Thursday, May 16, 2019

TLJ भाग १०

   
=====ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग १०  =============

बघता बघता वेळ पळू लागला... तो दिवस हि उगवला... हो आज आहे रुपाली आणि आयुष चे लग्न...
लग्न साधच होत रेजिस्टारऑफिस मधे सकाळी ९च्या टोल्यावर दोघांनी एकमेकांना हार घातले आणि सर्वांच्या साक्षी ने दोघांनी एकमेकांचा स्वीकार केला...

ठरल्याप्रमाणे लग्नाचा होणार खर्च आयुष नि रुपालीच्या नावाने त्याच्या हॉस्पिटल मधे दान करायचे ठरवले असते, तो आणि रुपाली सोबतच हॉस्पिटल ला निघतात आणि घरच्यांना पुढे घरी जायला सांगतात, आयुष आणि रुपाली हॉस्पिटल ला येतात, रुपाली कार च्या बाहेर पडून बघते तर भले मोठे हॉस्पिटल तिच्या समोर असते, "इतके मोठे हॉस्पिटल?"
"हम्म.. हे multispeciality हॉस्पिटल आहे, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांसाठी इथे एक डिपार्टमेंट आहे... " रुपाली थक्क होऊन बघत असते..."मी neurosurgeon आहे, नेओरोलॉजि डिपार्मेंट मधे आहे चल तुला माझं केबिन दाखवतो..."
हॉस्पिटल मधे गेल्यावर रुपाली सगळीकडे बघत चालत असते, स्वछ, नीट नेटके सगळीकडे शांत वातावरण आयुष च्या मागे मागे चालत ते नयूरॉलॉजि डिपार्टमेंट ला येतात तिथे आयुष कोणाला बोलावतो आणि त्याला काही समजावून सांगतो... रुपाली त्याच्या केबिन मधे खिडकी शेजारी उभी राहते, तिला तिथून समोरचे जनरल वॉर्ड दिसतो, सर्व मेंटल आजार असलेले लोक दिसतात ज्यांना आपल्या आजू बाजू ला काय चाले हे हि लक्षात येत नव्हते, रुपाली जरा शी घाबरलेली, ती त्यांना बघत राहते त्यांचे वागणे निरखून बघते.. आयुष तिला चल म्हणतो... घाबरलेली रुपाली आयुष च्या बाजू ला धरून त्याच्या मागून चालते... सर्व सोपस्कार पूर्ण करून ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा रुपाली च्या लक्षात आले कि तिने आयुष चा हात  किती घट्ट धरून ठेवला होता, आपला हाथ मागे घेत ती त्याला सॉरी म्हणते, आयुष तिच्याकडे बघून गोड स्माईल देतो आणि कार चे दार उघडतो, "इतकं काय घाबरायला झालं?"
"माहित नाही त्या लोकांच्या नजरा... वेड्यांना तरी... म्हणजे... काय सांगू... तुम्ही कसे काम करता या लोकांमध्ये, कसे ह्यांच्यावर उपचार करता.. ?? म्हणजे मला ना एक प्रश्न पडलाय विचारू?"
"विचार ना..."
"आपण कोण आहोत काय करतो, कोणाबरोबर वावरतो, कोण आपले नातेवाईक कोण मित्र , कोण वैरी या वर तर आपले सर्व आयुष्य असते.... आपण जर तेच विसरलो... तर कसं होईल... मी त्यांच्या प्रियजनांच्या डोळ्यात वेदना पाहिल्यात... त्यांच्यावर किती प्रहार करत असेल हे सत्य... आपण ज्याच्यावर कधी इतकं प्रेम केलं, ज्याने आपल्यावर इतका जीव लावला, ती.. ती व्यक्ती .. ती व्यक्ती आज आपल्याला विसरली... ओळखत नाही...?? आपल्या स्मृती किती महत्वाच्या आहेत ना... म्हणजे मला वाटत होत आज पर्यंत कि हृदय सगळ्यात महत्वाचे अव्यय आहे, ते बंद पडले तर झाले आपण गेलो... पण आज वाटतंय नाही... डोकं महत्वाचे आहे... डोकं नीट नसेल, आपल्या स्मृती आपल्या सोबत नसतील तर त्या जगण्याला काय महत्व? प्रेम असून हि नसेल...  आपण  कोणावर प्रेम करतो हेच विसरलो तर जगणार कसं?"
आयुष तिला फक्त हूं असे उत्तर देतो आणि कार चालवत राहतो... रुपाली हि आपल्या विचारात मग्न होते...

दोघे घरी पोचतात, रुपाली पहिल्यांदा आपल्या घरी येत असते ती सर्व निरक्षण करत असते... सोसायटी, लिफ्ट, प्रत्येक क्षण नवीन आयुष्याचे नवीन उमेद देऊन जात असतात. लिफ्ट चे दार उघडते, दोघे बाहेर येतात शिवानी दारावर बघते "किलबिल" ची पाटी लागली असते... तिला ते नाव खूप आवडते ती स्वतःशीच विचार करत राहते, किती छान घरात नेहमी किलबिल सुरु राहिली पाहिजे... मोठ्यांची छोट्यांची... तेवढ्यात दार उघडते... सर्व त्यांची वाट बघत असतात... रुपाली चा रीतसर गृहप्रवेश होतो.... आपले नवीन घर नवीन परिवार बघून रुपाली चे डोळे भरून येतात... शिवानी तिला जवळ घेत... चला थोडा अराम करून घ्या सगळे परत मग संध्याकाळी रिसेप्शन ची तयारी करायची आहे... सगळे हो हो म्हणत आपल्या आपल्या खोल्यां मधे जातात.

संध्याकाळी....
रिसेपशन किलबिल च्या रुफटॉप वर असते...
"मस्त आहे ना वाहिनी... पेंट हाऊस ... आपला प्रायव्हेट टेरेस!!"
"हो ना.. चल तयार हो पटकन..." शिवानी तिला सांगते..

रुपाली तयार झाली असते सगळे अतिथी मंडळी हि आले असतात, अंकिता शिवानी ला रुपाली ला घेऊन यायला सांगते, आयुष तिची वाट बघत असतो... आयुष नि सोनेरी रंगाची शेरवानी घातली असते, रुपाली नि मरून रंगाचा ग्राउंड टच गाउन घातला असतो जो तिच्या गोऱ्या रंगला अजून खुलवतो, मोकळे केस कंबरेवर खेळात असतात, आयुष तिला आपला हाथ देतो... त्याच्या हातात हाथ देऊन ते दोघे टेरेस च्या पायऱ्या चढू लागतात...

फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर नि अगदी बरोबर गाणे निवडले होते....

हा तुझा ग रंग रागिणी कणा कणा ने खुलू लागला... आज तुझ्या ग सौंदर्याचा श्रुष्टि ला ग साज नवा...


