Monday, September 16, 2013

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार


आज मला काही वेगळा नाही मांडायचा आहे, आपण हे बर्याच द एकात आलो आहे पण मला कदाचित आज हे कळलं... तुम्हाला आधीच कळलं असेल...

जेव्हा आपण म्हणतो देव आपल्यातच आहे, देव हा प्रत्येक व्यक्ती मध्ये आहे.आपण त्याचाच एक अंश आहोत... एकदम बरोबर आहे हे..
माणसात जे गुण अवगुण आहेत त्याचा निर्माण शेवटी कुठून झाला. हे सगळे गुण आपल्याला देवापासूनच भेटले आहेत. देव इतर कोणी हि नसून आपल्या सारखाच एक आहे ज्यांनी आपल्या वाईट गुणांवर मात करून संपवले आहे.

देव हि आपल्या भक्त साठी कट रचतात, त्यांना हि वाटता कि त्याच्या कडे कोणी लक्ष द्यावा, त्याला हि कोणी प्रेम करावा, देव आपल्या रस्त्यात काठीणाई आणतात मग आपण त्याची आठवण करतो, त्याला साकडं घालतो, त्याला लालच देतो त्याला नवस बोलतो, मग होते आपल्याला त्याची आठवण...

देव हि आहे न प्रेमाचा भूकेला... त्याला पण वाटते मिळावा त्याला हि थोडा भाव..
हम्म खतो न मग असं भाव लगेच नाही पूर्ण करत तोः भक्ताच्या इच्छा
परीक्षा घेतो, वाट बगायला लावतो सहनशीलता बघतो ...

नवसाला पावणारे देवता आहेत...
मग नाही का ते आपल्यासार्केच लालची???
नवस केला कि इच्छा पूर्ण करणारे??
मला खूप प्रश्न पडतात, काय देवाण मध्ये हि भांडणं होतात?
मी दोन देवाण पाशी नवस बोलले तर कोणी त्याच्या भक्ताचा काम केला म्हणून काय त्यांच्यात हि चडा ओढ लागते??
हो हो सगळे देव एकाच आहेत.. :) पण मग एक पावतो आणि एक नाही असे का?

मला खरच त्याला भेटायचा आहे असं माणसा सारखा का वागतो विचारायचा आहे
त्याला कशाची कमी आहे? म्हणून असं माणसाना त्रास देतो? सगळा माहित असताना त्याच्या दैवत दुख का लिहितो?
कोणाच्या मनात कसा भाव हे हि त्याला माहित आहे, कोण त्याच्या वर किती प्रेम करतो हे ती त्याला माहित आहे मग काय अर्थ आहे ह्या परीक्षा देण्याचा..???
बारा देवू आपण परिक्ष... पण निकाल हि त्याला अगोदरच माहित आहे... मग परीक्षा घ्याचीच कशासाठी?

खूप खूप प्रश्न आहेत आणि खूप गोंधळ हि...
मी त्या दिवशी महादेव पाहत होती... त्यात नांदी महादेव ला एक खूप छान प्रश्न विचारतो... तो म्हणतो देवा तुम्ही राक्ष्श ला वरदान देताच का जेव्हा तुम्हाला माहित असतं कि तो पुढे जावून त्याचा दुरुपयोग करणार आहे आणि त्यला शेवटी तुमच्या हाथी मरावा लागणार आहे...

महादेव जे उत्तर देतात ते मला खूप आवडला..
जरी त्यांना पुढे काय होणार आहे हे सगळा माहित असतं, त्यांना माहित असतं कि काय वरदान मागणार आहे त्याच्या मनात काय इच्छा आहेत, त्याने जगाचा कल्याण होणार कि नाही... पण त्यांना एक आशा असते, आशा त्याच्या सुधारण्याची...

तप करतो तेव्हा भक्त देवाची वाट पाहतो कि आता येयील मग येईल आणि मला वरदान मिळेल....
वरदान दिल्यावर देव भक्ताची वाट पाहतात कि आता सुधारेल मग सुधारेल, त्याला त्याची चूक आता कळेल... :)

हि आशा असते त्यांना सगळं माहित असताना हि वरदान द्याला भाग पडते...
आशा माणसाच्या सुधारण्याची..
माणसाने आपली चूक काबुल करण्याची...

सगळं जरी ठरलं आहे... तरी आपल्या हातात त्याला बदलण्याची शक्ती आहे...
ती शक्ती आपल्याला दिली आहे आपल्या निर्णयांनी, आपण आपलं भविष्य घडवू शकतो ह्याचा अर्थ हा आहे...
जरी भविष्य ठरलेलं आहे तरी आपण बरोबर निर्णय घेवून ते भविष्य बदलू शकतो.. दोन निर्णयातून चांगला निवडून बदल घडवू शकतो..

मला कळल आहे आता.. "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" ह्या म्हणीचा अर्थ...


No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...