा आहेत माझ्या बायको कडून... मी कसं एका विवाहित मुलीशी लग्न करू तुम्ही सांगा... मला माफ करा..." विकास आपला हात सोडवत म्हणाला
"अरे पण एकूण तर घे... " रंजीत बोलत होता पण विकास त्याच काही न एकता आपल्या बाबा च्या मागे निघून गेला. सरी पाटील मंडळी आपल्या SUV मध्ये बसून तडका फडकी निघून गेले...

रंजीत त्यांना बघत तिथेच उभा राहिला... शिवानी तिथे येऊन त्याला आत चल म्हणते...
"मी सांगितलं होता ना... "शिवानी त्याला बजावणार इतक्यात तो तिला म्हणतो...
"अगं पण त्यांनी पूर्ण एकूणच घेतला नाही..."
"त्यांना हवा तेवढं सत्य त्यांनी ऐकलं... आज ही आपला समाज इतका विकसित नाही कि ते मान्य करतील कि रुपाली ला ही जगण्याचा अधिकार आहे... "
"इतकंच जर समाज विकसित असता ना तर रुपाली ला रासबेरी मध्ये यावेच लागले नसते... " शिवानी असे म्हणत रागा रागाने व्हरांडा आवरायला घेते... ती स्वतःशीच पुटपुटत असते, "मला माहित होते.. सगळे एका माळेचे मणी... म्हणे मला काही फरक नाही पडत भूतकाळाचा... मग चेहऱ्याचा रंग का उतरला ऐकल्यावर ... दुसरे लग्न आहे... दुसरे लग्न म्हणजे ... "

तिकडे सगळा प्रकार कळल्यावर रुपालीच्या कवळ्या मनावर घात करून जातात... तिला खिडकी शेजारी स्तब्ध उभी बघून रंजीत शिवानी ता तिला समजावण्यास सांगतो.. शिवानी तिच्या जवळ जाते... रुपाली ला आपल्या जवळ घेऊन तिला खुर्ची वर बसवते आणि सांगते, "रुपाली काही लोक कमकुवत असतात, तो तुझ्यासाठी उचित नव्हता... तू जशी मोठ्या मनाची आहेस ना, तो नाही आहे..." शिवानी चे बोलणे संपण्याच्या अगोदरच रुपाली रडायला लागते तिला पोटाशी घेऊन शिवानी समजावण्याचा प्रयत्न करते...
"मी विसरले होते वाहिनी, मला तर स्वप्न बघण्याचा अधिकारच नाही... कारण माझं तर भविष्य अंधकार आहे.. कारण माझा भूतकाळ काळा आहे... "
"असं नाही आहे रुप्स... तुला समजणारा... तुझ्या भूतकाळा पेक्षा तुला जास्ती जपणारा, तुझ्या मनाची काळजी घेणारा आहे आणि तो तुला शोधत आहे.. तो ही तुझ्या साठी अश्रू गाळत असेल... तुझी स्वप्न बघत आहे..  नाकी येईल.. विकास काय एकाच मुलगा आहे का... आपण त्याच्या हुन चांगलं स्थळ शोधू, असली कमकुवत माणसे नकोत" शिवानी तिचे अश्रू पुसते तेवढ्यात रंजीत येतो.

"रुपाली, मला नव्हतं माहित इतक्या शूद्र बुद्धीची लोक असतील.. मित्र म्हणून मी हलक्यात घेतलं, मी आधीच नीट चौकशी करायला हवी होती, माझीच चूक झाली.. मला माफ कर.. या पुढे मी कोणतंही स्थळ नीट चौकशी करून आणेल... तुला असं दुखावणार नाही "

"दादा तू काय माफी मागतोस... जे काही झालं ते माझ्या नशिबाने झालं आता ह्यात तुझी काही चूक नाही... आणि तू तर माझ्या भल्यासाठीच बोललास ना त्यांना... सत्य आपण लपवले जरी असते आत्ता आणि त्यांना उद्या हे कळले असते तर विचार कर त्यांची अशीच प्रतिक्रिया असती... आणि तेव्हा नुकसान जास्त झाले असते... तू नको काळजी करू... मी ठीक आहे..."

"किती गुणांची आहे ग माझी छकुली... " रंजीत तिच्या कपाळाची पप्पी घेत म्हणतो... "तू  फ्रेश हो मग आपण छान बाहेर जाऊ आज" रंजीत शिवानी ला घेऊन जातो आणि तिला आवरण्यात मदत करतो..
रुपाली आपल्या खोलीत शांत बसली असते आरशात स्वतःला बघत असते काही वेळा पूर्वी तिच्या सौंदर्याने तेजवलेला तिचा चेहरा आता रडून रडून सुजला होता eyeliner पसरून डोळे काळे निळे झाले होते. केस विस्कटलेले, स्वतःला बघून ती हसली, "मी नाही कोणाला माझ्या वर असा प्रभाव करू देईल... त्यांनी नकार दिला म्हणून काय... मला गरज नाही असल्या विक्षिप्त लोकांची !! ती स्वतःला सावरून फ्रेश होते..." रेडिओ लावते...

तेरे साथी मेरे कदमं के है निशाण... तू ना जाणे आस पास है खुदा... चलता  हू में तेरे साथ...  

क्रमश:
------------------

वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.. 

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...