प्रसंगाला साजेशे असे सगळे टेरेस सजवले असते... त्यांच्या साठी तिथे एक स्टेज असतो ज्यावर छान बैठक केली असते... सगळे आलेले अतिथी त्यांना येऊन भेटतात, अभिनंदन करतात, सगळ्यांची ओळख करून घेण्यात रुपाली मग्न असते... मागे मंद आवाजात वाद्य संगीत वाजत असते, मंद मंद वारा हि चालू असतो जो रुपाली च्या केसांशी खेळत असतो, सर्व कार्यक्रम संपायला खूप उशीर होतो... भुकेची वेळ हि निघून गेली असते तरी आयुष आणि रुपाली सोबत जेवण करतात.
हळू हळू सर्व लोक निघून जातात, फक्त घरची मंडळी राहतात, आरोही रुपाली ला बोलावते आणि खाली आपल्या घरात घेऊन जाते, "रुपाली कशी वाटली आज ची पार्टी?"
"छानच होती वाहिनी.. मी तर पहिल्यांदा इतके लोक एकत्र पहिले..." रुपाली हसत म्हणते...
"ये इकडे बस... " ती एका खुर्ची कडे दाखवत म्हणते रुपाली जाऊन बसते..
"गोड दिसतेस... " असे म्हणत ती स्वतःचे बोट मोडते आणि रुपालीचे केस विंचरू लागते...
"वाहिनी मी करते.. तुम्ही कशाला त्रास.. कर.... " रुपाली अडखळत म्हणते
"असू देत... आज स्पेशिअल दिवस आहे ना... मी तयार करते तुला..."
ते वाक्य ऐकून रुपाली लाजते... पुढे काय बोलावे तिला काही कळत नाही...
"रुपाली... आज तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे.. भाऊजी खूप हळवे आहेत... हळू हळू जसे तुम्ही वेळ घालवाल एक मेकाला ओळखालच ... " आरोही तिला समजावू लागते.. रुपाली चे अर्धे लक्ष तिच्या बोलण्या कडे असते आणि अर्धे पुढचे क्षण कसे असतील ह्या कडे... तिच्या लक्षात येते कि ती तर विसरलीच होती या सर्व तयारी मधे... आरोही तिचा मेकअप, केस  व्यवस्तीत करून देते आणि तिला आयुष च्या घरी नेते... "आपले.. स्वतःचे हक्काचे घर बघून घ्या जाऊ बाई... " आरोही चिडवत म्हणते...
रुपाली फक्त हम्म करत सगळीकडे नजर फिरवते...
आरोही तिला सर्व घर दाखवते... "... आणि हि आज ची स्पेशिअल खोली... " म्हणत ती बेडरूम चा दरवाजा उघडते... रुपाली बघते तर मंद दिव्यांच्या उजेडाने खोली मंदावली असते, गुलाबाची फुलांची सजावट, खोली ला वेगळंच आकर्षण देत होते, रुपाली ची नजर खोलीत लावलेल्या एका फोटो फ्रेम वर पडते... तिच्या मनातले प्रश्न ओळखून आरोही पुढे बोलते.. "फोटो मधे आयुष आणि काव्य आहेत.. काव्य जरी आयुष च्या आयुष्यातून गेली असली तरी... "
"काही हरकत नाही वाहिनी... मी समजू शकते.."रुपाली समजून घेत म्हणते.
तितक्यात आनंद तिथे येतो, "आरोही.. झाली का तयारी??"
"हो.. तुमची?" आरोही त्याला विचारते, रुपाली गोंधळून तिला विचारते, "ह्यांची कसली तयारी?"
"कळेल तुम्हाला... " आरोही आणि आनंद एकमेकाला डोळा मारत म्हणतात आणि खोलीतून बाहेर जातात ...आरोही वळून परत येते आणि म्हणते, "तू इथेच थांब आम्ही भाऊजींना पाठवतो... "
रुपाली ला कुठे तोंड लपवू असे होते, काय बोलू... ती फक्त होकारार्थी मान हलवते...

टेरेस वर...
"अरे चला सगळे, खाली नाही जायचे का आज?" आयुष सगळ्यांना म्हणतो...
"आयुष आज आम्ही सगळे तर खाली जाऊ शकतो पण तुला खाली जायचे असेल तर टॅक्स लागणार आहे... "
"कसला टॅक्स? ते हि आपल्या घरी जायला... "
"अरे वाह वाह... ह्या टेरेस ची हद्द पार करायचा टॅक्स बच्चू..." अर्चिता त्याचा कान पिळत म्हणते..
"ताई अगं हळू... दुखतोय ना... " कान चोळत आयुष म्हणतो..
सगळे त्याला घेरून उभे राहतात "बऱ्या बोलाने ऐकणार आहेस कि..."
"कि..?? दादा तू? मी तुझी साथ दिली होती ना... आणि तू??"
"मला काही माहित नाही आज मी ह्यांच्या पार्टीत आहे..." आनंद त्याला हिदायत देत म्हणाला
खूप विचार करून आयुष शेवटी विचारतो, "काय पाहिजे?"
"भावजी तुम्ही काय पाहिजे विचारलं तर सगळ्यांची फर्माईश पुरवता पुरवताच रात्र संपेल... त्या पेक्षा किती पाहिजे विचारा..." आरोही हसत म्हणाली...
"ओके, किती पाहिजे... " सगळे आपला आपला आकडा बोलू लागतात... "एक मिनिट शांत व्हा सगळे... "
"दादा तू बघ काय ते आणि मला फायनल सांग...."
"प्रत्येकाच्या नावाचे २००० ठीक राहतील... " आनंद सगळ्यांना डोळा मिचकावत इशारा करतो आणि आयुष ला बोलतो...
"काय?? प्रत्येकाच्या नावाचे?? नाही नाही... मी नाही देणार.. ठीक आहे... आज मी इथेच झोपतो... " आयुष जाऊन स्टेज वरच्या खुर्ची वर जाऊन बसतो...
बराच वेळ घास घिस सुरु राहते... पण आयुष काही ऐकायला तयार नसतो... शेवटी सगळे त्याला ठीक आहे म्हणतात आणि जा म्हणतात ...

रुपाली त्याची वाट बघून थकून गेली असते... तिला झोप येऊ लागते...
थोड्या वेळाने आयुष येतो... त्याला दरवाजा उघडून आत येताना बघून रुपालीच्या हृदयाची धड धड वाढते...

क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा? काय वाटते तुम्हाला?

वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...

Monday, May 13, 2019

TLJ भाग ९

   
=====ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ९  =============

दुसऱ्या दिवशी सगळेच लवकर उठतात, ध्रुव तयार होताना बेड वर उड्या मारत असतो, "ये!! आज आपण एस्सेल वर्ल्ड ला जाणार... ये... ये...!!!"
शिवानी त्याला तयार करत असते, "हो, हो.. जाणार... पण मावशी ला त्रास नाही द्याचा आणि ती सांगेल ते ऐकायचं... तरच पाठवणार ठीक आहे?"
"हो.. ठीक आहे... "
ठरल्याप्रमाणे शिवानी आणि रंजीत रुपाली आणि ध्रुव ला एस्सेल वर्ल्ड ला सोडतात, "दोघे खूप मज्जा करा, संध्याकाळी येतो आम्ही " असे म्हणून ते तिथून पुढे वरळी ला निघतात, शिवानी रस्ताभर खूप शांत असते, "काय झाले? आग रुपाली आहे ना त्याच्या सोबत... मज्जा करतील ते तिथे.. आणि तिथे वॉटर पार्क पण आहे ध्रुव ला छान वाटेल.." शिवानी त्याला हं ... असं उत्तर देते फक्त...
"काय झाले?" रंजीत तिला वारंवार विचारतो...
"काही नाही रे, जरा काळजी वाटतीय, काय समोर येईल ह्याची..."
दोघे वरळी ला पोहचतात, रंजीत आजू बाजू ला देसाई मंडळींची चौकशी करतो,
चहा प्यायला म्हणून एका दुकानावर थांबतात तिथे ४-५ लोक जमलेली असतात त्यांना रंजीत विचारतो, "हे देसाई कुठे राहतात माहित आहे का.. "
"हो हि बघा हि बाजूची बिल्डिंग आहे त्याच्या टॉप फ्लोर वर आहे त्यांचं घर..." रंजीत त्या बिल्डिंग च्या दिशेने बघतो, ऊन डोळ्यावर पडू लागते तर हाथ ठेवून बघतो इतकी उंच इमारत ... उगाच संभाषण वाढवायला म्हणतो, "या बिल्डिंग मध्ये... अरे देवा.. इतक्या मोठ्या बिल्डिंग मध्ये?"
"हो.. का काय झाले?" त्यांच्यातील दुसरा विचारतो...
"अहो मला काम लागलय तिथे पण ...  मला काही ठीक नाही वाटत आहे माणसं"
रंजीत च्या या वाक्यावर सगळेच चिडता, "भाऊ काय बोलताय? देसाई साहेब म्हणजे देव माणूस... मदत मागेल त्याला मदत करतात..."
"असं, पण इतका पैसे कुठून आला त्यांच्या कडे इतक्या मोठ्या पॉश बिल्डिंग मध्ये रहायला...."
ते लोक त्याला वेडा आहेस का? असे बघतात, "अहो त्यांना कशाची कमी आहे? इतका मोठा बिझिनेस आहे, सोन्या सारखी मुलं आहेत सगळे तर चांगले आहे..."
"पण मी ऐकलं त्यांची मुलं काही ठीक नाहीत?"
"अहो कोण असलं भलतं सलत सांगत तुम्हाला? बापाच्या एका हुकूमावर मोठ्या मुलाने सगळा बिझिनेस सांभाळला.. स्वतःचा ते काय म्हणतात आज काल निघालाय ना... नवीन..."
"स्टार्ट अप... त्यांनी स्वतःची स्टार्ट अप कंपनी काढलेली दुसऱ्या पार्टनर ला देऊन ते आपल्या बाबांचा बिझनेस बघतात" दुसर्याने त्याला साथ देत माहिती दिली...
"हा... "
"पण मग ..." रंजीत जरा अडखळला
"काय झाले भाऊ.. तुम्हाला जी हि माहिती मिळाली आहे ना ती खोटी आहे... अहो इथे देसाई परिवार आहे ज्यांनी आपली संस्कृती जपली आहे .. "
"पण त्यांच्या छोट्या सुनेने आत्महत्या का केली?"
रंजीत ने प्रश्न विचारला तेच सगळे शांत झाले... सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आले... "तेच कळलं नाही बघा साहेब... देव चंगल्या लोकांना दुःख का देतो... ??"

त्यांच्या गप्पा चालू असतात तेव्हा तिथे आनंद येतो... "अरे रंजीत तुम्ही इथे? सांगितले नाही तुम्ही मुंबई ला येणार आहेत ते... आम्ही घ्यायला आलो असतो ना... " आनंद ला तिथे बघून रंजीत गोंधळून जातो...
"हो हे काय तुम्हाला भेटायलाच येत होतो... पत्ताच विचारात होतो... " रणजित आपली बाजू सांभाळून घेतो...
"चला या माझ्या सोबत" असे म्हणत आनंद त्यांना आपल्या सोबत यायला सांगतो... "आल्यावर तरी फोन करायचा ना, गाडी पाठवली असती तुमच्या साठी, मुंबई मध्ये बिना गाडीचे नवीन माणसाला खूप त्रास होतो... कशी वाटली मग मुंबई? फिरले का कुठे?"
"नाही अजून ... जाऊ नंतर" रंजीत हसण्याचा प्रयत्न करत शिवानी कडे बघतो, ते सगळे लिफ्ट मध्ये जातात, रंजीत लिफ्ट मध्ये सारखा अस्वस्थ होऊन कोणता फ्लोर आला त्याकडे बघत असतो... लिफ्ट मधून बाहेर पडल्यावर आनंद दार उघडतो, समोर महालाच असल्याचा भास होतो त्यांना...
ते तिथेच स्तब्ध उभे असतात, "दादा आत या ना... " आनंद त्याला आत बोलवत म्हणतो, "आम्ही सगळे एकत्र राहतो ना... आणि मुंबईत जागा मिळणे इतके कठीण आहे शेवटी आम्ही हि युक्ती लढवली, हि बिल्डिंग बनताना आम्ही हिचा वरचा मजला पूर्ण बुक केलेला.. इथे प्रत्येक फ्लोर वर ६ फ्लॅट आहते इथे पेन्टहाऊस असे म्हणतात आणि मग आम्ही सर्व आपल्या मनानी एकत्र करून घेतले आहेत. एका फ्लॅट मध्ये ताई जीजू राहतात, एकात आई बाबा, एकात आम्ही , एकात आयुष्य, एक गेस्ट साठी ठेवली आहे आणि एकात आधी आजी आजोबा राहायचे पण आता त्यांना आई बाबांच्या कडे शिफ्ट केले आहे तर सध्या रिकामा आहे... ह्याने कसे एकत्र राहतो हि आणि प्रायव्हसी हि राहते प्रत्येकाला आपली आपली...  म्हणजे तुम्ही एकत्र विभक्त कुटुंब म्हणू शकता..."

शिवानी आणि रंजीत थक्क होऊन ऐकत होते... रंजीत ला आपण किती चुकीचा विचार करत होतो ह्याची जाणीव झाली, जेव्हा त्याला कळलेले कि देसाई ह्या बिल्डिंग च्या टॉप फ्लोर ला राहतात त्याला वाटलेले 2BHK मध्ये एवढा परिवार कसा राहत असेल... आपली शंका दूर झाली ह्याचा त्याला आनंद होता.तो प्रसन्न मुद्रेने शिवानी कडे बघतो.
आनंद त्यांना सांगतो, "आई आता मंदिरात गेली असेल... मी बघतो बाबा आहेत का तुम्ही आरामात बसा आपले घर समजा... " असे म्हणून आनंद निघायला जातो...
"मंदिरात या वेळेला? सकाळी सकाळी कीर्तन असते का?" शिवानी विचारते
"कीर्तनाला नाही आई तिथे मुलांना शिकवते, सकाळी ८ ते १२ गरीब होतकरू विद्यार्थयांसाठी, तिचे हि मन रमून राहते आणि त्या मुलांना हि शिकायला मिळते... " आनंद छान हसतो आणि जायला निघतो..."आलोच मी..."
थोड्या वेळात देसाई काका येतात, "काय रंजीत आम्हाला एक्दम चकित केले तू... आधी कळवायचे ना... येतोस ते..."
"अचानकच ठरले काका.. म्हणून नाही सांगितले..." रणजित हसण्याचा प्रयत्न करत म्हणतो...
"चल लबाड... मला माहित आहे का नाही सांगितलेस ते..." त्यांचे ते बोलणे ऐकून शिवानी आणि रंजीत गंभीर होतात, "मुलाचे घर बघायचे होते ना...?? अ अ... बरोबर कि नाही..."

त्यांचे वाक्य ऐकून दोघे सुटकेचा श्वास सोडतात स्वतःशीच पुटपुटतात, "बरं आहे तुमची हेरगिरी करायला आलो असे नाही म्हणाले..."
"कधी आलात तुम्ही मुंबईत ? कशी वाटली मुंबई?"
"चांगली आहे मुंबई... फक्त धावपळ होते खूप इथे... घाम काढते मुंबई माणसाचा..."
"हा हा हा... ते अगदी बरोबर म्हणालास... काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, ड्रिंक?"
"नाही काका आम्ही ड्रिंक नाही करत..."
"अरे कोल्ड ड्रिंक म्हणायचे होते मला... घाम गाळलास ना खूप... " देसाई काका हसत म्हणाले... या वेळी रंजीत आणि शिवानी हि त्यांच्या सोबत हसतात.
सगळ्यांच्या गप्पा संपेपर्यंत संद्याकाळ होते... शिवानी रंजीत ला आठवण करून देते रुपाली आणि ध्रुव ची तेव्हा रंजीत निघायचे म्हणतो... "अरे थांब थोडा वेळ आयुष्य येईलच थोड्या वेळात, त्याला भेटून जा... "
"गेलो असतो काका पण रुपाली आणि ध्रुव गोधळतील, आम्ही त्यांना घ्यायला येणार सांगितले आहे... "
"म्हणजे? रुपाली हि आली आहे मुंबईत? तिला का नाही आणलेस?"
"ध्रुव नि आम्हाला बसू दिले नसते इतका वेळ..." शिवानी वेळ मारून नेत म्हणाली...
"बरं मग कुठे आहेत ती दोघे?"
"त्यांना आम्ही एस्सेल वर्ल्ड ला सोडून आलोय... "
"अरे... जा बाबा लवकर... तुम्ही आले नाहीत म्हणून बिचारी पोरं घाबरून जातील... निघा निघा लवकर.. आणि उद्या सगळे जेवायला या संध्याकाळी"
"नको काका... आज झालेच ना.. ठरवून नसले तरी.. आज मी एकल ना तुमचं.. रोज रोज नको तुम्हाला  त्रास... आणि आम्ही आहोत ना आता इथेच २ महिने.. परत येऊ कधी..." रंजीत त्यांचा निरोप घेत म्हणाला.
दोघे लगबगीने निघतात "खूप उशीर झालाय रंजीत... रुपाली ला फोने तरी लावून बघ..."
"मी आधीच नास्ता का फोन करून कळवलं.. तिनी फोने घेतला नाही आहे स्वतःचा..."
"का?" शिवानी आश्चर्याने म्हणाली...
"तिला rides एन्जॉय करता नाही येणार म्हणून सकाळीच मला दिला तिने तिचा फोन... आणि मला कुठे वाटलेले आपल्याला इतका उशीर होईल..."
"ठीक आहे... चल लवकर... " शिवानी घाईने बोलावलेल्या कॅब मध्ये बसली, "भैया लवकर चला एस्सेल वर्ल्ड" ती ड्राइवर ला म्हणाली तो तिच्याकडे गोंधळून बघू लागला, "मॅडम एस्सेल वर्ल्ड तर आता बंद झाले असणार... "
"काय?? तरी चला लवकर तुम्ही..." शिवानी त्याला म्हणते आणि रंजीत कडे घाबरून कसे असतील दोघे असे बघते...
"अहो एस्सेल वर्ल्ड ला सकाळीच जायचे ना... तिथे पूर्ण दिवस जातो... असं संध्याकाळी निघून नाही होत ताई ... "
"हो हो.. दादा माहित आहे आम्हाला.. तुम्ही प्लिज जरा लवकर घ्या.. "
"अहो मुंबईत नवीन आलात का? आता ऑफिस सुटलेत सगळे... हे बघा रोड वर किती ट्रॅफिक आहे लवकर कशी नेणार..."
शिवानी ला खूप राग येतो स्वतःचा... रडकुंडीला येते, ती रंजीत चा घट्ट हाथ धरून बसली असते... "दादा जितकं जमेल तितकं लवकर चला.. आम्ही नवीन आहोत मुंबई आणि आमची मुलं तिकडे आमची वाट बघत आहेत..." रंजीत ड्राइवर ला आपली परिस्थिती समजावत सांगतो...
"अहो काय साहेब.. मुलांना एकटे ठेवले तिकडे..." ड्राइवर त्यालाच ओरडू लागला... ज्याने शिवानी आणखीनच घाबरून जाते...
"तुला फोने घेऊन यायची काय गरज होती रंजीत... रुपाली कॅब वगैरे करून सरळ हॉटेल वर गेली असती... कुठे आहे काय ते विचारपूस करता आली असती... आता काय... दोघे जेवलेत कि नाही कसे आहेत काय माहित... नवीन गाव आहे.. असं कसा रे तू... " शिवानी सगळी चिडचिड रंजीत वर करू लागली...
"शिवानी शांत हो... रुपाली हुशार आहे.. थांबतील ते... सांगितले ना त्यांना आपण येऊ"
"हम्म" शिवानी आपल्या हाताची पकड घट्ट करत म्हणते...
"घाबरू नका साहेब... मुंबई खूप सुरक्षित जागा आहे... आणि इथली लोक हि खूप चांगली आहेत... काळजी नका करू... " ड्राइवर त्यांना शांत करत म्हणाला... "इथे रात्री ३ वस्त हि लोकांची वर्दळ असते... २४ * ७ लोक इथे काम करत असतात.. ठीक आतील मुलं..."

जशी जशी घडी ठोके देत होती त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते... शेवटी तास भर असाच घालवल्यावर ते येऊन पोहचले, त्यांना दोघे कुठेच दिसत नव्हते.. रंजीत आणि शिवानी त्यांना शोधू लागले.. सगळीकडे काळोख पसरलेला आणि कुणीच दिसत नव्हते... ड्राइवर पण त्यांच्या सोबत निघाला रंजीत त्याला तुम्ही जा म्हणतो पण ते म्हणता, "अहो साहेब, तुम्ही नवीन आहेत मुंबईत.. आम्हाला काही माणुसकी नाही कि काय... पोरं एकटे कुठे थांबले असतील ? मी हि मदत करतो शोधायला... आधीच तुम्ही घाबरलेले आहेत... अश्या वेळी शांत डोकं पाहिजे..."
ते इकडे तिकडे बघतच असतात जेव्हा धावत येऊन ध्रुव रंजीत ला मागून घेरतो, "बाबा... किती उशीर, मी आणि मावशी थकलो वाट बघून..." त्याचे गराने सुरु होते...
त्याच्या मागे पळत रुपाली हि येते आणि ती शिवानी ला मिठी मारते.. "वाहिनी खूप घाबरलेले मी... माझ्या कडे फोन... " शिवानी तिला कडकडून मिठी मारते आणि म्हणते, "हो... माहित आहे मला... आलोय ना आता आम्ही... सगळं ठीक आहे" शिवानी तिचे अश्रू पुसत म्हणते... ते सगळे ड्राइवर ला थँक यु म्हणतात आणि आपल्या हॉटेल वर सोडायला सांगतात..

ध्रुव दिवस भाराची त्यांनी केलेली मज्जा सांगण्यात व्यस्त होतो...
"तिथे मी वॉटर पार्कमध्ये खूप खेळलो.. कप बशी मध्ये हि बसलो... खूप मज्जा आली बाबा आपण उद्या सगळे जाऊ... मग मी तुम्हाला दाखवीन किती छान छान आहे सगळे तिथे... खूप सारे पक्षी आहेत...उद्या जायचे ना मग आपण सगळ्यांनी?" शिवानी त्याला हो म्हणते आणि आता झोप म्हणते.
या सर्व गोंधळात रुपाली त्यांना देसाईंच्या घरी काय झाले विचारायचे विसरून जाते...

रात्री शिवानी आणि रणजित गप्पा मारत बसतात, "मी आज खूप खुश आहे... आपल्याला जी भीती होती तसे काही नाही आहे... देसाई कडचे सगळेच खूप चांगले आहेत, मी आता निश्चित होऊन रुपाली चा हाथ आयुष च्या हातात देऊ शकतो... "
"हम्म हो ना... चौकशीत त्यांना सर्व चांगलेच म्हणाले.. आणि आपण दिसल्याबरोबर आनंद नि हि किती आग्रहाने घरी नेले... मी हि निवांत आहे आता..."
शिवानी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हॉटेलरूम च्या गॅलरी मधून धावणारी मुंबई बघत बसते...

क्रमश:
-

Monday, May 6, 2019

TLJ भाग ८

=====ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ८ =============

देसाई मंडळी जाता जाता घरात वादळ निर्माण करून गेले.

मनात प्रश्न आणि त्याचे असंख्य भावी उत्तरं, एखादी व्यक्ती आत्महत्या का करेन? तिचे आयुष्य मनासारखे .. नाही त्या पेक्षा निरस झाले तर? तिला सासुरवास होता का खूप? नक्की हुंडा मागितला असेल.... वर वर दाखववतात पैसे, खर्च आम्ही करू... पण आज हि मानसिकता तशीच, किती तरी मुली हुंडाबळी पडतात... आपली रुपाली ... नाही नाही... शिवानी ताडकण उठली, झोपच लागत नव्हती तिला. रणजित ला हलवून उठवावे म्हणून बघितले तर तो जागेवर नव्हताच... कुठे गेला म्हणून ती त्याला शोधू लागली, खोलीतून आपले केस बांधत ती बाहेर आली, अमावस्या असल्याने काळोख पसरलेला, हाताला हाथ दिसत नव्हता पण उन्हाळ्यात हि थंडगार वारं सुटलेलं, ती हाताची घडी घालून रंजीत ला बघू लागली... 

तिला व्हरांड्यात रंजीत बसलेला दिसला, ती त्याच्या जवळ गेली तर थक्क राहिली, तो सिगारेट ओढत बसला होता... ती त्याच्या वर चिडून त्याच्या हातातली सिगारेट हिसकावून बुजवत म्हणाली, "काय करतोयस? कुठून आली हि?" शिवानी प्रश्न विचारत होती पण रंजीत चे तिच्याकडे लक्ष नव्हते. ती त्याला हलवते ज्याने त्याची तंद्री तुटते, "मी काय विचारत आहे रंजीत? तुला कुठून मिळाली हि सिगारेट?"
"मला माफ कर शिवानी, अगं ते खूपच डोकं गरगरायला लागलं होत, रमेश म्हणाला ऐक ओढ बरं वाटेल म्हणून... "
"तू.. म्हणून सिगारेट? बोल ना माझ्याशी... काय वाटतंय ते... असं मनात दडून ठेवशील तर डोकं गरगरेलच... "
"काय बोलू मी शिवानी? आज असे वाटतंय मोठे काही सांगून गेलेत ते खरंच आहे... दिसते तसे नसते म्हणून तर जग फसते... मी चुकलो शिवानी... मी शहनिशा करायला हवी होती होकार कळवन्या आधी..."
"रंजीत मला ठाऊक आहे, आपण जे काही सत्य ऐकले ते भयानक आहे पण आपण त्यांच्या बाजूने हि विचार करायला हवा..." शिवानी त्याला समजूत घालवू पाहू लागली...
"तूच विचार कर शिवानी... आज च्या काळात कोण इतक्या मोठ्या कुटुंबात राहते..?? ते हि मुंबईत? सगळे किती खुश वाटत होते, त्यांच्यात प्रेम होते. मोठ्यांसाठी आदर होता... मला तर आता सर्व ऐक भयानक फसवी वाटत आहे, ते लग्नच खर्च त्यांना देणे... कोणाची ट्रीटमेंट करणार? कि स्वतः गिळणार?" रंजीत चा आवाज चढत होता, त्याला स्वतःचीच चीड येत होती...
"श..श ... शांत हो... मला माहित आहे आता तुझ्या मनात काय वादळ उठलंय... पण आपण आहोत ना अजून रुपाली ला काही हि होऊ देणार नाही आपण... देव आहे आपल्या पाठीशी..."
"आपण विचारले नसते तर त्यांनी सांगितले हि नसते... " रंजीत चे डोळे पाणावलेले.. शिवानी नि ओळखले कि त्याचा बांध कोणत्याही क्षणी फुटेल..
"हे बघ रंजीत मला काय वाटते, आपण एक्दम टोकाची भूमिका नको घ्यायला... "
"... टोकाची भूमिका?? तुला आठवते आपण तो ऐक एपिसोड पहिला होता त्यात ऐक मुलगा आणि त्याचा परिवार असच गरजू मुलींशी लग्न करतात त्यांचे पैसे लुबाडतात आणि तिला मारून मग दुसऱ्या मुलीशी लग्न करतात... हि तशीच टोळी असली तर?? माझं मन अशांत होत आहे गं... नाही नाही... वाचवले आज देवानी..."
रंजीत ला असे बघून त्याला सावरायला शिवानी विचार करू लागली, "हे बघ रंजीत असं काही असतं तर त्यांनी खरं सांगितलं असत का? त्यांनी काही हि करणं सांगितलं असते उलट त्यांनी विचार पूर्वक सगळं ठरवून सांगितलं असतं, नाही का?"
रंजीत ला तिच्या बोलण्यात सत्यता वाटली, "हम्म, ते आहे!" तो गहाण विचार करून म्हणाला."पण नाही मला मुंबई ला जावे लागेल... "
"हो आपण सर्व जाऊ, २ महिने तिकडेच जाऊ"
"२ महिने... नाही नाही.. आधी  मी जाऊन बघून येतो... सर्व ठीक असेल तर मी तुम्हाला बोलवेल, काही गडबड असेल तर लग्न तर होणारच नाही आहे ..."
"मी तुला एकट्याला नाही जाऊ देणार, तू बघ किती काळजी करतोस आणि टेन्शन घेतोस...आणि तिथे मुंबई मध्ये कस राहशील...नाही मी पण येणार" शिवानी हट्ट धरते.. रणजित ठीक आहे म्हणतो...
रंजीत मुंबई चे तीन तिकीट घेऊन येतो... "तीन? का? आपण दोघेच जाणार आहोत ना..."
"आपण जाणार तर रुपाली इथे काय करणार.. तिला हि घेऊन जाऊ... " रणजित आज फ्रेश वाटत होता... "ईकडले सर्व आवरा आवारी  करून कामाचे ठाव ठिकाणे लावून मग निघावे लागेल. तिकीट मिळत नव्हते... त्या मोरे ला सांगून त्याच्या मागे लागून मिळवावे लागले तिकीट. १५ दिवस आहेत."

..... तिघे मुंबईत येऊन पोहचले... रुपाली आणि रणजित पहिल्यांदाच मुंबईत आले होते. त्यांनी स्टेशन च्या जवळच ऐक छान स्वस्त हॉटेल २ दिवस साठी घेतले.
"देसाई काकांना फोन कर आणि सांग आपण आलोय ते... " शिवानी रंजीत ला म्हणाली...
"त्यांना कळवायचे असते तर तिकीट काढले तेव्हाच कळवले असते ना... त्यांना कळू न देता मला सर्व माहिती काढायची आहे... " रंजीत आपली हेरगिरी दाखवत म्हणाला. शिवानी मान हलवत ठीक आहे म्हणाली.. .
"तुम्ही दोघी आराम करा तो पर्यंत मी जरा खाली फेर फटका मारून येतो... " शिवानी किंवा रुपाली काही बोलेल त्या आधी रंजीत निघालेला हि असतो.
थोड्याच वेळात तो परत येतो... जरा निराश दिसतो शिवानी त्याला काय झाले विचारते, "काय लोक आहेत यार इथली, कोणाला भावच नाही देत... मी ऐक आवाज दिला कि आपल्या गावात लोकांची लाईन  लागायची... आणि इथे माझा आवाज तर कोणाच्या कानावर हि नाही पडत..."
"नीट सांगशील का काय झाले ते?" शिवानी ला काही कळले नाही तो काय बोलतोय...
"अजून काय सांगू... मी लोकांना पत्ता विचारतोय कोणी सांगायला तयार नाही... "
"अरे दादा लोकांना विचारायला जायची काय गरज आहे... गूगल आहे ना.. " असे म्हणत रुपाली मॅप्स लावते आणि आण इकडे दे पत्ता म्हणते... ती त्यावर सर्व शोधून त्याला सांगते, "हे बघ इथून २२ क.मी. आले हे आणि कधी निघायचे आहे ते सांग मी कॅब बुक करते..." रंजीत आश्चर्याने तिच्याकडे बघत राहतो... "रुपाली.. तुला हे सर्व कसं माहित?"
"सोपं आहे दादा नवीन नवीन टेकनॉलॉजि सोबत आपण जोडून राहील पाहिजे नवीन गोष्टी अनुभवत राहिल्या पाहिजेत... "
"बरं बरं ठीक आहे... चला तुम्ही तयार व्हा मग आपण निघू...."
"कुठे?" रुपाली विचारते...
"जायचे नाही का देसाईंकडे?"
"कशाला?"
"कशाला म्हणजे? त्यांची चौकशी नको का करायला?" रंजीत गोंधळून म्हणाला...
"हे बघ मी सगळी माहिती काढली आहे... हे सर्व त्यांचे फोटोस... ते त्याचे परिवार चेच लोक आहेत... म्हणजे त्याचा खरंच इतका भला मोठा परिवार आहे... आणि ते सर्व एकत्र राहतात"
"आता हे सगळे फोटो तुला कुठून मिळाले..."
"सोपं आहे रणजित फेसबुक !!" शिवानी रुपाली ची साथ देत म्हणाली...
"म्हणजे तुम्ही तर हि माहिती सगळी आधीच काढून ठेवली होती... मग आपण मुंबई ला कशा साठी आलोय? हे सर्व तुम्ही मला घरी नव्हते सांगू शकत का?" रंजीत जरा चिडला...
"घरी सांगितलं असतं तर तू आम्हाला मुंबई ला अणलच नसतं... सारखा ते आपलं काम काम ... हो ना रे ध्रुव??"
ध्रुव पण मान हलवून हो म्हणतो... "चला आज आपण समुद्रावर जाऊ... " रुपाली ध्रुव ला म्हणते...
"समुद्र?? म्हणजे बीच वर?? ते टीव्ही वर दाखवतात तसं?" ध्रुव आनंदाने म्हणाला...
"हो सोन्या...." शिवानी त्याला तयार करायला घेत म्हणते..
"अगं पण या वरून काय... देसाई... जाऊन..." रणजित ला काही बोलू न देता शिवानी त्याला डोळ्याने इशारा करते शांत रहायला... "मी सर्व बघेन... तू काळजी नको करू.."

संध्याकाळी सर्व चौपाटी वर जातात तिथे रेतीत रुपाली आणि ध्रुव मिळून घर बनवतात शिवानी आणि रंजीत त्यांना मदत करतात, भेळ, पाणी पुरी खाऊन मग ध्रुव आणि रुपाली समुद्रात खेळायला जातात,
"माऊ समुद्र किती मोठा आहे... किती लांब आहे..." ध्रुव आपल्या हात लांब करून त्याला मोजण्याचा प्रयत्न करत म्हणतो... रुपाली त्याला हो रे हो रे करत उत्तरं देते आणि दोघे पाण्यात खेळतात...

शिवानी बीच वर रंजीत सोबत रेतीचे खोपे करत बसली असते... "शिवानी तू आज जायला का नाही म्हटले...?"
"तू रुपाली च्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलास? मला तो हिरावून नव्हता घ्याचा... तू आणि मी जितका भयानक विचार करतोय त्या विचाराने तिला अजून शिवले हि नाही ... आपण चूक हि असू शकतो नाही का... मग आधीच का तिचे मन तिच्या सासरच्यांबद्दल आपण कालवायचे... ??"
"बरोबर म्हणतेस... म्हणून तर मी एकटा पुढे येणार होतो ना... मग आता आपण काय करायचं?"
"उद्या असच ह्या दोघांना कोणत्या तरी स्पॉट वर पाठवू आणि आपण जाऊ वरली ला देसाईंचे घर बघायला... ठीक आहे?"

आता कुठे रंजीत च्या चेहऱ्यावर हसू आले... आणि तो रुपाली आणि ध्रुव च्या मागे धावून पाण्यात खेळू लागला... शिवानी सर्वांना आनंदाने खेळताना बघून स्वतः आनंद अनुभवत होती...

.. उद्या त्यांच्या समोर काय सत्य उलगडेल या भीती ला वाऱ्यावर ठेवून सर्व जण आज च्या क्षणात रमलेले.. .

क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा? काय वाटते तुम्हाला?

Friday, May 3, 2019

TLJ भाग ७


=====ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ७ =============

"रंजीत आता तुम्ही या मुंबई ला ... " देसाई काका निघताना म्हणतात "आपण व्याही होऊ नाही तर नाही.. मला माणूस म्हणून तुम्ही आवडलात जेव्हा कधी जमेल मुंबई ला नक्की या... "
"तुमच्या सारख्या मोठ्यांच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकून काम करण्याचा वेगळाच हुरूप येतो..."
"तुमच्या पिढीचे असे विचार आहेत हे ऐकून खूप बरे वाटले...  आम्ही अजून २ दिवस थांबणार आहोत, आलोच आहोत तर सर्वांचा ऐक टूर होऊन जाईल नाही तर सगळ्यांचं असं एकत्र जुळून बाहेर पडण्याची वेळ खूप क्वचित येतो... मी मनमोकळं बोलणारा माणूस आहे रंजीत, आम्हाला तुमची रुपाली आवडली आहे आमच्याकडून होकार आहे. मी लगेच होकार कळवळा म्हणून तुम्ही हि तसे करावे ह्याचे तुमच्यावर काहीच बंधन नाही, तुम्ही आपसात चर्चा करा आणि आम्हाला सांगा. आम्ही २-४ दिवस तसे हि आहोत इथे तो पर्यंत निर्णय घेता आला तर बघ... "
रंजीत ला त्यांचे समजूतदार बोलण्याने भरून आले, तो त्यांना आश्वासन देतो कि मी नक्की कळवतो.. सगळे जायला निघतात. रंजीत चे तेव्हा लक्ष जाते बाहेर दोन स्कोडा kodiaq गाड्या उभ्या असतात, त्याला आश्चर्य वाटते दोन्ही गाड्यांच्या मागे "A  A  Desai "  असे लिहिले असते न राहून तो विचारतो, "काका हे A  A  Desai कोण आहे?"

सगळे खुद्कन एकमेकांना बघून हसायला लागतात तरी रंजीत ला काही कळत नाही... शेवटी काका म्हणतात "नाही आले का लक्षात तुमच्या? अहो आम्ही सगळे... आमचे सगळ्यांचे initial A A आहेत ना.. "
"अरे हो.. काय मस्त आयडिया केलीत ओ तुम्ही कोणाला राग नाही लोभ नाही... पण तुम्ही मुंबई हुन गाडीत आलात इतक्या लांब?"
"नाही नाही.. आई बाबांना इतक्या लांब गाडीने कसे आणणार, आमची इथे दिल्ली ला शाखा आहे, आम्ही विमानाने दिल्ली ला आलो आणि मग तिथून गाडी ने आलो..."
"छान छान... " रंजीत शिवानी कडे बघत म्हणाला..
"चला निघतो मग आम्ही आता, खूप वेळ झाला.. " देसाई काका गाडीचे दार ओढून घेत म्हणाले...
"आम्हाला रुपालीचा नंबर मिळेल का दादा?" अर्चिता निघता निघता विचारते.
"हो हो, का नाही... " रंजीत त्यांना रुपाली चा नंबर देतो.

देसाई मंडळींना निरोप देऊन रंजीत आणि शिवानी सुटकेचा श्वास घेतात... ऐक मोठी जबाबदारी पार पडल्यासारखे वाटते, "किती मोठा परिवार आहे ह्यांचा... " शिवानी सोफ्यावर बसून पाणी पीत म्हणते. "आज तर नाक कापल्याच जाणार होत"
"हो ना.. मी हि आधी गोंधळलो इतके लोक बघून, मला वाटलेला येतील ३-४ लोक."
गप्पा मारत घर आवरत वेळ निघून जातो...
......
...
..
.

असेच २ दिवस निघून जातात ...
रुपाली खूप विचार करते, अयुष बद्दल तिच्या मनात फक्त आकर्षण आहे कि तिला खरंच तो आवडायला लागला हेच तिला कळत नाही, तिला जाणीव फक्त या गोष्टीची असते कि त्याच्या विचारातून स्वतःला ती बाहेर काढू शकत नाही आहे ... त्याचे चालणे, बोलणे ज्याचे तिने त्या छोट्याशा वेळेत निरीक्षण केले होते ते क्षण वारंवार तिला आठवायचे आणि सातवायचे... आपण आपल्या नशिबाची का परीक्षा घ्याची म्हणून ती अयुष ला होकार द्याचे ठरवते, नशिबात नसेल तर होणारच नाही लग्न आणि असेल तर मी अयुष आणि त्याच्या परिवाराला गमावणार नाही म्हणून... असा विचार करून ती मनाशी निश्चय करते रंजीत ला आपला निर्णय कळवण्याचा...
रणजित आणि शिवानी रुपाली चा होकार ऐकून खूप खुश होतात, "तू एक्दम बरोबर निर्णय घेतलायेस रुपाली, मला तुझ्यावर कोणतेच दडपण आणायचे नव्हते, तुझा तुझा निर्णय घेऊ द्याचा होता... मला आज किती आनंद होतोय म्हणून सांगू... आज खरंच तू मोठी झाल्याचा विश्वास बसतोय" रंजीत तिला जवळ घेत म्हणाला..
"हो ना.. देसाई मंडळी खूप चांगली आहेत... मला त्यांचा संपूर्ण परिवार आवडला..." शिवानी रंजीत शी सहमत होत म्हणाली..."त्यांना कळव ना आपला होकार... "
"हो लगेच कळवतो..." रंजीत फोन लावत म्हणाला. रांजेते चा फोन लागला तसं तो उत्साहात बोल्ला...
"हॅलो देसाई काका, रंजीत बोलतोय, रुपाली नि लग्नाला होकार दिलाय..."
"काय सांगताय... तुम्ही सकाळी सकाळी खूपच चांगली बातमी दिलीत... मग आता पुढे कसं करायचं?"
"तुम्ही जसं म्हणाल काका.. आता आम्हाला तर या सगळ्याचा अनुभव नाही त्यामुळे तुम्ही म्हणाल तसे..." रंजीत थोडा अडखळत म्हणाला...
"हो.. ते ठीक आहे.. मग मुंबई ला कधी येताय तुम्ही?"
"मुंबई ला? कशाला?" रंजीत ला काही कळले नाही मुंबई ला का जायचे.
"अहो मुलाचे घर बघायला नाही येणार का?" देसाई काका स्पष्टीकरण देत म्हणाले..."तुमची बहीण कुठे राहणार, घर ठीक आहे कि नाही, सुविधा आहेत कि नाही वगैरे वगैरे?"
"काका.. तुमचा पूर्ण परिवार बघितला, घर काय हो २*२ ची खोली हि पुरे होते पण घर माणसांनी बनते... त्याला घरपण माणसातल्या आपुलकीने येतो, आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही आमच्या रुपाली ची चांगली काळजी घ्याल आणि रुपाली खूप खुश राहील तुमच्या परिवारात...."
"असं म्हणताय... मग साखरपुडा आटपून घ्यायचा का? आम्ही अजून २ दिवस आहोत इथे... कामात काम होऊन जाईल..." थोडा विचार करून ते म्हणाले.
"पण तयारी करायला वेळ तर हवा ना काका... "
"अरे साखरपुड्याची तयारी ला काय वेळ लागतो... तू काही काळजी करू नकोस... आम्ही सर्व तयारी करतो... " देसाई काकांना आनंदाने फोन वर बोलताना  काकू ऐकत होत्या सर्व, त्या त्यांना म्हणतात उद्या शॉपिंग ला जाऊ सांगा  त्यांना...

ठरल्या प्रमाणे सर्व जण दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची खरेदी करायला जातात, अयुष रुपाली साठी कपडे, अंगठी वगैरे वगैरे अख्खा दिवस जातो. थाटात त्यांचा साखरपुडा उरोकतो दुसऱ्या दिवशी... पंडितजी लग्नाची तारीख २ महिन्यांनी काढतात.

देसाई मंडळी मुंबई ला जायला निघतात काका रंजीत ला म्हणतात, "लग्नात आमची ऐक अट आहे.. लग्न मुंबई ला होईल... आमची सगळे पाहुणे तिकडेच आहेत.. " त्यांना मधेच थांबवत अयुष म्हणतो... लग्न मोठे करायची काय गरज आहे बाबा, रजिस्टर लग्न करूयात?"
"अयुष आमच्या रुपाली च्या हि लग्नला घेऊन काही अपेक्षा आहेत, रुपाली च्या स्वतःच्या हि काही आकांक्षा आहेत... प्लिज लग्न होऊ द्या...  "
"तसं नाही दादा, लग्नाला येणारा इतका खर्च आपण गोर गरिबांना देऊ शकतो.. मी रोज इतक्या लोकांना बघतो, पैसे नसल्यामुळे आपला इलाज करू शकत नाहीत, ह्या लग्नात होणार वायफळ खर्च आपण काही लोकांच्या ट्रीटमेंट वर खर्च करू शकतो... पैसे कारणी लागले पाहिजे...."
"तुमचे सर्व ठीक आहे... पण..." रंजीत पुढे काही बोललेलं तेच रुपाली त्याचा हाथ धरते आणि डोळ्यांनी आपली सहमती दर्शवते...
"अयुष बरोबर बोलतात दादा, मला काहीच हरकत नाही, करूयात रजिस्टर लग्न..."
"दादा मला तुमचा हुरूप हि नष्ट नाही करायचा लोकांसाठी आपण रेसेपशन ठेवुयात, म्हणजे तुम्हाला पाहुण्यांना जेवण दिल्याचा हि आनंद होईल आणि लग्नाचा वायफळ खर्च हि मार्गी लागेल..."
"हे ऐक नंबर सुचवलंत तुम्ही अयुष..." रंजीत आंनदाने म्हणाला...
"ठरलं तर मग, आम्ही मुंबई ला ठरलेल्या तारखेच रेजिस्टर कडे अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो... तुम्ही सगळे मुंबई ला या बाकी सगळी तयारी आम्ही बघू रेसेपशन ची...."
"रेसेपशन तर आमच्या कडून आहे काका..." रंजीत गोंधळा
"नाही... ते मुलाकडून असेल रंजीत साहेब... तुम्ही लग्नाचा खर्च बघा..."
लग्नच खर्च? दोन हार आणि मुलं मुलीचे कपडे? रंजीत स्वतःशीच विचार करत होता ज्या काळात लोक खर्च मुली कडच्यांनी करायचा या विषयावरून भांडतात तिथे देसाई साहेब आम्ही खर्च करणार सांगून मोकळे झाले, रंजीत ला फार बरे वाटले कि रुपाली ला इतके चांगले कुटुंब मिळाले...

"आपली भेट आता मुंबईतच होईल... तुम्ही महिना भर तर आधी या मुंबई ला, मुंबई दर्शन पण होईल आणि बाकी तयारी पण होईल.. आम्हाला हि तुमचा सहवास लाभेल..." देसाई काका रंजीत ला निघताना म्हणाले... तितक्यात तिथे क्यू आली आणि आजोबांचा हाथ ओढून त्यांना खाली वाकायला लावते, रुपाली कडे हाथ दाखवून म्हणते  "मला बोलायचं आहे..."
तोंडाला हाथ लावून ते म्हणतात, "सगळ्यात मोड्या सदस्याचे मत तर आपण विचारलेच नाही रंजीत साहेब...." सगळे जण हसायला लागतात... "जा बेटा जा..."
क्यू ला आपल्या कडे येताना बघून शिवानी च्या मनात प्रश्नांची चल बिचल सुरु होते, ती मला स्वीकारेल ना? मी तिची चांगली आई होईल ना? तीला काय बोलायचे आहे वगैरे वगैरे...
रुपाली सोफ्यावर बसली असते तिथे तिच्या बाजूला येऊन क्यू बसते काही वेळ काहीच नाही बोलत आणि फक्त तिला निहारात बसते, रुपाली हि तिच्या कडे बघत बसते, आपल्या पर्स मधून ती ऐक चॉकलेटे काढते आणि तिला देते पण ती घेत नाही ज्याने रुपाली ला अजून टेन्शन येत, "आई म्हणायची चॉकलेटे खाल्याने दात किडतात" तिचे ते निरागस वाक्य ऐकून रुपाली चे डोळे पाणवतात. "काय तुम्ही माझी फ्रेंड बनाल?"
रुपाली हो म्हणते... आणि तिला सांगते नक्की होईल पण त्यासाठी मला ऐक गोड गोड पापा पाहिजे... क्यू लगेच तिच्या जवळ जाते आणि तिला गालावर किसी देते.
ती परत शांत तिच्या समोर उभी राहते.. तिला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत अशी जाणीव होऊन रुपाली म्हणते, "काय झाले बेटा? चॉकलेटे पाहिजे?" मन हलवून ती नाही म्हणते तिच्या डोळ्यात बघत ती विचारते, "मी तुम्हाला काय म्हणू?"
"थोडा विचार करून रुपाली म्हणते तुला जे म्हणावे वाटेल ते म्हण, ओके?" तिच्या चेहऱ्यावर हसू पसरते "मी तुम्हाला नवीन आई म्हणू?" रुपाली च्या काळजात ऐक तीर घुसल्याची वेदना होते "नवीन आई..." ती आपले अश्रू लपवत तिला होकार देते... क्यू आनंदाने तिला बाय करत सगळ्यांसोबत जाऊन गाडीत बसते.

रुपाली ला क्यू चे निरागस बोल लक्षात राहतात, "आई म्हणायची.... फ्रँड होणार? नवीन आई!!" ती अयुष च्या आई जवळ जाऊन विचारते, "आई, ऐक विचारू?" त्या विचार म्हणतात तेव्हा रुपाली पुढे विचारते  "क्यू च्या आई ला काय झाले होते?"
त्या प्रश्नांनी सगळे देसाई मंडळी शांत होतात, जणू आज च्या आनंदाला विरझण घातले त्या प्रश्नाने  "तिने आत्महत्या केली होती...." शांतता मोडत अयुष म्हणाला आणि गाडी सुरु करून तो गाडी काढतो.... तीला पुढे काही बोलायचे असेल किंवा काही हि न बोलता निघून जातात.

आत्महत्या?क्यू च्या आई नि आत्महत्या केलेली...? का? रुपाली ला हे सत्य पाचटाचा नाही इतक्या लहान मुलीचा विचार तरी करायला हवा होता... ऐक आई आपल्या ३ वर्षाच्या लहान मुलीचा विचार हि नाही करणार आत्महत्या करण्याआधी?
रुपाली चे मन सैर वैर धावत होते, प्रश्नांनी कल्लोळ केलेला तिच्या मनात ..... तिच्याच नाही तर रंजीत आणि शिवणीच्या हि मनात ह्या प्रश्नांनी घर केलेले... आपले काही चुकले तर नाही असे दोघांच्या हि चेहऱ्यावर लिहिले होते!

क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा? काय वाटते तुम्हाला?

१. काय करणं असेल क्यू च्या आई चे आत्महत्येचे?
२. काय देसाई मंडळी तितकेच चांगले आहेत जितके दाखवतायेत?
३. रुपलाई ने लग्नाला होकार देऊन चूक तर नाही केली?
४. काय रंजीत ने मुंबई ला जाऊन त्यांचे घर बघायला हवे होते?

तुम्हाला ह्या प्रश्नांची काय उत्तरं वाटते ते सांगा... बाकी सर्व प्रश्नांचे उत्तर लवकरच मिळतील वाचत रहा.. ती लाजते जेव्हा... पर्व २

आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...